Halloween Costume ideas 2015

एसआयओ, जेआयचचा स्थलांतरित मजुरांसाठी मायेचा घास

नागपूर (डॉ. रशीद)
कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे हजारोंच्या संख्येने मजूर आपले गाव गाठत आहेत. मागील तीन दिवसांपासून नागपूर रेल्वे स्थानकावरून हजारोंच्या संख्येने मजूर आपल्या गावी जात आहेत. स्थानकात जवळपास 20 मिनिटे गाडी थांबते. या काळात जमाअत-ए- इस्लामी हिंद आणि स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशनतर्फे मजुरांना दूध, बिस्कीट, फळे, चने आणि जेवनाचे पॅकेट्स दिले जात आहेत. या कार्यात डीसीपी नीलेश भरने यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
    एका रेल्वे गाडीत जवळपास 2600 नागरिक प्रवास करतात. अनेकजण प्रवासात  20 ते 25 तास उपाशी राहतात. यांना गाडीतून उतरण्याची मनाई आहे. त्यामुळे स्वयंसेवक कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शासन नियमांचे पालन करीत गरजूंपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचवित आहेत. या कामी एजाज खान फिरोज सोबत मोहम्मद शहजाद , शोएब शेख ,  मुजम्मिल शेख , फिरोज शेख  आणि एस आईओ चे  शादाब अहमद, मुदब्बिर खान , डॉ जव्वाद फैजान खान, उबैर इनामदार, राफे अल्वि , सुफियान खान , मुजाहिद खान , ताबिश खान, अशर खान, जीशान खान तसेच सदर अंजुमन इंजीनियरिंग कालेज चे प्रोफेसर नौशाद आलम आदी परिश्रम घेत आहेत. एसआयओ आणि जेआयएचचे सर्वत्र कौतूक होत आहे.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget