नागपूर (डॉ. एम. ए. रशीद)-
वर्तमान लग्न समारंभात होणारे निरर्थक खर्च आणि हुंडा या चलनाने मुलीच्या नातलगांवर मानसिक आणि आर्थिक ओझे वाढले आहे. या कारणाने वैवाहिक संबंध अडचणीत येऊन मुलीचे आईवडील जास्तच चिंता करण्यास विवश होतात. समाजात वाढत असलेल्या अशा कुरीतींविरुद्ध आवाज उठविण्याची आवश्यकता आहे. विवाह अशा प्रकारे सोपा करायला पाहिजे जसा प्रेषित मुहम्मद स.अ.व. च्या काळात होत होता, असे विचार कार्यक्रमाच्या अध्यक्षा व जमाअत ए इस्लामी हिंद नागपूर महिला विभागाच्या शहर अध्यक्षा डॉ सबिहा हाशमी यांनी अविष्कार कॉलनीतील संघटनेच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमामध्ये व्यक्त केले. त्यांनी सांगितले की जो पैसा आम्ही लग्न आणि हुंडा यावर खर्च करतो, त्याला मुलींचे शिक्षण आणि त्यांचे भविष्य सुधारण्यास खर्च करायला हवा.
विवाहच्या नावावर आज मुस्लिम समाजामधे ज्या काही रीति परंपरा अवलंबिल्या जातात, त्या इस्लामी नाहीत. आम्हाला वायफळ खर्च न करता या पैशाला गरजू लोकांची मदत करण्यास उपयोग केला पाहिजे. त्यांनी सांगितले की विवाहासारखे पवित्र संबंध सोपे बनवून लग्न वेळेवर होऊ शकते, तरूण पिढीला रेप (सर्व प्रकारचे लैंगिक शोषण) सारख्या पापांपासून स्वत:ला वाचवू शकतो.
त्यांनी सांगितले की जमा़अत ए इस्लामी हिंद समाजातून अशा प्रकारची दुष्कृत्ये संपविण्यासाठी प्रयत्न करत असते. ज़ेबा ख़ान यांनी प्रश्नांची योग्य व समाधानकारक उत्तरे दिली. सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या प्रतिभावंतांमध्ये अ़फरो़ज अंजुम, फ़िरदौस खान, तुबा समरीन यांना बक्षीस देण्यात आले.
चिल्ड्रन सर्कलच्या बालकांनी 'शरई निकाह'वर नाटक प्रस्तुत केले.
‘तुटत असणारे नाते, विखुरलेले कुटुंब, त्याचे कारण आणि समाधान’ यावर पीपीटीद्वारे ‘प्री मॅरेज काउन्सिलिंग वर्कशॉप’मध्ये ओसीडब्लूच्या सीनियर मॅनेजर फ़रहत क़ुरैशी यांनी विवाहाच्या सफलतेचे रहस्य सांगितले. त्यांनी सांगितले की अनेक कामे, जबाबदारीचे ओझे, राग, बॉडी लँग्वेज, फिल्मी स्टाईलचे अनुकरण, आपसातील मतभेद अशा साध्या गोष्टीची तक्रार वैवाहिक जीवनावर संकटे उभी करतात. इस्लामी शिक्षणाच्या अनुपालनासोबत परस्पर वार्तालाप, ऐकणे -समजण्याची योग्य क्षमता ठेवून कुठल्याही वैवाहिक समस्येचे समाधान निघू शकते. वैवाहिक जीवनाच्या सफलतेकरिता नातलग लोकांनी सकारात्मक विचारांना प्रोत्साहित करावे. यानंतर इ़र्फाना कुलसुम यांनी सुखी परिवारच्या इस्लामी व्हॅल्यूवर प्रकाश टाकला.
हा कार्यक्रम जा़फरनगरच्या मर्क़जे इस्लामी सभागृहामधे आयोजित करण्यात आला होता. याची प्रस्तावना बुशरा जावेद यांनी केली. कार्यक्रमाच्या समाप्तीवर ओसीडब्ल्यू आणि महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याच्या हितार्थ येणाऱ्या उन्हाळ्यात आम्हाला पाण्याचा एक-एक थेंब वाचविला पाहिजे, याबाबत उपस्थितांकडून प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्रमात कुरआन पठण राहिल परवीन, आयशा कुरैशी यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फ़िरदौस अंजुम, सुमैया शे़ख यांनी केले.

Post a Comment