(३९) बरे तर या लोकांवर कोणते संकट कोसळले असते जर यांनी अल्लाह व परलोकावर श्रद्धा ठेवली असती आणि जे काही अल्लाहने दिले आहे त्यातून खर्च केले असते. जर यांनी असे केले असते तर अल्लाहपासून यांच्या पुण्याईची स्थिती लपून राहिली नसती.
(४०) अल्लाह कोणावरही तिळमात्रसुद्धा अत्याचार करीत नाही. जर कोणी एक पुण्य केले तर अल्लाह त्याला द्विगुणित करतो व मग आपल्यातर्फे मोठा मोबदला प्रदान करतो.
(४१) मग विचार करा की तेव्हा हे लोक काय करतील जेव्हा आम्ही प्रत्येक लोकसमूहामधून एक साक्षीदार आणू आणि या लोकांवर तुम्हाला (अर्थात पैगंबर मुहम्मद-स. यांना) साक्षीदार म्हणून उभे करू.६४
(४२) तेव्हा ते सर्वजण ज्यांनी पैगंबरांचे म्हणणे ऐकले नाही आणि त्यांची अवज्ञा करीत राहिले, इच्छा करतील की पृथ्वीने तिच्या उदरात त्यांना सामावून घेतले तर किती छान! तेथे हे आपली कोणतीही गोष्ट अल्लाहपासून लपवू शकणार नाहीत.
(४३) हे श्रद्धावानांनो, जेव्हा तुम्ही नशेच्या स्थितीत असाल तेव्हा नमाजच्या जवळ जाऊ नका६५ नमाज त्या वेळेस अदा केली पाहिजे जेव्हा तुम्हाला कळत असेल की तुम्ही काय बोलत आहात६६ आणि याचप्रमाणे अपवित्रतेच्या स्थितीतसुद्धा६७ नमाजच्या जवळ जाऊ नका जोपर्यंत तुम्ही स्नान करीत नाही याव्यतिरिक्त की तुम्ही रस्त्याने जात असाल६८ आणि कधी जर असे घडले की तुम्ही आजारी असाल किंवा प्रवासात असाल अथवा...

६४) म्हणजे प्रत्येक युगाचा पैगंबर आपल्या युगातील लोकांवर अल्लाहच्या न्यायालयात साक्ष देईल की जीवनाचा तो सरळमार्ग आणि चिंतन व कर्माच्या सत्य मार्गाची शिकवण अल्लाहने मला दिली होती, त्या शिकवणीला मी या लोकांपर्यंत पोहचविले होते. नंतर हीच साक्ष पैगंबर मुहम्मद (स.) आपल्या युगातील लोकांवर देतील. कुरआनने माहीत होते की पैगंबर मुहम्मद (स.) यांचा युग त्यांना पैगंबरत्व प्राप्त् झाल्यापासून कयामतपर्यंतचा काळ आहे. (पाहा आलिइमरान, टीप ६९)
६५) हा दारूविषयीचा दुसरा आदेश आहे. पहिला आदेश सूरह २ आयत २१९ मध्ये आला आहे. त्यात फक्त हे दाखवून सोडून दिले होते की दारू वाईट गोष्ट आहे आणि अल्लाहला पसंत नाही. यामुळे मुस्लिमांतील एक गट तेव्हापासून दारू सेवनापासून अलिप्त् राहिला होता. परंतु बहुतेक लोक त्याला पूर्वीसारखेच सेवन करीत होते. कधीकधी तर दारूच्या नशेतच नमाजासाठी उभे राहात असत आणि काहीही बडबड करत असत. साधारण हि. स. ०४ च्या सुरवातीला हा दुसरा आदेश आला आणि नशेत नमाज अदा करण्यास मनाई करण्यात आली. याचा प्रभाव असा पडला की लोकांनी आपल्या दारू सेवनाच्या वेळा बदलून टाकल्या आणि अशा वेळी दारू पिणे बंद केले. याच्या काही दिवसानंतर दारूला हराम ठरविण्याचा आदेश सूरह ५ आयत ९०-९१ द्वारा अवतरित झाला. येथे हेसुद्धा समजून घेतले पाहिजे की आयत मध्ये `सुक्र' म्हणजे `नशा' हा शब्द आला आहे. म्हणून हा आदेश फक्त दारूसाठीच नव्हता तर प्रत्येक नशावान सर्व वस्तूंसाठी होता आणि आताही तो आदेश जारी आहे. नशेच्या वस्तूंचा उपयोग हराम आहे. तर नशेच्या स्थितीत नमाज अदा करणे दुप्पट अपराध आणि महापाप आहे.
६६) याच कारणांसाठी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आदेश दिला की एखाद्या व्यक्तीला झोपेची गुंगी येत असेल तर नमाजमध्ये तो सतत उंघत राहील, अशा वेळी त्याने नमाज सोडून झोपी जावे. कोणी या आयतद्वारा या निर्णयाप्रत येतात की जो व्यक्ती नमाजमध्ये पठण होत असलेल्या अरबी मजकुराचा अर्थ समजत नसेल तर त्याची नमाज होत नाही. परंतु त्यांचा हा अनुचित आणि जबरदस्तीचा तर्क आहे आणि कुरआनची शब्दरचनासुद्धा त्यास साथ देत नाही. कुरआनमध्ये `हत्तातफ़क़हु' किंवा `हत्तातफहमूमातकूलून' (येथपावेतो की तुम्ही समजावे की तुम्ही काय करीत आहात) असे सांगितले नाही तर `हत्ता त़अलमु मा तकुलुन' (जेव्हा तुम्ही जाणावे की काय म्हणत आहात) असे सांगितले गेले आहे. म्हणजेच नमाजमध्ये मनुष्याला इतके भान असले पाहिजे की तो आपल्या जिव्हेने (तोंडातून) काय उच्चरत आहे. असे होऊ नये की तो उभा राहिला नमाज अदा करण्यासाठी परंतु एखादी गजल म्हणण्यास सुरु केले.
६७) मूळ शब्द आहे `जुनुबन' आणि याचा समानार्थी शब्द जनाबत आहे. जनाबतचा शब्दार्थ आहे अपरिचय. यानेच `अजनबी' शब्दाची उत्पत्ती झाली आहे. इस्लामी शरीयतच्या परिभाषेत जनाबत म्हणजे `अपवित्रता' आहे जी स्वप्न दोषाने व वीर्यपतनाने होते. शरीयतनुसार असा व्यक्ती पवित्रतेपासून दूर होतो म्हणून अशा स्थितीला `जनाबत' म्हटले जाते.
६८) इस्लामच्या विधिज्ञांनी आणि भाष्यकारांच्या एका गटाने या आयतचा अर्थ हा काढला आहे की अपवित्रतेच्या स्थितीत मस्जिदमध्ये जाऊ नये, याशिवाय की एखाद्या कामासाठी मस्जिदमधून जाणे होते. याच मताचे अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) अनस बिन मलिक (रजि.) हसन बसरी आणि इब्राहीम नखई (रह.) इ. आहेत. दुसऱ्या गटांचे मत याने अभिप्रेत प्रवास आहे. म्हणजे मनुष्य प्रवासात असेल आणि अपवित्र बनला तर तयमुम केले जाऊ शकते. मस्जिदमध्ये अपवित्र स्थितीत वुजू करून मस्जिदमध्ये बसणे या गटाच्या मतानुसार योग्य आहे. हे मत माननीय अली (रजि.) इब्ने अब्बास (रजि.) आणि सईद बिन जुबेर (रजि.) आणि इतरांचे आहे. जरी याविषयी जवळजवळ सर्वांचे एकमत आहे की मनुष्य प्रवासात असेल आणि अपवित्र झाला आणि स्नान करणे संभव नसेल तर तय्यमुम करून नमाज अदा करू शकतो. परंतु पहिला गट या विषयाला हदीसचा संदर्भ देतो तर दुसरा गट सवलतीसाठी कुरआनच्या या आयतचा संदर्भ घेतो.
Post a Comment