Halloween Costume ideas 2015

धार्मिक भेदभावाचा आर्थिक प्रगतीवर दुष्परिणाम-३

मुस्लिमांना रोजगारीत रिचविणे
रोजगाराच्या उपलब्धतेमुळे व्यक्तीला आणि तिच्या परिवाराला क्रयशक्ती मिळते, तिला उपजीविका आणि तिच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून उपयोग्य वस्तू, सुखसमाधान आणि पुâरसत प्राप्त करण्यास समर्थ करते. त्याशिवाय रोजगाराद्वारा मिळालेल्या वाढत्या कमाईमुळे बचत व गुंतवणुकीस मदत होते. याचेच टिकावू उपभोग्य वस्तूंच्या खरेदीमध्ये आणि शिक्षण, आरोग्य आणि स्थावर जंगमसारख्या क्षेत्रामधील गुंतवणुकीत रुपांतर होते. भविष्यकालीन उत्पन्नातील वाढीसाठी आणि व्यक्तिगत तसेच आर्थिक पातळीवर टिकावू वाढीसाठी अशा प्रकारची गुंतवणूक निर्णायक असते. मालकी हक्कातील अशाप्रकारच्या वाढीपासून मिळालेले आर्थिक फायदे मोठे असले तरी रोजगारीचे सुद्धा ठळक बिगर-आर्थिक फायदे असतात. आपण एखाद्या योग्य कामात व्यस्त आहोत असा विश्वास व्यक्तीला स्वत:च्या मूल्याची आणि आपण स्वस्थ आहोत याची जाणीव करून देते.
भौतिक मालमत्ता (खासकरून जमीन) आणि मानवी संपत्ती (विशेषत: शिक्षण) यांच्या मालकीने केवळ रोजगाराच्या संधीवरच परिणाम होतो असे नाही तर व्यावसायिक नमुनेसुद्धा निर्धारीत होतात. या मालमत्तेकडे जाण्याच्या अपुऱ्या सापेक्ष सुगमतेने कामगार-बाजार परंपरेच्या खालच्या टोकाला कामगार अटकून राहतात. असे आग्रहाने प्रतिपादन केले जाते की, शिक्षणाचा सकारात्मक संघात हा बाजाराच्या (रोजगाराच्या) संधींच्या अस्तित्वावर निर्णायकपणे अवलंबून असतो. शिक्षणाला रोजगारी मिळवण्याच्या अधिकतर संभवनियता किंवा अधिकतर उत्पन्न कमावणे या स्वरूपात दिलेल्या आर्थिक मोबदल्याशिवाय मानवी साधनसंपत्तीच्या उभारणीत गुंतवणूक होऊ शकणार नाही. त्याबरोबरच भौतिक मालमत्तेचे स्वामित्व एकीकडे रोजगाराच्या संधी निर्माण करते तर रोजगारीतील वृद्धी ही नव्या भांडवल उभारणीसाठी साधनसंपत्ती तयार करते.

कामगार लोकसंख्येचे गुणोत्तर प्रमाण आणि बेकारीचे प्रमाण
विशाल अर्थाने कामगार लोकसंख्येचे गुणोत्तर प्रमाण एखाद्या विशिष्ट लोकसमूहाने आर्थिक कार्यातील केलेल्या सहभागाची कमाल कल्पनेची पूर्तता करते. कामचा शोध घेण्याची क्षमता हे मालमत्तेचे (भौतिक आणि अन्य दोन्हीही) तसेच उपलब्ध कामांच्या संधींचे कार्य आहे. त्याचप्रमाणे एखाद्या समृद्ध परिवारातील व्यक्ती (विशेषत: स्त्रिया) (उदा॰ मोठे जमीनधारक) हे कदाचित कामगारशक्तीमध्ये सहभागी होऊही शकणार नाहीत. कारण त्यांना अशा बळजबरीची आर्थिक गरज नसेल. समृद्धी गृहित धरून उपलब्ध काम हे एखाद्या व्यक्तीला आवडत असूनही तो /ती कदाचित करूही शकणार नाही. कामांमधील या निवडी सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक अशा विविध प्रकारच्या घटकांचे कार्य आहे. आणखी असे की, कामाच्या अनुपलब्धतेमुळे लोक (विशेषकरून स्त्रिया) श्रमिक शक्तीमधून आपले अंग काढून घेण्याच्या अवस्थेमध्ये परिणाम होतो. सामाजिकशास्त्र संशोधनामध्ये याचा ‘धैर्य खचविणारा कामगार परिणाम’ असा संदर्भ आलेला आहे. त्याचाच परिणाम म्हणून कामगार लोकसमूहाच्या गुणोत्तर प्रमाणातील तफावती या समृद्धी तसेच रोजगारसंधींचे स्वरूप आणि प्रक्षेपण यातील तफावतींमध्ये त्यांचे प्रतिबिंब उमटले आहे.
बेकारीच्या प्रमाणाचे प्रतिबिंब उपलब्ध व्यक्ती आणि रोजगार इच्छुक श्रमिक शक्तीच्या सापेक्ष प्रमाणात उमटते. विकसनशील देशामध्ये मुक्त बेकारी (खासकरून नेहमीचा दर्जा) ही विशिष्टरीत्या कनिष्ठच आढळून येते. गरिबांच्या बऱ्याच मोठ्या समुहास बेकार राहणे परवडत नाही आणि म्हणून त्यांना मिळेल ते काम हाती घ्यावे लागते. ते कदाचित पगारी नोकर म्हणून नियुक्त झाले नसतील आणि एखाद्या संपूर्ण वर्षात कामाचे इच्छुक म्हणून स्वत: कळवित सुद्धा नसावेत. म्हणून नेहमीच्या बेकारीच्या दर्जाच्या प्रमाणाऐवजी दैनंदिन बेकारीचे प्रमाण याची नोंद घेतली जाते.
मुस्लिमांचे कामगार लोकसमुहाचे गुणोत्तर प्रमाण हे ग्रामीण भागातील अन्य सर्व सामाजिक-धार्मिक गटवारीपेक्षा ठळकपणे कनिष्ठतर आहे. परंतु शहरी विभागामध्ये फक्त अंदाज कमी आहे. मुस्लिमांचे कामातील सहभागाचे एकत्रित कमी प्रमाण हे समुदायातील स्त्रियांचा आर्थिक कार्यांतील अतिशय कमी सहभाग यामुळेच संभवते. तथापि भिन्न-भिन्न समुदायांतील पुरुषांबाबत ते फारसे भिन्न नाही. मजेची बाब अशी की, मुस्लिम स्त्रियांच्या कामातील सहभागाचे प्रमाण हे उच्चवर्णीय हिंदू परिवारातील स्त्रियांपेक्षाही फारच कमी आहे. याला कारण स्त्रियांच्या कामाला काही सामाजिक-धार्मिक प्रतिबंध असू शकतात.
सर्वसाधारणपणे भारतातील १५ ते ६४ या वयोगटातील सुमारे ४४ टक्के स्त्रिया श्रमिकशक्तीमध्ये सहभागी होतात, तर सुमारे ८५ टक्के पुरुष सहभागी होतात. तथापि सर्वसाधारण सरासरीने मुस्लिम स्त्रियांमधील श्रमिकशक्ती सहभागाचे प्रमाण हे फक्त सुमारे २५ टक्के आहे. ग्रामीण विभागामध्ये श्रमिकशक्तीमध्ये सुमारे ७० टक्के हिंदू स्त्रिया सहभाग घेतात, तर फक्त सुमारे २९ टक्के मुस्लिम स्त्रिया सहभाग घेतात. ग्रामीण भागातील उच्चवर्णीय हिंदू स्त्रियांच्या उच्च सहभागाचे प्रमाण आहे ४३ टक्के. ग्रामीण भागातील स्त्रियांचा कनिष्ठतर सहभाग हा मुस्लिम परिवारांमध्ये (आणि म्हणूनच स्त्रियांमध्ये) शेतीकामामध्ये व्यस्त राहण्याची शक्यता फारच कमी असते या वस्तुस्थितीमुळे सहभाग असतो, याचे अंशत: स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे. शहरी विभागातील मुस्लिम स्त्रियांचे कामगार सहभाग प्रमाण हे १९ टक्क्यांपेक्षाही खाली आहे, याला परिवारातील स्त्रियांना कामाच्या संधी फारच मर्यादित असाव्या, हे कारण असू शकते. अशा प्रकारच्या संधी ग्रामीण भागात काहीशा अधिक असू शकतील, जमिनीची मालकी असल्यामुळे (मर्यादित असली तरी) मुस्लिम स्त्रियांचा सहभाग या विभागात काहीसा उच्च असावा.

मुस्लिम स्त्रियांच्या उच्च परावलंबित्वाचे प्रमाण
कारण जमातीतील तरुण लोकसमूहाच्या सापेक्षतेने उच्च समभागामुळे स्त्रियांना घरीच राहणे ाâमप्राप्त झाले असावे. हे मुस्लिम स्त्रियांच्या कमीतकमी सहभागाच्या कारणांपैकी एक असावे. एकूण लोकसंख्येच्या २३ टक्के लोक १० वर्षे वयाखाली (म्हणजेच ० ते ९ या वयात), २७ टक्के मुस्लिम लोकसंख्या या टप्प्यात मोडते. पुढे १० ते १४ या वयोगटात मुस्लिमांच्या बाबतीत दोन टक्क्यांचा अतिरिक्त लाभ त्यांना मिळतो. ही एक मोठ्या प्रमाणात तरुण वयावर अवलंबून राहण्याची अवस्था आहे. तथापि वयस्करांचा समभाग हा सर्वसाधारण लोकसंख्या तसेच मुस्लिम लोकसंख्या या दोहोंचाही उच्च नाही. अशा तNहेने वृद्ध वयावर अवलंबून राहण्याचे प्रमाण उच्च नाही.
‘तरुण वयावर अवलंबून राहण्याच्या प्रवृत्ती’चा एकत्रित (डब्ल्यूपीआर) कामगार सहभाग प्रमाणावर काय अर्थ ध्वनित होतो? वयोविशिष्ट (डब्ल्यूपीआर) कामगार सहभाग प्रमाण असे दर्शवितात की, सहभाग प्रमाण हे सर्वच वयोगटाच्या दृष्टीने पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या बाबतीत, ग्रामीण आणि शहरी विभाग या दोहोंमध्ये कनिष्ठतर आहेत. म्हणून ‘तरुण वयावर अवलंबून राहण्याची प्रवृत्ती’ मुस्लिमांमध्ये कनिष्ठतर (डब्ल्यूपीआर) कामगार सहभाग प्रमाणाकडे झुकत असल्याचे दिसून येत नाही.
दैनिक दर्जा बेकारीचे प्रमाण हे सर्वसाधारणपणे ११ टक्क्यांपेक्षा अधिक उच्च नाहीत. एकूणात बेकारीचे प्रमाण हे सर्व मुस्लिमांच्या बाबतीत (एकत्रित करून) सर्व हिंदूंपेक्षा किंचित उच्च आहे. परंतु प्रत्येक गटामध्ये तफावती आहेत. सर्वसामान्यपणे हिंदूंमध्ये बेकारीचे प्रमाण (यूआर) उच्चवर्णीय हिंदूंच्या बाबतीत इतरांपेक्षा (खासकरून अनुसूचित जाती-जमातींपेक्षा) कनिष्ठतर आहे. मुस्लिमांमधील बेकारीचे प्रमाण (पुरुष, स्त्रिया, ग्रामीण आणि शहरी) हे अनुसूचित जाती-जमाती यांच्यापेक्षा कनिष्ठतर परंतु हिंदू उच्चवर्णीयांपेक्षा अधिक आहे. ते शहरी विभागातील हिंदू ओबीसींपेक्षा अधिक उच्च आहे.
कामगारांच्या सहभागाचे प्रमाण (डब्ल्यूपीआर) आर्थिक कार्यामध्ये एखाद्या जमातीचा जास्तीत जास्त सहभाग किती असू शकतो, याचे सूचक संकेत पुरविते, तर कामाचा दर्जा या कार्यांत सहभागी होणाऱ्या कामगारांच्या क्षमतेचे वर्णन करते. उदा॰ कामगार हा स्वयं-नियुक्त किंवा नोकर असू शकेल. याशिवाय तो किंवा ती पगारी नोकर म्हणून किंवा रोजंदारीने अथवा अन्य प्रकारे काम करीत असेल.

- शाहजहान मगदुम
कार्यकारी संपादक, ‘शोधन’.
मो.: ८९७६५३३४०४

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget