Halloween Costume ideas 2015

सूरह यूसुफ : ईशवाणी (सुबोध कुरआन)


(३४) त्याच्या पालनकर्त्याने त्याची प्रार्थना स्वीकारली आणि त्या स्त्रियांच्या चाली त्याच्यापासून टाळल्या,२९ नि:संशय तोच आहे जो सर्वांचे ऐकतो आणि सर्वकाही जाणतो.’’ 

(३५) मग त्या लोकांना कल्पना सुचली की एका कालावधीसाठी त्याला कैद करावे वस्तुत: त्यांनी (त्याच्या निष्कलंकतेचे व आपल्या स्त्रियांच्या स्वैरपणाचे) स्पष्ट संकेत पाहिले होते.३० 

(३६) तुरुंगात आणखी३१ दोन गुलाम त्याच्याबरोबर दाखल झाले.३२ एके दिवशी त्यांच्यापैकी एकाने सांगितले, ‘‘मी स्वप्न पाहिले आहे की मी दारू गाळीत आहे.’’ दुसऱ्याने सांगितले, ‘‘मी पाहिले की माझ्या डोक्यावर भाकरी ठेवल्या आहेत आणि पक्षी त्या खात आहेत.’’ दोघांनी सांगितले, ‘‘आम्हाला याचे भाकित सांगा, आम्ही पाहतो की आपण एक सदाचारी मनुष्य आहात.’’३३ 

(३७) यूसुफ (अ.) ने सांगितले, ‘‘येथे जे जेवण तुम्हाला मिळते ते येण्यापूर्वी मी तुम्हाला या स्वप्नांचे भाकित सांगेन. हे त्या ज्ञानापैकी आहे जे माझ्या पालनकर्त्याने मला प्रदान केले आहे. वस्तुस्थिती अशी आहे की मी त्या लोकांचा मार्ग सोडून जे अल्लाहवर श्रद्धा ठेवीत नाहीत व परलोकचा इन्कार करतात, 

(३८) आपले वडिलधारी इब्राहीम (अ.), इसहाक (अ.) आणि याकूब (अ.) यांचा मार्ग अनुसरला आहे. आमचे हे काम नव्हे की आम्ही अल्लाहबरोबर एखाद्याला भागीदार ठरवावे. खरे पाहता ही अल्लाहची कृपा आहे आमच्यावर व सर्व मानवांवर (की त्याने आपल्याखेरीज अन्य कोणाचाही दास आम्हाला बनविले नाही) परंतु बहुतेक लोक कृतज्ञ बनत नाहीत.



२९) दूर करणे या अर्थाने की पैगंबर यूसुफ (अ.) यांच्या सत्चरित्राला अशी दृढता प्रदान केली की ज्याच्या मुकाबल्यात त्या स्त्रियांच्या सर्व चाली विफल झाल्या. तसेच या अर्थानेसुद्धा की अल्लाहच्या इच्छेने तुरूंगाचा दरवाजा त्यांच्यासाठी खोलला गेला. 

३०) अशाप्रकारे यूसुफ (अ.) यांना कैदेत टाकले जाणे खरे तर त्यांचा नैतिक विजय आणि इजिप्त्च्या शासकवर्गाचा नैतिक पराजय होता. आता पैगंबर यूसुफ (अ.) अनोळखी मनुष्य राहिले नव्हते. संपूर्ण देशात ते सामान्यजनात व असामान्यजनात लोकप्रिय झाले होते. घडलेल्या घटनेची चर्चा घराघरात होत होती. लोकांनी यूसुफ (अ.) यांची सच्च्रित्रता आणि पवित्र जीवनाविषयी जाणून घेतले होते. लोकांना हेसुद्धा माहीत होते की यूसुफ (अ.) यांना अपराधापोटी तुरूंगामध्ये टाकले गेलेले नाही. इजिप्त्मधील सरदारांनी त्यांच्या बायकांना काबूत ठेवण्याऐवजी या निर्दोषाला तुरूंगामध्ये पाठविणे सोईचे वाटले. त्यांच्या बायकांना काबूत ठेवणे त्यांच्यासाठी कठीण काम होते. याने हे ज्ञात झाले की एखाद्याला त्याचा अपराध न्यायालयात सिद्ध होण्यापूर्वीच कैदेत टाकणे हे कृत्य भ्रष्ट शासकांची जुनी पद्धत आहे. आजच्या काळातील शैतान प्राचीन काळाच्या दृष्ट लोकांपेक्षा काही वेगळे नव्हते. 

३१) जेव्हा पैगंबर यूसुफ (अ.) यांना कैद करण्यात आले तेव्हा त्यांचे वय २०/२१ वर्षाचे होते. तलमूदचे वर्णन आहे की कैदेतून सुटून ते जेव्हा इजिप्त्चे शासनाधिकारी बनले तेव्हा त्यांचे वय तीस वर्षाचे होते. कुरआननुसार ते कैदेत अनेक वर्ष राहिले होते. `बिनअसीनीन' हा अरबी शब्द दहापर्यंत संख्येसाठी वापरला जातो.

३२) हे दोन गुलाम कैदखान्यामध्ये पैगंबर यूसुफ (अ.) यांच्यासह दाखल झाले होते. यांच्याविषयी बायबलचे कथन आहे की त्यांच्यापैकी एक इजिप्त्च्या बादशाहांना मदिरापान करणाऱ्यांचा सरदार होता आणि दुसरा शाही भोजनालयाचा अधिकारी होता. 

३३) यावरून अनुमान केले जाऊ शकते की कैदेत पैगंबर यूसुफ (अ.) यांना कोणत्या दृष्टीने पाहिले जात होते. वर ज्या घटनांचा उल्लेख झाला आहे, त्यांना दृष्टीत ठेवल्याने हे आश्चर्यकारक वाटत नाही की या दोन कैद्यांनी पैगंबर यूसुफ (अ.) यांनाच स्वप्नफळ का विचारले? त्यांनी यूसुफ (अ.) यांच्या सेवेत श्रद्धाभाव का दाखविला की आम्हाला माहीत आहे की तुम्ही एक सदाचारी आहात. कैदेत आणि कैदेबाहेर सर्वजण जाणत होते की तो सदाचारी माणूस आहे, अपराधी नव्हे. त्यांनी कठीणतम स्थितीत ईशपरायणतेचे प्रमाण दिले आहे. आज संपूर्ण देशात याच्यासारखा भला माणूस दुसरा कोणीही नाही. तसेच देशातील सर्व धर्मगुरुंमध्येसुद्धा असा भला माणूस आढळत नाही. म्हणूनच कैदी लोकच त्यांना फक्त श्रद्धाभावाने पाहात नव्हते तर कारागृहातील अधिकारीवर्ग  आणि कर्मचारीवर्गसुद्धा त्यांच्याशी प्रभावित झाला होता. बायबलचे वर्णन आहे, `कारागृहातील जेलरने सर्व कैद्यांना यूसुफ (अ.) यांच्या सुपूर्द केले. सर्वजण त्यांचे आदेश पाळत. अशाप्रकारे जेलर आपल्या कामाविषयी निश्चिंत होता. (उत्पत्ति-३९ : २२,२३)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget