Halloween Costume ideas 2015

मित्राकडून अभिनंदन !

मित्राकडून अभिनंदन ! -------------------------
रात्रीची वेळ. कोविड युद्धावरून थकूनभागून आलेले उधोजी राजे जेवणानंतर आपल्या दिवाणखान्यात शतपावली करीत आहेत. एका खुर्चीवर बसलेले बाळ राजे उधोजींच्या मोबाईलवर कोणतातरी गेम खेळण्यात मग्न आहेत. अचानक बाळ राजेंच्या हातातील मोबाईलची रिंग वाजते. ‘नायक नही खलनायक हुं मै , जुलमी बडा दुखदायक हुं मै.' रिंगटोन ऐकताच बाळ राजे दचकतात तर उधोजी राजेंच्या कपाळावर आठ्या उमटतात.
' काय पीडा आहे साली.' उधोजी राजे पुटपुटतात.
बाळ राजे मोबाईलच्या स्क्रीनवर नजर टाकतात. त्यावर ‘झारीतले शुक्राचार्य कॉलिंग' अशी अक्षरे उमटलेली दिसतात.
‘डॅड, अशी काय हो रिंगटोन ठेवलीत. व्हेरी पुअर चॉईस. आणि कोण हे 'झारीतले
शुक्राचार्य'?'
‘काही लोकांसाठी अशीच नावं आणि अशीच रिंगटोन परफेक्ट असते. तुला नाही कळणार ते. दे तो फोन इकडे.'
बाळ राजे हात मागे नेत मोबाईल लपवतात.
‘मला नाही कळणार म्हणजे काय? डॅड, मंत्री आहे मी आणि आमदारसुद्धा! तोही लोकांमधून निवडून आलेला; म्हणजे थोडक्यात परीक्षा देऊन पास झालेला!'
‘ही अक्कल कोणी शिकवली तुम्हाला राजे?' ‘काल देवा अंकलांचा फोन आला होता मला. त्यांनीच सांगितलं मला की, तू परीक्षा देऊन पास झाला आहेस, लोकांनी तुला निवडून दिला आहे, ज्यांना हे जमत नाही ना ते मागच्या दाराने येतात म्हणून. अभिनंदनही केलं त्यांनी माझं. रिअली, किती मॅनर्स एटीकेट्स आहेत ना देवा अंकलांना?'
उधोजी राजे बाळ राजेंकडे एक जळजळीत कटाक्ष टाकतात आणि त्यांच्या हातातला मोबाईल जवळजवळ हिसकावून कानाला लावतात.
‘बोला, माजी बोला. कशी आठवण आली आमची?'
पलीकडच्या फोनवर देवानाना नागपूरकर असतात.
‘त्याचं काय आहे सेनापती- - -'
‘सेनापती?'
‘हो, म्हणजे घरात बसून तुम्ही नेतृत्व करताहेत ना करोना विरुद्धच्या युद्धाचं, म्हणून सेनापती, आम्ही माजी तर तुम्ही सेनापती, कळलं?'
‘बरं, बरं. टिंगलटवाळी पुरे.फोन कसा केलात ते सांगा.'
‘कसा केलात म्हणजे काय? अभिनंदन करायला केला, तुमचं!'
‘माझं अभिनंदन? ते कशासाठी बुवा?'
‘अरे व्वा,  आमदार झालात तुम्ही, करोना
बॅचमध्ये. लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये पाचवे आलात तुम्ही, करोना बॅचमध्ये. मग अभिनंदन नको का करायला?'
‘करोना बॅचमध्ये, म्हणजे?'
‘म्हणजे परीक्षा न देता!'
‘असं सहजासहजी काही मिळत नसतं माणसाला; त्यासाठी दिवसरात्र लोकांची कामं करावी लागतात. करावी लागतात म्हणजे काय करतोच आहे मी. किंबहुना यापुढेही करतच राहणार आहे. लक्षात ठेवा, हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि याला पुढे नेण्यासाठी मी वाट्टेल तितकी मेहनत घेईन.घेतोच आहे. किंबहुना घेतच राहणार आहे.'
‘हो ना, इतकी लोकांची कामं करता, पण
लोकांमधून निवडून येऊन आमदार बनणं नशिबात नव्हतं तुमच्या, म्हणून मग मागच्या दाराने आमदार बनावं लागलं. चालायचंच.'
‘हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. इथे असं मागच्या दाराने काही होत नसतं. आणि मी जे काही करतो ते सर्व अगदी खुल्लमखुल्ला असतं. त्यात लपवाछपवी काही नसते. नसतेच काही लपवाछपवी.'
‘तुम्ही ‘शोले' पाहिला होता का हो?'
‘का? आणि मध्येच हा ‘शोले' कुठून आला?' ‘नाही, म्हणजे हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे हे सर्वांना माहीतही आहे आणि मान्यसुद्धा आहे; पण ते तुमच्या तोंडून नेहमी नेहमी ऐकतांना,
'शोले'तला ‘हम अंगरेज के जमाने के जेलर हैं.' म्हणणारा असरानी आठवतो म्हणून विचारलं. हॅलो, हॅलो, हॅलो- - - ठेवला वाटतं फोन.'

-मुकुंद परदेशी, मुक्त लेखक
भ्रमणध्वनी क्र. ७८७५०७७७२८

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget