Halloween Costume ideas 2015

मुस्लिमचा मुस्लिमवर अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)

माननीय अबू मूसा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मुस्लिम मुस्लिमासाठी इमारतीसमान आहे जिचा एक भाग दुसऱ्या भागाला शक्ती प्रदान करतो.’’ मग पैगंबरांनी आपल्या एका हाताच्या बोटांना दुसऱ्या हाताच्या बोटांशी जुळवून दाखविले. (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
या हदीसमध्ये मुस्लिम समाजाला इमारतीची उपमा दिली आहे. ज्याप्रमाणे त्या इमारतीच्या विटा एकमेकांशी जुळलेल्या असतात त्याप्रमाणे मुस्लिमांना आपसांत जुळून राहिले पाहिजे आणि मग ज्याप्रकारे विटा एकमेकांना शक्ती व आधार देतात त्याप्रकारे त्यांनीदेखील एकमेकांना आधार दिला पाहिजे. ज्याप्रमाणे विस्कटलेल्या विटा एकमेकांना जुळून मजबूत इमारतीचे स्वरूप साकारतात त्याप्रमाणे मुस्लिमांच्या शक्तीचे रहस्य त्यांच्या आपसांत जुळण्यात आहे. जर त्या विस्कटलेल्या विटांसारखे राहिले तर त्यांना वाऱ्याची प्रत्येक झुळूक उडवून घेऊन जाईल आणि पाण्याची प्रत्येक लाट वाहून नेऊ शकते. शेवटी ही हकीकत एका हाताच्या बोटांना दुसऱ्या हाताच्या बोटांशी जुळवून स्पष्ट करून सांगितले.

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मुस्लिम मुस्लिमचा आरसा आहे आणि मुस्लिम मुस्लिमचा भाऊ आहे. तो त्याला विनाशापासून वाचवितो आणि पाठीमागून त्याचे संरक्षण करतो.’’ (हदीस : मिश्कात)

स्पष्टीकरण
‘एक मुस्लिम दुसऱ्या मुस्लिमसाठी आरसा आहे.’ म्हणजे त्याच्या त्रासाला आपला त्रास समजतो. ज्याप्रमाणे तो आपल्या त्रासामुळे तडफडतो तसाच हादेखील तडफडेल आणि तो त्रास कमी करण्यासाठी बेचैन होईल.

‘‘तुमच्यापैकी प्रत्येकजण आपल्या बंधुचा आरसा आहे. जर तो संकटात असेल तर त्याचे संकट दूर करील.’’

स्पष्टीकरण
अशा प्रकारे जर त्याच्यात एखादी दुर्बलता पाहतो तेव्हा त्याला आपली दुर्बलता समजून ती नष्ट करण्याचा प्रयत्न करतो.
माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तू आपल्या बंधुची मदत कर, मग तो अत्याचारी असो की अत्याचारपीडित.’’ तेव्हा एका मनुष्याने विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! अत्याचारपीडित असेल तर मी त्याची मदत करीन, परंतु तो अत्याचारी असेल तर मी त्याची कशाप्रकारे मदत करू शकेन?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘तुझे त्याला अत्याचार करण्यापासून रोखणे हेच त्याला मदत होईल.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मुस्लिम मुस्लिमचा भाऊ आहे. तो त्याच्यावर अत्याचार करीत नाही आणि त्याला एकटे सोडत नाही आणि आपल्या भावाची आवश्यकता पूर्ण करील, अल्लाह त्याची आवश्यकता पूर्ण करील. जो मनुष्य एखाद्या मुस्लिमाची अडचण दूर करील, अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी त्याची अडचण दूर करील. जो मनुष्य एखाद्या मुस्लिमचे दोष लपवील, अल्लाह अंतिम निवाड्याच्या दिवशी त्याचे दोष लपवील.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीरकण : हदीसचे शेवटचे शब्दांचा अर्थ असा आहे की जर सदाचारी मुस्लिमकडून एखादी चूक घडली तर त्याला लोकांच्या नजेतून उतरविण्यासाठी ठिकठिकाणी सांगत फिरण्याऐवजी त्याच्या दोषांवर पडदा घाला, त्या मनुष्याच्या विपरीत जो उघडपणे अल्लाहची अवज्ञा करतो, तेव्हा त्याच्या दोषांना लपविण्याऐवजी त्याला उघडे पाडण्याचा पैगंबरांनी आदेश दिला आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget