लातूर (प्रतिनिधी)
राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रूग्णांत भर पडत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सामाजिक जबाबदारी पाळत लातुरातील मुस्लिम समाजातर्फे ईद-उल-फित्रचे औचित्य साधून 1 लाखाचा निधी जमा करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत बुधवारी जमा करण्यात आला. निधीचा धनादेश जिलाधिकारी जी.श्रीकांत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
आजतागायत राज्यभरात 72 हजारांपेक्षा अधिक रूग्ण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यामुळे सर्वच क्षेत्रावर त्याचा परिणाम पडला. लातुरातील मुस्लिम समाजातर्फे लॉकडाऊन काळात सर्वच समाजघटकापर्यंत अन्न धान, राशन तसेच ईदचे साहित्य पोहोचविण्यात आले. तसेच ईद उल फित्रचे औचित्य साधून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी 1 लाखांचा निधी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्यामार्फत देण्यात आला. कोरोनामुळे धनादेश देताना समाजातील काही मोजकीच मंडळी उपस्थित होती.

Post a Comment