मा. अब्दुल्ला बिन अब्बास (र.) यांचे निवेदन आहे की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले आहे की, ‘‘जो मनुष्य अल्लाहच्या ग्रंथाचे (कुरआन) अनुसरण करील, तो न जगात मार्गहीन राहील ना आखीरतमध्ये (मरणोत्तर जीवनात) त्याच्या वाट्याला वंचितता येईल.’’ (हदीस - मिश्कात)
पवित्र कुरआनात पाच गोष्टी मा. अबु हुरैरा (र.) कथन करतात की प्रेषित मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, पवित्र कुरआनात पाच गोष्टी आहेत. हलाल (वैध), हराम (अवैध), मुहक्कम (मजबूत), मुतशबा (समान) आणि अमशाल (उहादरणे). तेव्हा हलाल गोष्टीस हलाल समजा, हराम गोष्टीस हराम समजा. मुहक्कम (कुरआनचा तो भाग ज्यात श्रद्धा नियम इत्यादिची शिकवण दिली गेली आहे), त्या आचरणात आणा आणि मुकशाबा (कुरआनचा तो हिस्सा ज्यात अपरोक्षाच्या गोष्टींचे वर्णन दिले गेले आहे) वर इमान (श्रद्धा) ठेवा. (हदीस : मिश्कात)
धर्माचे ज्ञान नाहीसे होईल
मा. जियाद बिन लबीद (र.) यांनी कथन केले आहे की, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी एका भयानक गोष्टीचा उल्लेख केला आणि मग म्हणाले, असे त्यावेळी होईल जेव्हा धर्माचे ज्ञान नाहीसे होईल. तेव्हा मी म्हणालो, हे अल्लाहचे प्रेषित! ज्ञान का म्हणून नष्ट होईल. वास्तविक आम्ही कुरआन पठन करीत आहोत, आणि आपल्या मुलाबाळांना शिकवित आहोत आणि आमची मुले आपल्या मुलाबाळांना शिकवत राहतील.
प्रेषित (स.) यांनी फर्माविले, ‘‘छान! हे जियाद! मी तुम्हाला मदीननाचा अतिशय समंजस माणूस समजत होतो! काय तुम्ही पाहात नाही की यहुदी व खिश्चन, तौरात व इंजील (हे त्यांचे धर्मग्रंथ) चे केवढे पठन करतात, पण! त्यातल्या शिकवणिंना थोडे तरी आचरणात आणतात काय?’’ (हदीस- इब्ने माजा)
आदर्श व उत्तम आचरण
माननिय आयशा (रजी.) सांगतात की, प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आचणांचा आदर्श ‘दिव्य कुरआन’ होते. (म्हणजेच दिव्य कुरआनात ज्या उच्चतम नैतिकतेचा आदर्श मांडण्यात आला आहे, प्रेषित मुहम्मद (स.) नेमक्या त्याच आदर्शाचा नमुना होते.) (हदीस - मुस्लिम)
दिव्य कुरआनचे पठण
मा. अनस (रजी.) यांचे कथन आहे की प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘नि:संदेह मानवापैकी काहीजण ईश्वराचे लाडके दास आहेत.’’ लोकांनी प्रश्न केला की, ‘‘हे प्रेषिता! हे कोणते लोक आहेत? प्रेषितांनी सांगितले की, ‘‘कुरआनवाले लोक, ईश्वरवाले आणि ईश्वराचे विशेष दास!’’ (हदीस - निसई, इब्ने माजा)
स्पष्टीकरण -
ईश्वरवाले लोक म्हणजे दिव्य कुरआनचे पठण करणारे व इतरांना शिकविणारे लोक होय.. तसेच त्याचा अर्थ समजून घेण्याचा व त्याच्या मार्गदर्शनावर आचरण करण्याचा प्रयत्न करणारे लोक होय. कुरआनसंबंधी प्रेषितांची वचने (हदीस) - माझ्या अनुयायांसाठी सर्वात तेजस्वी व अभिमानास्पद ठेवा म्हणजे पवित्र कुरआन. मुक्तीचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पवित्र कुरआन. तुमच्यासाठी कुरआनकरीम सारखा ग्रंथ सोडून जात आहे. त्याप्रमाणे तुम्ही आचरण केल्यास, तुम्ही कधीही पथभ्रष्ट होणार नाही.

Post a Comment