महात्मा फुले सत्यशोधक समाजाच्या वतीने शिव राज्याभिषेक दिन साजरा.
कोल्हापूर
छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण आयुष्यच प्रेरणादायी आहे, रयतेचा राजा शिवछत्रपतीनी स्वराज्यात जाती, धर्म, कर्मकांडे,यांचे स्तोम न माजवता आदर्श राज्य पध्दतीचा पाया रचला, म्हणून शिवराज्याभिषेकसोहळा लोकोत्सव व्हावा,असे मत करवीर काशी फौंडेशनचे अध्यक्ष सुनीलकुमार सरनाईक यांनी व्यक्त केले.कोष्टी गल्ली, मंगळवार पेठ येथील महात्मा जोतीराव फुले सत्यशोधक समाजाच्या वतीने शिव राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.त्यावेळी श्री.सरनाईक बोलत होते.प्रारंभी ज्येष्ठ कार्यकर्ते सर्जेराव चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.करवीर काशी फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनीलकुमार सरनाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी संस्थापक अध्यक्ष महेश जाधव यांनी प्रास्ताविक केले.सुनीलकुमार सरनाईक यांनी आपल्या भाषणात राज्याभिषेकाची निकड सांगुन, महत्व उद्धृत केले. आभार राजू मालेकर यांनी मानले. यावेळी प्रकाश रांगणेकर, बबन माने, राजाराम कांबळेसर, सुनील हावळ, मुरली सुतार, विश्वास खेडकर,दिपक महाडीक आदी उपस्थित होते.

Post a Comment