Halloween Costume ideas 2015

सत्यपाल महाराजांसह विविध धर्मगुरूंनी भाग घेतला ऑनलाईन ईदमिलनात

औरंगाबाद (प्रतिनिधी)
जमाअत ए इस्लामी हिंद तर्फे देशभरात दरवर्षी रमज़ान व ईदनंतर समाजात जातीय सलोखा कायम राखण्याकरिता ईद मिलन कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यात सर्व धर्म, जात व सांप्रदायाचे लोकं एकत्रित येऊन शिरखुम्र्याचा आस्वाद घेतात, सोबतच वैचारिक मेजवाणीही असते. परंतु यंदा कोरोना, लॉकडाऊनमुळे ते शक्य नव्हतं. म्हणून जमाअत ए इस्लामी हिंद, महाराष्ट्र प्रदेशच्या संदेश विभागातर्फे रविवार 14 जून रोजी सायंकाळी 6 ते 7 दरम्यान https://www.Youtube. com/JIHMaharashtra/ तसेच https://www.facebook.com/JIHMaharashtra/ या जमाअतच्या फेसबूक पेजवर ऑनलाइन ईदमिलन कार्यक्रम लाइव्ह वसा वढलस. या लाइव्ह ईद मिलन कार्यक्रमात प्रसिद्ध सप्तखंजेरीवादक किर्तनकार माननीय सत्यपालजी महाराज, शिख समाजातील विचारवंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय सुरजीतसिंहजी खुंगर, मेत्ता सामग्गीचे संस्थापक व आंतरराष्ट्रीय बौद्ध प्रशिक्षक माननीय भिक्खु अभय पूत्रजी आणि इस्लाम अभ्यासक तसेच जमाअतच्या महाराष्ट्र प्रदेश संदेश विभाग समितीचे सदस्य प्रा. वाजेद अली खान यांनी त्यात आपले ऑनलाईन विचार मांडले आहेत. सर्वांचा अल्लाह एक आणि फक्त एकच असून त्याचेच सगळे बंदे असल्याची सर्व शिख गुरूंची शिकवण असल्याची यावेळी माहिती सुरजितसिंहजी यांनी दिली आहे. कोरोना संकटात अनेक ठिकाणी मुसलमानाचे अंतिम संस्कार हिंदूंनी तर हिंदूंचे अंत्य संस्कार मुसलमानांनी केले आहे. अशाप्रकारे मिळून मिसळून बंदुभावानंच सर्वांनी राहावं, असाच या ईद मिलनाचा संदेश आहे, असे विचार यावेळी सत्यपाल महाराजांनी मांडले. तसेच दुसर्यांचं दु:ख समजून घेणारीच व्यक्ती मोठी असल्याचं प्रतिपादन भिक्खु अभयपुत्रजींनी मांडले.
    अध्यक्षीय समारोप करतांना रमज़ानचा संबंध कुरआनाशी असून ही सृष्टी निर्मीती आहे आणि त्याच्या एकमेव निर्मात्याला ओळखणं महत्वाचं आहे, त्याने पाठविलेले सर्व प्रेषित, त्या प्रेषितांद्वारे समस्त मानवजातीकरिता पाठवलेले मार्गदर्शन स्वीकारणे लौकिक व पारलौकिक जीवनात कसे आवश्यक आहे, ते सविस्तरपणे प्रा. वाजेद अली खान यांनी यावेळी विषद केले.
‘देहसे दूरी’ असली तरीही दुरावा मात्र राहू नये, वैचारिक मंथन होऊन गैरसमजुती दूर व्हाव्यात आणि सामाजिक सद्भाव कायम राहावा, या उदात्त हेतूने मराठी भाषेत लाईव्ह होणार्‍या या ऑनलाईन  कार्यक्रमाला नेटकर्‍यांनी तसेच सर्वच स्तरातील नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला आणि अजुनही फेसबूक पेज व यु ट्युबवर सदर कार्यक्रमाच्या व्हिडिओवरील हिट्स दिवसेंदिवस वाढतच आहेत. बातमी लिहेपर्यंत ही संख्या 3139 झालेली आहे. लॉकडाऊनमध्ये ‘मेडिकल डिस्टन्स’ ठेवत असतांनाही सामाजिक प्रबोधनाचं कार्य मात्र पूर्ववत चालू राहू शकते आणि धर्मस्थळ बंद असले तरी विविध धर्मांचे धर्मगुरू वैचारिकदृष्ट्या ऑनलाईन एकत्र येऊ शकतात हेच या कार्यक्रमावरून सिद्ध झालं आहे. जमाअतच्या संदेश विभागाचे यासाठी सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. सुत्रसंचालन पत्रकार नौशाद उस्मान यांनी केले. साजीद शेख, अनवर खान तसेच खुर्रम सय्यद यांनी तांत्रिक सहकार्य केले.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget