Halloween Costume ideas 2015

इजराईल-युएई करार

अब्राहम अकॉर्ड काय आहे?

आठवडा इजराईल-युनायटेड अरब अमिरात यांच्यातील एका होवू घातलेल्या कराराने गाजला. त्या कराराचे नाव अब्राहम अकॉर्ड असे आहे. त्या करारावर येत्या दोन महिन्यात अमेरिकेमध्ये दोन्ही देशांच्या प्रमुखांच्या सह्या होतील. याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः केली. ते म्हणाले की, मध्यपूर्वेतील आमचे दोन मित्र यांनी आपसात करार करण्याचा निश्‍चय केला आहे. स्पष्ट आहे इजराईल युएईच्या या करारामागे दोन प्रमुख देशांची मुख्यभूमिका आहे. एक सऊदी अरब तर दूसरा अमेरिका.            
    या करारामुळे इजराईल आणि युएईला काही लाभ मिळो न मिळो मात्र येत्या निवडणुकांमध्ये राष्ट्रपती यांना निश्‍चितच थोडाबहुत लाभ होईल. अमेरिकेतील मजबूत यहुदी लॉबी त्यांच्या प्रचारासाठी हराम व्याजातून कमावलेल्या डॉलरच्या थैल्या सैल करतील.
    14 मे 1948 रोजी संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार पॅलेस्टिनच्या भूमीवर इजराईलची अनैतिकपणे स्थापना झाल्यानंतर सातत्याने अमेरिकेने इजराईलची पाठराखण केलेली आहे. मध्यपूर्वेतील तेल संपन्न राष्ट्रांवर आपले नियंत्रण रहावे यासाठी इजराईलचा अमेरिकेने एका सैनिक अड्ड्यासारखा उपयोग केलेला आहे.
    संयुक्त राष्ट्राच्या नोंदणीकृत 193 देशांपैकी 163 देशांनी इजराईलला राजकीय मान्यता दिलेली आहे मात्र मुस्लिम राष्ट्रांपैकी फार कमी राष्ट्रांनी इजराईलला राजकीय मान्यता दिलेली आहे. इजिप्त (1979) आणि जॉर्डन (1994) नंतर युएई आता (2020) तिसरा देश झालाय ज्यांनी इजराईलला राजकीय मान्यता दिलेली आहे.
    या होवू घातलेल्या अब्राहम करारामुळे मुस्लिम जगतामध्ये अतिशय तीव्र अशा प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. ओमान आणि बहरीन वगळता इतर मुस्लिम देशांनी या कराराचा विरोध केलेला आहे. तुर्कीने याला युएईची ऐतिहासिक चूक म्हणून पॅलेस्टिनींचा विश्‍वासघात केल्याची प्रतिक्रिया दिली असून, इराणनेही या विरोधात तीव्र प्रतिक्रिया दिलेली आहे. पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेचे अध्यक्ष महेमूद अब्बास यांनी युएईवर राजद्रोह केल्याचा ठपका ठेवलेला असून, वेस्टबँक मधील पॅलिस्टीनियन ऑर्गनायझेशन हमास यांनी या कराराचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे.
    कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ” यहुदी आणि ख्रिस्ती तुमच्याशी कदापी सहमत होणार नाहीत जोपर्यंत त्यांच्या पद्धतीने तुम्ही वागणार नाही. त्यांना स्पष्टपणे सांगा कि अल्लाहने सांगितलेला मार्गच योग्य आहे. अन्यथा तुझ्याकडे आलेल्या ज्ञानानंतर जर तू त्यांच्या इच्छांचे अनुसरण करशील तर अल्लाहच्या प्रकोपापासून वाचविणारा तुझा कोणीही मित्र किंवा सहाय्यक असणार नाही.”(सुरह बकरा आयत नं. 120)
    युएईचे शासक मुहम्मद बिन नहयान यांनी स्वतः अरब असून, वर नमूद आयातीच्या विरोधात वर्तन करून स्वतःवर अल्लाहचा प्रकोप ओढवून घेतलेला आहे.
    या कराराची घोषणा करतांना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेले आहे की, ”या कराराच्या बदल्यात इजराईल वेस्ट बँकमधील आपली विस्तार योजना स्थगित करेल.” त्यांच्या या घोषणेला लगेच पाठिंबा देत इजराईलच्या पंतप्रधान नेतनयाहू यांनी सांगितले की, ”बरोबर आहे आम्ही तूर्त वेस्टबँकमधील पॅलेस्टाईनच्या वस्त्या तोडून तेथे ज्यूंच्या वस्त्या तेथे वसविण्याच्या योजनेला स्थगिती दिलेली आहे. परंतु ही माझी प्रिय योजना आहे या योजनेची फाईल माझ्या टेबलवरच राहील. लवकरच आम्ही या योजनेला मुहूर्त स्वरूप देऊ.”
    येणेप्रमाणे नेतनयाहू यांनी आपल्या दुटप्पी भूमिकेची घोषणा करून अब्राहम अकॉर्ड किती तकलादू आहे हे निदर्शनास आणून दिलेले आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget