Halloween Costume ideas 2015

माझे राशन माझा अधिकार

जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 5 ऑगस्टपासून विशेष मोहिम

"अल्लाहला लोकांमधील ते लोक सर्वाधिक आवडतात जे दूसर्‍यांसाठी उपयोगी असतात"
 - रिजवानुर्रहेमान खान


मुंबई
 कोविड 19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे. या जागतिक समस्येने आपल्या देशालाही प्रभावित केलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 5 ऑगस्टपर्यंत जवळपास 4.58 लोक  कोरोनोग्रस्त झाले होते आणि 2.99 लाख लोक यातून बरे झाले आहेत तर 16 हजार 142 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. किंतू लक्ष देण्यासारखी गोष्ट ही आहे की, महाराष्ट्र ते राज्य आहे जे इतर राजांच्या तुलनेत कोरोनामुळे जास्त प्रभावित झालेले आहे, असे उद्गार जामअते इस्लामी हिंदचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रिजवानुर्रहेमान खान यांनी एका वेबिनारमध्ये व्यक्त केले. ते जमाअते इस्लामीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. ते म्हणाले की, कोरोनाची चैन तोडण्यासाठी सरकारकडून एका पाठोपाठ एक लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. ज्यामुळे आर्थिक हालचाली मंदावलेल्या आहेत. अशा परिस्थितीत काही लोकांना दोन वेळेसच्या भोजनांची व्यवस्था करणेसुद्धा जिकरीचे होऊन बसले आहे. गरीब आणि मजुरी करणार्‍या वर्गाचे हाल किती वाईट असतील याची कल्पनाच केलेली बरी. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांकडून या वर्गाला वेगवेगळ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात सहाय्य केले जात आहे. कोणीही उपाशीपोटी झोपणार नाही. यासाठी अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत. जमाअते इस्लामी हिंद त्यापैकी एक संस्था आहे. पण जमाअतची साधन सामुग्री सीमित आहे. अशा परिस्थितीत आम्हाला राज्यशासनाकडून मिळणार्‍या शिधा वाटप योजनेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल. शिधा वाटपाची योजना काय आहे, त्या योजनेतून अन्नधान्य घेण्यासाठी कोण पात्र आहेत. या संदर्भात गरीब लोकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. म्हणून जमाअते इस्लामीच्या स्थानिक शाखांमधून योजनापूर्वक प्रयत्न केले गेले पाहिजेत.
    शेख अब्दुल मुजीब (सचिव, सामाजिक न्याय विभाग, जमाअते इस्लामी महाराष्ट्र यांनी या संदर्भात, ” माझे राशन माझा अधिकार” या विशेष मोहिमेची आखणी केलेली आहे. ही मोहिम काय आहे, ती कशी पुढे न्यायची आहे. या संदर्भात सर्व कार्यकर्त्यांना माहिती असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे ही मोहिम 5 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट दरम्यान, महाराष्ट्रभर राबविली जाईल. ज्याचा उद्देश गरजू लोकांपर्यंत अंत्योदय योजनेतील रेशन मिळेल. यासाठी प्रयत्न करणे हे आहे. गरीब वर्ग हा अशिक्षित असल्यामुळे आपल्या अधिकारांच्या बाबतीत जागरूक नसतो. त्यांच्यासाठी योजलेल्या योजनांचीही त्यांना फारशी माहिती नसते. म्हणून त्यांच्यापर्यंत जमाअते इस्लामी हिंदच्या कार्यकर्त्यांनी पोहोचणे गरजेचे आहे. जर कोणी अंत्योदय योजनेमधून रेशन घेण्यासाठी पात्र असतानासुद्धा त्याला रेशन मिळत नसेल तर त्याला काय अडचण आहे ती अडचण या मोहिमेदरम्यान दूर करण्यासाठी जमाअतच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. रेशन मिळविण्यामध्ये ज्या अडचणी येत असतील त्या दूर करण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करावेत. 3 ऑगस्टच्या संध्याकाळी झूम अ‍ॅपच्या माध्यमातून राज्यभरातील जमाअतच्या कार्यकर्त्यांशी रिजवानुर्रहेमान खान यांनी संपर्क साधला. याच कार्यक्रमात एमपीजेचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद सिराज यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, हे काम करतांना अनेक अडचणी येणार आहेत. त्या अडचणीबद्दल तक्रार न करता त्यावर प्रयत्नपूर्वक मात करून गरजू लोक कुठल्याही पद्धतीने रेशन योजनेपासून वंचित राहणार नाहीत. यासाठी एमपीजेचे कार्यकर्ते जमाअतच्या कार्यकर्त्यांना भरपूर सहकार्य करतील. एमपीजेचे कार्यकर्ते एन. रमेश यांनी सुद्धा रेशनकार्डवर मिळणार्‍या अन्नधान्याचा तपशील यावेळेस दिला. ते म्हणाले की, या मोहिमेममध्ये इतर बिगर सरकारी संस्थांचेही सहकार्य घेण्यात यावे. रेशन वाटपामध्ये होणार्‍या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. मुंबई एमपीजेचे अध्यक्ष शब्बीर देशमुख यांनी याप्रसंगी बोलताना म्हटले की, जुलाई आणि ऑगस्ट या दरम्यान, ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाहीत, अशांना आधारकार्डाद्वारे रेशन देण्यात यावे.

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget