आजच्या या काळात आपल्या देशात पण १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेन्टाइन डे’ साजरा केला जातो. परंतु आम्ही ‘व्हॅलेन्टाइन डे’ साजरा न करता ‘लज्जा दिवस’ साजरा करीत आहोत. कारण ‘व्हॅलेन्टाइन डे’भारतीय संस्कृती नसून पाश्चिमात्य संस्कृती आहे. ‘व्हॅलेन्टाइन डे’ साजरा करणे, टीव्ही, मोबाइल आणि इंटरनेटचा गैरवापर करणे, तोकडे कपडे घालणे, गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड्स असणे हे आजच्या काळातले तरुण पिढीची फॅशन झाली आहे. परंतु याचा परिणाम काय होत आहे हेही आम्हाला माहीत आहे. देशात इतरत्र बलात्काराच्या कित्येक घटना घडतच आहेत. एका दिवसात कित्येक बलात्कार होत आहेत. याची खात्री पण आम्हाला नाहीय. कारण कित्येक प्रकरणे रेकॉर्डवर येतात आणि कित्येक प्रकरणे रेकॉर्डवर येतच नाहीत. कित्येक मुले मुलींना लग्नाचे किंवा प्रेमाचे आमिष दाखवून त्यांना फसवीत आहेत. मोबाइलमध्ये अश्लील क्लिप्स तयार करून मुले मुलींना ब्लॅकमेल करीत आहेत. हेच नाही तर अनेक मुली लज्जेमुळे आत्महत्या करून आपली जीवनलीला संपवीत आहेत. अशा प्रकारे अनेक मुलांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. अशा प्रकारे ‘व्हॅलेन्टाइन डे’ साजरा करणे हे वाईट मार्गाचे चोर दरवाजे आहेत.
मुलांना समजले पाहिजे की आपले आई-वडील आपली लहानपणापासून काळजी करतात. आमच्या संगोपनासाठी कष्ट सहन करतात. आमच्या उच्चशिक्षणासाठी चांगल्या महाविद्यालयात आम्हाला प्रवेश मिळवून देतात. आमच्या शिक्षणावर आपली कष्टाची-परिश्रमाची कमाई खर्च करतात. कारण सर्वच पालकांचे स्वप्न असते की आपला पाल्य खूप शिकावा. शिकून मोठा व्हावा. तेव्हा मुलांनी आदर्श व्यक्ती बनून आपल्या पालकांचे स्वप्न साकार करायला हवे. एखादी मुलगी आपल्या आईवडिलांच्या परवानगीशिवाय एखाद्या बॉयफ्रेंडबरोबर टाइमपास करते तर ही गोष्ट कोणत्याही पालकांना आवडत नाही. त्यांना दु:ख होते. अशा प्रकारे त्यांना दुखवू नये. आजच्या काळातल्या मुली तोकडे कपडे घालतात, आपल्या संस्कृतीनुसार वागत नाहीत. याविषयी पालकांनी काही सल्ला दिला तर त्यांना वाईट वाटते आणि पालकांचे म्हणणे त्या ऐकत नाहीत. पाश्चिमात्य संस्कृतीचा अंगीकार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दुसरे म्हणजे टीव्ही, मोबाइल आणि इंटरनेटमुळे अश्लीलता व निर्लज्जताही खूप वाढली आहे. आम्हाला माहीत आहे की एका छोट्याशा साबनाची जाहिरात देखील एका स्त्रीच्या तोकड्या कपड्यांतील शरीरप्रदर्शनाशिवाय पूर्ण होत नाही. अशा प्रकारे व्यवसायाच्या नावाखाली स्त्रीजातीचा अपमान होत आहे आणि अशा संस्कृतीमुळे जी नैतिकता फैलावली गेली आहे त्यामुळे लग्नाला एक जुनी परंपरा ठरविले जाते तर बलात्काराला एक मनोरंजनाचा प्रकार आणि घटस्फोटाला क्षुल्लक खेळ आणि प्रेमी व्हायला स्वप्नातील स्वर्ग समजले जात आहे. म्हणूनच ‘जीआयओ’ (गर्ल्स इस्लामिक ऑर्गनायझेशन) ‘व्हॅलेन्टाइन डे’ साजरा न करता ‘लज्जा दिवस’ साजरा करीत आहे.

- यास्मीन बानो
अचलपूर, मो.: ९३०९५३९६८२
अचलपूर, मो.: ९३०९५३९६८२
Post a Comment