Halloween Costume ideas 2015

युपीएससीत मुस्लिम टक्का घसरतोय

UPSC
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (युपीएससी) 2019 वर्षाच्या परीक्षेचा अंतिम निकाल मागच्या आठवड्यात घोषित करण्यात आला. 829 यशस्वी उमीदवारांमध्ये 43 मुस्लिम उमेदवार सामील आहेत. परंतु, या 43 पैकी फक्त एक आयएएस होईल. बाकीच्या लोकांना इतर केडरमध्ये सामावून घेतले जाईल. कारण बाकीच्यांच्या रँक्स या गुणवत्ता सूचीमध्ये खालच्या स्थानी आहेत. पहिल्या 20 मध्ये एकही मुस्लिम उमीदवार नाही. आणि पहिल्या 100 मध्ये एक मुस्लिम आहे. निवडल्या गेलेल्या उमेदवारांमध्ये मुलींचे प्रमाण दखल घेण्याजोगे असून, बहुतेक उमेदवार हे मध्य आणि दक्षीण भारतातील आहेत. निवड झालेल्या उमेदवारांचे नाव आणि आणि त्यांचे यादीतील स्थान खालीलप्रमाणे -
    1. सफना नजीरूद्दीन (रँक -45), 2. शेख मोहम्मद जेब जाकीर (रँक - 153), 3. रमिजा फातेमा (रँक - 185), 4. नोंगजे मुहम्मद अक्रमशहा (रँक - 188), 5. समीर अहेमद (रँक - 193), 6. सूथन अब्दुल्लाह (रँक - 209), 7.सोफिया (रँक - 241),  8. असरार अहेमद किचलू (रँक - 248), 9. नुरूल कमर (रँक - 252), 10. अजमल शहेजाद अली (रँक - 254 ), 11. फरमान अहेमद खान (रँक - 258), 12 मुहम्मद शफिक (292), 13. सुफियान अहेमद (303), 14 अझरूद्दीन जहिरूद्दीन काझी (315), 15 आसिफ युसूफ तांत्रे (328), 16. अहेमद बिलाल अन्वर (332), 17. नाबिया बेग (350), 18. आशिक अली (367), 19. मुहम्मद याकूब (385), 20. साहूल हमीद (388), 21. शाहीन सी (396), 22. शब्बीर आलम (403), 23. आफताब रसूल (412), 24. शियाज केम (422), 25. अहेमद आशिक (460), 26. मुहम्मद नदीमोद्दीन (461), 27. सय्यद जाहिद अली (476), 28. मुहम्मद दानिश (487), 29. मुहम्मद कमरूद्दीन खान (511), 30. माज अख्तर (529), 31. मुहम्मद अकील (579), 32. रिहान खत्री (596), 33. समीर रझा (603), 34. फैसल खान (611), 35. सैफुल्लाह (623), 36. सब्जर अहेमद (628), 37. माजीद इक्बाल खान (638), 38. फिरोज आलम (645), 39. रूहना तुफेल खान (718), 40. रईस हुसैन (747), 41. मुहम्मद नवाज शरफोद्दीन (778), 42. शेख शोएब (823), 43. सय्यद जुनैद आदील (824).
    यावर्षी घोषित झालेल्या निकालामध्ये प्रदीपसिंह यांनी प्रथम क्रमांक मिळविलेला असून, जतीन किशोर आणि प्रतिभा वर्मा अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर आहेत. हा निकाल 217-18 च्या तुलनेत मुस्लिमांसाठी निराशाजनक आहे. 2017 मध्ये सादमियाँ खान 25 व्या थानी तर 2018 मध्ये जुनैद हे तिसर्‍या स्थानी आले होते. 2017 साली 52 मुस्लिम उमीदवार यशस्वी झाले होते. 45 रँकवर असलेली सफना नजरूद्दीन ही एकमेव मुस्लिम उमेदवार हीच आयएएस बनू शकते. बाकी उमेदवारांना इतर सेवांमध्ये सामील केले जाईल. मुस्लिम उमीदवारांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अतिशय कमी असून, ते 3 ते 6 टक्क्याच्या आत राहील, याची खात्री युपीएससीकडून अदृश्यरित्या घेतली जाते की काय? अशी शंका येईल इतके सातत्य या सरासरीमध्ये असते. भारतामध्ये 15 टक्क्यापेक्षा जास्त मुस्लिम राहत असून, त्यांच्या लोकसंख्येच्या मानाने अर्धे सुद्धा प्रतिनिधीत्व त्यांना अखिल भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये मिळत नाही. स्वातंत्र्याच्या 73 वर्षानंतर सुद्धा हे एक विदारक सत्य आहे.
    यावर्षी संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या बाबतीत आणखीन एक विवाद पुढे आला असून, मोठ्या प्रमाणात इतर मागासवर्गीय नागरिकांमध्ये या निकालामुळे अस्वस्थता पसरलेली आहे. त्याचा तपशील असा की, जेव्हा संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षा 2019 च्या जाहीर झाल्या होत्या तेव्हा 927 पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती तरी निवड मात्र 829 लोकांचीच केलेली आहे. 98 जागांचे निकाल जाहीर करण्यात आलेले नाहीत. यात संघ लोकसेवा आयोगाने चालाखी अशी केलेली आहे की, राखीव प्रवर्गातील उमेदवारांची कट ऑफ लिस्ट त्यांच्या प्रवर्गातच जाहीर केलेली आहे. रोस्टर पद्धतीने राखीव कोट्यातून अधिक गुण घेऊन जे उमेदवार उत्तीर्ण होतात त्यांची गणना अनारिक्षत खुल्या गटात व्हावयास हवी. हीच पद्धत वर्षानुवर्षे चालू आहे. मात्र या वर्षी प्रवर्गनिहाय कट ऑफ लिस्ट जाहीर केल्यामुळे इतर मागासवर्गीय गटातील उमेदवारांना खुल्या गटातील उमेदवारांपेक्षा जास्त गुण मिळवावे लागले आहेत. स्पष्ट आहे उर्वरित 98 जागांचे निकाल नंतरने जाहीर करण्यात येतील आणि ते सर्व अनारक्षित खुल्या गटातील असतील, असा दावा मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय गटातील मान्यवरांकडून केला जात आहे आणि त्यात तथ्य आहे. आरक्षित उमेदवारांना आरक्षणापासून वंचित करण्याचा हा खुश्कीचा मार्ग संघ लोकसेवा आयोगाने स्वीकारलेला आहे, असा आरोपही मागासवर्गीय व अन्य मागासवर्गीय गटाकडून केला जात आहे. आरक्षण समाप्त करण्याच्या दिशेने उचलले गेलेले हे पहिले पाऊल असल्याचेही या लोकांचे म्हणणे आहे.

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget