Halloween Costume ideas 2015
June 2022


प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विधान आहे की या जगात जे काही प्रेषित पूर्वी होऊन गेले आहेत त्यांच्या शिकवणीत असे म्हटले आहे की ‘‘जर तुम्हाला लाज वाटत नसेल तर मग तुम्ही वाटेल ते करा.’’

(अबु उकबा, अम्रो अन्सारी, बुखारी)

याचा अर्थ असा की ज्या माणसाला कोणतेही कृत्य करताना लाज वाटत नसेल तर तो काहीही करू शकतो. कुकर्म करताना ज्या माणसाला लाज वाटत असेल तर तो असे कृत्य करणार नाही.

दुसऱ्या एके ठिकाणी प्रेषित (स.) म्हणाले की, जेव्हा अल्लाह एखाद्या माणसाला नष्ट करू इच्छितो तेव्हा तो त्याच्याकडून लाज-लज्जा हिरावून घेतो. आणि ज्या माणसाकडून हे काढून घेतले ते तर अशा माणसाला कुणी पसंत करत नाही. इतर लोक त्याची घृणा करतात. आणि जेव्हा तो माणूस या दशेला पोहोचतो तेव्हा अल्लाह त्याच्याकडून प्रामाणिकता हिरावून घेतो. तेव्हा तो इतरांशी प्रामाणिक राहत नाही. छल-कपट करतो. जेव्हा अशी व्यक्ती या दशेपर्यंत पोहोचते तेव्हा अल्लाह त्याच्याकडून दयाभावना हिरावून घेतो. अशा अवस्थेत तो भ्रष्टाचार आणि अनैतिकतेत गुरफटून जातो. या दशेपर्यंत पोहोचल्यावर अल्लाह त्याच्याकडून श्रद्धा हिरावून घेतो. आणि या अवस्थेत तो सैतानासारखा होऊन जातो.

प्रेषित (स.) म्हणतात, ‘‘लाज माणसाला भलाईकडे नेते. ज्या माणसामध्ये हे दोन गुण असतात त्याला अल्लाह पसंत करतो.’’

त्यांच्या अनुयायींनी विचारले, ‘ते दोन गुण कोणते?’

प्रेषित (स.) म्हणाले, ‘‘शालीनता आणि लज्जा.’’

अनुयायींनी पुन्हा विचारले, ‘ह्या गोष्टी आधीपासूनच आहेत की आताच आहेत.’

प्रेषित (स.) यांनी उत्तर दिले, ‘‘हे पूर्वीपासूनच आहेत.’’

प्रेषित (स.) यांनी आणखी एके ठिकाणी असे म्हटले आहे, ‘‘अल्लाहशी अशा प्रकारे लज्जा बाळगा जसे तुम्ही घरातल्या वडीलधारी माणसांसमोर लज्जा बाळगता. अल्लाहपासून लाजण्याचा अर्थ असा की आपल्या डोक्यामध्ये आणि पोटात वाईट आणि निषिद्ध गोष्टी जाऊ देऊ नका. आणि सदैव मृत्यू आणि परीक्षेची आठवण ठेवत राहा.’’

एक अनुयायी प्रेषित (स.) यांच्याकडे ज्ञानाच्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी आले आणि त्यांच्यासमोर उभे राहिले आणि म्हणाले, ‘आपण मला कोणत्या गोष्टीचे आचरण करण्याची शिकवण देता?’

प्रेषित (स.) यांनी उत्तर दिले, ‘‘नेकी करा. वाईटांपासून अलिप्त राहा आणि लोकांना तुमच्यमधील कोणत्या गोष्टी आवडतील ते पाहा आणि त्यानुसारच कार्य करत राहा. लोकांना तुमच्या काही गोष्टी आवडल्या नसतील तर त्या सोडून द्या.’’

प्रेषित मुहम्मद (स.) नेहमी अशी प्रार्थना करत होते की ‘‘हे अल्लाह, आमच्यामध्ये आपली इतकी भीती निर्माण कर जी आपत्तीपासून आम्हाला वाचवील आणि अशा प्रकारे आचरण करण्याची आम्हास क्षमता प्रदान कर जी तुझ्यावर प्रेम करण्यापर्यंत आम्हाला पोहोचविण्यात आमची मदत करील.’’

(संदर्भ- ह. अब्दुल्लाह बिन उमर (र.))

संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद



(६)...आणि तुला गोष्टींच्या तळापर्यंत पोहोचण्याचे शिकवील. आणि तुझ्यावर व याकूब (अ.) च्या संततीवर आपली देणगी त्याचप्रकारे पूर्ण करील ज्याप्रकारे यापूर्वी त्याने तुझे वाडवडिल इब्राहीम (अ.) व इसहाक (अ.) यांच्यावर केलेली आहे. निश्चितच तुझा पालनकर्ता सर्वज्ञ व बुद्धिमान आहे.’’ 

(७) वस्तुस्थिती अशी आहे की यूसुफ (अ.) आणि त्याच्या भावांच्या या वृत्तान्तामध्ये प्रश्न करणाऱ्यांकरिता मोठा संकेत आहे. 

(८) हा वृत्तान्त असा सुरू होतो की, त्याच्या बांधवांनी आपापसांत सांगितले, ‘‘हा यूसुफ (अ.) आणि याचा भाऊ दोघे आमच्या वडिलांना आम्हा सर्वांपेक्षा अधिक प्रिय आहेत, वास्तविक पाहता आम्ही एक पूर्ण जथ्था आहोत, खरी गोष्ट अशी आहे की आमचे वडील पूर्णपणे बहकले आहेत.



६) मूळ अरबी भाषेत `तावीलुल अहादीस' शब्द प्रयोग झाला आहे. याचा अर्थ स्वप्नाचे फळ दाखविणे हाच अर्थ नाही तर एक अर्थ असाही होतो की अल्लाह तुला परिस्थितीचे ज्ञान आणि सत्यापर्यंत पोहचण्यासाठी मार्गदर्शन करील आणि ती वैचारिक दृढता तुला देईल ज्यामुळे प्रत्येक स्थितीत तू खोलात शिरून तळ गाठण्याची योग्यता प्राप्त् करशील.

७) बायबल आणि तलमूदचे वर्णन कुरआन वर्णनापासून वेगळे आहे. त्यांचे वर्णन असे आहे की पैगंबर याकूब (अ.) यांनी स्पष्ट ऐकून मुलाला रागवले आणि म्हणाले की तू असे स्वप्नसुद्धा पाहात आहेस, की मी आणि तुझी आई आणि सर्व मिळून तुला सजदा (नतमस्तक) करतील. परंतु विचारांती ही गोष्ट त्वरित समजते की पैगंबर याकूब (अ.) यांच्या पैगंबरत्वाच्या आचरणाने कुरआन स्पष्टीकरण अधिक जवळचे वाटते, बायबल आणि तल्मूदचे वर्णन मेळ खात नाही. पैगंबर यूसुफ (अ.) यांनी स्वप्न सांगितले होते. त्यांनी आपली इच्छा आणि आकाक्षांचे वर्णन काही केले नव्हते. स्वप्न जर खरे होते आणि पैगंबर याकूब (अ.) यांनी त्याचा जो अर्थ काढला त्यावरून स्पष्ट होते की ते एक खरे स्वप्न होते, म्हणूनच याचा स्पष्ट अर्थ होतो की पैगंबर यूसुफ (अ.) यांचीही इच्छा नव्हती तर अल्लाहचा तो निर्णय होता की उत्कर्ष प्राप्त् होईल. एक पैगंबराची तर लांबची गोष्ट आहे, एका समजूतदार माणसाचेसुद्धा हे काम होऊ शकते की अशा गोष्टीने वाईट वाटून घेऊन स्वप्न पहाणाऱ्याला रागवावे? काय एखादा सज्जन पिता असा होऊ शकतो काय जो आपल्या पुत्राच्या भावी प्रगतीची शुभसूचना ऐकून खूश होण्याऐवजी त्याचा द्वेष करू लागेल?

८) म्हणजे पैगंबर यूसुफ (अ.) यांचे सख्खे भाऊ बिन यामिन आहे जे यूसुफ (अ.) पासून काही वर्षानी लहान होते. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या आईचे निधन झाले होते. याच कारणामुळे पैगंबर याकूब (अ.) या दोन्ही विना आईच्या मुलांची जास्त काळजी घेत होते. याव्यतिरिक्त या प्रेमाचे आणखी एक कारण म्हणजे त्यांच्या सर्व मुलांमध्ये पैगंबर यूसुफ (अ.) हाच  समजदार आणि सौभाग्यशील असा पुत्र होता. पैगंबर यूसुफ (अ.) यांचे स्वप्न ऐकून त्यांनी जे काही सांगितले त्यावरून स्पष्ट झाले होते की ते आपल्या या पुत्राच्या असाधारण क्षमतांना चांगल्या प्रकारे जाणून होते. दुसरीकडे त्या दहा मोठ्या मुलांच्या आचरणांचा अंदाज पुढील घटनांनी होतो. मग असे आपण कसे म्हणू शकता की एक सदाचारी मनुष्य अशा दुराचारी पुत्रांशी खुश राहील? परंतु बायबलमध्ये यूसुफ (अ.) यांच्या भावांच्या द्वेषाचे एक कारण हे दाखविले गेले की ज्याने उलटा आरोप यूसुफ (अ.) यांच्यावर येतो. ही एक विटंबना आहे. बायबलमध्ये उल्लेख आहे की पैगंबर यूसुफ (अ.) भावांच्या चहाड्या वडिलांजवळ करीत होते, त्यामुळे त्यांचे भाऊ त्यांच्याशी नाराज होते.

९) या वाक्याचा भावार्थ समजण्यासाठी खेडुतांच्या भटक्या जमातीच्या जीवनाला डोळयांपुढे ठेवले पाहिजे. जेथे राज्य नसते आणि एकमेकांच्या मदतीने टोळया आपापली वसाहत करतात. तिथे एका माणसाची शक्ती त्याच्या मुलांवर, नातीपोती, भाऊ इ. वर अवलंबून असते. हे सर्व वेळेवर त्याच्या पाठीमागे उभे राहणारे `हिमायती'  असतात.  अशा  स्थितीत  स्त्रिया, मुले  यांच्यापेक्षा  माणसाला  ती  जवान मुले अधिक कामाची  वाटतात. कारण  ते वेळप्रसंगी त्याच्या पाठीशी उभे राहातात. यामुळेच या भावांनी सांगितले की आमचा बाप म्हातारपणी बावचळलेला आहे. आम्ही तरुण पुत्रांचा मजबूत गट त्यांच्या मागे वाईट प्रसंगी उभा राहू शकतो. परंतु त्याना आम्ही तरूण मुलं प्रिय नाहीत तर हे लहान दोन पुत्र प्रिय आहेत जी त्यांच्या काहीच कामी येऊ शकत नाहीत. ते तर स्वत: दुसऱ्यावर आश्रित आहेत.


कुरआन ज्या अरबी समुदायासाठी अवतरित करण्यात आला तो समुदाय इतका उख्खड  आणि क्रूर होता की, कोणी राजा सुद्धा त्यांच्यावर शासन करण्यास इच्छुक नव्हता. अशा या रानटी प्रवृत्तीच्या लोकांसमोर केवळ सुभाषितवजा सल्ला देऊन चांगले वागा! चांगले वागा! म्हणून उपयोगी ठरणारे नव्हते. तर अशा असंस्कृत समाजाला सुसंस्कृत करण्यासाठी त्यांच्याशी प्रत्यक्ष नातेसंबंध स्थापन करणे गरजेचे होते. म्हणून प्रेषित सल्ल. यांना हे विवाह करावे लागले. अशा प्रकारच्या सामाजिक आणि राजकीय कारणासाठी केवळ प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनीच असे विवाह केले होते असे नव्हे तर जगात त्या काळात तशी रीतच होती.

प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या वैवाहिक जीवनावर नुपूर शर्मा यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर जो जागतिक स्तरावर गदारोळ उडाला त्यामुळे प्रसार आणि समाज माध्यमांचे अवकाश अक्षर: ढवळून निघाले. अशा परिस्थितीत त्यांचे वैवाहिक जीवन कसे होते या संबंधी माहिती घेणे उद्बोधक ठरेल. त्यानिमित्ताने मराठी भाषिक वाचकांना हे ही कळेल की, अरबी लोकांनी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या आयुष्याच्या सर्वच पैलूंचे दस्ताऐवजीकरण (डाक्युमेंटेशन) केलेले असून त्यात त्यांच्या वैवाहिक जीवनाचाही समावेश आहे.

या संबंधात माध्यमांमधून ज्या उलट-सूलट चर्चा सुरू आहेत त्या अर्धवट किंवा चुकीच्या माहितीवर आधारित आहेत. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर त्यांच्या हयातीतच टिका करण्यात आली होती, जगात सर्वाधिक बदनामीकारक पुस्तके त्यांच्याच विरूद्ध लिहिण्यात आलेली आहेत. त्यांच्या अचंभित करणाऱ्या विजयामुळे चिडून लोक त्यांची बदनामी करत होते. कोणी त्यांना जादूगर म्हणत होता तर कोणी वेडा. मक्का शहरामध्ये 13 वर्षे कष्ट करूनही शे-दोनशे समर्थक सुद्धा गोळा न करू शकलेल्या प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी पुढच्या दहा वर्षात अवघा अरबस्थान आपल्या कवेत कसा घेतला? याचेच त्यांच्या विरोधकांना आश्चर्य वाटत असे. तत्कालीन प्रस्थापित मूर्तीपूजक, अग्नीपूजक आणि ज्यू लोकांनी प्रेषित सल्ल. यांच्या यशस्वी जीवनाकडे पाहून त्यातून निर्माण झालेल्या आसुयेमुळे त्यांना बदनाम करण्याची एकही संधी सोडलेली नव्हती. प्रेषित सल्ल. यांचे वैवाहिक जीवन तर त्यांच्या निशाण्यावर अव्वलस्थानी होते. प्रेषित सल्ल. यांचे जीवन एक आदर्श जीवन होते. त्या जीवनातून प्रलयाच्या दिवसापर्यंत जन्माला येणाऱ्या प्रत्येक मानवाचे मार्गदर्शन व्हावे म्हणून त्या जीवनाचे दस्तऐवजीकरण करून जपून ठेवण्यात आलेले आहे. 

पहिला विवाह

प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा पहिला विवाह वयाच्या 25 व्या वर्षी हजरत खतिजा रजि. यांच्या सोबत झाला. त्यावेळेस हजरत खतिजा रजि. यांचे वय 40 वर्षे होते व त्या दोन वेळेस विधवा झालेल्या होत्या. हे लग्न तेव्हाच नव्हे तर आज 21 व्या शतकातही क्रांतीकारक ठरू शकेल असेच आहे. कारण ऐन पंचेविशतील अविवाहित तरूण दोन वेळा विधवा झालेल्या व आपल्यापेक्षा 15 वर्षांनी मोठ्या असलेल्या महिलेशी विवाह करतो, ही गोष्ट त्यावेळेसही साधारण नव्हती आणि आजही साधारण नाही. दूसरी गोष्ट म्हणजे हजरत खतिजा रजि. जीवंत असेपर्यंत प्रेषित सल्ल. यांनी दूसरा विवाह केलेला नव्हता. त्यांना त्यांच्यापासून चार मुली- 1. हजरत जैनब रजि, 2. रूकैय्या रजि., 3. उम्मे कुलसूम रजि. 4. फातिमा रजि. झाल्या. 

दूसरा विवाह 

हजरत खतिजा रजि. यांच्या मृत्यूपरांत प्रेषितत्वाच्या दहाव्या वर्षी शव्वाल महिन्यामध्ये त्यांनी हजरत सौदा रजि. यांच्याशी विवाह केला. त्यापण विधवा होत्या. त्यांचे पती सुक्रान बिन उमरू यांचा नैसर्गिक मृत्यू झालेला होता. 

तिसरा विवाह 

प्रेषितत्वाच्या अकराव्या वर्षी शव्वाल महिन्यातच त्यांनी हजरत आएशा यांच्या बरोबर विवाह केला. त्या हजरत अबुबकर रजि. यांच्या कन्या होत. लग्नाच्या वेळेस त्यांचे वय किती होते. याबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. एक विचार प्रवाह असा आहे की, लग्नाच्या वेळेस त्यांचे वय 6 वर्ष होते आणि रूख्सती (सासुरवाडीला जाणे) 9 वर्षे झाल्यावर झाली. तर दूसरा विचार प्रवाह असा आहे की त्यांच्या रूख्सतीच्या वेळेचे वय 19 वर्षे होते. यांच्याच वयाच्या मुद्यावरून अनेक टिकाकारांनी ज्यात नुपूर शर्माही सामील आहे टिका केलेली आहे. वास्तविक पाहता  त्यांचे वय 9 वर्षे जरी गृहित धरले तरी हिजाज (आताचा सऊदी अरेबिया) हा अतिशय उष्ण कटिबंधीय प्रदेश असून, नवव्या वर्षी मुली आजही वयात येतात. त्यामुळे 1400 वर्षापूर्वी हे लग्न बालविवाह होता म्हणून टिका करण्यात काही हाशिल नाही. बालविवाह हा काही अपवाद नाही. आज 21 व्या शतकातही आपल्या अवतीभोवती शेकडो बालविवाह होतात. तेव्हा इतिहासामध्ये झालेल्या महापुरूषांच्या बालविवाहावर विकृत टिप्पणी करणे स्वस्थ मानसिकतेचे लक्षण खचितच नाही. 

कारण प्रेषित सल्ल. यांचे जीवन हे जागतिक नितीमत्तेचे सर्वोच्च मापदंड असल्याचे प्रशस्तीपत्र स्व: कुरआनने दिलेले आहे. या संदर्भात कुरआन म्हणतो की,’’आणि :संशय तुम्ही नीतिमत्तेच्या उच्च दर्जावर आहात. ’’ (सुरे अलकलम : 68 : आयत नं.4). त्यामुळे आता दुसऱ्या कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. ज्यांचा विश्वास कुरआनवर नाही अशा नुपूर शर्मा आणि इतर लोक या संबंधी कितीही आलोचना करोत, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचेवरील आमचे प्रेम तुसभरही कमी होणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. 

चौथा विवाह

प्रेषित सल्ल. यांनी 3 हिजरीमध्ये हजरत हफ्सा बिन्ते उमर बिन खत्ताब रजि. या मातब्बर सरदाराच्या मुलीबरोबर केला. त्याही विधवा होत्या. त्यांचे पूर्व पती खनीस बिन हजाफा सहमी रजि. हे बदर आणि ओहदच्या युद्धा दरम्यान नैसर्गिकरित्या मृत्यू पावले होते. 

पाचवा विवाह

प्रेषित सल्ल. यांनी चौथ्या हिजरीमध्ये हजरत जैनब बिन खजिमा रजि. यांच्याबरोबर पाचवा विवाह केला. त्या बनू हिलाल कबिल्याशी संबंधित होत्या. ह्या ही विधवा होत्या. त्यांचे पती अब्दुल्लाह बिन हजश रजि. हे ओहदच्या युद्धामध्ये शहीद झालेले होते. त्या फक्त 8 महिने प्रेषित सल्ल. यांच्या विवाह बंधनात राहिल्या. त्यानंतर त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला. त्यांचे पती अब्दुल्लाह बिन हजश रजि. शहीद झाल्यामुळे त्या निराधार झाल्या होत्या व आजारीही राहत होत्या. त्यांना सन्मानाने आश्रय देण्यासाठी प्रेषित सल्ल. यांनी हा विवाह केला होता. 

सहावा विवाह

प्रेषित सल्ल. यांनी सन 4 हिजरीमध्ये उम्मे सलमा हिंद बिन्ते अबि उमैय्या रजि. यांच्याशी विवाह केला. ह्या सुद्धा विधवा होत्या. त्यांचे पती अबु सलमा रजि. यांचाही 4 हिजरीमध्येच नैसर्गिक मृत्यू झाला होता. पतीच्या मृत्यूनंतर त्या निराधार झाल्या होत्या. त्यांना सन्मान आणि आधार देण्यासाठी प्रेषित सल्ल. यांनी हा विवाह केला होता. 

सातवा विवाह

हजरत जैनब बिन्ते हजश बिन रियाब रजि. ह्या कबिला बनू असदशी संंबंधित होत्या. यांचे लग्न हजरत जैद बिन हारिस रजि. यांच्याबरोबर झाले होते. ते लहानपणापासूनच प्रेषित सल्ल. यांच्यासोबत राहत असल्यामुळे लोक त्यांना प्रेषित सल्ल. यांचा मुलगा समजत होते. विवाहानंतर पती-पत्नींमध्ये तीव्र मतभेद झाल्यामुळे हजरत जैद रजि यांनी हजरत जैनब रजि. यांना घटस्फोट दिला होता. त्यानंतर प्रेषित सल्ल. यांनी ईश्वरीय आदेशावरून हजरत जैनब यांच्याशी लग्न केले. प्रेषित सल्ल. यांचे हे लग्न 4 हिजरीमध्ये झाले होते. या संदर्भातही मोठा वाद झाला होता. कारण अरबी समाजामध्ये त्यावेळेस मुलगा दत्तक घेण्याची परंपरा होती. ईश्वराला ही परंपरा मान्य नव्हती म्हणून ती तोडण्यासाठी ईश्वरीय आदेशाने हे लग्न झाले होते. याचा मोठा इतिहास आहे. या संबंधाची कारणमिमांसा ही किचकट स्वरूपाची आहे. ज्यांना या संबंधी अधिक माहिती जाणून घेण्याची इच्छा असेल त्यांनी कुरआनच्या सुरा क्रमांक 37 च्या आयत क्र. 33 संबंधिच्या तफसीर (स्पष्टीकरण) चे अवलोकन करावे.

आठवा विवाह

हजरत ज्युवेरिया बिन्ते हारिस रजि. यांचा संबंध अलमस्तलक या मातब्बर अरबी घराण्याशी होता. युद्धात त्यांना कैदी बनवून आणले गेले होते आणि त्या हजरत साबत बिन कैस बिन शमास रजि. यांच्या वाट्यात आल्या होत्या. त्यांनी एका ठराविक रकमेच्या मोबदल्यात ज्युवेरिया यांना प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्याकडे सोपविले होते. उच्च कुळातील एका कैदी महिलेला स्वतंत्र करून सन्मानाने जीवन जगण्याची संधी द्यावी म्हणून प्रेषित सल्ल. यांनी हे लग्न केले होते. हे लग्न 5 किंवा 6 हिजरीच्या शाबान महिन्यात झाले होते. 

नववा विवाह

उम्मे हबीबा रमल्ला बिन्ते अबि सुफियान रजि. या मक्का शहराच्या अत्यंत उच्चकुलीन सुफियान घराण्याच्या कन्या होत. त्यांचे लग्न अब्दुल्लाह बिन हजश यांच्याबरोबर झाले होते. त्यांनी आपल्या पतीसोबत हबश येथे हिजरतही केली होती. मात्र हबश येथे गेल्यानंतर त्यांच्या पतीने इस्लाम धर्माचा त्याग करून ख्रिश्चन धर्माची दिक्षा घेतली होती आणि त्याच अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला. मात्र उम्मे हबीबा रजि. यांनी धर्मांतर केलेले नव्हते.    उम्मे हबीबा ह्या विधवा होत्या. प्रेषित सल्ल. यांनी त्यांना आश्रय देण्यासाठी म्हणून हा विवाह केला. 

दहावा विवाह

हजरत सफिया बिन अख्तब रजि. यांचा संबंध बनी इसराईल या प्रसिद्ध कुळाशी होता आणि खैबरच्या युद्धात युद्ध बंदी म्हणून त्या कैद केल्या गेल्या होत्या. त्यांना प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी स्वतंत्र करून त्यांच्याशी विवाह केला. हा विवाह 7 हिजरी नंतर झाला. 

अकरावा विवाह

हजरत मैमुना बिन्ते हारिस रजि. यांच्याशी प्रेषित सल्ल. यांनी सातव्या हिजरीमध्येच लग्न केले. त्या सुद्धा घटस्फोटित होत्या.

 या विवाहांचे विश्लेषण

येणेप्रमाणे प्रेषित सल्ल. यांचे अकरा विवाह झाल्याबद्दल इतिहासकारांचे एकमत आहे. या ठिकाणी वाचकांना एक प्रश्न पडणे साहजिक आहे की, कुरआनमध्ये चार विवाहांची परवानगी असतांना प्रेषित सल्ल. यांनी अकरा विवाह कसे केले? या संदर्भात स्पष्टीकरण असे की, मुस्लिम पुरूषांना चार विवाहांची परवानगी नव्हे तरतूद आहे. विशिष्ट परिस्थितीमध्ये अपवाद म्हणून ते चार लग्न करू शकतात. प्रेषित सल्ल. यांंची स्थिती मात्र सामान्य मुुस्लिम पुरूषांपेक्षा वेगळी होती, त्यांच्या जीवनाचे मिशन वेगळे होते. ते मिशन पूर्ण करण्यासाठी म्हणून त्यांना अकरा विवाहाची परवानगी देण्यात आली होती. या संदर्भात अधिक विवेचन खालीलप्रमाणे -

हजरत खतिजा रजि. आणि हजरत जैनब रजि. या दोन पत्नींचा मृत्यू प्रेषित सल्ल. यांच्या हयातीत झाला व शेवटपर्यंत 9 पत्नी हयात होत्या. सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा आहे तो म्हणजे 25 व्या वर्षी लग्न झाल्यानंतर त्या पुढील तारूण्याची 30 वर्षे त्यांनी फक्त एका पत्नीसोबत म्हणजे हजरत खतिजा रजि. यांच्यासोबत घालविले. ज्या की, त्यांच्यापेक्षा 15 वर्षांनी ज्येष्ठ होत्या. अशा परिस्थितीमध्ये असे कसे गृहित धरता येईल की, तारूण्य संपल्यावर उतारवयाला लागल्यानंतर प्रेषित सल्ल. यांनी जी लग्ने केली ती (ईश्वर क्षमा करो) लैंगिक सुखासाठी केली होती. त्यातही हजरत आएशा रजि. या एकट्या कुमारिका होत्या. ही गोष्टही लक्षात घेण्याजोगी आहे. प्रेषित सल्ल. यांनी वेगवेगळ्या मातब्बर घराण्यांशी व शूरवीरांशी नातेसंबंध जोडण्यासाठी, शहीदांच्या पत्नींना आश्रय आणि सन्मान देण्यासाठी म्हणून बाकीचे विवाह केले. हजरत आएशा रजि. यांचे वडिल हे मक्का शहरातील प्रतिष्ठित कापड व्यापारी होते तर हजरत उमर बिन खत्ताब रजि. हे मक्का शहरातील अत्यंत धाडसी आणि शूर लढवय्ये होते. या दोघा सरदारांच्या मुलींशी लग्न करून प्रेषित सल्ल. यांनी त्यांच्याशी नातेसंबंध प्रस्थापित केले. अरबी समाजामध्ये जावयाला अतिशय सन्मानाच्या नजरेने पाहण्याचा प्रघात होता. जावई म्हणजे त्यांचा जीव का प्राण होता. हेच कारण होते ज्यामुळे की, प्रेषित सल्ल. यांनी मातब्बर घराण्यांशी जावाई म्हणून संबंध स्थापन केले नाही तर आपल्या मुलीसुद्धा मातब्बर सरदारांना देऊन त्यांच्याशी नातेसंबंध दृढ केले. उदा. हजरत उस्मान रजि. या श्रीमंत परंतू दानशूर सरदाराशी एका नंतर एक दोन मुली हजरत रुकैय्या रजि. आणि त्यांच्या मृत्यूनंतर हजरत कुलसुम रजि. यांचा विवाह केला. या सर्व लग्नांचे उद्देश स्व:ला राजकीय दृष्ट्या मजबूत करण्यासाठी किंवा स्व:ची राजेशाही स्थापन करण्याचा नव्हता तर ईश्वराने त्यांची इस्लामचा पैगंबर म्हणून जी निवड केली होती ती निवड सार्थ ठरविण्यासाठी व पृथ्वीवर इस्लामचा संदेश सार्वजनिक करण्यासाठी तसेच या संदेशावर आधारित एक राज्य स्थापन करण्यासाठी व त्याद्वारे प्रलयाच्या दिवसापर्यंत जन्मणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी जे ईश्वरीय मिशन त्यांना देण्यात आले होते ते मिशन पूर्ण करण्याचा मार्ग सुलभ व्हावा, यासाठी स्व:ची आणि स्व:च्या मुलींची लग्ने त्यांनी विशिष्ट अशा मातब्बर घराण्यांमध्ये केली होती आणि त्याचा परिणामही झाला. हजरत उम्मे सलमा रजि. यांच्याबरोबर लग्न होताच त्यांचा कबिला ज्यात अबु जहेल व खालीद बिन वलिद सारख्या मातब्बरांचा समावेश होता प्रेषित सल्ल. यांच्या समर्थनात आला. 

खालीद बिन वलिद एक श्रेष्ठ यौद्धे होते. इतके श्रेष्ठ की ओहदच्या युद्धामध्ये ज्याचे नेतृत्व दस्तुरखुद्द प्रेषित मुहम्मद सल्ल. करत होते, मध्ये त्यांनी मुस्लिम सैन्याचा अंश: पराभव केला होता. तसे हे खालिद बिन वलिद प्रेषित सल्ल. यांच्या विषयी फक्त नम्रच झाले नाहीत तर त्यांनी प्रेषित सल्ल. यांच्या हातावर विनाअट इस्लामचा स्वीकार केला आणि भविष्यात अनेक लढायांमध्ये नेतृत्व करून इस्लामचा झेंडा समुद्रापार नेला. हजरत जवेरिया रजि. ह्या जेव्हा प्रेषित सल्ल. यांच्या पत्नी झाल्या तेव्हा सहाबा रजि. यांनी त्यांच्या कबिल्याच्या शंभर घराण्यांना जे की युद्ध कैदी म्हणून आणले गेले होते, केवळ प्रेषित सल्ल. यांचे सासरवाडीचे लोक आहेत म्हणून स्वतंत्र करून टाकले. याचा सकारात्मक परिणाम निश्चितच इस्लामच्या प्रसारामध्ये झाला. ती सर्व घराणी भविष्यात प्रेषित सल्ल. यांच्या बाजूने ठामपणे उभी राहिली. कुरआन ज्या अरबी समुदायासाठी अवतरित करण्यात आला तो समुदाय इतका उख्खड  आणि क्रूर होता की, कोणी राजा सुद्धा त्यांच्यावर शासन करण्यास इच्छुक नव्हता. अशा या रानटी प्रवृत्तीच्या लोकांसमोर केवळ सुभाषितवजा सल्ला देऊन चांगले वागा! चांगले वागा! म्हणून उपयोगी ठरणारे नव्हते. तर अशा असंस्कृत समाजाला सुसंस्कृत करण्यासाठी त्यांच्याशी प्रत्यक्ष नातेसंबंध स्थापन करणे गरजेचे होते. म्हणून प्रेषित सल्ल. यांना हे विवाह करावे लागले. अशा प्रकारच्या सामाजिक आणि राजकीय कारणासाठी केवळ प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनीच असे विवाह केले होते असे नव्हे तर जगात त्या काळात तशी रीतच होती. अगदी आपल्या जवळचेच उदाहरण घ्यायचे म्हटल्यास छत्रपती शिवाजी महाराज यांचे उदाहरण घेता येईल. महाराजांचेही एकूण 8 विवाह उच्च घराण्यातील मुलींशी झाले होते. ज्यात सईबाई -निंबाळकर घराणे यांच्याशी लग्न बालपणीच (1640) झाले. सगुणाबाई - शिरके घराणे (1641), सोयराबाई - मोहिते घराणे (1650), पुतळाबाई-पालकर घराणे (1653), लक्ष्मीबाई-विचारे घराणे (1656), सकवारबाई-गायकवाड घराणे (1657), काशिबाई- जाधव घराणे (1657) आणि गुणवंतबाई- इंगळे घराणे (1657) यांच्याबरोबर झाले होते. येणेप्रमाणे इतिहासामधील महापुरूषांच्या लग्नांचे विषय 21 व्या शतकात आजच्या परिस्थितीमध्ये उकरून काढून त्यावर उलट-सूलट चर्चा करत बसणे म्हणजे राष्ट्रीय वेळेचा अपव्यय आहे दूसरे काहीही नाही. म्हणून वाचकांनी अशा विषयांकडे दुर्लक्ष करून देशाच्या विकासाच्या मुद्यांवर लक्ष केंद्रीत करावे. 

- एम.आय.शेख


समाज माध्यमांवर ज्या चित्रफिती फिरत आहेत त्या पाहता हे सर्व प्रकार एका व्यापक षडयंत्राचाच भाग असावा, असे समजण्यास जागा आहे. या सर्व घटनांची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. जमाअते इस्लामी हिंदची अशी धारणा आहे की, प्रयागराजमधील प्रसिद्ध सामाजिक आणि मानवाधिकार कार्यकर्ते जावेद मुहम्मद यांच्याविरूद्ध केली गेलेली कारवाईसुद्धा सूडाच्याच्या राजकारणाचे उघड उदाहरण आहे. 


नवी दिल्ली 

10 जून रोजी झारखंडच्या रांची, उत्तरप्रदेशच्या प्रयागराज आणि देशातील इतर ठिकाणावर पैगंबर मुहम्म्द सल्ल. यांच्या अवमाननासंबंधी निघालेल्या मोर्चांवर क्रूर लाठीहल्ला आणि गोळीबार केला आणि ज्यात किमान दोघांचा मृत्यू झाला आणि अनेक लोक जखमी झाले. अनेकांना अटक करण्यात आली. पैकी काही लोकांना कोठडीमध्ये बेदम मारहाण करण्यात आल्याच्या चित्रफिती पुढे आल्या आहेत. तसेच अनेकांची घरे जेसीबीनीे उध्वस्त करण्यात आली आहेत. जमाअते इस्लामी हिंद या सर्व बाबींचा निषेध करते व हे सर्व बेकायदेशीर कृत्य करणार्यांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करते. उध्वस्त केलेली घरे पुन्हा बांधून द्यावीत अशी सरकारकडे मागणी करते. या संबंधी खरोखर ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांच्या विरूद्ध कारवाई करण्याचीही मागणी करते. 

गेल्या 10 जूनला अनेक ठिकाणच्या मुस्लिमांनी आपल्या लोकशाही अधिकारांचा वापर करीत प्रदर्शने केली होती. त्यात विशेष करून उत्तर प्रदेश आणि झारखंडच्या पोलिसांनी जो काय अत्याचार  केला तो देशाच्या लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार होता. 

या संदर्भात अमीरे जमाअत सआदतुल्लाह हुसैनी यांनी मुस्लिम समाजाकडे ही अपील केलेली आहे की, लोकांनी आपल्या संवैधानिक अधिकाराचा वापर करून प्रदर्शन जरूर करावे पण शांततेच्या मार्गाने. त्यांच्या शांतपणे सुरू असलेल्या प्रदर्शनाचे निमित्त साधून शांतताभंग करणार्या तत्वांपासून समाजाने सावध रहावे. त्यांनी प्रयागराजमधील मुहम्मद जावेद यांच्या घराला उध्वस्त करण्याच्या प्रशासनाच्या कारवाईवरही नाराजी व्यक्त केली. या संदर्भात ते म्हणाले की, ज्या घटनेची सभ्य समाजामध्ये कल्पनाही केला जावू शकत नाही अशी घटना प्रत्यक्ष प्रयागराजमध्ये घडलेली आहे. हे त्या ठिकाणी नागरी प्रशासन व पोलीस स्व:च गुन्हेगारी कृत्य करून कायदा भंग करत आहे. विषेश म्हणजे जे काही प्रशासन करत आहे ते उघडपणे करत आहे.  कोणाच्या घराला फक्त याचसाठी उध्वस्त करणे की ते प्रदर्शन करत आहेत व ती प्रदर्शने सरकार आपल्या विरोधी आहे असा समज करून घेते व त्यातून अशी कारवाई होते हे चुकीचे आहे. अशा शांततापूर्ण प्रदर्शन करणार्यांना गोळ्या घालणे कुठल्याही सभ्य समाजामध्ये याची कल्पनाच केली जावू शकत नाही. हे बदल्याचे राजकारण वाटते. ते पुढे म्हणाले की, आम्ही या गोष्टींचा तीव्र शब्दात निषेध करतो. आमची अशी धारणा आहे की, प्रशासनाच्या अशा कृत्यामुळे देश आणि विदेशात आपल्या देशासंबंधी चुकीची प्रतीमा उभी राहत आहे. पोलिसांच्या अशा कृत्यामुळे समाजाच्या भावना आणखीन तीव्र होतील. त्यांच्यामध्ये बेचैनी वाढेल. अशामुळे त्यांचा प्रशासनावरील विश्वासही कमी होईल. उत्तर प्रदेश सरकारला कायद्याची थोडीजरी बूज असेल तर त्यांनी उध्वस्त घरांची नुकसानभरपाई द्यावी आणि यासाठी जबाबदार लोकांविरूद्ध कायदेशीर कारवाई करावी.

सआदतुल्लाह हुसैनी यांनी रांची मध्ये झालेल्या गोळीबाराची न्यायालयीन चौकशीचीही मागणी केली. ते पुढे म्हणाले की, प्रेषित सल्ल. यांच्या अपमानासाठी जबाबदार असणार्या लोकांवर वेळीच आणि योग्य कायदेशीर कारवाई केली गेली असती तर या सगळ्या अप्रिय घटना घडल्याच नसत्या. समाज माध्यमांवर ज्या चित्रफिती फिरत आहेत त्या पाहता हे सर्व प्रकार एका व्यापक षडयंत्राचाच भाग असावा, असे समजण्यास जागा आहे. या सर्व घटनांची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. जमाअते इस्लामी हिंदची अशी धारणा आहे की, प्रयागराजमधील प्रसिद्ध सामाजिक आणि मानवाधिकार कार्यकर्ते जावेद मुहम्मद यांच्याविरूद्ध केली गेलेली कारवाईसुद्धा सूडाच्याच्या राजकारणाचे उघड उदाहरण आहे. जावेद मुहम्मद आणि त्यांच्या घरातील सदस्यांनी 10 जूनच्या प्रदर्शनामध्ये सहभागच घेतला नव्हता. शिवाय तोडण्यात आलेले घर जावेद मुहम्मद यांच्या मालकीचे नसून त्यांच्या पत्नीच्या मालकीचे होते. म्हणून हे घर तोडणे तसेही बेकायदेशीरच असल्याचेही ते म्हणाले असल्याची माहिती प्रेस नोटद्वारे जमाअते इस्लामी हिंद मीडिया विभागाचे सय्यद तन्वीर अहेमद यांनी दिली. 


जेव्हा सरकार आपली जबाबदारी समर्थपणे पेलण्यास काही कारणामुळे असमर्थ ठरत असेल तर अशा वेळेस समाजातील श्रीमंत लोकांनी पुढे येऊन बेरोजगारीला दूर करण्याचा प्रयत्न करावयास हवा. परंतु दुर्दैवाने याची जाणीव नसल्यामुळे अनेक श्रीमंत मुसलमान असे आहेत ज्यांची संपत्ती त्यांच्या वैयक्तिक जीवनात भरभराटी आणण्यापूर्तीच उपयोगात आणली जात आहे. 


कॉलेज के सब बच्चे चुप हैं कागज की एक नाव लिए

चारों तरफ दरिया की सूरत फैली हुई बेकारी है

उर्दूमध्ये एक म्हण आहे, ’’कमाता बेटा और नांदती बेटी सबको अच्छे लगते हैं’’ एका विशिष्ट वयात आल्यानंतर प्रत्येक तरूणांकडून समाज कामधंद्याची अपेक्षा करतो.  ती अपेक्षा पूर्ण न झाल्यास तरूणांवर घरातून आणि बाहेरून इतका दबाव वाढतो की, त्याची अंतिम परिणीती बेरोजगार तरूणांच्या आत्महत्येमध्ये होते. बीबीसीच्या 11 फेब्रुवारी 2022 च्या बातमीपत्रात असे म्हटलेले आहे (जे की आजही त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे) की, राज्यसभेमध्ये गृहमंत्री नित्यानंद रॉय यांनी बेरोजगारीच्या कारणावरून तरूणांच्या आत्महत्येची माहिती देताना सांगितले की, 2018 मध्ये 2741 तर 2019 मध्ये 2851 तर 2020 मध्ये 3548 बेरोजगार तरूणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. या आकडेवारीवरून या प्रश्नाच्या भीषणतेची कल्पना येण्यास हरकत नाही. कमावते वय झाल्यानंतर बेरोजगार राहिल्यानंतर अनेक समस्यांना तरूणांना तोंड द्यावे लागते. लग्न वेळेवर होत नाही, झाले तरी अनुरूप स्थळ मिळत नाही, लग्नानंतर खर्च वाढतो, त्यामुळे त्याचा अतिरिक्त दबाव निर्माण होतो, लग्न केले नाही तर अनेक मानसिक समस्या उत्पन्न होतात, शारीरिक गरजा पूर्ण होत नसल्यामुळे पाय घसरण्याचा संभव असतो, त्यातून समाजात अनैतिकता वाढते त्यामुळे समाज नासतो, अनेक तरूण मनोरूग्ण होऊन जातात, एकांतप्रिय  होऊन जातात, परवडेल ते व्यसन करण्यास सुरूवात करतात. जे हे सर्व दबाव सहन करू शकत नाहीत ते शेवटी आत्महत्या करतात. 

तलाशे रिज्क का ये मरहला अजीब है के हम

घरों से दूर भी घर के लिए बसे हुए हैं

उर्दूत दूसरी एक म्हण आहे की, ’’सबसे बडा गम रोजगार का गम होता है’’ बेरोजगार तरूणांची न घरात किमत असते न बाहेर. फाटलेला किसा व फाटलेले नशीब घेऊन कोट्यावधी बेरोजगार तरूणांचे तांडे आज देशात भटकत आहेत. नुकतीच एक बातमी अशीही येऊन गेलेली आहे की, लाखो तरूणांनी वैफल्यग्रस्त होऊन रोजगार शोधणेच बंद केलेले आहे. असे तरूण समाजविघातक कामात सहभागी होण्याची जास्त शक्यता असते. आज याचाच अनुभव देशात होणाऱ्या जातीय दंगली, समाज माध्यमातील सांप्रदायिक मजकूर आणि टीव्हीवरील प्रक्षोभक आणि अनावश्यक चर्चांमधून येत आहे. गुन्हेगारी वाढत आहे. त्यात तरूणांचा सहभाग वाढत आहे. बेरोजगारीमुळे एक नव्हे अनेक संकटांनी भारतीय समाज चारीही बाजूंनी वेढला गेलेला आहे. 

बेरोजगारीची कारणे 

1. समाजात गरीबी मोठ्या प्रमाणात व्याप्त असून गरीबांमध्ये शिक्षण घेण्याची जाणीव प्रगल्भ नसते. त्यामुळे अशिक्षित आणि कौशल्यविहीन तरूणांचे समूह तयार होतात. जे की बेरोजगार राहतात. आज देशात नेमके हेच होत आहे. 

2. आरक्षण : आरक्षणामुळे अनेक तरूणांना पात्र असूनही नाईलाजाने बेरोजगार रहावे लागत आहे. त्यातल्या त्यात मुस्लिम तरूणांना या आरक्षणापासून जाणून बुजून काँग्रेसने वंंचित ठेवल्यामुळे बेरोजगार मुस्लिम तरूणांची संख्या बेसुमार वाढलेली आहे. 

3. शैक्षणिक दर्जा : देशात पदवीधारी तरूणांची कमतरता नाही परंतु त्या पदवी अनुरूप त्यांची योग्यता नसल्यामुळे त्यांना काम मिळत नाहीये. 

4. सरकारी उदासीनता : सर्वच सार्वजनिक क्षेत्रात आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये अघोषित नोकरकपातीच्या सरकारी धोरणामुळे सुद्धा बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 

5. नवनवीन कल्पनांचा अभाव : आज जगामध्ये संकल्पना विकल्या जातात. स्व:च्या मालकीचे एकही चारचाकी वाहन नसतांना ’ओला’ आणि ’उबर’ लाखो चारचाकी गाड्या भाड्यावर देऊन कोट्यावधी रूपये कमवित आहेत, स्व:च्या मालकीचे एकही हॉटेल नसतांना ’ओयो’ विविध शहरातील हजारो हॉटेलमधील लाखो खोल्या भाड्याने देऊन कोट्यावधींची कमाई करत आहे, स्व:चे कुठलेही उत्पादन नसतांना अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्या लाखो उत्पादने कोट्यावधी लोकांना विकून अब्जावधी रूपयांची उलाढाल करत आहेत आणि आपले भारतीय तरूण हॉटेल, पानपट्टी, किराणा दुकानच्या पलिकडे विचार करू शकत नाहीत. हे वैचारिक दारिद्रय भारतीय तरूणांना, त्यातल्या त्यात मुस्लिम तरूणांना बेरोजगार ठेवण्यामध्ये मोठी भूमीका अदा करत आहे. 

6. मोबाईल फोन : बापाच्या कमाईतून आईला इमोशनल ब्लॅकमेल करून घेतलेल्या स्मार्टफोनमधील अनावश्यक व्यस्ततेमुळे अनेक तरूण आज बेरोजगार झालेले आहेत. 

उपाय

असलम बडे वकार से डिग्री वसूल की

और उसके बाद शहर में ख्वांचा लगा लिया

वर दिलेली पाच कारणे व अशाच अनेक कारणांमुळे भारतीय तरूण विशेष: मुस्लिम तरूण मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत. मुस्लिमेत्तर तरूणांची थोडीफार तरी काळजी सरकार आणि त्यांच्या समाजातील श्रीमंत लोक घेत असतांना दिसून येतात. परंतु पावलोपावली होत असलेल्या अघोषित भेदभाव व घोषित आर्थिक बहिष्काराच्या आव्हानांमुळे मुस्लिम तरूणांच्या बेरोजगारीची समस्या अधिक तीव्र झालेली आहे. जेव्हा सरकार आपली जबाबदारी समर्थपणे पेलण्यास काही कारणामुळे असमर्थ ठरत असेल तर अशा वेळेस समाजातील श्रीमंत लोकांनी पुढे येऊन बेरोजगारीला दूर करण्याचा प्रयत्न करावयास हवा. परंतु दुर्दैवाने याची जाणीव नसल्यामुळे अनेक श्रीमंत मुसलमान असे आहेत ज्यांची संपत्ती त्यांच्या वैयक्तिक जीवनात भरभराटी आणण्यापूर्तीच उपयोगात आणली जात आहे. 

वास्तविक पाहता छोटे-छोटे व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवणारे खाजगी सरकारमान्य किंवा बिगरसरकार मान्य आयटीआय आणि पॉलिटे्निनकच्या संस्थांचे जाळे देशाच्या प्रत्येक शहरात सहज विनता येऊ शकते. ज्यामुळे कारपेंटर, वेल्डर ते बिल्डर तरूण तयार होऊन स्वयंरोजगाराच्या माध्यमातून बेरोजगारीच्या मगरमिठीतून सहज बाहेर पडू शकतात. 

तालीम, तरबियत और तिजारत


शिक्षणामुळे माणसाची बुद्धी प्रगल्भ होते, विचार करण्याची क्षमता वाढते. म्हणून मिळेल त्या माध्यमातून व शाखांमधून प्रत्येक मुस्लिम व बिगर मुस्लिम तरूणाने किमान पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्याचे लक्ष्य समोर ठेवायला हवे. पालकांनी आपली मुलं किमान पदवीपर्यंत शिक्षण घेतील यासाठी आपले सर्वस्व पणाला लावायला हवे. या मिळालेल्या तालीम सोबत मुस्लिम तरूणांची दीनी तर्बियत म्हणजे इस्लामी शिक्षण सुद्धा पदवीबरोबर पूर्ण व्हायला हवे. ज्यामुळे मुस्लिम तरूणांच्या व्यक्तिमत्वाचा संतुलित विकास होईल. आज भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आपल्या इच्छेप्रमाणे जगण्याची एक फॅशन सुरू झालेली आहे, जी की अत्यंत चुकीची आहे. जीवन जगण्याची खरी पद्धती कोणती? याबाबतीत आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त प्रसिद्ध विचारवंत अबुल आला मौदुदी यांचे विचार खालीलप्रमाणे, 

’’जहालत का लफ्ज़ इस्लाम के मुकाबले में इस्तेमाल किया जाता है. इस्लाम का तरिक़ा सरासर इल्म है. क्यों की इसकी तरफ अल्लाह ने रहनुमाई की है जो तमाम  हक़ायक का इल्म रखता है. और इसके  बरअक्स हर वो तरीका जो इस्लाम से मुख्तलिफ है जहालियत का तरीका है. अरब मे जमाना-ए-कब्ल-ए- इस्लाम को जाहालत का दौर इसी माने में कहा गया है के इस जमाने में इल्मके बगैर महज़ वहम या कयास व गुमान या ख्वाहिशों की बुनियाद पर इंसान ने अपने लिए जिंदगी के तरीके मुकर्रर कर लिए थे. ये तर्ज-ए-अमल जहां जिस दौर में भी इंसान इख़्तियार करेंगे उसे बहर- हाल जिहालत ही कहा जाएगा. स्कूल और यूनिवर्सिटी में जो कुछ पढ़ाया जाता है वह महेज़ एक जुज़्वी इल्म (इल्मका एक ख़लिल हिस्सा) है और किसी माने में भी इंसान की रहनुमाई के लिए काफी नहीं है. लिहाज़ा  अल्लाह के दिए हुए इल्म से बेनियाज़ होकर जो निजाम-ए-जिंदगी इस जुज़्वी इल्म के साथ अवहाम, कयास और ख़्वाहिशात की आमेज़िश करके बना लिये गये हैं वो भी इसी तरह की ’जाहिलियत’ की तारीफ में आते हैं, जिस तरह कदीम जमाने की जाहिलीयत की तारीफ में आते हैं.’’ (तफहिमुल कुरआन).

अनेक लोक संपत्ती असूनसुद्धा जीवन जगण्याची खरी पद्धत माहित नसल्यामुळे जीवनात अपयशी होतात व अकाली मृत्यू पावतात. चित्रपट, संगीत सृष्टीतील अनेक सालस तरूण अकाली हृदयघात होऊन किंवा आत्महत्या करून मरत आहेत, ते यामुळेच. त्यांच्याकडे रोजगाराची किंवा पैशाची चणचण नाही फक्त त्यांना जीवन जगण्याची खरी पद्धत माहित नाही, म्हणून त्यांच्यावर अकाली जीवन संपविण्याची वेळ आलेली आहे. जीवन जगण्याची खरी पद्धत इस्लामी पद्धत आहे. या पद्धतीविरूद्ध जावून जे जगतील त्यांचे जीवन या लोकातही आणि परलोकातही यशस्वी ठरणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. इस्लाम विषयी असलेल्या पूर्वग्रहामुळे अनेक लोक या कल्याणकारी जीवन व्यवस्थेचा लाभ उठवू शकत नाहीत, हे इस्लामचे नव्हे तर त्यांचे दुर्दैव आहे. 

येणेप्रमाणे भौतिक शिक्षण (तालीम) इस्लामिक प्रशिक्षण (तरबियत) घेतल्यानंतर तिजारत (व्यापार) हे तीसरे उद्देश्य तरूणांनी आणि त्यांच्या पालकांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवायला हवे. आज व्यापारातूनच चीन जागतिक महासत्ता झालेला आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्हटलेले आहे की, ’’ व्यापारात गुंतून रहा कारण नऊ दशांश (90) टक्के उदरनिर्वाह त्यातून मिळतो.’’ (संदर्भ : कंजुल आमाला, हदीस क्र. 9342). 

येथे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी निसर्गाचा एक नियम उलगडून दाखविलेला आहे तो म्हणजे, ईश्वराच्या निर्मिती योजनेनुसार उदरनिर्वाहाचा सर्वात मोठा वाटा ईश्वराने व्यापारात ठेवलेला आहे. ही गोष्ट प्रत्येक माणसासाठी आशेचा एक खजीना आहे. (संदर्भ : युथ विंग, लातूर) जर एखाद्या माणसाला नोकरी मिळत नसेल किंवा त्याला वारसाहक्क मिळत नसेल किंवा इतर स्त्रोताकडून काहीही मिळण्याची शक्यता नसेल तरीही त्याने स्व:चा व्यावसाय सुरू करावा. त्या व्यावसायातून अर्थात व्यापारातून मोठी संपत्ती मिळण्याची शक्यता असते. आज अनेक असे व्यवसाय आहेत ज्यामुळे बिना भांडवली व्यापार करून मोठ्या प्रमाणात संपत्ती कमावता येते. त्याचा तपशील या ठिकाणी सांगणे शक्य नाही. पूर्वी भारतात एक म्हण प्रसिद्ध होती, ’’उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी.’’ आज ही म्हण नेमकी उलट झालेली आहे. भ्रष्टाचाराची मोठी संधी असल्यामुळे उत्तम नोकरी, जोखीम असल्यामुळे मध्यम व्यापार आणि मातीत भ्रष्टाचार करणे शक्य नसल्यामुळे कनिष्ठ शेती अशी एकंदरित परिस्थिती निर्माण झालेली आहे. 

तरूणांनी त्यांना मिळणारी रोजगाराची पहिली संधी कधीच सोडू नये. काय माहित दुसरी संधी मिळणार सुद्धा नाही? नोकरीची संधी मिळत असेल तर ठीक नसेल तर केवळ नोकरीवरच विसंबून राहून आयुष्याची राखरांगोळी करून घेण्यात, व्यसनाधिन होऊन निरूद्देश जीवन जगण्यात काही हाशिल नाही. स्व:च्या मनगटाच्या बळावर व्यापार करून आयुष्याला संधी दिल्यास व नेकीने व्यापार केल्यास ईश्वराची मदत आल्याशिवाय राहणार नाही. याचा किमान मला तरी तेवढाच विश्वास आहे जेवढा विश्वास या गोष्टीवर आहे की सूर्य प्रकाश देतो. 

शेवटी जमाअते इस्लामी हिंदचे अध्यक्ष सआदतुल्लाह हुसैनी यांची संकल्पना स्पष्ट करून सदरचे लेखन थांबवितो. त्यांनी एक अशी संकल्पना मांडलेली आहे, जिचा मतीतार्थ असा की, प्रत्येक समाजाच्या जीवन प्रवाहामध्ये उतार आणि चढाव येतच असतात. उतारास लागलेल्या समाजामध्ये तीन प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू शकतात. 

1. तो समाज पराभवामुळे खचून जाऊ शकतो. 

2. त्या समाजातील तरूण प्रतिक्रियावादी होऊन हिंसक होऊ शकतात. 

3. त्या समाजातील लोक परिस्थितीचे योग्य आकलन करून आपल्या वर्तनामध्ये थोडीशी लवचिकता निर्माण करून स्व:ला त्या विशिष्ट परिस्थितीतून सुद्धा ज्या संधी ईश्वराने लपवून ठेवलेल्या आहेत त्यांचा शोध घेऊन स्व:ला त्या अनुरूप करून पुन्हा यश प्राप्त करू शकतात. मुस्लिम समाज कुरआन आणि प्रेषितांच्या चरित्राचा अभ्यास करून आजच्या कठीण परिस्थितीत सुद्धा पराभूत मानसिकतेमध्ये न जाता यश प्राप्त करू शकतात व सय्यद सआदतुल्लाह हुसैनी यांनी दिलेल्या तीसऱ्या पर्यायाप्रमाणे पुन्हा उत्कर्ष प्राप्त करू शकतात. कारण प्रेषित सल्ल. यांच्या समोर जेवढ्या कठीण अडचणी आणि आव्हाने होती तेवढी आज आपल्यासमोर नाहीत. म्हणून प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे चरित्र प्रत्येक मुस्लिम व्यक्तिसाठी मोटीव्हेशन (प्रेरणेचे स्त्रोत) ठरू शकते. यापेक्षा प्रभावशाली प्रेरणेचे दूसरे स्त्रोत जगात अस्तित्वात नाही. याची खात्री प्रत्येक मुस्लिम तरूणाने बाळगावी व भौतिक शिक्षण आणि नैतिक (इस्लामिक) शिक्षणातून स्व:चा संतुलित विकास साधून मिळेल तो रोजगार प्राप्त करावा आणि देशाच्या उन्नतीमध्ये आपला वाटा उचलावा. जय हिंद !



स्त्रियांच्या समस्या सोडवण्यासाठी इस्लाम मध्ये जे मार्गदर्शन केले गेले आहे, ते असे की, कोणीही विवाह योग्य असलेली स्त्री किंवा पुरूष जोडीदाराशिवाय राहता कामा नये. स्त्री असो की पुरुष विवाहयोग्य वय होताच, त्याचा विवाह केला जावा. विधवा, घटस्फोटित व निराधार महिलांच्या विवाहाला प्राधान्य दिले जावे. विवाहाद्वारे त्यांचे पुनर्वसन केले जावे. पैगंबर मुहम्मद ( स.) यांनी स्व: या तत्त्वांचा अंगीकार केला आणि पहिला विवाह एका विधवा स्त्रीशी केला. सुमारे पंचवीस वर्षे त्यांच्याबरोबर सुखी संसार केला. एवढेच नव्हे तर पहिल्या पत्नीच्या हयातीत त्यांनी दुसरा विवाहसुद्धा केला नाही.

सर्वोच्च न्यायालयाने देहविक्री हा वैध व्यवसाय असल्याचे मान्य करीत, पोलिसांनी सज्ञान आणि परस्पर संमतीने देहविक्री करणाऱ्या महिलांची अडवणूक किंवा त्यांच्या कामात हस्तक्षेप करू नये, असा आदेश दिला. देहविक्री करणाऱ्या महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी सहा मार्गदर्शक तत्त्वेही माननीय सर्वोच्च न्यायालयाने जारी केली आहेत. मला न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करायचे नाही. माझा मुद्दा हा आहे की खरोखरच सर्वच स्त्रिया आनंदाने, राजीखुशीने, आपण होऊन हा व्यवसाय निवडतात का?

जसे इतर अनेक व्यवसाय आपल्या मर्जीने निवडले जातात, तसाच हा व्यवसाय निवडला जातो का? इतरही काही व्यवसाय असतील की, स्त्रिया पोटाची खळगी भरण्यासाठी मजबुरीने करत असतील परंतु; इतर व्यवसायाप्रमाणेच या व्यवसायाकडे व ते करत असलेल्या महिलांकडे समाज सन्मानाने पाहतो का? त्यांच्या मुलाबाळांना सन्मानाची वागणूक मिळते का? असे एक ना अनेक प्रश्न आहेत. पण मुख्य मुद्दा हा आहे की, समाजात मान्यता असलेले व सन्मानजनक वागणूक दिली जाणारे इतर अनेक व्यवसाय असताना स्त्रिया या व्यवसायात का पडतात? आपल्या मर्जीने हा व्यवसाय निवडणाऱ्या स्त्रिया असतीलही. परंतु त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. वास्तविक पाहता या व्यवसायात पडणाऱ्या अधिकतर महिला अशा असतात ज्यांचे लैंगिक शोषण झालेले असते. हे एक कटू सत्य आहे.

माणसाच्या इतर गरजांप्रमाणे शारीरिक सुख मिळणे ही गरजेचे आहे. शिक्षणाच्या नावाखाली किंवा मुलींना स्वावलंबी बनविण्याच्या हेतूने विवाहकडे दुर्लक्ष केले जाते. मुलींना शिक्षण देऊ नये असे नाही परंतु; तिशी ओलांडेपर्यंत विवाहाचा विचारच करू नये, असा नियम तर नाही ना. विवाहानंतरही शिक्षण घेता येते. या काळात मुली कोणाच्या प्रेमात तरी पडतात किंवा लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्या भावनांशी व शरीराशी खेळले तरी जाते. अनेक महाविद्यालयीन मुलींची फसवणूक झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रातून आपण वाचत असतो. यातून अलीकडे कुमारी मातेचा गंभीर प्रश्न रौद्ररूप धारण करत चालला आहे.

एखाद्या तरुणाच्या प्रेमात पडून घर सोडून पळून गेलेल्या अनेक मुलींचा नंतर पत्ता सापडत नाही. कुठे जातात या मुली? खरोखरच कुठेतरी आपल्या जोडीदारासह सुखी जीवन जगत असतात का? असे असेल तर ठीक आहे. पण अशा मुली बोटावर मोजण्या इतक्याच असतात. कित्येक मुलींची फसवणूक करून त्यांची कुंटनखाण्यामध्ये विक्री केली जाते. आई-वडिलांच्या मर्जीचा विचार न करता पळून गेल्याने, परत आई-वडिलांना तोंड दाखवण्याची इच्छा नसते. नातेवाईक शेजारीपाजारी सगळीकडे बदनामी झालेली असते. त्यामुळे घराकडे परतण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असतात. दुसरीकडे ज्याच्यावर विश्वास ठेऊन घर सोडलं, जन्मदात्या आईबापाला सोडलं, त्यांनीही हात झटकलेले असतात. त्यांना वाममार्गाला लावून बेपत्ता झालेले असतात. ’घर का ना घाट का’ अशी त्यांची अवस्था झालेली असते. अशा परिस्थितीत नशिबाला दोष देत, कन्हत पिचत पडलेल्या असतात. अलिकडेच आलेला चित्रपट ’गंगूबाई’मध्ये शरीरविक्रीसाठी महिलांना कशाप्रकारे आणले जाते याचे हृदयद्रावक चित्रण केलेले आहे. अनेक विधवा, घटस्फोटित व सोडून दिलेल्या निराधार स्त्रियांच्या बाबतीतही असेच घडत असते. विधवा, निराधार तसेच घटस्फोटित महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर अनेक प्रयत्न केले जातात. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन करण्याचे प्रयत्न केले जातात. विधवा व निराधार महिलांची आश्रमामध्ये राहण्याची सोय केली जाते. परंतु अनेक वेळा या ठिकाणीही त्यांचे शारीरिक शोषण झाल्याच्या बातम्या कानावर येतात. घरातही अनेक वेळा जवळचे नातेवाईक त्यांच्या निराधारपणाचा गैरफायदा घेत असतात. जवळील नातेवाईकांकडूनच त्यांचा लैंगिक छळ झालेला पाहावयास मिळतो. अशा विधवा निराधार घटस्फोटित महिलांच्या सर्व समस्या सोडवण्याचा एकच मार्ग आहे, ते म्हणजे त्यांचा पुनर्विवाह! या अशा प्रकारच्या सर्व महिलांचे सर्व प्रश्न या मार्गाने सुटू शकतात. 

पुनर्विवाह झाला तर त्यांच्या सर्व समस्या चुटकीसरशी सुटतील. स्त्रियांच्या समस्या सोडवण्यासाठी इस्लाम मध्ये जे मार्गदर्शन केले गेले आहे, ते असे की, कोणीही विवाह योग्य असलेली स्त्री किंवा पुरूष जोडीदाराशिवाय राहता कामा नये. स्त्री असो की पुरुष विवाहयोग्य वय होताच, त्याचा विवाह केला जावा. विधवा, घटस्फोटित व निराधार महिलांच्या विवाहाला प्राधान्य दिले जावे. विवाहाद्वारे त्यांचे पुनर्वसन केले जावे. पैगंबर मुहम्मद ( स.) यांनी स्व: या तत्त्वांचा अंगीकार केला आणि पहिला विवाह एका विधवा स्त्रीशी केला. सुमारे पंचवीस वर्षे त्यांच्याबरोबर सुखी संसार केला. एवढेच नव्हे तर पहिल्या पत्नीच्या हयातीत त्यांनी दुसरा विवाहसुद्धा केला नाही.खऱ्या अर्थाने महिलांच्या समस्या सोडवावयाच्या असतील तर योग्य वेळी विवाह करणे, विधवा घटस्फोटित व निराधार महिलांचे पुनर्विवाहाद्वारे पुनर्वसन करणे तसेच विवाह सोपा आणि कमी खर्चाचा करणे हेच खरे उपाय आहेत.

- सय्यद जाकेर अली, परभणी

9028065881



भारतात बहुसंख्य लोकसंख्या ग्रामीण भागात आहे. आजपर्यंत ग्रामीण व्यवस्थेला बळकटी आणण्याच्या दृष्टीने ब-याच योजना राबविल्या गेल्या. परंतु अजूनही या भागाचा विकास म्हणावा तसा झालेला नाही. अजूनही ग्रामीण भागात मूलभूत प्रश्नांचा सामना करावा लागतो. त्यात आरोग्याच्या दृष्टीने ग्रामीण भाग पिछाडीवर आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा याप्रमाणेच आरोग्य हा देखील नागरिकाचा मुलभूत हक्क असतो आणि त्यासाठी लोककल्याणकारी सरकारने नियोजनबद्ध कार्यक्रम आखावा लागतो. अशा कार्यक्रमांसाठी आणि योजनांसाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद करावी लागते. आज आपला देश सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी जीडीपीच्या फक्त १.२५% खर्च करतो. ब्रिक्स गटातील इतर देशांचा हा आकडा ब्राझिल ९.२%, साउथ आफ्रिका ८.१%, रशिया ५.३% आणि चीन ५% असा आहे. आपला शेजारी भूतान २.१% आणि श्रीलंका १.६% हेही आपल्या पुढे आहेत. सार्वजनिक आरोग्यासाठी खर्च करण्यात आपण जगात खालून ५ वे म्हणजे १५४ वे आहोत. साहजिकच सर्वांगिण आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक असणा-या गोष्टी पूर्णत्वास जात नाहीत. 

जनतेच्या आरोग्याचा कळवळा आणत सरकारने गाव पातळीवर प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले. यातून जनतेचे आरोग्य सांभाळण्यास मदत होईल, असा आभास निर्माण झाला. शासकीय आरोग्य व्यवस्थेतील प्राथमिक आरोग्य केंद्रे ही आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात आरोग्य सेवा देणारी एक व्यवस्था आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत या आरोग्य केंद्रांनाच अपुरे कर्मचारी, सोयींचा अभाव यासारख्या असंख्य आजारांनी विळखा घातला आहे. प्रशासकीय उदासीनता आणि सरकारचे दुर्लक्ष यामुळे हा विळखा अधिकच घट्ट होत चालला आहे. कोरोना महासाथीच्या काळात या ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादा समोर आल्या आहेत. दरम्यान, ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेसाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. ग्रामीण भागात अजूनही ६८ टक्के तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे.

नॅशनल हेल्थ प्रोफाईल २०१९ च्या आकडेवारीनुसार, देशात जवळपास २६ हजार सरकारी हॉस्पिटल आहेत. त्यातील २१ हजार हॉस्पिटल ग्रामीण भागात आहेत. सरकारी हॉस्पिटलची आकडेवारी तर दिलासादायक वाटते. मात्र, वास्तव फार विदारक आहे. गेल्या २० वर्षांत लोकसंख्या प्रचंड वाढली. पर्यायाने रुग्ण संख्याही वाढली. ग्रामीण आरोग्य सांख्यिकी २०२१ च्या ताज्या अहवालानुसार दीड दशकांपूर्वीच्या तुलनेत ग्रामीण आरोग्यासाठी मनुष्यबळाची गरज आणखी वाढली आहे. मात्र शासनाने पदे वाढवली नाहीत. विशेष म्हणजे, मागील अनेक वर्षांपासून भारत सरकारने ग्रामीण आरोग्य सेवा केंद्रांमध्ये रिक्त पदे भरलेली नाहीत. प्रत्येक ग्रामीण आरोग्य क्षेत्रात कर्मचा-यांची कमतरता आहे. नियुक्त झालेले कर्मचारी सतत गैरहजर राहत असल्याने या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार रामभरोसे आहे. ग्रामीण भागात ६८ टक्के तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भासत आहे. मंजूर पदांपैकी अर्ध्याहून अधिक जागा रिक्त आहेत. सन २००५ पासून आतापर्यंत रिक्त पदांमध्ये ५३ टक्क्यांची वाढ झाली आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर दोन मेडिकल ऑफिसरची पदे मंजूर आहेत. मेडिकल ऑफिसर एमबीबीएस असावे, अशी अपेक्षा असली तरी आज एमबीबीएस पदवी घेतलेला डॉक्टर खेड्यात जाण्यास तयार नाही. त्यामुळे आयुर्वेदिक शाखेतील पदवी घेतलेल्या बीएएमएस डॉक्टरची नियुक्ती या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर मेडिकल ऑफिसर म्हणून करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या रिक्त जागांच्या संख्येत वाढ होत आहे. वर्ष २००५ मध्ये ७५८२ पदांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ३५५० जागा भरण्यात आल्या, तर ४०३२ जागा रिक्त होत्या. २०२१ मध्ये १३६३७ पदांवर भरतीसाठी मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ४४०५ जागा भरण्यात आल्या, तर ९२३२ जागा रिक्त आहेत. याचा अर्थ रिक्त जागांचे प्रमाण अजूनही ६८ टक्क्यांवर आहे. २००५ मध्ये १७ टक्के जागा रिक्त होत्या, तर २०२१ मध्ये हे प्रमाण २१ टक्क्यांवर गेले आहे. ग्रामीण भागातील सार्वजनिक आरोग्य केंद्रात सर्जन, फिजिशियन, बालरोगतज्ज्ञ तसेच प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ यांच्या जागा रिक्त आहेत. ग्रामीण भागात ९ हजार तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील या जागादेखील तात्काळ भरणे आवश्यक आहे. 

आरोग्य विभागामार्फत शिशू सुरक्षा, राजमाता जिजाऊ मिशन, सावित्रीबाई फुले कल्याण योजना, सिकलसेल आधार नियंत्रण, सामूहिक लोहयुक्त गोळ्या वाटप, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम आणि नव्याने सुरू झालेली राजीव गांधी आरोग्यदायी योजना या व अशा अनेक योजना सुरू झाल्या आहेत. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आरोग्य विभागाकडे नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सामुदायिक आरोग्य केंद्रात परिचारिका पदासाठीही अनेक जागा रिक्त आहेत. सन २००५ मध्ये ३४,०६१ जागांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी ५,१३१ जागा रिक्त राहिल्या, तर २०२१ मध्ये १,०६,७२५ जागांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी २७,६८१ हजार जागा रिक्त आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेविका, मदतनीसांच्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ झाली आहे. २००५ मध्ये १,३९,७९८ पदांना मंजुरी दिली होती. त्यापैकी १,३३,१९४ जागांवर भरती करण्यात आली. २०२१ मध्ये २,६८,९१३ पदांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी २,१४,८२० जागांवर भरती करण्यात आली. ५४,०९३ जागा रिक्त आहेत. कोरोनामुळे राज्यात दोन वर्ष स्पर्धा परीक्षा वेळेवर झाल्या नाहीत. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणारे उमेदवार निराशेत होते. त्यानंतर कोरोनाचे रुग्ण कमी होवू लागले आणि परीक्षा घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. परंतु टीईटी परीक्षा, आरोग्य भरती, म्हाडा या परीक्षांमध्ये घोटाळा झाल्याचे, पेपर फुटल्याचे समोर आले. या परीक्षा घोटाळ्यामुळे ही पदे अजूनही भरता न आल्याने आरोग्य विभागातील अपु-या कर्मचा-यांवर अतिरिक्त कामाचा भार वाढला आहे.

आरोग्यक्षेत्राकडे सरकार खाजगी गुंतुवणूकीची संधी म्हणून पहात आहे आणि खाजगी क्षेत्राला झुकते माप देणारे पीपीपी मॉडेल पुढे रेटत आहे. २०२२ पर्यंत भारतातील आरोग्यावरील ही गुंतवणूक ३७२ बिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. ज्या देशातील २७.५% जनता अधिकृत दारिद्र्य रेषेखाली आहे, ज्यात दलित, आदिवासी, भटके, स्त्रिया यांचा प्रामुख्याने समावेश आहे, असा देश आरोग्य क्षेत्रातील अशा खाजगी गुंतवणुकीकडे जेंव्हा वाटचाल करतो तेंव्हा हा समाज बाहेरच फेकला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा खाजगी क्षेत्र हे आरोग्य सेवांचा फक्त ५-१०% भाग उचलत होते आज याच्या उलट स्थिती आहे. आज ६६% रुग्ण भरती ही खाजगी रुग्णालयात होते. खाजगी यंत्रणा ही आरोग्यावर आलेल्या संकटाच्या काळात सर्वसामान्यांना आधार देण्यास किती असमर्थ ठरते आणि सर्वसामान्यांचे किती आर्थिक शोषण करणारी ठरते हे आपण कोव्हीड महासाथीच्या काळात अनुभले आहेच.

- सुरेश मंत्री

अंबाजोगाई

संपर्क- ९४०३६५०७२२


ईश्वराचे प्रेषित आदरणीय मुहम्मद (स.) यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि माध्यम प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांना भाजपने हद्दपार केले. ही वृत्तपत्रीय वार्ता.

परंतु त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा संपूर्ण जगात फैलाव झाला, म्हणून त्यांना हटवण्यात आले. हा प्रकार निंदानालस्तीचा असून भारताची शान ही बदनाम झाली आहे. मुस्लिम देशांनी भारताचा व भाजपचा निषेध करून बहिष्कार टाकला आहे. इतर राष्ट्रांनीही याची दघल घेऊन निषेध केला आहे. हिंदू संस्कृती ही सर्व धर्मांचा, ईशदूतांचा सन्मान करणारी आहे, याची जाणीव भाजपने ठेवावी.

या दोघांना बडतर्फ करून चालणार नाही, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना योग्य शासन झालेच पाहिजे, नाहीतर येणारा काळ भाजपला त्याची पायरी दाखवल्याशिवार राहणार नाही. सत्ता आहे म्हणून कुणा संत, पैगंबर यांची निंदा करून चालणार नाही. सत्तेचा माज जनता उतरवू शकते. मुस्लिम समाजबांधव ही भाषा कदापि सहन करू शकणार नाही. कुणाच्या धार्मिक भावना कोणीही दुखवू शकत नाही. भारत सर्व धर्मांचा आदर करणारा देश आहे. येणारा काळच भाजपला तोंडघशी पाडेल.

सत्तेचा माज हा

अत्यंत हीन व धोकादायक आहे

नका करू माज

नाही शिकवत हिदू संस्कृती

वेळीच आवरा

नाही तर होईल भारताची नालस्ती

- नजीरअहमद एम. अत्तार

पुणे.


सध्या महाराष्ट्रात काही ठिकाणी महागाई विरोधी आंदोलने होत आहेत. त्यावर काही लेखही  प्रसिद्ध होत आहेत. आपल्या शेजारच्या पाकिस्तान, बंगला देश, नेपाळ, म्यानमार, अफगाणिस्तान आणि श्रीलंका येथील आर्थिक परिस्थिती तर भारतापेक्षा खूपच वाईट, भयंकर आहे. पाकिस्तानमध्ये एका डॉलरची किंमत २०० रुपये आहे; भारतात ७८ रुपये. त्यामुळे पाकिस्तानमधे जीवनासाठी अनावश्यक वस्तू आयातीवर बंदी घातली आहे. 

श्रीलंकेत ज्या महेंद्र राजपक्षे यांच्या पक्षाला २ /३ बहुमताने निवडून दिले, त्याच्या विरोधात प्रचंड हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. मंत्री मंडळात त्याचे ७ कुटुंबीय आणि खुद्द राष्ट्रपती त्याचा भाऊ असताना तो जनतेचे प्रश्न सोडवू शकला नाही. हिंसाचारी जनतेने देशात आणीबाणी पुकारली असताना त्याचे पंतप्रधान पदाचे निवासस्थान आणि अन्य खाजगी घरे जाळून टाकली. अखेर पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन महेंद्र राजपक्षे यांनी श्रीलंकेतून पळ काढून गुपचूप भारतात आश्रय घेतला आहे. घराणेशाही देशाचे काय वाटोळे करते ते जनतेने पाहिले. केवळ आपल्या अनेक पिढ्यांसाठी संपत्ती साठवली जाते.

भारतीय जनतेने आणि विशेष: भ्रष्ट भारतीय नेत्यांनी यापासून धडा शिकला पाहिजे. त्यांनी भाववाढीविरोधी निरर्थक आंदोलने करण्यापेक्षा गरीब जनतेला आर्थिक मदत करण्यासाठी "विशेष फंड "गोळा करावा. आपल्याकडील अनेक नेते मंडळी आणि त्यांच्या जवळच्या आप्तेष्टांकडे(त्यांच्या लहान मुलांच्या नावावरही) करोडो रुपये, अनेक घरे, जमिनी आहेत हे त्यांच्या निवडणूक आयोगाकडे दिलेल्या शपथपत्रावरून अथवा ईडीच्या धाडीसंबंधी माहितीवरून जगजाहीर झाले आहे.

या प्रचंड संपत्ती पैकी फक्त २ कोटी रुपये आणि १ घर स्व: साठी ठेवून बाकी संपत्ती त्या "विशेष फंड " मध्ये जमा करावी. महाराष्ट्र शासनाने पेट्रोल-डिझेलवरील वॅट कमी करावा.  भूतपूर्व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या निरर्थक चांदिवाले कमिशनवर केला तसा सर्व अनाठायी खर्च टाळावा. कोणी जरा एखाद्या सरकारी  व्यक्तीवर टीका केली की त्याच्या मागे पोलिसांची फौज पाठवून, कोर्ट कचे-या, खटले, पोलिस कोठडी, तपास, न्यायालयीन कोठडी, जामीन इत्यादीमध्ये निश्चितच भरपूर अपव्यय होतो. हा पैसा जनतेचा आहे. अनेक खटल्यात सरकार विरोधी निकाल लागतो. उदाहरणार्थ राणा दांपत्याविरोधी राजद्रोहाचा गुन्हा न्यायालयाने रद्द ठरवला. सरकारने जनताहितासाठी आपला अहंकार  बाजूला ठेवून शाब्दिक टीकेला केवळ शब्दाने उत्तर द्यावे, अन्य खर्च करू नये.

महाराष्ट्रातील लोक सूज्ञ आहेत. अवाजवी टीकेचा जनताच समाचार घेईल. महाराष्ट्र संतांची भूमी आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे, "कोणत्याही व्यक्तीपेक्षा-ती कितीही श्रेष्ठ असली तरी देश अधिक मोठा आहे" ही डॉ. बाबासाहेबांची शिकवण आहे. महाराष्ट्र सरकारने हे विसरून चालणार नाही.   महाराष्ट्र शासनाने असा निर्णय घ्यावा की, मंत्र्यांनी शासकीय रूग्णालयातच उपचार करून घ्यावेत, म्हणजे त्यांना शासकीय सेवेची प्रत्यक्ष माहिती होईल, तेथील कमतरता कळतील. मध्यंतरी अनेक करोडोपती मंत्र्यांनी खाजगी रूग्णालयात उपचार करून घेतले आणि सरकारकडून (म्हणजेच जनतेकडून) लाखो रुपये वसूल केले, अशी बातमी सर्वत्र गाजली होती. असे असताना जेलमधून मंत्रीपद सांभाळणारे नवाब मलिक आणि जेल मधील माजी मंत्री अनिल देशमुख यांनी शासकीय रूग्णालयाऐवजी खाजगी रूग्णालयात उपचार करून घेण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला. अशा परिस्थितीत या नेत्यांना महात्मा गांधी अथवा शाहू, फुले, आंबेडकर यांची नावे घेण्याचा नैतिक अधिकार आहे का ?

महा विकास आघाडी सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांचा  आदर्श नजरेसमोर ठेवून रयतेसाठी राज्य करायचे ठरवले, तरी महागाई सुसह्य होईल.

-प्रा.केशव आचार्य

अंधेरी (प), मुंबई - ४०० १०२


आजच्या समाजजीवनावर राजकारणाचा पगडा असून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विस्कळीतपणा, अस्थिरता व बेचैनी पसरलेली आहे. कोणत्याही क्षेत्रात सत्याचे, नैतिकतेचे अधिष्ठान दृष्टीस पडत नाही. यावर समाजसेवकांनी सखोल मनन चिंतन करणे आवश्यक आहे. माणूस अद्याप जीवंत आहे. अजून आशा आहे. परिस्थिती गंभीर आहे. पण आटोक्याबाहेर नाही. सत्याची चाड व नीतीमत्तेची चाड बाळगणारी व समाजाची उभारणी या तत्त्वावर व्हावी म्हणून अशी धडपडणारी माणसे अजून हयात आहेत. रोग्यांच्या मानाने वैद्यांची संख्या अल्प आहे. परवंतु वैद्य आहेत, पण वेळ लागेल. रीगी बरे होतील. समाजात सुधारणा होईल.

धार्मिक आचारविचारांमध्ये राजकीय लोक राजकारणाच्या स्वार्थासाठी हस्तक्षेप करत असतात. इतिहास हा राजकीय हेतूने रंगविला जात आहे आणि उलटपक्षी पाहता राजकारणात धर्म नको असा कांगावा केला जात असला तरी सुधारणेच्या नावाखाली चिरंतन नीतीमूल्ये सत्यता पायदळी तुडविली जात आहे. प्रथम नव्या औषधांचा प्रयोग उंदीर व प्राण्यांवर करून मानवी आरोग्यावर कितपत लागू पडते याची शहानिशा पाहिली जाते, परंतु नवविचारसरणीच्या माणसांचा वापर करून समाज बिघडवला जात आहे. अंधाधुंदी माजविली जात आहे. समाजजीवनाचे खोबरे केले जात आहे. याला समाजसुधारण नव देऊन दहशत निर्माण केली जात आहे.

परंतु मानव क्षुद्र नाही आणि मृत नाही. आजचे राजकारण, राजनीती, हुकूमशाही व वचकाने चालत आहे. जातीयता निर्माण करून देशात अराजकता माजविली जात आहे. परंतु नीतीमूल्ये साध्य करणारी माणसे आहेत, ते हिसका दाखविल्याशिवाय राहणार नाहीत.

भगवान के घर देर है, लेकिन अंधेर नहीं।

मानव आहे जागरुक

बसेल हिसका मानवाचा

तेव्हा भगवंतही तुम्हाला तारु शकणार नाही

अतिवृत्ती घातक वृत्ती

वेळ आहे सुधरा।

- नजीर अहमद एम. अत्तार

पुणे.



ज्ञानवापी मस्जिद असो की इतर कोणती मस्जिद किंवा स्मारके यांचा वाद चव्हाट्यावर न आणता स्थानिक पातळीवर परस्पर सामंजस्याने, चर्चेद्वारे संपवावा अशी भूमीका जमीअतुल उलेमा ए हिन्द ने घेतली आणि अर्थातच ती भारतातील साऱ्या मुस्लिमांसाठी आहे, ही भूमीका काही लोकांना पसंत पडली नाही. गेले 6-7 वर्षापासून एकानंतर दुसऱ्या वादात मुस्लिमांविरूद्ध मनाला येईल ते बोलण्यात येत आहे. तरी देखील मुस्लिमांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी एक प्रकारचे मौन बाळगले. मुस्लिमांच्या नरसंहाराची घोषणा केली गेली त्यावरही कुणी आक्षेप घेतला नाही आणि ही परिस्थिती भाजपाला समजली नाही, कसेही करून मुस्लिमांना रस्त्यावर आणायचा ठाम पवित्रा त्यांनी घेतला होता. काही प्रमाणात त्यांना यशही मिळाले. खरगोण, जहांगीरपुरी येथे ते आपल्या बचावासाठी बाहेर निघाले नंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली पण याचा फटका मुस्लिमांना बसला. त्यांच्या घरावर बुलडोजर चालविले गेले. अशा घटना पुन्हा होऊ नये म्हणून मुस्लिमांनी पुन्हा तीच भूमीका घेतली जी मौलाना महेमूद अहमद मदनी यांनी जमीअतच्या अधिवेशनावेळी जाहीर केली.

ज्ञानवापीचा वाद असो की इतर कोणत्याही मस्जिदीच्या वादात प्रेषितांना गोवण्याचा अर्थ काय? उघड- उघड हेच की त्यांनी रस्त्यावर याव आणि मग दंगे व्हावेत त्यानिमित्ताने त्यांच्या घरावर, व्यवसायांवर (उर्वरित पान 7 वर)

बुलडोझर फिरविले जावे आणि झाले तसेच कानपूरमधील लोकांना भाजप प्रव्नत्याच्या वक्तव्याचा निषेध करीत बंद पाळला. दगडफेक झाली पुढे काय होतय माहित नाही.

ज्यांनी प्रेषितांच्या खासगी जीवन चरित्रावर आक्षेप घेतला त्यांना जगातील इतर संस्कृती विषयीची माहिती नसणार आणि त्याच बरोबर प्रेषितांनी त्यांच्या हक्काधिकारांसाठी जो लढा दिला त्यावेळी इस्लामच्या शिकवणीचा प्रसार करताना याचीही त्यांना माहिती नाही. ज्या काळी मानव आणि दानव यात कोणता फरक उरला नव्हता त्या काळी प्रेषितांनी मानवजातीला सुसंस्कृत केले, त्यांचे नाते त्यांच्या निर्मात्याशी जोडले. नैतिक अधःपतन त्याकाळी शिगेला पोहोचले होते. मद्यपान, जुगार, व्याभिचार हेच त्यांच्या जगण्याची रीत होती. माणसालाच जगण्याचा अधिकार नव्हता. तेव्हा स्त्रीचे कोणते स्थान असेल? का स्थान नसेल याची फक्त कल्पनाही करता येत नाही. माणसाला ठार मारणे त्याच्यासाठी खेळ होता. चलता चलता एकमेकांत वाद झाला की त्याची परिणिती कुणाच्या तरी हत्येत होत होती आणि हा सिलसिला बदल्याच्या स्वरूपात वर्षानुवर्षे चालत असे. 

आफ्रीकेतून काळ्या माणसाला जनावराप्रमाणे पकडून आणले जात असे आणि त्यांना विकायला बाजार भरवले जायचे. स्त्री म्हणजे भोगवस्तू अन्य काहीच नाही. इटलीच्या्नलोसियममध्ये एका समारोहाचे आयोजन करून तिथे उच्चभ्रू श्रीमंत अभिजनवर्गाला निमंत्रण देऊन बोलवले जात होते आणि त्यांच्या करमणुकीसाठी त्या ठिकाणी भुकेल्या सिहांसमोर काळ्या गुलामांना सोडून द्यायचे. सिहांनी त्यांना ठार करून फस्त केल्यावर सर्वत्र टाळ्याचा गजर व्हायचा. एक दोन नाही हजारो उदाहरणे तत्कालीन माणसांच्या पाश्वीवृत्तीचे देता येतील. अशा काळी अरबस्थानात प्रेषितांचा उदय होतो आणि ते माणुसकीचे रक्षक बणून समोर येतात. नापीक खडकाळ डोंगरांनी व्यापलेल्या वाळवंटातून अल्लाहने मानव जातीवर कृपा प्रसादाचा वर्षाव करीत प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांना उभे केले. त्यांनी मग एक सुंस्कृत समाज व सभ्यतेची सुरूवात केली. प्रेषितांनी आपल्या अंतिम प्रवचनात घोषणा केली की, अल्लाहने तुम्हाला एकच पुरूष आणि स्त्री पासून निर्माण केले आहे तेव्हा सारे मानव  समान आहेत. कोणालाही कोणावर कसलीही श्रेष्ठता नाही की प्रभाव नाही. स्त्री पुरूषांचा समान दर्जा आहे. स्त्रीची स्वतःची सामाजिक, राजकीय आणि व्यावहारिक ओळख आहे. सारे मानव आदमची संतती आहेत. आदम यांना चिखलमातीतून निर्माण केले होते. काळ्या माणसाला गोऱ्या माणसावर किंवा गोऱ्या माणसाला काळ्या माणसावर कोणतीच श्रेष्ठता नाही. अज्ञान काळातील सर्व प्रतिष्ठा प्रेषितांनी आपल्या पायाखाली तुडविल्या. प्रेषित सल्ल. त्याकाळी ज्या काळी कायद्याच्या राज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती. घोषणा केली की, ’’एकानं केलेल्या अपराधापायी दुसऱ्याला जबाबदार धरले जाणार नाही. बापानं केेलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याच्या मुलाला दिली जाणार नाही. कोणीही दुसऱ्यांच्या समस्यांच ओझं उचलणार नाही.’’ 

वास्तविकता अशी की या भुतलावर कोण असा दावा करू शकतो की त्याने न्याय्य आणि प्रामाणिक मानवी समाजाची स्थापना केली. तर ते केवळ प्रेषित मुहम्मद सल्ल. आहेत. मानवजातीला त्यांनी सन्मान प्राप्त करून दिला. प्रेषित मुहम्मद सल्ल. निसर्गाचा आत्मा आहेत. मानवतेने केवळ एकदाच एका निवडक व्यक्तीमत्वाला पाहिले आहे. पुन्हा त्यांना कुणी पाहू शकणार नाही. उच्चतम उद्दिष्ट, तोकडी संसाधन तरीपण अनन्य साधारण यश हे केवळ प्रेषितांनीच करून दाखवले आहे. 

इतका रूत्बा असून देखील त्यांनी साधारण माणसाचं जीवन जगले आणि म्हणूनच त्यांच्या अनुयायांनी ज्यावेळी ते गरीबीत गुरफटले होते तेव्हा ही साथ दिली आणि ज्यावेळी अरब जग त्यांच्यासमोर नतमस्तक झाले तेव्हाही साथ दिली. 

खेदाची बाब ही की आम्ही प्रेषित सल्ल. व त्यांच्या कार्याची यथोचित प्रसिद्धी करू शकलो नाही किंवा त्यांचा संदेश घरोघरी जावून पोहोचविला नाही.  जर त्यांना समजलं असते तर कुणीही प्रेषितांविषयी अनादराचे उद्गार केले नसते. दोष आमचा आहे.

- सय्यद इफ्तिखार अहमद



अर्थव्यवस्थेचा स्थूल व सूक्ष्म पाया आणि समाज व मानवी आंतरक्रियांना चालना देणाऱ्या मूलभूत शक्ती यांच्यामधील गुंतागुंतीच्या संबंधांची चर्चा प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ कार्ल पोलानी यांनी मांडलेल्या संशोधन अभ्यासाच्या मालिकेत सर्वप्रथम करण्यात आली. त्यांच्या द ग्रेट ट्रान्सफॉर्मेशन (१९४४) या ग्रंथातील त्यांच्या कार्याच्या मूलभूत तत्त्वांमध्ये त्यांनी असे प्रतिपादन केले आहे की, अर्थशास्त्राची शिस्त ही मानवाच्या निरीक्षणांतून व समाजातील त्यांच्या व्यवहारांतून उदयास आली. मानवाच्या सामाजिक स्वभावामुळे 'एम्बेडेडनेस' म्हणजे सामाजिक संबंध आणि आर्थिक पाया यांमधील परस्परसंबंधांची प्रक्रिया ही अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक ती अट बनते. महत्त्वाचे म्हणजे अर्थव्यवस्थेचे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी आणि सामाजिक व सांस्कृतिक नेटवर्कमध्ये विस्तार करण्यासाठी जातीय सलोखा राखणे आवश्यक आणि पूर्वअट दोन्ही आहे. भारत सुमारे दोनशे दशलक्ष मुस्लिमांचे घर आहे, ज्यामुळे ते जगातील सर्वात मोठ्या मुस्लिम लोकसंख्येपैकी एक आहे परंतु हिंदूबहुल देशातील अल्पसंख्याक आहे. ब्रिटिश वसाहतवादाच्या काळापासून घटनात्मक तरतुदी असूनही भारतभरातील मुस्लिमांना पद्धतशीर भेदभाव आणि हिंसेचा सामना करावा लागला आहे. गेल्या आठ वर्षांत हा जिवंत भेदभाव अधिकच वाढला आहे. सोशल मीडिया आणि सरकारी पाठबळ असलेल्या माध्यमांच्या प्रचारामुळे दुर्दैवाने भारतातील सर्वसामान्य मुस्लिमांचे दैनंदिन जीवन जवळजवळ असह्य झाले आहे. समान संधी आणि सामाजिक सुविधांमध्ये 'प्रवेश' करण्याच्या दृष्टीने भारतातील मुस्लिमांनी भेदभाव कसा अनुभवला आहे, याची पुरेशी आकडेवारी आहे. आरोग्यसेवेपासून ते रोजगार, शिक्षण आणि गृहनिर्माणापर्यंत, अभ्यासाने हे दाखवून दिले आहे की, या समुदायाला देशभरातील अडथळ्यांचा सामना कसा करावा लागतो, मर्यादित सरकारी हस्तक्षेपामुळे त्यांचे राहणीमान सुधारण्याची ऑफर देण्यात आली आहे. प्रक्रियात्मक न्यायाच्या क्षेत्रात आणि कायदेशीर मार्गाच्या बाबतीतही त्यांची मुस्कटदाबी बोत आहे. सेंटर फॉर न्यू इकॉनॉमिक्स स्टडीज (सी.एन.ई.एस.) च्या 2021 च्या अहवालात 'अॅक्सेस (इन)इक्वॅलिटी इंडेक्स' तयार करताना उपेक्षित गटांमधील मूलभूत सामाजिक, आर्थिक आणि कायदेशीर सेवांमध्ये प्रतिबंधात्मक प्रवेशातील उच्च पातळीच्या भिन्नतेचे विश्लेषण केले गेले. येथे भारतीय मुसलमानांसाठीचे निर्देशक इतर काही अत्यंत भेदभावपूर्ण गटांपेक्षा (अनुसूचित जाती, इतर मागास जाती) कितीतरी पटीने वाईट असल्याचे आढळून आले. कॉमन कॉजच्या 2019 च्या अहवालात असे आढळले आहे की सर्वेक्षणात सहभागी झालेल्या अर्ध्या पोलिसांनी मुस्लिमविरोधी पक्षपातीपणा दर्शविला आहे, ज्यामुळे ते मुस्लिमांवरील गुन्हे थांबविण्यासाठी हस्तक्षेप करण्याची शक्यता कमी आहे. सरकारपुरस्कृत बुलडोझर्स कोणत्याही 'योग्य प्रक्रिये'शिवाय असंतुष्ट मुस्लिम कार्यकर्त्यांच्या घरांचा चुराडा करत आहेत. न्यायालये आणि सरकारी संस्था दोषी ठरवत आहेत आणि मुस्लिमांविरूद्धच्या हिंसाचारात हिंदूंचा सहभाग असल्याचा आरोप करणारे खटले मागे घेत आहेत. यापूर्वी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने २००६ मध्ये स्थापन केलेल्या सच्चर समितीच्या अहवालात भारताच्या मुस्लिम लोकसंख्येवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. मात्र सच्चर समितीच्या बहुतांश शिफारशींची अंमलबजावणी आपल्या कार्यकाळात करण्यात सरकारला अपयश आले. 2019 च्या पिरियॉडिक लेबर सर्वेच्या आकडेवारीनुसार, मुस्लिमांमधील सुमारे 85% कामगार अजूनही कोणत्याही 'लेखी करारा'शिवाय अनिश्चितपणे काम करतात. मुस्लिम समाजातील निम्म्याहून अधिक कामगार स्वयंरोजगारात गुंतलेले असून, त्यांचे आणखी २५% कामगार नैमित्तिक कामात गुंतलेले आहेत. मुस्लिम रस्त्यावरील विक्रेत्यांवर अलीकडील हल्ले हे सखोल राजकीय ध्रुवीकरणाचे आणि अल्पसंख्याक समाजातील अनौपचारिक कामगारांच्या आर्थिक विलगीकरणाच्या प्रयत्नांची चिन्हे आहेत. अल्पसंख्याक लोकसंख्येमध्ये युनियनायझेशन सक्षम करण्यासाठी कमकुवत संस्थात्मक नेटवर्कमुळे मुस्लिमांना त्यांच्या चिंता व्यक्त करणे कठीण झाले आहे. मुस्लिम आणि दलितांना भारतीय शहरांमधील सर्वात वाईट निवासी विलगीकरणाचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांना पाईपद्वारे पाणी आणि सांडपाणी यासारख्या निकृष्ट सार्वजनिक सेवा असलेल्या ठिकाणी राहण्यास भाग पाडले जाते. परदेशातील सुमारे दोन तृतीयांश भारतीय नागरिक - १३.६ दशलक्ष लोकांपैकी ८.९ दशलक्ष - गल्फ कोऑपरेशन कौन्सिलच्या सहा देशांमध्ये राहतात. गेल्या वर्षी, सहा जीसीसी देशांशी द्विपक्षीय व्यापार 87.4 अब्ज डॉलर्स होता, जो युरोपियन युनियन किंवा आग्नेय आशियाई देशांशी भारताच्या द्विपक्षीय व्यापारापेक्षा जास्त आहे. भारताच्या निम्म्याहून अधिक तेल व वायू आयातीचा पश्चिम आशिया पुरवठा करतो. सततच्या ध्रुवीकरणासह (मुस्लिमांविरुद्ध) देशांतर्गत वातावरण आणि 'आम्ही विरुद्ध ते' अशी भूमिका टाळली पाहिजे. म्हणूनच, भारतीय मुस्लिमांना लोकसंख्येच्या आधारावर भारतात अल्पसंख्याक म्हणून स्थान दिले जाऊ शकते, परंतु आशियाचा भाग म्हणून भारताच्या शेजारच्या बहुतेक प्रदेशांसाठी आणि देशांसाठी, मुस्लिमांना लोकसंख्येचा आधार खूप मोठा आहे. समुदायांमध्ये सामाजिक एकात्मता सुनिश्चित करणे आणि विविध अंतर्भूत सामाजिक संरचनांमध्ये आर्थिक प्रणालींना कार्य करण्यास अनुमती देणे ही सर्वांच्या निरंतर विकासाची गुरुकिल्ली आहे.

- शाहजहान मगदुम

कार्यकारी संपादक, 

मो.:८९७६५३३४०४



वास्तविकता अशी की या भुतलावर कोण असा दावा करू शकतो की त्याने न्याय्य आणि प्रामाणिक मानवी समाजाची स्थापना केली. तर ते केवळ प्रेषित मुहम्मद सल्ल. आहेत. मानवजातीला त्यांनी सन्मान प्राप्त करून दिला. प्रेषित मुहम्मद सल्ल. निसर्गाचा आत्मा आहेत. मानवतेने केवळ एकदाच एका निवडक व्यक्तीमत्वाला पाहिले आहे. पुन्हा त्यांना कुणी पाहू शकणार नाही. उच्चतम उद्दिष्ट, तोकडी संसाधन तरीपण अनन्य साधारण यश हे केवळ प्रेषितांनीच करून दाखवले आहे. 

ज्ञानवापी मस्जिद असो की इतर कोणती मस्जिद किंवा स्मारके यांचा वाद चव्हाट्यावर न आणता स्थानिक पातळीवर परस्पर सामंजस्याने, चर्चेद्वारे संपवावा अशी भूमीका जमीअतुल उलेमा ए हिन्द ने घेतली आणि अर्थातच ती भारतातील साऱ्या मुस्लिमांसाठी आहे, ही भूमीका काही लोकांना पसंत पडली नाही. गेले 6-7 वर्षापासून एकानंतर दुसऱ्या वादात मुस्लिमांविरूद्ध मनाला येईल ते बोलण्यात येत आहे. तरी देखील मुस्लिमांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी एक प्रकारचे मौन बाळगले. मुस्लिमांच्या नरसंहाराची घोषणा केली गेली त्यावरही कुणी आक्षेप घेतला नाही आणि ही परिस्थिती भाजपाला समजली नाही, कसेही करून मुस्लिमांना रस्त्यावर आणायचा ठाम पवित्रा त्यांनी घेतला होता. काही प्रमाणात त्यांना यशही मिळाले. खरगोण, जहांगीरपुरी येथे ते आपल्या बचावासाठी बाहेर निघाले नंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली पण याचा फटका मुस्लिमांना बसला. त्यांच्या घरावर बुलडोजर चालविले गेले. अशा घटना पुन्हा होऊ नये म्हणून मुस्लिमांनी पुन्हा तीच भूमीका घेतली जी मौलाना महेमूद अहमद मदनी यांनी जमीअतच्या अधिवेशनावेळी जाहीर केली.

ज्ञानवापीचा वाद असो की इतर कोणत्याही मस्जिदीच्या वादात प्रेषितांना गोवण्याचा अर्थ काय? उघड- उघड हेच की त्यांनी रस्त्यावर याव आणि मग दंगे व्हावेत त्यानिमित्ताने त्यांच्या घरावर, व्यवसायांवर बुलडोझर फिरविले जावे आणि झाले तसेच कानपूरमधील लोकांना भाजप प्रवक्त्याच्या वक्तव्याचा निषेध करीत बंद पाळला. दगडफेक झाली पुढे काय होतय माहित नाही.

ज्यांनी प्रेषितांच्या खासगी जीवन चरित्रावर आक्षेप घेतला त्यांना जगातील इतर संस्कृती विषयीची माहिती नसणार आणि त्याच बरोबर प्रेषितांनी त्यांच्या हक्काधिकारांसाठी जो लढा दिला त्यावेळी इस्लामच्या शिकवणीचा प्रसार करताना याचीही त्यांना माहिती नाही. ज्या काळी मानव आणि दानव यात कोणता फरक उरला नव्हता त्या काळी प्रेषितांनी मानवजातीला सुसंस्कृत केले, त्यांचे नाते त्यांच्या निर्मात्याशी जोडले. नैतिक अधःपतन त्याकाळी शिगेला पोहोचले होते. मद्यपान, जुगार, व्याभिचार हेच त्यांच्या जगण्याची रीत होती. माणसालाच जगण्याचा अधिकार नव्हता. तेव्हा स्त्रीचे कोणते स्थान असेल? का स्थान नसेल याची फक्त कल्पनाही करता येत नाही. माणसाला ठार मारणे त्याच्यासाठी खेळ होता. चलता चलता एकमेकांत वाद झाला की त्याची परिणिती कुणाच्या तरी हत्येत होत होती आणि हा सिलसिला बदल्याच्या स्वरूपात वर्षानुवर्षे चालत असे. 

आफ्रीकेतून काळ्या माणसाला जनावराप्रमाणे पकडून आणले जात असे आणि त्यांना विकायला बाजार भरवले जायचे. स्त्री म्हणजे भोगवस्तू अन्य काहीच नाही. इटलीच्या्नलोसियममध्ये एका समारोहाचे आयोजन करून तिथे उच्चभ्रू श्रीमंत अभिजनवर्गाला निमंत्रण देऊन बोलवले जात होते आणि त्यांच्या करमणुकीसाठी त्या ठिकाणी भुकेल्या सिहांसमोर काळ्या गुलामांना सोडून द्यायचे. सिहांनी त्यांना ठार करून फस्त केल्यावर सर्वत्र टाळ्याचा गजर व्हायचा. एक दोन नाही हजारो उदाहरणे तत्कालीन माणसांच्या पाश्वीवृत्तीचे देता येतील. अशा काळी अरबस्थानात प्रेषितांचा उदय होतो आणि ते माणुसकीचे रक्षक बणून समोर येतात. नापीक खडकाळ डोंगरांनी व्यापलेल्या वाळवंटातून अल्लाहने मानव जातीवर कृपा प्रसादाचा वर्षाव करीत प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांना उभे केले. त्यांनी मग एक सुंस्कृत समाज व सभ्यतेची सुरूवात केली. प्रेषितांनी आपल्या अंतिम प्रवचनात घोषणा केली की, अल्लाहने तुम्हाला एकच पुरूष आणि स्त्री पासून निर्माण केले आहे तेव्हा सारे मानव  समान आहेत. कोणालाही कोणावर कसलीही श्रेष्ठता नाही की प्रभाव नाही. स्त्री पुरूषांचा समान दर्जा आहे. स्त्रीची स्वतःची सामाजिक, राजकीय आणि व्यावहारिक ओळख आहे. सारे मानव आदमची संतती आहेत. आदम यांना चिखलमातीतून निर्माण केले होते. काळ्या माणसाला गोऱ्या माणसावर किंवा गोऱ्या माणसाला काळ्या माणसावर कोणतीच श्रेष्ठता नाही. अज्ञान काळातील सर्व प्रतिष्ठा प्रेषितांनी आपल्या पायाखाली तुडविल्या. प्रेषित सल्ल. त्याकाळी ज्या काळी कायद्याच्या राज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती. घोषणा केली की, ’’एकानं केलेल्या अपराधापायी दुसऱ्याला जबाबदार धरले जाणार नाही. बापानं केेलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याच्या मुलाला दिली जाणार नाही. कोणीही दुसऱ्यांच्या समस्यांच ओझं उचलणार नाही.’’ 

वास्तविकता अशी की या भुतलावर कोण असा दावा करू शकतो की त्याने न्याय्य आणि प्रामाणिक मानवी समाजाची स्थापना केली. तर ते केवळ प्रेषित मुहम्मद सल्ल. आहेत. मानवजातीला त्यांनी सन्मान प्राप्त करून दिला. प्रेषित मुहम्मद सल्ल. निसर्गाचा आत्मा आहेत. मानवतेने केवळ एकदाच एका निवडक व्यक्तीमत्वाला पाहिले आहे. पुन्हा त्यांना कुणी पाहू शकणार नाही. उच्चतम उद्दिष्ट, तोकडी संसाधन तरीपण अनन्य साधारण यश हे केवळ प्रेषितांनीच करून दाखवले आहे. 

इतका रूत्बा असून देखील त्यांनी साधारण माणसाचं जीवन जगले आणि म्हणूनच त्यांच्या अनुयायांनी ज्यावेळी ते गरीबीत गुरफटले होते तेव्हा ही साथ दिली आणि ज्यावेळी अरब जग त्यांच्यासमोर नतमस्तक झाले तेव्हाही साथ दिली. 

खेदाची बाब ही की आम्ही प्रेषित सल्ल. व त्यांच्या कार्याची यथोचित प्रसिद्धी करू शकलो नाही किंवा त्यांचा संदेश घरोघरी जावून पोहोचविला नाही.  जर त्यांना समजलं असते तर कुणीही प्रेषितांविषयी अनादराचे उद्गार केले नसते. दोष आमचा आहे.

- सय्यद इफ्तेखार अहमद


प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधण्याची प्रवृत्ती चुकीची ठरवून सरसंघचालक मोहन भागवतजींनी देशाला विकासपथावर नेण्यासाठी पवित्र मंत्र दिला आहे.


ज्ञानवापीचे प्रकरण लोकांच्या मनाला डाचत असतानाच मंदिर-मशिदीचे आणखी काही वाद समोर येऊ लागले आहेत. इतिहासाची विवाद्य पाने फडफडविण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्याच वेळी विचारी लोकांच्या डोक्यात स्वाभाविकपणे एक प्रश्न उभा राहिला, ‘कुठल्या दिशेने जातो आहे आपला देश आणि हा रस्ता आपल्याला कुठे घेऊन जाईल?’ अशा वातावरणात सरसंघचालक मोहन भागवतजी यांचे हे विचार प्रकट झाले आहेत. त्यांच्या मते, ज्ञानवापी वादाचा निर्णय आपापसात समझोता करून किंवा न्यायालयीन निर्णयाचा आदर राखून झाला पाहिजे. प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधण्याची प्रवृत्ती योग्य नाही. असे होता कामा नये.
इतिहासात गाडून टाकलेल्या जखमा नव्याने उकरून काढून वर्तमानकाळाचे पंख रक्तरंजित करण्याचे प्रयत्न सरसंघचालकांच्या या विचारांमुळे कदाचित थांबतील अशी आशा आहे. हिंदू पक्षात बहुसंख्य लोक सरसंघचालकांबद्दल आदरभाव बाळगतात. त्यांच्या विचारांनी प्रभावित होतात, यात कोणतीही शंका नाही. त्यांच्या विचारांचा एकेक कणसुद्धा या लोकांसाठी महत्त्वाचा असतो. त्यांच्या या विचारांची कदर प्रत्येक व्यक्ती करील आणि असे विवाद वाढणार नाहीत अशी आपण आशा केली पाहिजे. कायद्याच्या दृष्टीने पाहू जाता उपासनास्थळ अधिनियम 1991  नुसार आपल्या देशात सर्व धार्मिक स्थळांचे स्वरूप 15 ऑगस्ट 1947 रोजी जे होते तसेच राहील.
यावर कोणता वाद निर्माण होता कामा नये; परंतु काळानुसार समोर आलेले वास्तव असे  आहे की हिंदू समाजामधला एक मोठा वर्ग इतिहासाने गाडून टाकलेल्या जुलमांच्या कहाण्या समोर         - (उर्वरित पान 7 वर)
घेऊन आक्रोश करीत आहे. सातव्या शतकात भारतावर खलिफांची सेना चाल करून आली यात शंका नाही. आठव्या शतकाच्या प्रारंभापासून त्यांना सफलता मिळू लागली. त्यानंतर अनेक जुलमी शासकांनी हिंदुस्थानच्या अनेक भागांवर कब्जा केला. धर्मस्थळे उद्ध्वस्त केली. त्यांनी केलेल्या जुलमांच्या असंख्य कहाण्या इतिहास सांगत असतो. त्यांनी केवळ 
भारतातच नव्हे, तर जगाच्या अनेक भागांत असे जुलूम केले. हेच आठवून बहुसंख्य लोक आक्रोश करीत आहेत. तो स्वाभाविक असला तरी तसा तो करून आपल्याला काय मिळणार, हाच  महत्त्वाचा प्रश्न आहे. विकासवादाच्या विचारधारेला जुलमाच्या दुनियेत आपण परत घेऊन जाऊ पाहत आहोत काय? भारताची फाळणी झाली तेव्हा आपण फार मोठे दुःख झेलले. आता आणखी नाही.
याच शंकांच्या संदर्भात सुप्रसिद्ध कवी आणि शायर अदम गोंडवी यांनी या जगातून निरोप घेण्याच्या आधी एक गझल लिहिली. ते म्हणतात..
हम मे कोई हूण, कोई शक, कोई मंगोल है
दफ्न है जो बात, अब ऊस बात को मत छेडिये 
गर गलतियां बाबर की थी, 
जुम्मन का घर फिर क्यों जले
ऐसे नाजूक वक्त मे हालात को मत छेड़िए 
है कहां हिटलर, हलाकू, जार या चंगेज खां
मिट गये सब, कौमकी औकात को मत छेड़िए 
छेड़िए इक जंग, मिल जुल कर गरीबी के खिलाफ
दोस्त, मेरे मजहबी नग्मात को मत छेड़िए
जिंकण्याचा उन्माद असा असतो की जो हरलेला आहे त्या समाजाची बेइज्जती केली जाते. असे घडते याला इतिहास साक्षी आहे. कधी धार्मिक स्थळे तोडून तर कधी लेकी-सुनांवर अत्याचार करून ही बेइज्जती केली जाते. जगाच्या कानाकोपऱ्यात हे झाले आहे. आज युक्रेनमध्ये काय होते आहे, बलात्काराचे भयावह प्रसंग त्या देशातून समोर येत आहेत. युक्रेनमधून बाहेर पडू पाहणाऱ्या स्त्रियांवर तिथले लांडगे तुटून पडत आहेत. 
सर्व जगात इस्लामिक खलिफा राजवट आणण्याचे स्वप्न पाहणारा इस्लामिक दहशतवादी अबू बकरने काय केले, जो प्रदेश जिंकला, तिथल्या मुलींना रानटी दहशतवाद्यांच्या समोर फेकले. लक्षावधी मुली त्यांचे आयुष्य सुरू होण्याच्या आधीच दफनल्या गेल्या. ज्या राहिल्या त्या जिवंतपणी प्रेतवत होऊन राहिल्या. अबू बकरला संपवणारी सेना असाच व्यवहार करील काय?... नाही. या सेनेला तर या जखमांवर मलमपट्टी करावी लागेल. या मलमपट्टीनेच इतिहासाची काळी पाने शुभ्र होत असतात. पान जोवर ती शुभ्र होत नाहीत तोवर त्याच्यावर नवा धडा लिहिता येत नाही. 
दुर्दैवाने आपण ज्या कालखंडातून जात आहोत त्यात द्वेषाची हवा आता वादळाचे रूप घेऊ लागली आहे. आग दोन्हीकडून भडकते आहे. मी आपल्याला घाबरवत मुळीच नाही; पण काळाचा आरसा दाखवतो आहे. हे वादळ आपल्या सर्वांना घेऊन जाईल. इस्लामच्या नावाने आज दहशतवादाचे जे काळजाचा थरकाप उडवणारे  दृश्य निर्माण झाले आहे त्यात जास्त करून मुस्लीमच मृत्युमुखी पडतात ना! कोणताही सच्चा मुसलमान दहशतवाद्यांच्या बाजूने उभा राहणार नाही, त्यांना सहानुभूती दाखवणार नाही हे मला माहीत आहे; परंतु त्यांच्याविरुद्ध त्यालाही आता आवाज बुलंद करावाच लागेल. जाता जाता एक गोष्ट सांगतो.. मुस्लिमांच्या लोकसंख्येच्या बाबतीत  भारत संपूर्ण जगतात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांच्या इमानदारीबद्दल शंका घेता येणार नाही. प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधण्याच्या प्रवृत्तीने हिंदुस्थानचे भले नक्कीच होणार नाही. आपली घटना सर्वांना एकसारखे मानते आणि आपले पूर्वजही तसेच मानत आले. मग एक दुसऱ्याबद्दल पुन्हा एकदा अतूट विश्वास निर्माण करूया. आपली सर्वांची एकजूट हीच हिंदुस्थानला जगाचा मुकुट करू शकते. जय हिंद! 
- विजय दर्डा 
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)
(साभार : लोकमत) 
vijaydarda@lokmat.com


जेव्हा सरकार आपली जबाबदारी समर्थपणे पेलण्यास काही कारणामुळे असमर्थ ठरत असेल तर अशा वेळेस समाजातील श्रीमंत लोकांनी पुढे येऊन बेरोजगारीला दूर करण्याचा प्रयत्न करावयास हवा. परंतु दुर्दैवाने याची जाणीव नसल्यामुळे अनेक श्रीमंत मुसलमान असे आहेत ज्यांची संपत्ती त्यांच्या वैयक्तिक जीवनात भरभराटी आणण्यापूर्तीच उपयोगात आणली जात आहे. 

वास्तविक पाहता छोटे-छोटे व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवणारे खाजगी सरकारमान्य किंवा बिगरसरकार मान्य आयटीआय आणि पॉलिटे्निनकच्या संस्थांचे जाळे देशाच्या प्रत्येक शहरात सहज विनता येऊ शकते. ज्यामुळे कारपेंटर, वेल्डर ते बिल्डर तरूण तयार होऊन स्वयंरोजगाराच्या माध्यमातून बेरोजगारीच्या मगरमिठीतून सहज बाहेर पडू शकतात. 


कॉलेज के सब बच्चे चुप हैं 

कागज की एक नाव लिए

चारों तरफ दरिया की सूरत

फैली हुई बेकारी है

उर्दूमध्ये एक म्हण आहे, ’’कमाता बेटा और नांदती बेटी सबको अच्छे लगते हैं’’ एका विशिष्ट वयात आल्यानंतर प्रत्येक तरूणांकडून समाज कामधंद्याची अपेक्षा करतो.  ती अपेक्षा पूर्ण न झाल्यास तरूणांवर घरातून आणि बाहेरून इतका दबाव वाढतो की, त्याची अंतिम परिणीती बेरोजगार तरूणांच्या आत्महत्येमध्ये होते. बीबीसीच्या 11 फेब्रुवारी 2022 च्या बातमीपत्रात असे म्हटलेले आहे (जे की आजही त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे) की, राज्यसभेमध्ये गृहमंत्री नित्यानंद रॉय यांनी बेरोजगारीच्या कारणावरून तरूणांच्या आत्महत्येची माहिती देताना सांगितले की, 2018 मध्ये 2741 तर 2019 मध्ये 2851 तर 2020 मध्ये 3548 बेरोजगार तरूणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. या आकडेवारीवरून या प्रश्नाच्या भीषणतेची कल्पना येण्यास हरकत नाही. कमावते वय झाल्यानंतर बेरोजगार राहिल्यानंतर अनेक समस्यांना तरूणांना तोंड द्यावे लागते. लग्न वेळेवर होत नाही, झाले तरी अनुरूप स्थळ मिळत नाही, लग्नानंतर खर्च वाढतो, त्यामुळे त्याचा अतिरिक्त दबाव निर्माण होतो, लग्न केले नाही तर अनेक मानसिक समस्या उत्पन्न होतात, शारीरिक गरजा पूर्ण होत नसल्यामुळे पाय घसरण्याचा संभव असतो, त्यातून समाजात अनैतिकता वाढते त्यामुळे समाज नासतो, अनेक तरूण मनोरूग्ण होऊन जातात, एकांतप्रिय    

होऊन जातात, परवडेल ते व्यसन करण्यास सुरूवात करतात. जे हे सर्व दबाव सहन करू शकत नाहीत ते शेवटी आत्महत्या करतात. 

तलाशे रिज्क का ये मरहला अजीब है के हम

घरों से दूर भी घर के लिए बसे हुए हैं

उर्दूत दूसरी एक म्हण आहे की, ’’सबसे बडा गम रोजगार का गम होता है’’ बेरोजगार तरूणांची न घरात किमत असते न बाहेर. फाटलेला किसा व फाटलेले नशीब घेऊन कोट्यावधी बेरोजगार तरूणांचे तांडे आज देशात भटकत आहेत. नुकतीच एक बातमी अशीही येऊन गेलेली आहे की, लाखो तरूणांनी वैफल्यग्रस्त होऊन रोजगार शोधणेच बंद केलेले आहे. असे तरूण समाजविघातक कामात सहभागी होण्याची जास्त शक्यता असते. आज याचाच अनुभव देशात होणाऱ्या जातीय दंगली, समाज माध्यमातील सांप्रदायिक मजकूर आणि टीव्हीवरील प्रक्षोभक आणि अनावश्यक चर्चांमधून येत आहे. गुन्हेगारी वाढत आहे. त्यात तरूणांचा सहभाग वाढत आहे. बेरोजगारीमुळे एक नव्हे अनेक संकटांनी भारतीय समाज चारीही बाजूंनी वेढला गेलेला आहे. 

बेरोजगारीची कारणे 

1. समाजात गरीबी मोठ्या प्रमाणात व्याप्त असून गरीबांमध्ये शिक्षण घेण्याची जाणीव प्रगल्भ नसते. त्यामुळे अशिक्षित आणि कौशल्यविहीन तरूणांचे समूह तयार होतात. जे की बेरोजगार राहतात. आज देशात नेमके हेच होत आहे. 

2. आरक्षण : आरक्षणामुळे अनेक तरूणांना पात्र असूनही नाईलाजाने बेरोजगार रहावे लागत आहे. त्यातल्या त्यात मुस्लिम तरूणांना या आरक्षणापासून जाणून बुजून काँग्रेसने वंंचित ठेवल्यामुळे बेरोजगार मुस्लिम तरूणांची संख्या बेसुमार वाढलेली आहे. 

3. शैक्षणिक दर्जा : देशात पदवीधारी तरूणांची कमतरता नाही परंतु त्या पदवी अनुरूप त्यांची योग्यता नसल्यामुळे त्यांना काम मिळत नाहीये. 

4. सरकारी उदासीनता : सर्वच सार्वजनिक क्षेत्रात आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये अघोषित नोकरकपातीच्या सरकारी धोरणामुळे सुद्धा बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 

5. नवनवीन कल्पनांचा अभाव : आज जगामध्ये संकल्पना विकल्या जातात. स्वतःच्या मालकीचे एकही चारचाकी वाहन नसतांना ’ओला’ आणि ’उबर’ लाखो चारचाकी गाड्या भाड्यावर देऊन कोट्यावधी रूपये कमवित आहेत, स्वतःच्या मालकीचे एकही हॉटेल नसतांना ’ओयो’ विविध शहरातील हजारो हॉटेलमधील लाखो खोल्या भाड्याने देऊन कोट्यावधींची कमाई करत आहे, स्वतःचे कुठलेही उत्पादन नसतांना अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्या लाखो उत्पादने कोट्यावधी लोकांना विकून अब्जावधी रूपयांची उलाढाल करत आहेत आणि आपले भारतीय तरूण हॉटेल, पानपट्टी, किराणा दुकानच्या पलिकडे विचार करू शकत नाहीत. हे वैचारिक दारिद्रय भारतीय तरूणांना, त्यातल्या त्यात मुस्लिम तरूणांना बेरोजगार ठेवण्यामध्ये मोठी भूमीका अदा करत आहे. 

6. मोबाईल फोन : बापाच्या कमाईतून आईला इमोशनल ब्लॅकमेल करून घेतलेल्या स्मार्टफोनमधील अनावश्यक व्यस्ततेमुळे अनेक तरूण आज बेरोजगार झालेले आहेत. 

उपाय

असलम बडे वकार से डिग्री वसूल की

और उसके बाद शहर में ख्वांचा लगा लिया

वर दिलेली पाच कारणे व अशाच अनेक कारणांमुळे भारतीय तरूण विशेषतः मुस्लिम तरूण मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत. मुस्लिमेत्तर तरूणांची थोडीफार तरी काळजी सरकार आणि त्यांच्या समाजातील श्रीमंत लोक घेत असतांना दिसून येतात. परंतु पावलोपावली होत असलेल्या अघोषित भेदभाव व घोषित आर्थिक बहिष्काराच्या आव्हानांमुळे मुस्लिम तरूणांच्या बेरोजगारीची समस्या अधिक तीव्र झालेली आहे. जेव्हा सरकार आपली जबाबदारी समर्थपणे पेलण्यास काही कारणामुळे असमर्थ ठरत असेल तर अशा वेळेस समाजातील श्रीमंत लोकांनी पुढे येऊन बेरोजगारीला दूर करण्याचा प्रयत्न करावयास हवा. परंतु दुर्दैवाने याची जाणीव नसल्यामुळे अनेक श्रीमंत मुसलमान असे आहेत ज्यांची संपत्ती त्यांच्या वैयक्तिक जीवनात भरभराटी आणण्यापूर्तीच उपयोगात आणली जात आहे. 

वास्तविक पाहता छोटे-छोटे व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवणारे खाजगी सरकारमान्य किंवा बिगरसरकार मान्य आयटीआय आणि पॉलिटे्निनकच्या संस्थांचे जाळे देशाच्या प्रत्येक शहरात सहज विनता येऊ शकते. ज्यामुळे कारपेंटर, वेल्डर ते बिल्डर तरूण तयार होऊन स्वयंरोजगाराच्या माध्यमातून बेरोजगारीच्या मगरमिठीतून सहज बाहेर पडू शकतात. 

तालीम, तरबियत और तिजारत

शिक्षणामुळे माणसाची बुद्धी प्रगल्भ होते, विचार करण्याची क्षमता वाढते. म्हणून मिळेल त्या माध्यमातून व शाखांमधून प्रत्येक मुस्लिम व बिगर मुस्लिम तरूणाने किमान पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्याचे लक्ष्य समोर ठेवायला हवे. पालकांनी आपली मुलं किमान पदवीपर्यंत शिक्षण घेतील यासाठी आपले सर्वस्व पणाला लावायला हवे. या मिळालेल्या तालीम सोबत मुस्लिम तरूणांची दीनी तर्बियत म्हणजे इस्लामी शिक्षण सुद्धा पदवीबरोबर पूर्ण व्हायला हवे. ज्यामुळे मुस्लिम तरूणांच्या व्यक्तिमत्वाचा संतुलित विकास होईल. आज भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आपल्या इच्छेप्रमाणे जगण्याची एक फॅशन सुरू झालेली आहे, जी की अत्यंत चुकीची आहे. जीवन जगण्याची खरी पद्धती कोणती? याबाबतीत आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त प्रसिद्ध विचारवंत अबुल आला मौदुदी यांचे विचार खालीलप्रमाणे, 

’’जहालत का लफ्ज़ इस्लाम के मुकाबले में इस्तेमाल किया जाता है. इस्लाम का तरिक़ा सरासर इल्म है. क्यों की इसकी तरफ अल्लाह ने रहनुमाई की है जो तमाम  हक़ायक का इल्म रखता है. और इसके  बरअक्स हर वो तरीका जो इस्लाम से मुख्तलिफ है जहालियत का तरीका है. अरब मे जमाना-ए-कब्ल-ए- इस्लाम को जाहालत का दौर इसी माने में कहा गया है के इस जमाने में इल्मके बगैर महज़ वहम या कयास व गुमान या ख्वाहिशों की बुनियाद पर इंसान ने अपने लिए जिंदगी के तरीके मुकर्रर कर लिए थे. ये तर्ज-ए-अमल जहां जिस दौर में भी इंसान इख़्तियार करेंगे उसे बहर- हाल जिहालत ही कहा जाएगा. स्कूल और यूनिवर्सिटी में जो कुछ पढ़ाया जाता है वह महेज़ एक जुज़्वी इल्म (इल्मका एक ख़लिल हिस्सा) है और किसी माने में भी इंसान की रहनुमाई के लिए काफी नहीं है. लिहाज़ा  अल्लाह के दिए हुए इल्म से बेनियाज़ होकर जो निजाम-ए-जिंदगी इस जुज़्वी इल्म के साथ अवहाम, कयास और ख़्वाहिशात की आमेज़िश करके बना लिये गये हैं वो भी इसी तरह की ’जाहिलियत’ की तारीफ में आते हैं, जिस तरह कदीम जमाने की जाहिलीयत की तारीफ में आते हैं.’’ (तफहिमुल कुरआन).

अनेक लोक संपत्ती असूनसुद्धा जीवन जगण्याची खरी पद्धत माहित नसल्यामुळे जीवनात अपयशी होतात व अकाली मृत्यू पावतात. चित्रपट, संगीत सृष्टीतील अनेक सालस तरूण अकाली हृदयघात होऊन किंवा आत्महत्या करून मरत आहेत, ते यामुळेच. त्यांच्याकडे रोजगाराची किंवा पैशाची चणचण नाही फक्त त्यांना जीवन जगण्याची खरी पद्धत माहित नाही, म्हणून त्यांच्यावर अकाली जीवन संपविण्याची वेळ आलेली आहे. जीवन जगण्याची खरी पद्धत इस्लामी पद्धत आहे. या पद्धतीविरूद्ध जावून जे जगतील त्यांचे जीवन या लोकातही आणि परलोकातही यशस्वी ठरणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. इस्लाम विषयी असलेल्या पूर्वग्रहामुळे अनेक लोक या कल्याणकारी जीवन व्यवस्थेचा लाभ उठवू शकत नाहीत, हे इस्लामचे नव्हे तर त्यांचे दुर्दैव आहे. 

येणेप्रमाणे भौतिक शिक्षण (तालीम) इस्लामिक प्रशिक्षण (तरबियत) घेतल्यानंतर तिजारत (व्यापार) हे तीसरे उद्देश्य तरूणांनी आणि त्यांच्या पालकांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवायला हवे. आज व्यापारातूनच चीन जागतिक महासत्ता झालेला आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्हटलेले आहे की, ’’ व्यापारात गुंतून रहा कारण नऊ दशांश (90) टक्के उदरनिर्वाह त्यातून मिळतो.’’ (संदर्भ : कंजुल आमाला, हदीस क्र. 9342). 

येथे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी निसर्गाचा एक नियम उलगडून दाखविलेला आहे तो म्हणजे, ईश्वराच्या निर्मिती योजनेनुसार उदरनिर्वाहाचा सर्वात मोठा वाटा ईश्वराने व्यापारात ठेवलेला आहे. ही गोष्ट प्रत्येक माणसासाठी आशेचा एक खजीना आहे. (संदर्भ : युथ विंग, लातूर) जर एखाद्या माणसाला नोकरी मिळत नसेल किंवा त्याला वारसाहक्क मिळत नसेल किंवा इतर स्त्रोताकडून काहीही मिळण्याची शक्यता नसेल तरीही त्याने स्वतःचा व्यावसाय सुरू करावा. त्या व्यावसायातून अर्थात व्यापारातून मोठी संपत्ती मिळण्याची शक्यता असते. आज अनेक असे व्यवसाय आहेत ज्यामुळे बिना भांडवली व्यापार करून मोठ्या प्रमाणात संपत्ती कमावता येते. त्याचा तपशील या ठिकाणी सांगणे शक्य नाही. पूर्वी भारतात एक म्हण प्रसिद्ध होती, ’’उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी.’’ आज ही म्हण नेमकी उलट झालेली आहे. भ्रष्टाचाराची मोठी संधी असल्यामुळे उत्तम नोकरी, जोखीम असल्यामुळे मध्यम व्यापार आणि मातीत भ्रष्टाचार करणे शक्य नसल्यामुळे कनिष्ठ शेती अशी एकंदरित परिस्थिती निर्माण झालेली आहे. 

तरूणांनी त्यांना मिळणारी रोजगाराची पहिली संधी कधीच सोडू नये. काय माहित दुसरी संधी मिळणार सुद्धा नाही? नोकरीची संधी मिळत असेल तर ठीक नसेल तर केवळ नोकरीवरच विसंबून राहून आयुष्याची राखरांगोळी करून घेण्यात, व्यसनाधिन होऊन निरूद्देश जीवन जगण्यात काही हाशिल नाही. स्वतःच्या मनगटाच्या बळावर व्यापार करून आयुष्याला संधी दिल्यास व नेकीने व्यापार केल्यास ईश्वराची मदत आल्याशिवाय राहणार नाही. याचा किमान मला तरी तेवढाच विश्वास आहे जेवढा विश्वास या गोष्टीवर आहे की सूर्य प्रकाश देतो. 

शेवटी जमाअते इस्लामी हिंदचे अध्यक्ष सआदतुल्लाह हुसैनी यांची संकल्पना स्पष्ट करून सदरचे लेखन थांबवितो. त्यांनी एक अशी संकल्पना मांडलेली आहे, जिचा मतीतार्थ असा की, प्रत्येक समाजाच्या जीवन प्रवाहामध्ये उतार आणि चढाव येतच असतात. उतारास लागलेल्या समाजामध्ये तीन प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू शकतात. 

1. तो समाज पराभवामुळे खचून जाऊ शकतो. 

2. त्या समाजातील तरूण प्रतिक्रियावादी होऊन हिंसक होऊ शकतात. 

3. त्या समाजातील लोक परिस्थितीचे योग्य आकलन करून आपल्या वर्तनामध्ये थोडीशी लवचिकता निर्माण करून स्वतःला त्या विशिष्ट परिस्थितीतून सुद्धा ज्या संधी ईश्वराने लपवून ठेवलेल्या आहेत त्यांचा शोध घेऊन स्वतःला त्या अनुरूप करून पुन्हा यश प्राप्त करू शकतात. मुस्लिम समाज कुरआन आणि प्रेषितांच्या चरित्राचा अभ्यास करून आजच्या कठीण परिस्थितीत सुद्धा पराभूत मानसिकतेमध्ये न जाता यश प्राप्त करू शकतात व सय्यद सआदतुल्लाह हुसैनी यांनी दिलेल्या तीसऱ्या पर्यायाप्रमाणे पुन्हा उत्कर्ष प्राप्त करू शकतात. कारण प्रेषित सल्ल. यांच्या समोर जेवढ्या कठीण अडचणी आणि आव्हाने होती तेवढी आज आपल्यासमोर नाहीत. म्हणून प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे चरित्र प्रत्येक मुस्लिम व्यक्तिसाठी मोटीव्हेशन (प्रेरणेचे स्त्रोत) ठरू शकते. यापेक्षा प्रभावशाली प्रेरणेचे दूसरे स्त्रोत जगात अस्तित्वात नाही. याची खात्री प्रत्येक मुस्लिम तरूणाने बाळगावी व भौतिक शिक्षण आणि नैतिक (इस्लामिक) शिक्षणातून स्वतःचा संतुलित विकास साधून मिळेल तो रोजगार प्राप्त करावा आणि देशाच्या उन्नतीमध्ये आपला वाटा उचलावा. जय हिंद !

- एम.आय.शेख

जाफरनगरच्या जामा मशिद येथे जमाअत ए इस्लामी हिंद नागपूरचा उपक्रम


नागपूर (डॉ. राशिद शेख) 

मस्जिदित येऊन आम्हाला उत्साही वाटत आहे, आमच्या अनेक गैरसमजूती व भिती दूर झाली आहे, आता वाटेल तेव्हा मशिदितील थंड पाण्याने आम्ही आमची तृष्णा भागवू शकतो, विश्वास आहे की येथे कुणासोबतही चुकीचा व्यवहार करण्यात येणार नाही. द्वेषाच्या वातावरणात मस्जिद परिचय हा चांगला उपक्रम आहे, यामुळे बंधुभाव, सौहार्द आणि सद्भावनेला चालना मिळेल. आम्हाला हे जाणून आश्चर्य झाले की येथे देशात बंधुभाव, शांती व विकासाकरिता अल्लाहकडे ‘दुआ’ (प्रार्थना) केली जाते. अशा प्रकारचे कार्यक्रम शाळा व्यवस्थापनासोबत युवक व विविध समुदायांसाठी मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जावे. अजान, नमाज ही अमर उपासना असल्याचे विचार विविध संप्रदायातील बांधवांनी मस्जिद परिचय कार्यक्रमात व्यक्त केले. 

जमाअत ए इस्लामी हिंद नागपूरच्यावतीने जाफरनगर मस्जिद कमेटीच्या संयुक्त विद्यामाने जाफरनगरच्या जामा मशिद येथे रविवारी (ता. 5 जून रोजी) मशिद परिचय कार्यक्रम घेण्यात आला.

उपस्थितांच्या परिचयानंतर मस्जिद परिचय कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर मस्जिदचे ‘मुअज्जन’ (अजान देणारे) ख्वाजा रफिउदीन सुहैल यांनी अजान दिली. मौलाना साद नदवी आणि संदेश विभागचे सचिव डॉ. नुरुल अमिन यांनी ‘नमाज’शी संबंधित अजान, वजु, नमाज, दुआ यांचे अर्थ समजावून सांगीतले. उपस्थितांना मस्जिदीच्या विविध स्थानांची माहिती देण्यात आली. यावेळी माहिती देतांना, प्रत्येक नमाजसाठी अजान आवश्यक असते, यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या  निर्देशांचे पालन केले जात आहे, सकाळची अजान लाउडस्पिकरवर दिली जात नाही आहे. नमाज ‘किब्ला’ (पश्चिमेकडे) चेहरा करून पढली जाते. ही दिशा ‘खाना ए काबा’ (पवित्र काबाची दिशा) आहे जे संपूर्ण विश्वाचे केंद्र आहे. नमाज पढतांना कुठलाही भेदभाव केला जात नाही. जो सर्वात आधी येतो त्याचे ते स्थान असते. तसेच इस्लाममध्ये कुठलाही ऊच निचतेचा भेदभाव नाही. मस्जिदमधील ‘मिंब’ (मौलवीकरिता बसण्यासाठी असलेली उंच जागा) विषयी माहिती देतांना सांगण्यात आले की, शुक्रवारच्या नमाजमध्ये येथे उभे राहून ‘इमाम’ (नमाज पठविणारे मौलवी) प्रवचनात धार्मिक आधारावर संस्कारमय जीवन जगण्याची कला व प्रेषित मुहम्मद (स.अ.व.) यांच्या जीवनावर आधारित बाबी सांगतात. मस्जिद परिचय कार्यक्रमात प्रश्नोत्तराच्या सत्रात, अजान कशासाठी, मशिदीत महिलांना प्रवेश, नमाज पठण करतांना कसे कपडे परिधान करावे आदी प्रश्नांचे तर्कसंगत उत्तरे देण्यात आली. यावेळी हेदेखील सांगण्यात आले की ‘तब्लीगी जमात’चे सदस्य कशाप्रकारे चार-पाच च्या संख्येत परिसरात जाऊन स्थानिकांना तसेच इस्लामच्या शिकवणीपासून दूर होत चाललेल्या मुस्लिमांना नमाजचे महत्त्व सांगून मस्जिदीत येण्यास सांगतात. व्यापाऱ्यांना वस्तू विक्री करतांना योग्य प्रकारे नियमानुसार मोजून द्यावी, चोरी करू नये, खोटे बोलू नये, मद्यप्राशन करू नये आदी बाबीही समजावून सांगण्यात येतात. मस्जिद परिचय उपक्रमात अजान, वजू, नमाज आणि दुआ चे प्रात्यक्षिकही करून दाखविण्यात आले. 

यावेळी मिलिंद झोडे, विजय पोहनकर, लक्ष्मण ठामरे, राजू इंगोले, नरेश इंगोले, साहेबराव क्षीरसागर, चिन्मय मुखर्जी, रिंकू, संजय प्रजापती, आनंद डेकाटे, आलोक प्रकाश चौबे, सुनील खोब्रागडे, राजकुमार रावत, विलास शेगांवरकर, शिवशंकर ताकतोडे, शैलेश पांडे, सुनील किरानाचे संचालक तसेच गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे मारोती आणि अनिल केंद्रे आदिंनी मोठ्या संख्येने उपस्थित होऊन कार्यक्रमाला यशस्वी केले. गुलाबाचे फूल देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले. 

मस्जिद कमेटीचे अध्यक्ष मीर अहमद हुसैन यांनी सांगीतले की, त्यांचे वडील मोहीयुद्दीन अहमद यांनी आजोबा मीर जाफर हुसैन यांच्या नावावर 1962 मध्ये 2600 चौरस फूटाचे सहा प्लॉट (एकूण 15,600 चौफु) खरेदी केले होते. मस्जिदेचे पहिले अस्थाई बांधकाम 1968 मध्ये झाले. 1976 मध्ये याचे पक्के बांधकाम करण्यात आले. 2005 मध्ये याचे नवनिर्माण करण्यात आले. 1982 मध्ये सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयात मशिद कमेटीची नोंदणी झाली व मला (मीर अहमद हुसैन) पहिला अध्यक्ष जाहिर करण्यात आले. याचे व्यवस्थापन आपल्या परिवाराकडे आहे. मस्जिदित प्रत्येक आवश्यक सुविधांचा समावेश आहे. मस्जिदीत मुले आणि मुलींसाठी वेगवेगळे वर्ग चालतात. यात त्यांना अरबी, उर्दु आणि धार्मिक बाबी शिकविल्या जातात. विवाहित महिलांनाही सासरी चांगले जीवन जगण्याच्या बाबी सांगीतल्या जातात. येणाऱ्या जमातच्या व्यक्तींकरिता येथे निवास व भोजनाची व्यवस्था आहे. कुठल्याही प्रवाश्याला येथे थांबण्याची परवानगी तेव्हाच देण्यात येते जेव्हा त्याच्याजवळ आधारकार्ड व इतर आवश्यक कागदपत्र असतात. येथे सीसीटीव्ही सुद्धा लावण्यात आले आहेत. येथे हाफीज रहमतुल्लाह व हाफिज अशफाक असे दोन (इमाम) मौलवी आहेत. तसेच गुलाम व रसूल हे दोन मुअज्जन (अजान देणारे) आहेत. काही दिवसांपूर्वी परिसरात नाल्याचे पाणी पेयजलापूर्ती करणाऱ्या पाईपलाइनमध्ये गेल्याने नागरिकांनी पेयजलाची समस्या झाली होती, तेव्हा मशिदीच्यावतीने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

मस्जिद परिचयाचा कार्यक्रम प्रत्येक शहर, गाव, वाडी-तांड्यावर घेण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून मुस्लिमेत्तर बांधवामधील मस्जिदीबद्दलचे गैरसमज दूर होतील. कुरआन आणि हदीसमध्ये असलेल्या संदेशांबद्दल सर्वांना माहिती देणे आवश्यक आहे. कारण आजकाल उठसूट काही तथाकथित समाजकंटक धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. अशांना उत्तर चांगले काम करून दिले जावे, असा सूर उमटला. 


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget