Halloween Costume ideas 2015

वाचाळवीर आणि सामाजिक दहशतवाद

एखादा विद्यार्थी अभ्यासात सुमार असतो, कामधंद्यातपण फारसं लक्ष लागत नाही. पण त्याला भाषण वगैरे छान जमते. वाचन बिचनाचा लेखणाचा नाद असतो. अशी मंडळी  सर्वसाधारणपणे बेरोजगार असते. घरची आर्थिक परिस्थिती बरी असली तर ठिक आहे, नाहीतर अशी मंडळी बेरोजगार म्हणून इकडे तिकडे नुसते हिंडत असतात गप्पा गोष्टी करत. काही राजकीय मंडळीकडून ही मंडळी वापरली जात असतात. नंतर वापरून फेकून दिली जातात. अशी मंडळी मग वाममार्गाला लागतात. म्हणजे व्यसनी वगैरे होत नाहीत... तर  एकप्रकारे सामाजिक गुंड बनतात. सामाजिक खंडणी दादा बनतात. सामाजिक प्रश्न उचलून चळवळीच्या नावावर निदर्शने वगैरे करून लोकांना ब्लॅक मेल करतात. संस्थेसाठी वर्गणीच्या  नावावर चक्क लुटतात. ही एकप्रकारची प्रोटेस्ट इंडस्ट्री आहे. पण सगळेच असे नसतात. पदरमोड करून लोकांच्या कल्याणासाठी उत्सफुर्तपणे रस्त्यावर येणारेही सन्मानीय क्रांतीकारी  काही आहेत. त्यांना सलाम! पण चळवळीच्या या अथांग समुद्रावर सामाजिक चाचेगीरी करणारेच सहसा जास्त करून आढळतत, त्यामुळे खऱ्या क्रांतीकारकांना ओळखणे अवघड जाते.  अशा मंडळींना तरूणपणी वेळीच जर योग्य दिशा मिळाली तर त्यापुढील हा ’सामाजिक दहशतवाद’ नियंत्रित केला जाऊ शकतो. अशा लोकांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी  वेगवेगळे प्लॅटफॉर्म उपलब्ध करवून दिले गेले पाहिजे. त्यासोबतच नवनविन उद्योगधंद्यांबाबत मार्गदर्शन करणाऱ्या कार्यशाळाही उपलब्ध करवून दिल्या गेल्या पाहिजेत. सोबतच  व्याजविरहीत कर्जपुरवठा करणेही अनिवार्य आहे. यामुळे त्यांच्यातील आक्रस्ताळेपणादेखील कमी होऊ शकतो.
अशा लोकांची विचारसरणी ही जास्त करून वाचनातूनच घडत असते, म्हणून त्यांना सकारात्मक पण क्रांतीकारी साहित्य जसे कुरआन, प्रेषित-चरित्र व इतर काही साहित्यही उपलब्ध  करवून देण्याची गरज आहे. त्यानंतरच या वाचाळवीर असलेल्या लोकांकडूनही समाज प्रबोधन केले जाऊन सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडवले जाऊ शकते, हा सामाजिक दहशतवाद  संपुष्टात येऊ शकतो, क्रांतीची एक पहाट होऊ शकते,
आमीन!
- नौशाद उस्मान, औरंगाबाद

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget