मुंबई
महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय काम करून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आणि प्रशासकीय व्यवस्थेला सकारात्मक दृष्टी देणाऱ्या एका कर्तृत्ववान अधिकाऱ्याला आपण मुकलो आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले असून महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव तसेच ज्येष्ठ सनदी अधिकारी राम प्रधान यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी पुढे म्हटले आहे की, श्री. प्रधान यांनी आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय कारकीर्दीत अनेक विभागात काम केले. रचनात्मक आणि विधायक कामाला आपल्या अनुभवांची जोड देतांना राम प्रधान यांनी राज्य आणि राष्ट्रीयस्तरावरचे अनेक प्रश्न संयमाने, मुत्सदेगिरीने आणि अभ्यासपूर्वक हाताळले. अनेक विषयांचा सखोल अभ्यास हे त्यांचे वैशिष्ट्य होते. प्रशासकीय अधिकारी ते अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल असा त्यांचा कार्य प्रवास नेहमीच सर्वांसाठी प्रोत्साहन देणारा राहिला असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Post a Comment