Halloween Costume ideas 2015

‘आयटा महाराष्ट्राची’ आपल्या ध्येयाकडे यशस्वी वाटचाल

महाबळेश्वर येथे शिक्षकांचे ’अज़्म-ए-नव’ प्रशिक्षण शिबीर उत्साहात


महाबळेश्वर (जि.सातारा)

 देशात शैक्षणिक क्रांती घडवण्याचा ध्यास घेऊन अविरतपणे प्रयत्न करणारी शिक्षकांची राष्ट्रव्यापी संघटना ऑल इंडिया ऑल टीचर्स असोसिएशन (आयटा ) आजच्या शैक्षणिक , सामाजिक वास्तवाचा गांभीर्याने विचार करणे हे आपले राष्ट्रीय दायित्व समजून  याबाबत विचारमंथन व विवेकशील कृतींसाठी नियोजन बद्ध पुढाकार घेते. शिक्षकांनी काळानुसार अद्ययावत असावे  व उपक्रमशीलता आपल्या अंगी बाणवावी व तसेच आदर्श बनावे आणि आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी म्हणून  आयटा वेळोवेळी शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करते. याचाच एक भाग म्हणून आयटा महाराष्ट्रा तर्फे महाबळेश्वर येथे 16 ते 19 में 2022 दरम्यान अज़्म-ए-नव  प्रशिक्षण शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात अब्दुल रहीम शेख (राष्ट्रीय अध्यक्ष, आयटा), अस्लम फेरोज़ (राष्ट्रीय सचिव), सय्यद शरीफ (राज्य अध्यक्ष ), मोहम्मद अतीक़ शेख (राज्य सचिव), रियाज़ुल ख़ालिक़ ( राज्य उपाध्यक्ष), प्रा. ज़ियाउर रहमान अन्सारी (मुंबई), अब्दुल क़वी फलाही (औरंगाबाद) व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी आयटा महाराष्ट्राच्या सल्लागार व इतर समित्यांचे सदस्य व तसेच सबंध राज्यातून आलेले आयटाचे जिल्हा अध्यक्ष व सचिव यांना मान्यवरांनी संबोधित केलं.

अब्दुल रहीम शेख (राष्ट्रीय अध्यक्ष, आयटा) आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, आयटा देशातील शिक्षकांची एकमेव अशी संघटना आहे जे शिक्षकांना आपली जबाबदारी प्रभावीपणे शाश्वत पद्धतीने पूर्ण करण्यासाठी प्रेरित करते. विद्यार्थ्यांचं भविष्यच घडवायचं नाही ; तर त्यांना भविष्यासाठी घडवायचं आहे. या दृष्टिकोनातून शिक्षकांनी कर्तव्यनिष्ठतेने आणि प्रामाणिकपणे आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी.

सय्यद शरीफ (राज्य अध्यक्ष, आयटा) यांनी उपस्थितांना आवाहन केले की, देशात शैक्षणिक क्रांती घडवण्याचं आयटाचं स्वप्न असून ते साकार करण्यासाठी सर्वांनी आपापल्या जिल्ह्यातील अधिकाधिक शिक्षकांना ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोसिएशन या संघटनेशी जोडण्याचा आत्मियतेने प्रयत्न करावा. अब्दुल क़वी फलाही यांनी  क्रांतिकारी आदर्श शिक्षकांच्या इतिहासावर सविस्तर प्रकाश टाकला. तेव्हा सर्व उपस्थितांचे डोळे पाणावले. तसेच ज़ियाउर रहमान अन्सारी यांनी शिक्षकांचं व्यक्तिमत्व विकास या विषयावर सखोल असं मार्गदर्शन केलं.

सय्यद सादतुल्लाह हुसैनी (अध्यक्ष जमाते इस्लामी हिन्द ) यांनी डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून अज़्म- ए- नव या प्रशिक्षण शिबिरात उपस्थित शिक्षकांना बहुमोल असं मार्गदर्शन केलं. ते म्हणाले की, शिक्षकांनी सतत आपलं आत्मपरीक्षण करावं. झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळावी आणि आपली शैक्षणिक, बौद्धिक व तांत्रिक क्षमता वाढवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहावे असे आवाहन करीत म्हणाले की, शिक्षकांनी अध्यापनाच्या आधुनिक पद्धतींचा वापर करून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अविरतपणे प्रयत्न करत राहावे.

शिबिराच्या प्रारंभी मोहम्मद अतीक़ शेख ( राज्य सचिव, आयटा) यांनी प्रस्ताविक मांडलं तर रियाज़ुल ख़ालिक़ (राज्य उपाध्यक्ष, आयटा) यांनी प्रस्तावित कार्यांचा आराखडा  प्रस्तुत केला.

प्रशिक्षण शिबीर संपल्यानंतर सर्व शिक्षकांनी भिलार  या पुस्तकांच्या गावाला भेट दिली व तसेच महाबळेश्वर येथील विविध पर्यटन स्थळांना प्रत्यक्ष जाऊन निसर्गरम्य वातावरणाचा मनसोक्त आनंद घेतला. यावेळी राज्यभरातून आलेल्या 55 शिक्षक व शिक्षिकांनी आपली जबाबदारी प्रामाणिकतेणे प्रभावीपणे पूर्ण करण्याचा संकल्प केला.

सदरील प्रशिक्षण शिबिरात मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाचे व्हिडिओ   आयटा महाराष्ट्राच्या यू-ट्यूब चैनल वर अपलोड केले आहेत. वाचकांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोसिएशन आयटा महाराष्ट्राचे मीडिया सेक्रेटरी शेख इक्बाल पाशा यांनी केले आहे. शिबीर उत्साहात पार पडले. 


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget