मुंबई
कळवण सुरगाणा मतदारसंघात असलेल्या जलसंपदा विभागांतर्गत विविध प्रकल्पांच्या अडीअडचणीसंदर्भात तातडीने उपाययोजना करुन त्या मार्गी लावाव्यात, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यासंदर्भातील एका बैठकीचे आयोजन मंत्रालयात केले होते. त्यावेळी त्यांनी उपरोक्त निर्देश दिले. यावेळी आमदार नितिन अर्जुन पवार तसेच विभागाचे मुख्य अभियंता के. बी. कुलकर्णी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. क्षेत्रिय अधिकारी ‘झुम’ व्दारे बैठकीत सहभागी झाले.
यावेळी मंत्री महोदयांनी या मतदारसंघातील ल.पा प्रकल्प ओतूर कळवण, दुमी मध्यम बृहत ल.पा प्रकल्प (पार प्रकल्प) श्रीभुवन लघु पाटबंधारे योजना सुरगाणा तसेच जलसंपदा विभागाच्या विविध प्रश्नांबाबत झालेल्या कार्यवाहीची संबंधित अधिकाऱ्यां कडून माहिती घेतली.
यात प्रामुख्याने ओतूर धरणाचा जुना सांडवा तोडून नव्याने काँक्रिटमध्ये सांडवा बांधने, नवीन धरणासाठी जुन्या धरणाचे मटेरियल न वापरता नवीन गुणवत्तेचे साधन- साहित्य वापरणे. नवीन धरण पूर्ण लांबीत नव्याने करणे. सु.प्र.मा. बाबत कार्यवाही पूर्ण करणे. ओतूर प्रकल्पासाठी आवश्यक ४० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात घेणे, तसेच लघु पाटबंधारे प्रकल्प धनोली. धनोली उजवा कलवा, धनोली डाव दुरुस्ती व सु.प्र.मा. बाबत कार्यवाही करणे आदीबाबत चर्चा झाली तसेच अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पास सु.प्र.मा. बाबतची कार्यवाही करणे. आदी बाबत चर्चा झाली.
तसेच अर्जुनसागर (पुनंद ) प्रकल्प पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करुन तेथे मा. आ स्व. ए.टी. पवार यांचे स्मारक उभारणे बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आमदार नितिन पवार तसेच उपस्थित पदाधिकारी, अधिकारी यांनी विविध मुद्यांवर मंत्री महोदयां समवेत चर्चा केली.

Post a Comment