Halloween Costume ideas 2015

बैरूत: आधुनिक जगातील सर्वात मोठी गफलत

bairut
मध्यपुर्वेतील एक महत्त्वाचे मुस्लिम बहुल शहर म्हणून बैरूतची ओळख आहे. हे शहर एका नैसर्गिक द्विपकल्पावर वसलेले असून, याच्या पुर्वेकडून बैरूत नदी वाहते, त्यावरूनच या शहराचे नाव बैरूत असे पडले. 19.9 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या या महानगराची लोकसंख्या 2012 च्या जनगणनेनुसार 20 लाख होती. हे शहर लेबनान या देशाच्या राजधानीचे शहर असून, सुंदर समुद्र किनारे आणि पाश्‍चिमात्य जीवनशैली असलेल्या पर्यटकांना आकर्षित करणारे शहर होते. भूमध्य समुद्र किनारी वसलेले हे एक नैसर्गिक बंदर असून, मंगळवार 4 ऑगस्ट रोजी या बंदराच्या हँगर (गोदाम) क्रमांक 12 मध्ये या शतकातील आतापोवतोचा महास्फोट झाला. हा स्फोट एवढा जबरदस्त होता की, त्यामुळे बंदराची जमीन सरकली. या स्फोटाची तीव्रता रिस्टर स्केलवर 3.9 एवढी मोजली गेली. या स्फोटात बंदरासह अर्धे अधिक शहर बेचिराख झाले असून, 85 टक्के धान्यसाठा तेेथील इतर गोदामात ठेवलेला असल्याने नष्ट झाला. म्हणून एक महिन्यापेक्षा जास्त काळ पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा लेबनानमध्ये नाही. बंदर नष्ट झाले व धावपट्टी उखडली गेल्या कारणाने अन्नधान्य शहरात आणावयाचे कसे हा       - (उर्वरित पान 2 वर)
प्रश्‍न निर्माण झाला आहे. इ.स.पूर्वी 15 व्या शतकात बांधलेले हे शहर ऐतिहासिक कारणांमुळे 7 वेळा उध्वस्त होऊन पुन्हा वसविले गेले, असा या शहराचा इतिहास आहे. आता पुन्हा नव्याने या शहराची आठव्यांदा पुनर्बांधणी करणे लेबनानच्या कुवतीबाहेरचे काम आहे. लेबनान हा अरब सुन्नी बहूल चिमुकला देश आहे व इजराईलशी सतत भांडण सुरू असल्यामुळे इजराईलच्या कायम निशाण्यावर राहतो. म्हणून जेव्हा स्फोट झाला तेव्हा पहिला संशय इजराईलवरच गेला. पण लगेच लेबनान सरकारने स्पष्ट केले की, बैरूतच्या हँगर क्रमांक 12 मध्ये 2750 मेट्रिक टन अमोनियम नायट्रेट नावाचे स्फोटक ठेवलेल्या गोदामाला लागलेल्या आगीमुळे हा महास्फोट झाला. आग नेमकी कशी लागली याबद्दल तपास सुरू असून, बंदरावरील दोन डझनापेक्षा जास्त काम करणार्‍या अधिकार्‍यांना अटक करण्यात आलेली आहे.
स्फोटके कोठून आली?
    एवढ्या मोठ्या प्रमाणात ही स्फोटके तेथे का साठविण्यात आली याचीही एक रोचक कथा आहे. रशियाच्या बाजूला असलेल्या जॉर्जिया या देशाच्या ’बातूमी’ नावाच्या शहरातील एका कारखान्यातून जो की काळ्या समुद्राजवळ आहे, सप्टेंबर 2013 मध्ये ’रोसस’ नावाच्या एका खाजगी मालवाहू जहाजातून अमोनिअम नायट्रेट घेऊन हे जहाज मोझाम्बिक या आफ्रिकन देशाकडे निघाले होते. मोझाम्बिकच्या ’फायब्रिका डी एक्सप्लोझिव्हज्’ नावाच्या कंपनीने हे नायट्रेट खरेदी केले होते. त्यासाठी 10 लाख डॉलरची रक्कमही चुकविण्यात आली होती. हे जहाज अतिशय जीर्ण होते, याचा मालक इगोर नावाचा एक रशियन व्यक्ती होता. माल घेऊन जातांना इगोर याने जहाजावरील क्रूला पुरेसे पैसे दिलेले नव्हते. म्हणून सुवेझ कालव्याजवळ येऊन हे जहाज थांबले आणि चुंगी भरण्यासाठी पैसे नसल्याने जहाजाच्या कॅप्टनने इंगोरशी संपर्क साधून पैसे पाठविण्याची विनंती केली. तेव्हा इगोरने सांगितले की, बैरूत बंदरावर जा आणि तेथून एका इंजिनिअरिंग कंपनीची काही यंत्रे उचला आणि त्यातून मिळालेल्या पैश्यातून चुंगी अदा करा आणि पुढे जा. येणेप्रमाणे जहाजाच्या कॅप्टनने नोव्हेंबर 2013 मध्ये हे जहाज बैरूत बंदरावर आणले. संबंधित इंजिनिअरिंग कंपनीशी संपर्क केला. परंतु त्या कंपनीच्या अधिकार्‍यांनी जहाजाची जीर्ण अवस्था पाहून आपली मौल्यवान मशिनरी त्यात चढविण्यास नकार दिला. बैरूतपोर्टच्या अधिकार्‍यांनी या जहाजाची पाहणी करून याला मालासहीत जब्त केले व हे जहाज पुढील समुद्र प्रवास करण्यास लायक नसल्याचा अभिप्राय दिला. त्यानंतर जहाजाचा कॅप्टन बोरीस फोर्डकोशेव आणि क्रुच्या 9 सदस्यांना अटक केली. काही दिवसानंतर 6 लोकांनी कोर्टातून जमानत घेऊन बैरूत सोडले, बाकी लोक तसेच राहिले. कॅप्टन बोरीस याने स्थानिक दुतावासाशी संपर्क करून मदतीची याचना केली. परंतु त्यांना कसलीही मदत मिळाली नाही. कॅप्टन आणि चार क्रू मेम्बर दहा महिने त्या जहाजावरच बंधक बणून राहिले. त्यानंतर जहाजाच्या कॅप्टनने रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांना पत्र लिहून खतरनाक केमिकलसह जहाज बैरूतमध्ये अडकल्याची माहिती दिली, पण तिकडूनही काही उत्तर आले नाही. शेवटी कॅप्टनने जहाजामधील काही इंधन विकून वकीलामार्फत स्थानिक कोर्टामध्ये आपली अडचण मांडली. तेव्हा कोर्टाने दया दाखवून कॅप्टन आणि क्रू च्या चार सदस्यांना जमानत देऊन टाकली व हे पाचही लोक आपापल्या घरी परत गेले. मात्र जहाज तेथेच राहिला. तेव्हा बैरूत पोर्ट अधिकार्‍यांनी 2014 मध्ये जहाज बुडेल या भितीने जहाजातील अमोनियम नायट्रेट उतरवून 12 नंबरच्या हँगरमध्ये ठेऊन दिले. ते 4 ऑगस्ट 2020 रोजी स्फोट होईपर्यंत तसेच पडून राहिले.
    बैरूत पोर्ट ट्रस्टचे अधिकारी हे जाणून होते की, अमोनियम नायट्रेट हे एक घातक रसायन असून, यात कधीही स्फोट होऊ शकतो. म्हणून पोर्टचे डायरेक्टर जनरल बद्री दाहेद यांनी सरकार आणि कोर्ट दोघांनाही या रसायनाचा निकाल लावण्यासाठी अनेकवेळा पत्रव्यवहार केला. परंतु त्यांच्या पत्रव्यवहाराची कोणीच दखल घेतली नाही. शेवटी पोर्टचे जनरल मॅनेजर हसन कुरायतम यांनीही सरकारला या केमिकलबद्दल कळवून सदरच्या केमिकलचा लिलाव करण्याची परवानगी मागितली परंतु त्यांना परवानगी मिळाली नाही. इकडे केमिकल समुद्राच्या दमट हवेच्या संपर्कात येऊन कुजून अधिक घातक झाले आणि त्याचा शेवट 4 ऑगस्ट रोजी झालेल्या स्फोटात झाला.
    लेबनानमधील सरकार अतिशय भ्रष्ट होते. स्फोट होण्यापूर्वी 2018 पासून या सरकारविरूद्ध जनतेमधील रोष होता. रस्त्यावर येऊन जनतेनी अनेक वेळा सरकारविरोधी प्रदर्शन केले होते. शासकीय अधिकार्‍यांचा भ्रष्टाचार शिगेला पोहोचलेला होता. यारवही जनता नाराज होती. स्फोटानंतर जनतेच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्यांनी पुन्हा तीव्र प्रदर्शन सुरू केली. म्हणून शेवटी सरकारला पायउतार व्हावे लागले. जनतेने फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉ यांच्याशी संपर्क साधून आपल्या देशाचे प्रशासन फ्रान्स सरकारनी हातात घ्यावे व देशामध्ये सुशासन सुरू करावे, अशी नामुष्की आणणारी मागणी केली आहे. यापेक्षा मोठे दुर्दैव एखाद्या देशाचे काय असू शकेल? काहीही असो हा स्फोट म्हणजे बैरूत शासन आणि प्रशासन यांची या शतकातील सर्वात मोठी गफलत होती, एवढे मात्र खरे.


- एम.आय.शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget