Halloween Costume ideas 2015

मुस्लिमचा मुस्लिमवर अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)

माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार,
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाहची शपथ! ज्याच्या ताब्यात माझे प्राण आहेत, कोणताही मनुष्य ईमानदार होऊ शकत नाही जोपर्यंत तो आपल्या बंधुकरिता ते सर्वकाही पसंत करीत नाही जे स्वत:साठी पसंत करतो.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाहच्या भक्तांपैकी काही असे लोक आहेत जे पैगंबर (नबी) नाहीत आणि हुतात्मा नाहीत, तरीही पैगंबर आणि हुतात्मे अंतिम निवाड्याच्या दिवशी त्यांच्या पदावर गर्व करतील जे अल्लाहपाशी मिळेल.’’

लोकांनी विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! हे लोक कोण असतील?’’
पैगंबर म्हणाले, ‘‘हे लोक आपसांत एकमेकांचे नातेवाईक नसतील आणि आपसांत संपत्तीची देवाणघेवण करीत नव्हते तर फक्त अल्लाहच्या ‘दीन’ (धर्मा) च्या आधारे एकमेकांशी प्रेम करीत होते. अल्लाह शपथ! त्यांचे चेहरे तेजस्वी असतील आणि त्यांच्या चोहीकडे प्रकाश पसरलेला असेल. त्यांना कसलेही भय नसेल, जेव्हा लोक भयग्रस्त असतील आणि कसलेही दु:ख नसेल, जेव्हा लोक दु:खग्रस्त असतील.’’
मग पैगंबरांनी या आयतीचे पठण केले– ‘‘अला इन्ना औलियाअल्लाहि ला ़खौफुन अलैहिम वला हुम यह़जनून.’’ (हदीस)

स्पष्टीकरण
 खरे तर हदीसमध्ये ‘ग़बित’ हा शब्द आला आहे. या शब्दाचा अर्थ ‘अतिशय आनंदित होणे’ असा आहे. हा शब्द ‘गर्व’ व ‘ईर्षा’साठीदेखील वापरण्यात आला आहे. येथे पहिला अर्थ लागू होतो. या हदीसचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे एखाद्या विद्याथ्र्याने जेव्हा उच्च स्थान प्राप्त केले तर शिक्षकाला अत्यानंद होतो आणि त्याला त्याचा गर्व वाटू लागतो, त्याप्रमाणे सर्वांत उच्च स्थानी असलेले पैगंबर व हुतात्मे त्या लोकांच्या यशाबद्दल आनंदीत होतील. वर उल्लेख करण्यात आलेल्या लोकांच्या प्रेमचा पाया फक्त ‘दीन’वर होता. रक्ताचे नाते आणि संपत्तीच्या घेवाणदेवाणीमुळे त्यांना आपसांत जोडले नव्हते तर इस्लाम आणि इस्लामी जीवन निर्माण करण्याच्या उत्साहाने त्यांना एकमेकांचे मित्र आणि सहकारी बनविले होते. असा लोकांसाठी जगात विजय व यशाची शुभवार्ता देण्यात आली आहे आणि परलोकात कायमस्वरूपी राहणारे बक्षीसदेखील.

सूरह यूनुसच्या आयतीचा वर उल्लेख करण्यात आला आहे. ती पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर विश्वास बाळगणाऱ्यांच्या आणि ‘दीन’च्या मार्गात त्रास सहन करणाऱ्याच्या आणि ‘ईमानी’ (श्रद्धावंताच्या) जीवनासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या आणि अज्ञानतेच्या शासनाशी संघर्ष करणाऱ्यांच्या बाबतीत आहे. अल्लाह म्हणतो, ‘‘लहुमुल बुश्रा फ़िलहयातिद्दुनिया व फ़िल-आ़िखरति.’’ अर्थात- त्यांच्यासाठी शुभवार्ता आहे या जगातही

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget