Halloween Costume ideas 2015

सत्याचा चेहरा उजळून काढायला हवा

सण, जयंत्या, उत्सवात रमणारा महाराष्ट्र, गोड बोलण्याच्या आणि ऐकण्याच्या नादात खरं ऐकणं / बोलणं विसरूनच गेला. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मिरवणाऱ्या टेलीमीडियाने  खरंतर जहरीकहरच केलाय. उसाच्या चिपाडाप्रमाणे सगळा खरा रस बाजूला करून चिप्पाड बातम्या सर्रास पसरवल्या जातायेत.
गोडाची चव जीभेवर येण्यापूर्वीच साहित्य संमेलनाचा पद्धतशीर उदोउदो करण्यात संघीमानसिकता पक्की उजवी ठरली. आमचा पंथ आक्रोशाचा नाही म्हणत अखिल भारतीय मराठी  संमेलनाध्यक्ष अरूणाजी ढेरे यांनी सोईचे पुरोगामित्व लोकप्रिय केले. गुळमाट गोडवा इतका झाला की वर्तमानपत्रे आणि टिव्हीवरच्या बातम्यांना मुंग्या लागल्या. आम्हाला मात्र इंगळ्या डसताहेत. मोहसिन शेखला केवळ ’मुस्लिम’ असल्याच्या कारणावरून आपला प्राण गमवावा लागला, यात हिंदुत्ववादी संघटनांचे काही क्रूर घातकी मंडळी सहीसलामत सूटताहेत. मनुच्या  राज्यात धनूची पाठराखण, पाठबळ वाढत आहे. हा धनु सुटतो आणि तो ही धनु सुटतो. शस्त्रे बाळगणारा! घरात केवळ वैचारिक पुस्तके असल्याच्या कारणावरून महत्त्वाच्या ज्ञानवंत, विचारवंतांवर, लेबलीझम चिकटवून त्यांना देशद्रोही ठरवण्यापर्यंत इथली न्यायव्यवस्था सरळसोप काम करते. विषय चहाळून त्यांना अखंड सतावल जातं. आणि दुसरीकडे नालासोपाराते  डोंबीवलीपर्यंतच्या धनुच्या घरी 170 हून अधिक शस्त्र सापडतात. तरी केवळ तातडीने त्यास जामीन मिळतो.
आपण संविधान की जय म्हणत
किती दिवस भोळ्या भाबड्या भावनिकतेने गुलामी मानसिकतेला कवटाळून बसणार आहोत?
खोट्या बातम्यांचा जाब विचारावा, धनुच्या शस्त्रासंबंधीचा उलगडा मांडावा तर आरक्षणासारख्या मुद्यांवर बहुजनांची पक्की वाटणी सत्ताधिशांनी घातली आहे. आपण शेंबडातल्या  माशीसारखे घाणीतच धडपडत राहणार. आपण भावनेच्या भाबडेपणातच महापुरूषांचा मोठेपणा मिरवणार. आपण केबल चॅनेल्सचे पैसे भरणार, खोटे-नाटे ऐकणार. आपण उधाण आलेल्या  देशप्रेमाला 26 जानेवारीपर्यंत सांभाळणार. आपण पुस्तके- मस्तके बदलतात म्हणून विचार सांगणार आणि नालासोपारा ते गोवा, डोंबिवलीपर्यंत गणमंत्रात ’गनयंत्र’ आणणाऱ्यांची याची  डोळा उघड कायदेशीर सुटका बघणार . मोहसिनच्या वडीलांचा न्यायाशिवायचा अंत बघणार, मस्जिदीच्या - गोंधळ माजविलेल्या तारखेवर उपाशी पोटी चर्चा करणार, तिकीट काढून  ’बायोपिक’ बघणार आणि ’मी मराठी’ म्हणून फसवं ओरडणारं. शेतीमालाला मिळत नाही योग्य भाव म्हणून कांद्याच्या पिकात तरूण शेतकरी विष पिऊन मरणार. संप, बंद, मोर्चे  यातून आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी रस्त्यावर उतरून, हालअपेष्टा सोसून आपण लोकशाहीचे पाईक ठरणार. घरात पुस्तके सापडली तरी आपण घाबरावे, प्रार्थनेत सनातनी शस्त्रे  सापडली तरी त्यांनी मोकाट फिरावे?
सामाजिक समतेचा प्रवाह बळकट करण्यासाठी वारंवार इथल्या बहुजनांनी सहिष्णुतेचा पाठपुरावा केला. पण ही ताकद जेव्हा सकारात्मक पद्धतीने मोठी होऊ लागली तेव्हा-तेव्हा फॅसिस्टांनी यांच्या भिंतीच निर्माण केल्या. पंथाच्या - जातीच्या भींती, रक्षण-आरक्षणाच्या भींती, खऱ्या-खोट्याच्या भींती.. आपण या भिंतीआड एकेकटे पडतो आणि सनातनी ऑक्टोपस  गिळंकृत करतोय एकतेला.
खरंतर छोटा लेखप्रपंच मांडताना आतून प्रचंड संताप येतोय. तत्कालीक फायद्यासाठीचा विचार करून स्वतःचे व्यक्तीमहात्म्य वाढवणारे पोपटपंची सर्वत्र वाढताहेत. खरे प्रश्न आणि  त्यांची उत्तरे बाजूला आणि केवळ ’सांशकता-भिती’च्या दमनाचा सोवळा संघी गोंधळ यातच आपण गोंधळतोय. अभिजनांच्या वळचणीला जाऊन त्यांचे साहित्य, कला, राजकारणाचे  गुणागुण करणाऱ्या गाढवांना सेलीबे्रटी स्टेटस मिळतंय आणि खऱ्या साध्या माणसांसाठी राबणाऱ्यांना अपेक्षितांहून वंचित ठेवलं जातयं.
बैठका, शिबीरे, संमेलने, केडर यातून तयार होणारा बहुजन. नक्षलवादी, दहशतवादी, अतिरेकी वगैरे ठरवून सगळेच पटकन मोकळं होतायत. आणि ब्राम्हणी मानसिकता रूजवणाऱ्या  सगळ्या सांस्कृतिक घटकांतून प्रचंड लोकप्रियता मिळवून देणारे बावळट लेखक, कवी कलावंत आदर्श ठरताहेत. झोपेच्या सोंगानी हंगामी गांधी ठरणारे अण्णा, दादा, बाबांच बक्कळ पेव  देशासाठी घातकच!
संविधान बदलाची भाषा करणाऱ्यांच्या विरोधात भली मोठी लढाई केवळ स्वतःच्या समाधान खाजेपूरती मर्यादीत होत आहे. संविधान काय? देशबदल, देशत्व बदलायची पूर्ण तयारी  झालीय. हिटलरी समर्थकांच्या मानवी हक्काच रक्षण व साध्या माणसाचे मॉब लिंचिंग मधून भक्षण घडतच आहे.
कुंभमेळ्याचे अफाट, स्मारकांचा धाट आणि आरोपी बीनभोपाट यांचा सुळसुळाट आहे. आपण फक्त चर्चा करत राहू. कागदावर राग सांडत राहू. पोटाच्या प्रश्नापेक्षा, प्रेमाच्या गाण्यांपेक्षा आपण दुसरं काही करायचंच नाही बरं का?
बॉम्ब फेकणारे, दंगल घडवणारे, बैठका घेऊन दौड करणारे, मुलं देणाऱ्या आंबे विकणारे,जाती-धर्मातले तेढ वाढविणारे, हंगामी देशप्रेम विकणारे, बलात्काराच्या आरोपींच्या पाठीशी  धर्मझेंडा मिरवणारे, मीच मस्जिद पाडली म्हणून त्वेषाने बोलणारे, रेटून द्वेष पेरणारे, फेकन्यूजच काय फेक इन्काऊंटर करणारे, शस्त्रे बाळगून धर्म पसरविणारे, महापुरूषांच्या  इतिहासातून पिढीपर्यंत ‘अलगाव’ निर्माण करणारे, तलवारी बंदुकांनी नथु ते धनु तयार करणारे, विचारवंताच्या हत्या करून आनंद सोहळा करणारे, धार्मिक मेळ्यातून कंडोमची विक्रमी  खरेदी करणारे, शेतकरी कष्टकरी सामान्य मुस्लिमाला भयंकित करून मरण्यास प्रवृत्त करणारे, पुढच्या पिढीचे वारसदार ठरताहेत. याचा निकाल लावायचा कसा कि.. कुठला  चालावायचा पुढे वारसा. बस्स! अस्वस्थतेच्या या प्रश्नांना निरर्थकपणे मांडत राहू. मुखवट्यांनी नाही होत काही आता सत्याचा चेहरा उजळून काढायला हवा. सत्य बोलायलां हवे, उघड बोलायला हवे.
’’तमन्ना दर्द-ए-दिल की हो
तो कर खिदमत फकीरों की,
नही मिलता ये गौहर
बादशाहों के खजिनों में..
अभिजन-हिटलरी -
फॅसिस्टांची मिळगुळी गोडण्याची सेवा पायचारी न ठरता... ताकद पाय खेचणारी ठरो.. एवढीच आशा.

- साहिल शेख
8668691105
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget