Halloween Costume ideas 2015

धार्मिक भेदभावाचा आर्थिक प्रगतीवर दुष्परिणाम-४

कोरोना इफेक्ट–IV

स्वयंरोजगारी संबंधित व्यवसायात केंद्रीकरण-
स्वयंरोजगारीच्या व्यवसायात कार्यरत असलेल्या मुस्लिम कामगारांच्या व्यवसायात कार्यरत असलेल्या मुस्लिम कामगारांचा उच्च सहभाग हे मोठे उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे. शहरी विभागात आणि स्त्री-कामगारांच्या बाबतीत हे विशेषत: खरे आहे. एकत्रित विचार केला असता, तीन स्वयं-नियुक्त वर्गवारीमध्ये एकूण मुस्लिम श्रमशक्तीच्या सुमारे ६१ टक्के (हिंदू कामगारांच्या सुमारे ५५ टक्के याशी तुलना करता) कामगारांचा समावेश आहे. शहरी विभागामध्ये मुस्लिमांचा समभाग ५७ टक्के आहे, तर हिंदूंचा ४३ टक्के आहे. स्त्रियांमध्ये हा समभाग मुस्लिमांच्या बाबतीत ५३ टक्के एवढा उच्च आहे आणि हिंदूंच्या बाबतीत ६० टक्के आहे. आपण नंतर बघणारच आहोत की, स्वयंरोजगारीमध्ये बिगर-शेती व्यवसायाशी तुलना करता मुस्लिम हे शेतकी क्षेत्रात कमी व्यस्त आहेत. मुस्लिम जमातीमध्ये स्वयंरोजगारीवर अवलंबून राहणे हे सर्वसामान्य मुस्लिम (५९ टक्के) यांच्यापेक्षा ओबीसी (६४ टक्के) यांच्यामध्ये अधिक उच्च आहे. (प्रकरण १० पहा) हिंदूंमध्ये स्वयंरोजगारीवर अवलंबून राहण्याचे प्रमाण अनुसूचित जाती-जमाती (४२ टक्के) यांच्या बाबतीत सापेक्षतेने फार कमी आहे. ओबीसी (५१ टक्के) आणि हिंदू उच्चवर्णीय (५५ टक्के) यांच्या बाबतीत बरेच उच्च आहे. स्वयंरोजगारीशी संबंधित व्यवसायांमधील उच्च सहभाग गृहित धरून अन्य सामाजिक-धार्मिक गटवारीपेक्षा मुस्लिमांच्या बाबतीत भांडवलाची उपलब्धता अधिक निर्णायक असते.

पगारी नोकरीत कमी सहभाग-
कामगार म्हणून मुस्लिम सर्वसामान्यपणे नैमित्तिक कामगार म्हणून काम करतात. अनुसूचित जाती-जमातीच्या कमागाराप्रमाणेच मुस्लिम कामगारांचे पगारी व्यवसायातील सहभाग (सार्वजनिक आणि खाजगी या दोन्ही क्षेत्रांत) अगदीच कमी आहे. एकत्रित संख्येत २५ टक्के हिंदू-उच्चवर्णीय कामगार नियमित सेवेत कार्यरत आहेत, तर अशा प्रकारच्या व्यवसायांत फक्त १३ टक्के मुस्लिम कामगार कार्यरत आहेत. अनुसूचित जाती-जमातीच्या कामाच्या दर्जातील नैमित्तिक कामाच्या वर्चस्वाचे चित्र अगदी अंध:कारयुक्त आहे, त्यामध्ये पुष्कळसे म्हणजे या गटात अशा प्रकारचे काम करणारे ४६ टक्के कामगार आहेत.
नियमित नोकरी मिळण्याचा अभाव, खासकरून सार्वजनिक क्षेत्रामध्ये ही मुस्लिम लोकांमध्ये एक चिंतेची बाब ठरलेली आहे. वर सूचविल्याप्रमाणे नियमित नोकरीच्या बाबतीत मुस्लिमांची स्थिती जर का आपण एकत्रित आकडेवारी आणि पुरुष आणि स्त्री-कामगारांची स्वतंत्रपणे तुलना केली तर ओबीसी आणि अनुसूचित जाती-जमातीच्या हिंदूंपेक्षा ती फारशी भिन्न वाटत नाही. तथापि शहरी विभागातील कामगारांच्या कामाच्या दर्जाचे विभाजन सूक्ष्मपणे अशी माहिती निदर्शनास आणते की, नियमित नोकरीमधील मुस्लिमांचा सहभाग हा परंपरेने दुर्लक्षित राहिलेल्या अनुसूचित जाती-जमातीबरोबर सुद्धा तुलना केली असता, अगदीच मर्यादित वाटतो. फक्त सुमारे २७ टक्के शहरी विभागातील मुस्लिम कामगार नियमित कामामध्ये व्यक्त आहेत, तर अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी आणि हिंदू उच्चवर्णीय वर्गामधील अशा कामगारांचा समभाग हा अनुक्रमे ४०, २६ आणि ४९ टक्के आहे.
नियमित कामगार हे लहानसहान असंघटित उद्योगामध्ये सुद्धा आढळून येतात. तथापि मोठ्या उद्योगातील नियमित नोकरी ही अधिक स्थिर आणि किफायतशीर असते. सामाजिक सुरक्षितता आणि अन्य फायद्यांमुळे अशा नोकऱ्यांची सामान्यपणे सर्वचजण अभिलाषा करतात. भिन्न-भिन्न गटवारीतील नियमित कामगारांचा केवढा भाग सरकारी, सार्वजनिक विभाग आणि खाजगी, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांमध्ये काम करीत असतो? २४ टक्क्यांपेक्षाही कमी नियमित मुस्लिम कामगार हे सार्वजनिक क्षेत्रात किंवा शासकीय सेवेत नोकरीला आहेत. अन्य सामाजिक-धार्मिक गटवारीबाबत हे सापेक्ष प्रमाण बरेच उच्च आहे, तर सुमारे ३९ टक्के नियमित अनुसूचित जाती-जमातीचे कामगार अशा प्रकारच्या सेवेत कार्यरत आहेत, हिंदू-उच्चवर्णीय आणि हिंदू-ओबीसी कामगारांचा समभाग हा अनुक्रमे ३७ आणि ३० टक्के एवढा आहे. मोठ्या खाजगी उद्योगामधील (खाजगी आणि सार्वजनिक मर्यादित) नियमित नोकऱ्यांचा समभाग हा हिंदू अनुसूचित जाती-जमाती कामगार सोडून सर्वांत कमी समभाग असणाऱ्या मुस्लिमांबाबत सारखाच नमुना दर्शवितो. या मनोवांछित व्यवसायामध्ये मुस्लिम कामगारांचा समभाग हा सर्वात कमी आहे. अनुसूचित जाती-जमातींच्या कामगारांचा शासकीय सेवेतील बऱ्याच मोठ्या प्रमाणातील सहभाग हा उठून दिसतो. या गटाकरिता नोकरीच्या आरक्षणाच्या सकारात्मक भेदभावाच्या धोरणाचा हा बहुधा परिणाम असावा. शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील अंगिकृत व्यवसायांत रोजगार
शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील सेवेमध्ये मुस्लिमांचा कमी समभाग हा भिन्न-भिन्न शासकीय खात्यांनी आणि अंगिकृत सार्वजनिक व्यवसायांनी समितीस पुरविलेल्या आकडेवारीमध्ये प्रतिबिंबित झालेला आहे. प्रकरण ९ मध्ये अधिक सविस्तरपणे याचे विश्लेषण झाले आहे. बहुसंख्य शासकीय खात्यामध्ये आणि अंगिकृत सार्वजनिक क्षेत्रामध्ये मुस्लिम कामगारांचा समभाग हा ५ टक्क्यांपेक्षा अधिक नाही, हे येथे नमूद करण्यास पुरेसे आहे. राज्य शासकीय खात्याकडून आणि राज्य पातळीवरील अंगिकृत सार्वजनिक क्षेत्राकडून मिळालेली माहिती असे दर्शविते की, केंद्रीय पातळीपेक्षा मुस्लिमांचे काहीसे उच्च प्रतिनिधित्व राज्य स्तरावर आहे. तथापि सविस्तर माहिती स्पष्टकरते की, मुस्लिम, ओबीसी, अनुसूचित जाती-जमातींमधील सार्वजनिक क्षेत्रातील कामगारांचे, हिंदू उच्चवर्णीय कामगारांचा सहभाग उच्चपदांमध्ये अधिक आहे. अशा कामगारांशी तुलना करता त्यांची कनिष्ठ पातळीवरील पदांमध्ये सापेक्षतेने अधिक संख्या आहे. कोणत्याही अखिल भारतीय नागरी सेवेमध्ये (केडर) मुस्लिमांचा समभाग ५ टक्क्यांहून अधिक नाही.

उद्योगाच्या प्रकाराने आणि कामाच्या स्थानाने कामगारांचे विभाजन-
मुस्लिम कामगार हे अधिक संख्येने स्वयंरोजगारीच्या व्यवसायात कार्यरत आहेत, त्या पाठोपाठ नैमित्तिक मंजुरी यामध्ये आणि नियमित नोकरीमधील त्यांचा सहभाग खासकरून सार्वजनिक / शासकीय क्षेत्रामध्ये फारच मर्यादित आहे.
शासकीय / सार्वजनिक क्षेत्र आणि सार्वजनिक / खाजगी मर्यादित कंपन्यांमध्ये औपचारिक क्षेत्राचा समावेश होतो आणि उरलेल्या वर्गवारीमध्ये अनौपचारिक क्षेत्राचा समावेश होतो. म्हणून या सर्व वर्गवारी आपणास अनौपचारिक /औपचारिक फरकाची माहिती देतात आणि शासकीय रोजगाराची अधिक चांगली आकडेवारीसुद्धा पुरवितात. वर उल्लेखिलेल्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये नियमित नोकरीच्या आकडेवारीमध्ये नैमित्तिक कामाचा समावेश केलेला नाही. पण ते शासकीय क्षेत्रामध्ये उपलब्ध आहे. त्याअर्थाने शासकीय नोकऱ्यांची आकडेवारी ही अधिक सर्वसमावेशक आहे.

स्वत:च्या मालकीच्या अनौपचारिक उद्योगामधील गर्दी-
स्वयं-रोजगारावर अवलंबून राहण्याच्या सरासरीपेक्षा मुस्लिमांची सरासरी अधिक उच्च आहे. यापूर्वीच्या या निर्णयाशी सुसंगतपणे निरनिराळ्या सामाजिक-धार्मिक गटवारीसाठी उद्योग-प्रकारांनी श्रमिकांचे विभाजन असे दर्शविते की, मुस्लिम कामगारांचा एक ठळक मोठा भाग हा लहान-सहान मालकी हक्काच्या उद्योगांमध्ये कार्यरत झालेला आहे आणि त्यांचा औपचारिक क्षेत्रांतील रोजगारातील सहभाग हा ठळकपणे राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे.
•    अन्य सर्व सामाजिक-धार्मिक गटवारीशी तुलना केली असता मुस्लिमांचा बराचसा मोठा भाग (पुरुष आणि स्त्रिया दोन्हीही) स्वत:च्या मालकीहक्काच्या उद्योगामध्ये काम करीत असतो. शहरी विभागात तरी खासकरून असेच दिसते.
•    स्त्रियांच्या मालकीहक्काच्या स्वत:च्या उद्योगामधील स्त्री-कामगारांचा सहभाग हा मुस्लिमांच्या बाबतीत ठळकपणे अधिक उच्च आहे. याचा अर्थ असा होतो की, स्त्रियांनी चालविलेल्या स्वत:च्या मालकीच्या उद्योगधंद्याचे वर्चस्व अन्य सामाजिक-धार्मिक गटवारीपेक्षा मुस्लिमांमध्ये अधिक उच्च आहे. तथापि, मुस्लिम स्त्रियांचे उद्योग हे प्रामुख्याने घरातल्या घरात चालणारे असल्यामुळे, ते दुय्यम कराराने चालणाऱ्या कामामध्ये ठराविकपणे गुंतलेले असतात, परिणामी त्यांच्या उत्पन्नाची पातळी कमीच असते.
•    सार्वजनिक क्षेत्र किंवा शासकीय क्षेत्र यामधील मुस्लिम कामगारांचा सहभाग हा सर्व सामाजिक-धार्मिक गटवारीमध्ये सर्वांत कमी आहे. उदा॰ मुस्लिम पुरुष कामगारांमध्ये ६ टक्क्यांपेक्षा कमी अशा कामामध्ये कार्यरत असतात, हेच प्रमाण सर्व पुरुष कामगारांसाठी १० टक्के आहे आणि सर्व हिंदू पुरुष कामगारांसाठी १३ टक्के आहे. अशा कामांतील ओबीसी आणि अनुसूचित जाती-जमातीच्या कामगारांचा समभाग सुद्धा मुस्लिमांपेक्षा उल्लेखनीयरीत्या अधिक उच्च आहे.
शहरी आणि ग्रामीण या दोन्ही विभागांमध्ये स्त्री कामगारांच्या बाबतीत अशाच प्रकारच्या स्थितीचे वर्चस्व आहे. अन्य सामाजिक-धार्मिक गटवारीशी तुलना करता, अनौपचारिक क्षेत्रातील उद्योगांमधील मुस्लिम कामगारांचा सहभाग हा बराच उच्च आहे. उदा॰ २१ टक्क्यांच्या राष्ट्रीय सरासरीशी तुलना करता मुस्लिम कामगारांच्या ८ टक्क्यांपेक्षाही कमी लोक शहरी विभागातील औपचारिक क्षेत्रामध्ये कामावर नेमले गेले आहेत. हिंदू ओबीसी आणि अनुसूचित जाती-जमातीच्या कामगारांचा शहरी विभागातील अशाच प्रकारच्या कामातील समभाग हा अनुक्रमे १८ आणि २२ टक्के एवढा उच्च आहे. ग्रामीण भागामध्ये पुरुष आणि स्त्री कामगारांच्या बाबतीत त्या नमुन्याचे वर्चस्व दिसून येते.
-(क्रमश:)

- शाहजहान मगदुम
कार्यकारी संपादक, ‘शोधन’.
मो.: ८९७६५३३४०४

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget