Halloween Costume ideas 2015

'भारतीय क्षेत्रावरील हवामान बदलाचे मूल्यांकन' (जून २०२०)

औद्योगिक-पूर्व काळापासून, जागतिक सरासरी तापमानात सुमारे १ डिग्री सेल्सियस वाढ झाली आहे. ग्लोबल वार्मिंगची ही तीव्रता आणि दर केवळ नैसर्गिक भिन्नतेद्वारेच स्पष्ट केले  जाऊ शकत नाही, म्हणूनच मानवी क्रियाकलापांमुळे होणाऱ्या बदलांविषयी बोलणे आवश्यक आहे. हरितगृह वायू (जीएचजी), एरोसॉल्स आणि औद्योगिकवापरादरम्यान भूमीचा वापर  आणि ग्रीन कव्हर (एलयूएलसी) मधील मानवी बदलांमुळे वातावरणीय रचनांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत ते ग्रह ऊर्जा संतुलह आणि सध्याच्या हवामानातील बदलांसाठी  जबाबदार आहेत. वातावरण आणि हवामानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे सन १९५० पासून जागतिक पातळीवर तापमानात अत्यधिक प्रमाणात वाढ झाली आहे. (उदा. उष्णतेच्या  लाटा, दुष्काळ, अतिवृष्टी आणि तीव्र चक्रीवादळ) पाऊस आणि हवेच्या पॅटर्नमध्ये बदल (जागतिक मान्सून प्रणालीतील बदलांसह), तापमानवाढ व जागतिक महासागराचे आम्लीकरण,  समुद्रावरील बर्फ आणि हिमनदी वितळणे, समुद्राची पातळी वाढणे आणि सागरी व स्थलीय वातावरणातील बदल.
एकविसाव्या शतक आणि त्यापुढील कालावधीदरम्यान मानवी-प्रेरित हवामान बदलाची सुरूवात जागतिक हवामान मॉडेलद्वारे अंदाज लावण्यात येतो. सध्याचा जीएचजी उत्सर्जनाचा दर  कायम राहिला तर एकविसाव्या शतकाच्या अखेरीस जागतिक सरासरी तापमानात सुमारे पाच अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. २०१५ च्या पॅरिस कराराअंतर्गत केलेल्या  (ज्याला 'राष्ट्रीय निर्धारित योगदान' म्हणतात) सर्व वचनबद्धता पूर्ण झाल्या तरीही शतकाच्या अखेरीस ग्लोबल वार्मिंग ३ डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त होईल असा अंदाज आहे. तथापि,  तापमानात वाढ संपूर्ण ग्रहात एकसारखी होणार नाही; जगातील काही भागात जागतिक सरासरीपेक्षा जास्त उष्णता जाणवेल. तापमानातील अशा प्रकारच्या मोठ्या बदलांमुळे हवामान  व्यवस्थेत आधीपासूनच सुरू असलेल्या पावसाचा बदलता पॅटर्न आणि तापमानवाढ यासारख्या इतर बदलांना मोठ्या प्रमाणात वेग येईल. सन १९०१-२०१८ दरम्यान भारताचे सरासरी  तापमान अंदाजे ०.७ डिग्री सेल्सियसने वाढले आहे. तापमानात ही वाढ मुख्यत्वे जीएचजी-प्रेरित वार्मिंगमुळे आणि अंशतः अँथ्रोपोजेनिक एरोसोल आणि एलयूएलसीमधील बदलांमुळे  होते.
एकविसाव्या शतकाच्या अखेरीस आरसीपी ८.५ परिस्थिती आणि मागील (१९७६- २००५ सरासरीच्या) तुलनेत भारताचे सरासरी तापमानात अंदाजे ४.४ डिग्री सेल्सियसने वाढ होण्याची  शक्यता आहे. गेल्या ३० वर्षांच्या कालावधीत (१९८६- २०१५) सर्वात उष्ण दिवसाच्या आणि वर्षाच्या सर्वात थंड रात्रीच्या तापमानानत अनुक्रमे०.६३ डिग्री सेल्सियस आणि ०.४ डिग्री  सेल्सियसने वाढ झाली. एकविसाव्या शतकाच्या अखेरीस ही तापमानवाढ गेल्या काही वर्षांच्या (१९७६-२००५) तुलनेत ही तापमानवाढ ४.७ अंश आणि ५.५ अंशांपर्यंत वाढण्याचा अंदाज  आहे.
एकविसाव्या शतकाच्या अखेरीस आरसीपी ८.५ परिस्थितीनुसार संदर्भ कालावधी १९७६-२००५ तुलनेत उष्ण दिवस आणि उष्ण रात्री होण्याच्या वारंवारतेत अनुक्रमे ५५ टक्के आणि ७०  टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. भारतातील उन्हाळ्यात (एप्रिल ते जून) उष्ण हवेचे प्रमाण आरसीपी ८.५ नुसार मागील काही वर्षांच्या (१९७६-२००५) तुलनेत एकविसाव्या शतकाच्या  शेवटी ३ ते ४ पट होण्याचा अंदाज आहे. उष्ण वाऱ्याचा सरासरी कालावधी देखील जवळजवळ दुप्पट होण्याचा अंदाज आहे. पृष्ठ भागाचे तापमान आणि आद्र्रतेत एकत्रित वाढ झाल्याने  संपूर्ण भारतात विशेषत: गंगा आणि सिंधू नदी पात्रांवर उष्णतेच्या दाबाचा विस्तार होणे अपेक्षित आहे. १९५१ ते २०१५ दरम्यान उष्णकटिबंधीय हिंद महासागराच्या समुद्राच्या पृष्ठ भागाच्या तापमानात (एसएसटी) सरासरी १ डिग्री सेल्सियसने वाढ झाली आहे, जी याच कालावधीत ०.७ डिग्री सेल्सियस असलेल्या जागतिक पातळीवरील समुद्राच्या पृष्ठभागाच्या  तापमान (एसएसटी) पेक्षा जास्त आहे. उष्णकटिबंधीय हिंदी महासागराच्या वरच्या ७०० मीटर (ओएचसी ७००) मध्ये गेल्या सहा दशकांत (१९५५- २०१५) समुद्राच्या तापमानवाढीत गेल्या  दोन दशकांत (१९९८-२०१५) वाढत्या कलमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
एकविसाव्या शतकात उष्णकटिबंधीय हिंद महासागरामध्ये समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान एसएसटी आणि समुद्राच्या तापमानात वाढत राहील असा अंदाज आहे. भारतात १९५१ ते २०१५  या काळात जून ते सप्टेंबर दरम्यान मान्सूनच्या पावसामध्ये सला टक्क्यांनी घट झाली आहे, ज्याचा परिणाम गंगेच्या मैदानी प्रदेशावर आणि पश्चिम घाटावर झाला आहे. अनेक  डेटासेट आणि हवामानाच्या मॉडेल सिमुलेशनवर आधारित एक उदयोन्मुख सहमती आहे, जी उत्तर गोलार्धात अँथ्रोपोजेनिक एरोसोलच्या किरणोत्सर्गाच्या परिणामांमुळे जीएचजी  वार्मिंगमधील वाढीमुळे अपेक्षित पर्जन्यवृष्टीवर परिणाम झाला आहे आणि उन्हाळ्यातील मान्सूनच्या पावसाच्या घटात हातभार लागला.

(भाग ८) - क्रमश:
- शाहजहान मगदुम
मो.: ८९७६५३३४०४

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget