Halloween Costume ideas 2015

‘आम्ही भारतीय’चा आवाज काळजातून बुलंद केला पाहिजे

जानेवारीचा राष्ट्रीय सण, प्रजासत्ताक दिनाच्या तयारीला सगळीकडे सुरूवात झाली॰ राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, शासकीय, निमशासकीय, संस्थासंघटना सगळीकडे  देशभरात एकच लगबग़॰॰ ‘सण’ भारतीयांचा आला॰ सण प्रजेची सत्ता आणि एका-एका मताची महत्ता सांगणारा सण॰॰॰ गणतंत्र, लोकांप्रत लोकांनी स्वत:हून अर्पण करून घेतलेल्या, डॉ॰  बाबासाहेबांच्या अथक अभ्यासू परिश्रमातून साकारलेल्या संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीची रूजवात झाली याची आठवण देणारा सण - सोहळा॰ देशप्रेमाची भरती ऊधाणली॰ मोडक्या  शाळेपासून, झोपडीतल्या गळक्या छतांतून, पॉश मॉल्सपासून, व्यसन केंद्राच्या इमारतीतून गाव घरे वस्त्या वाड्यांतून, जंगलातून॰॰ तिरंगा ध्वज अभिमानाने फडकला॰
देशभक्तीच्या गाण्यांनी अवघं आसमंत दोन दिवस भरून गेलं॰ गारठ्याथंडीची पर्वा न करत प्रभातफेरीतल्या घोषणांतून गावं-रस्ते- मैदाने दणाणून गेले॰ सोशल मीडिया, मिडीया झळाळून  उठला॰
दोन-चार फोटो झब्बा-कुर्ता दाढीवाले चाचा- मामू देशभक्त म्हणून गाजले॰ गोरक्षा करत गौशाळा चालविणाऱ्या मुस्लिम नावाच्या कुटुंबाला ‘पद्म’ पुरस्काराने घोषित झाला॰ रोहित, नजीब,  मोहसिन, जावेद, अख्लाक, तौसिफ, आसिफाला देश विसरला॰
२६ जानेवारीच्या दुपारनंतर निवडक उच्च ठिकाणी सत्यनारायणाचा प्रसाद वाटला गेला॰ देव देशधर्माचा गौरव द्विगुणीत करत पुन्हा धर्मांध खेळाची सुरूवात झाली॰ सिलेक्टीव्ह देशभक्ती,  हंगामी देशप्रेम, गोंधळलेली सहिष्णुता, जाणवत जाणारे ठळक उपरेपण, फॅसिझमच्या गडद नोंदी यांची सरमीसळ सुरूच आहे॰ जाती, धर्म, भाषा, प्रांत, राजकीय विसारणी यांवर  आधारित द्वेष, हिंसा दंगलीने भरलेल्या आणि भारलेल्या वातावरणात ‘देशप्रेमाचा ऊरूस’ सजला॰ थिएटर सिनेमामधून राजकीय व्यक्तीप्रेमाचा केंद्र करून सांस्कृतिक दहशतवाद घट्ट  होतोय॰ मनोरंजन, कलात्मकतेच्या नावावर तद्दन द्वेषमानसिकता सबळ करणारे साहित्य-सिनेमे पडद्यावर येताहेत॰ बायोपिकचे आलेले उदंड पीक़॰॰॰ माणुसकीचा दुष्काळ ठरविणारी  आहे॰
मॉब लिंचिंग आणि केवळ मुस्लिम म्हणून देशभक्ती सिद्धता करण्याच्या विषारी प्रचाराला बळी पडलेल्या अनेक तरूणांची आठवण करत, देशातील एक महत्त्वाची शैक्षणिक संस्था  व्यथित होऊन आपल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सणा दिवशी प्रवास करू नये, अशी नोटीस काढते हे आभाळाएवढे दुर्देव॰ बरोबर याच्या उलट उत्तरपूर्व भारतात सिटीजन संशोधन  विधेयकाच्या विरोधात प्रजासत्ताक दिनावर बहिष्कार घालत ३० हजाराहून अधिक तरूण लोक विद्यार्थी रस्त्यावर मोर्चाने उतरतात॰ पोस्टर, घोषणांनी आकांत भरलेला॰ त्यातली एक  घोषणा धक्का देते सगळ्या ‘जयहिंद’च्या नाऱ्यातील घोषणा ‘‘हॅलो चायना, बाय-बाय इंडिया’॰॰ झेंडावंदन करून भयाने शांत बसणारी न फिरणारी मुले कुठली? इंडिया - भारतातली॰  आणि राष्ट्रवादाचा डोस देत विष पसरवणारी संघीय पिलावळ कुठे तर परदेशात॰ परदेशावरून आठवले, स्वाईन फ्लू पासून सगळ्याच भल्या मोठ्या रोगांची लागण घेऊन सारे देशप्रेमी  नेते सध्या परदेशात उपचारासाठी आहेत॰ रामदेवबाबांच्या योगाचा रामबाण उपाय काही बहुतेक चालला नाही॰ रामदेवांच्या मात्रा काही केल्या चालेना॰ अर्थात त्यांच्या गुडघे दुखीवर त्यांनी  अमेरिकन डॉक्टरांनाच कन्सल्ट केलंय॰ या सगळ्या पार्श्वभूमीवर नोटाबंदीचा घोटाळा ते राफेलची डील याचा ससेमिरा पाठी लागू नये म्हणून अर्थमंत्री सुद्धा उपचारार्थ परदेशीच आहे॰ हमी  विदेश दौरा करणारे पीएम॰मात्र ‘मन की बात’ मधल्या नियोजित प्रौढ शाळेत बढाई मारून जाताहेत किंवा अगदी सकाळी कचरागाडीतून कैलाशखेर सोबतचा आवाज कानाला फसवत आहेच॰ पद्म आणि भारतरत्न सारख्या मानप्रतिष्ठेच्या पुरस्काराच्या यादीवरून पुन्हा एकदा प्रतिक्रियांचा बोचरा पाऊस पडतोय॰ सोईस्कर आणि निवडणुकांच्या रंगीत महानाट्यांत युती  नितीचा बनावटी डाव खेळला जातोय॰ ईवीएमचा विवाद, खुनांची मालिका, आरोपांचे सत्र, आरक्षणाचे गाजर, आर्थिक निकषाचे तुणतुणे सगळं आलबेल वेल सुरूय॰ आणि आपण  देशभक्तीच्या प्रमाणपत्रासाठी किव आणणारी धडपड करतोय॰ भारत हमको जान से प्यारा है ‘म्हणत-गात’ जोश ओसरल्यावर हंगामी आंदोलकांचे आदर्श आण्णादादा वगैरे सारख्या  त्यागी महापुरूषांनी या हंगामात पुन्हा झोपेतूनच लोकपाल आंदोलन उभारण्याची हाकारी दिलेली आहे॰ पुन्हा सेल्फी पॉईंट उभारून नवीन पक्षांची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी मिडीया प्रायोजित मांडव उभे राहतील बहुतेक़.
या मिडीयाने आपल्या सामान्य नागरिकांच्या मनमेंदूत एवढा घट्ट विश्वास रोवलाय की मेंदू मिडीयाचलित झाला आहे॰ क्रांती परिवर्तनाच्या पोकळ फेसबुकी गप्पांशिवाय काहीच करता  येऊ नये॰ इतकी डाटाव्यस्त तरूणाई ‘पकौडे सेंटर’ च्या शोधात आहे॰ मिडीयातून नेत्यांच्या घरच्या आनंदीसोहळ्याचे प्री-पोस्ट चित्रण - प्रक्षेपण इमानाने सुरू आहे॰ अरबपतीकरोड पतींनी  आपल्या दारात कोंटीचा हत्ती बांधावा हे ठिकाय, पण गल्ली-लोकलची कुत्री सुद्ध दावणीला बांधली गेलीयत॰ लोकशाहीचा विजय असो, संविधानाचा विजय असो, गणतंत्र विजया असो॰  गनयंत्रांचा खचाखच साठा सापडलेल्या साधक-सनातन्यांचा जाहीर जामिन सत्कार वगैरे सुरूय॰ रस्त्यावर साधा भारतीय मात्र ‘प्लास्टिकच्या झेंड्याचा अवमान चुकूनही’ घडू नये म्हणून काळजीने आपली कामं करतोय॰ हीच काळजी प्रस्थापित सरकार नागरिकांची वाटणी घालून घेतंय, योगी-बाबा साधूंचे पेन्शन लागू॰ आणि घसा कोकलून, स्वहत्येचा मार्ग पत्करून, लोकशाहीवादी मोर्चे काढून आपल्या हक्क न्यायासाठी झगडणाऱ्यांच्या संघर्षाला दाद मिळत नाही॰ सवर्ण आरक्षणाचा बाणा लगेच पास होतो॰ काय आपण लोकशाहीप्रधान देशात  आहोत? माजी न्यायमुर्तींच्या मिडीयासमोर येऊन कैफियती मांडल्यापासून आजपर्यंत॰ विचारवंतांच्या क्रूरहत्या झाल्यनंतरही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबून झाल्यावर,  मॉबलिंचिंगच्या निर्घूण कत्तली नंतर... शिक्षणातून सर्वसामान्य गरिबाला दूर सारल्यावर आपल्या हक्कासाठी बहुजनांच्यामध्ये दरी निर्माण केल्यावर, भारतीयांवर वर्णवर्गवादाचा भार  दिल्यावर, सांस्कृतिक दहशतवादाची मुळे डोक्यात खुपसल्यावर कट्टरतेच्या धार्मिक गोळीचा ओव्हरडोज पाजल्यावर बांधावरल्या आत्महत्यानंतर कामगारांच्या उपाशी पोटापर्यंत भूकेला  लाथाडल्यावर छद्मी इतिहासाचे मृत्यूलेख परंपरेच्या नावाखाली निर्माण करत पुढील पिढ्या नासवणाऱ्या प्रस्थापितांच्या भूमिकेवर राष्ट्रप्रेमाचे लायसन्स देणाऱ्या उथळ संघी संस्थाबहर  केवळ द्वेष-जहर रोवणाऱ्या एकूण व्यवस्थेवर॰॰॰ आपण सर्व जोपर्यंत केवळ भारतीय म्हणून एकसाथ प्रहार नाही करत तोपर्यंत॰॰॰ मत-मनाची किंमत जाणून समता- एकता - प्रेम  बंधुतेच्या शिकवण्यांची जाणीव होऊन डीजिटलपेक्षा जीवलग माणुसकी, आपली होत नाही तोपर्यंत आपण सॅल्यूट करायला पात्र नाही॰ जानेवारीचा सण खऱ्या अर्थाने उदात्त, मुक्त,  खुल्या मानवतेला साद देणारा सण या निमित्ताने केवळ संविधानाने दिलेल्या ‘आम्ही भारतीय’चा आवाज काळजातून बुलंद केला, तरच देशातले हिटलरी क्लोनिंगला पायाखाली तुडवता येईल॰
जय हिंद॰

- साहिल शेख
866869110

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget