Halloween Costume ideas 2015

अन्निसा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

...नि:संशय अल्लाहला प्रत्येक वस्तूचे ज्ञान आहे.५४
(३३) आणि आम्ही त्या प्रत्येक वारसासंपत्तीचे हक्कदार ठरवून दिले आहेत, जी आई, वडील व जवळचे नातलग पाठीमागे ठेवतील. आता उरले ते लोक ज्यांच्याशी तुमचा करार-मदार  झाला असेल तर त्यांचा वाटा त्यांना द्या. नि:संशय अल्लाह प्रत्येक वस्तूवर निरीक्षक आहे.५५
(३४) पुरुष स्त्रियांवर विश्वस्त आहेत.५६ या आधारावर की अल्लाहने त्यांच्यापैकी एकाला दुसऱ्यावर काही विशिष्ट विशेषता आणि क्षमता दिल्या आहेत.५७ आणि या आधारावर की पुरुष  आपली संपत्ती खर्च करतात. मग ज्या सदाचारी स्त्रिया आहेत त्या आज्ञाधारक असतात आणि पुरुषांच्या गैरहजेरीत अल्लाहच्या देखरेखीत व संरक्षणात त्यांच्या हक्कांचे रक्षण  करतात५८ आणि ज्या स्त्रियांकडून तुम्हाला दुर्वर्तनाचे भय असेल त्यांची समजूत घाला, शयनगृहात त्यांच्यापासून अलिप्त राहा, आणि मार द्या,५९ मग जर त्या तुमच्या आज्ञाधारक  बनल्या तर विनाकारण त्यांच्यावर हात टाकण्यासाठी निमित्त शोधू नका. विश्वास ठेवा की अल्लाह हजर आहे जो उच्चतम व महान आहे.



५४) या आयतमध्ये एक मोठा नैतिक आदेश देण्यात आला आहे ज्याला लक्षात ठेवले गेले तर सामाजिक जीवनात मनुष्याला अधिक शांती प्राप्त् होते. अल्लाहने सर्व माणसांना  एकसारखे बनविले नाही परंतु त्यांच्यामध्ये अगणित योग्यतेनुसार फरक ठेवला आहे. कोणी सुंदर तर कोणी कुरुप, कोणाच्या आवाजात मधुरता तर कोणाचा आवाज कर्कश, कोणी  शक्तिशाली तर कोणी शक्तिहीन, कोणी स्वस्थ तर कोणी जन्मत:च अशक्त, कोणाला शारीरिक व मानसिक सामथ्र्य जास्त प्रमाणात दिले तर कोणाला कमी प्रमाणात, कुणाला  चांगल्या स्थितीत तर कोणाला वाईट स्थितीत जन्म दिला, कुणाला जास्त जीवनसामुग्री दिली तर कुणाला कमी. याच फरकावर आणि विशिष्टतेवर मानवसंस्कृतीची अनेकरुपता  आधारित आहे आणि तत्त्वदर्शितेची निकडसुद्धा आहे. हे स्वाभाविक आहे जेव्हा या फरकाला त्याच्या स्वाभाविक मर्यादांपेक्षा जास्त वाढवून मनुष्य आपल्या कृत्रिम फरकाने त्यात वृद्धी  करतो; तिथे एक प्रकारचे बिघाड निर्माण होते. तसेच जिथे सुरवातीपासूनचे हे फरक मिटविण्याचा प्रयत्न होतो तिथे निसर्गाशी संघर्ष होतो आणि तिथे वेगळाच बिघाड निर्माण होतो.  दुसऱ्याला आपल्यापेक्षा मोठा होताना पाहून मनुष्य बेचैन होतो ही मनुष्याची मनोवृत्ती आहे. तिथेच सामाजिक जीवनात द्वेष, शत्रुत्व, संघर्ष आणि ओढातान सुरु होते. परिणामत:  त्याला जे वैध पद्धतीने प्राप्त् होत नाही त्यांना तो अवैधरीत्या प्राप्त् करण्याचा प्रयत्न करतो. अल्लाह या आयतमध्ये याच मानसिकतेला बदलण्याची व त्यापासून सुरक्षित राहण्याची सूचना करीत आहे. अल्लाह म्हणतो जे काही मी दुसऱ्यांना दिले आहे त्याची तुम्ही आशा करू नका तर अल्लाहच्या कृपेची याचना करा. अल्लाह ज्या कृपेला तुमच्यासाठी योग्य समजेल  ती प्रदान करील. ``पुरुषांनी जे कमविले त्यानुसार त्यांचा वाटा आहे आणि स्त्रियांनी जे कमविले त्यानुसार त्यांचा वाटा आहे.'' याचा अर्थ माझ्या बुद्धीप्रमाणे म्हणजे स्त्री आणि पुरुषांना  जे काही अल्लाहने दिले आहे त्याला वापरून जो जितकी भलाई आणि दुष्टता कमविल त्यानुसारच दुसऱ्या शब्दांत त्याच रूपात अल्लाहजवळ आपला वाटा मिळविल.
५५) अरबांमध्ये नियम होता की ज्यांच्यामध्ये दोस्ती आणि भाईचारा (बंधुत्व) करार होत असे ते एक दुसऱ्याचे वारस बनत असत. याचप्रमाणे ज्याला मुलगा बनविले जायचे (दत्तक)  तो मानलेल्या बापाचा वारस बनायचा. या आयतीत अज्ञानतेच्या या पद्धतीला रद्द करताना सांगितले की वारसाहक्क तर त्याच नियमाप्रमाणे नातेवाईकांमध्ये वाटप केला गेला पाहिजे जे  अल्लाहने निर्धारित केले आहे. म्हणून ज्या लोकांशी तुमचा करार आहे तुम्ही त्यांना आपल्या जीवंतपणी हवे ते देऊ शकता.
५६) अरबी शब्द `कव्वाम व कय्यिम' त्या व्यक्तीला म्हटले जाते जो एखाद्या व्यक्तीच्या, संस्थेच्या किंवा व्यवस्थेच्या व्यवहाराला ठीकठाक चालविण्यासाठी आणि त्याचे रक्षण व  काळजी घेण्यासाठी आणि आवश्यकता पूर्ण करण्यासाठी जबाबदार आहे.
५७) येथे `फ़जीलत' श्रेष्ठता, प्रतिष्ठता आणि सन्मानच्या अर्थात प्रयोग झाला नाही जसा एक सर्वसाधारण हिंदी व उर्दू पाठक या शब्दाचा अर्थ घेतो. परंतु येथे हा शब्द या अर्थात आहे  की पुरुषाला अल्लाहने स्वाभाविकपणे काही विशिष्ट विशेषता आणि क्षमता दिल्या आहेत ज्यांना स्त्री जातीस बहाल करण्यात आलेल्या नाहीत किंवा दिले असेल तर कमी दिले. या  आधारावर पारिवारिक व्यवस्थेत पुरुषच `कव्वाम' होण्याची योग्यता ठेवतो. स्त्रीला नैसर्गिकरित्या अशाप्रकारे बनविले गेले आहे की तिला कौटुंबिक जीवनात पुरुषाच्या रक्षणात आणि काळजी खाली राहणे आहे.
५८) हदीसकथन आहे की पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ``उत्तम पत्नी ती आहे जेव्हा तुम्ही तिला पाहाल तर तुमचे मन प्रफुल्लित व्हावे. जेव्हा तुम्ही तिला एखादा आदेश दिला तर तुमचे तिने आज्ञापालन करावे आणि जेव्हा तुम्ही घरी नसाल तर तुमच्या मागे तुमच्या संपत्तीची आणि आपल्या शीलाचे ती रक्षण करील.'' ही हदीस या आयतचा उत्तम खुलासा  आहे. परंतु येथे हे अगदी स्पष्ट समजून घेतले पाहिजे, की स्त्रीवर आपल्या पतीच्या आज्ञापालनापेक्षा महत्त्वपूर्ण आणि प्रथम काम आपल्या निर्माणकर्त्या अल्लाहचे आज्ञापालन आहे.  म्हणून एखादा पती आपल्या पत्नीला अल्लाहची अवज्ञा करण्याचा आदेश देतो किंवा अल्लाहने अनिवार्य ठरविलेल्या गोष्टीला रोखण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला पत्नीने अमान्य  केले पाहिजे अशा स्थितीत पतीचे ती ऐकेल तर गुन्हेगार सिद्ध होईल. परंतु याविरुद्ध पती पत्नीला जर गौण नमाज (नफील) किंवा गौण रोजा न ठेवण्यास सांगत असेल तर पत्नीने हे मान्य करावयास हवे. अशा स्थितीत पत्नी गौण (नफील) उपासना करेल तर ती अल्लाहजवळ मान्य होणार नाही.
५९) म्हणजे तिन्ही काम एकत्र केले जावे हा अर्थ होत नाही. परंतु अर्थ होतो की उदंडतेच्या स्थितीत या तिन्ही उपायांची अनुमती आहे. त्यांना व्यावहारिक रुप देण्यात अपराध आणि  शिक्षा दरम्यान अनुकूलता असणे आवश्यक आहे. जिथे हलका उपाय (शिक्षा) करून काम होत असेल तिथे कठोर उपाय करणे योग्य नाही. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी पत्नींना  मारण्याची जेव्हा परवानगी दिली तेव्हा नाईलाजाने दिली आहे. तरीही असे करण्यास पसंत ठरविले नाही. तरी काही स्त्रिया अशा असतात जे मार खाल्याविना ठीक होत नाहीत. अशा  स्थितीत पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की त्यांच्या तोंडावर मारू नका निर्दयतेने मारू नये आणि काठीने मारू नये किंवा अशा वस्तूने जिने तिच्या अंगावर वळ उठतील.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget