Halloween Costume ideas 2015

कोरोनाच्या कहरात विकासाची चाके रूतली

लॉकडाऊनमध्ये शिथिलता : राज्यात 91 हजारांवर पोहोचले कोरोना रूग्ण

कोरोनाच्या कहरात महाराष्ट्र सुसाट धावत आहे. राज्यात 91 हजारांवर रूग्ण पोहोचले असून, 3 हजार 289 जणांचा यात मृत्यू झाला आहे. उद्योग कोलमडले असून विकासाची चाके कोरोनात पूर्णपणे रूतली आहेत. देशाचे 30.5 लाख कोटीचे नुकसान झाले असून त्यात महाराष्ट्राचे 15.9 टक्के आर्थिक नुकसान झाले आहे. जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी व विकासाला गती देण्यासाठी लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली मात्र त्याचा परिणाम कोरोनाच्या रूग्णसंख्या वाढण्यात होत आहे.
    जगभरात 72 लाख 68 हजार 033 कोरोनाबाधितांची संख्या झाली आहे. तर 4 लाख 11 हजार 348 जणांनी जग सोडले आहे. मात्र 35 लाख 77 हजार 228 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आपल्या देशात 2 लाख 66 हजार 598 वर रूग्णसंख्या झाली असून, 7 हजार 471 जणांना मृत्यू आला आहे. समाधानाची बाब एवढी आहे की, बाधित बरे होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, आतापर्यंत 1 लाख 29 हजार 313 जण बरे झाले आहेत. राज्यातील 36 हजार 623 नोंदणीकृत उद्योगांपैकी फक्त 9 हजार 54 उद्योग  सुरू आहेत. त्यामुळे विकासाची चाके पूर्णपणे कोरोनाने आपल्या कवेत घेतली आहेत.
राज्यात 28 लाख 54 हजार नोंदणीकृत कामगार असून, 4 लाख 92 हजार 972 कामगार कामावर रूजू झाले आहेत. तर 23 लाख 61 हजार कामगार कामाच्या प्रतीक्षेत आहेत. व्यापारावर कोरोनाचे सावट दिसून येत आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्याने सर्वच दुकाने उघडली असली तरी व्यापारात उठाव येत नाही. अति गरज असेल तरच नागरिक बाहेर पडत असल्याने किरकोळ बाजारावर याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. अजूनही राज्य व परराज्यातील वाहतूक बंद असल्याने मालाची ने-आण बंदच आहे. त्यामुळे उपलब्ध मालाची दुकानदार चढ्या दराने विक्री करीत आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, औरंगाबाद,  सोलापुरात या मुख्य शहरात कोरोनाची लागण झपाट्याने होत आहे. हीच राज्यातील मोठी शहरे आहेत,  जिथे कारखानदारी आणि व्यापार मोठ्या प्रमाणात चालतोे.   
    कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे 30.3 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 20 लाख कोटींच्या कोविड -19 च्या मदत पॅकेजपेक्षा 50 टक्के जास्त असल्याचे एसबीआय इकोरॅपने जाहीर केलेल्या ताज्या अहवालात म्हटले आहे. केंद्राने म्हटले आहे की, राज्यातील जिल्हानिहाय आणि झोननिहाय जीएसडीपीत कोव्हिड-19 मुळे 30.3 लाख कोटी रूपयांचा तोटा झाला आहे. जो एकूण जीएसडीपीच्या 13.5 टक्के असल्याचे अहवालात म्हटले आहे. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की कोरोना व्हायरसमुळे दोन महिन्यांपासून लॉकडाउन लादल्यामुळे नुकसानीचा अधिकृत अंदाज आला नव्हता. जीडीपीमध्ये नुकसानीची सर्वाधिक संख्या असलेल्या राज्यात अनुक्रमे महाराष्ट्र, तामिळनाडू आणि गुजरात यांचा समावेश आहे. राज्यनिहाय विश्‍लेषण असे दर्शविते की, पहिल्या 10 राज्यात 75 टक्के जीडीपीचे नुकसान झाले आहे. त्यात महाराष्ट्राचा 15.6 टक्के एकूण नुकसान झाले आहे.  तसेच तामिळनाडू 9.4 टक्के, गुजरात 8.6 टक्के. या तिन्ही राज्यात सर्वाधिक कोव्हिड 19 चे रूग्ण आहेत, असे एसबीआय ग्रुपचे चीफ इकॉनॉमिक अ‍ॅडव्हायझर कांती घोष म्हणाल्या.  सर्वसाधारणपणे जीडीपी आणि जीव्हीए विकास दरामधील फरक फारसा मोठा नसतो, परंतु या वेळी निव्वळ अप्रत्यक्ष कराच्या मोठ्या नुकसानीमुळे फरक बराच मोठा होईल. आमचा अंदाज आहे की, आर्थिक वर्ष 2021 पर्यंत जीव्हीएमधील वाढ 3.1 टक्के होईल तर वास्तविक जीडीपीमध्ये  6.8 टक्के होईल, असेही अहवालात म्हटले आहे. एकंदर कोरोनाच्या विळख्यातून निघण्यासाठी प्रत्येकाला सतर्क रहाणे आवश्यक आहे.

- बशीर शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget