Halloween Costume ideas 2015

दहशतीमागचा क्रूर चेहरा

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील लेथपुरा-अवंतीपुरा भागात १४ फेब्रुवारी २०१९ रोजी दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात  चाळीसहून अधिक जवान हुतात्मा झाले. या हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट निर्माण झाली. देशभरातून नव्हे तर जगभरातून या हल्ल्याचा निषेध केला गेला. समाजात शांतता  प्रस्थापित करण्यात माध्यमाची महत्त्वाची भूमिका असते, याचा अनेकांना विसर पडल्याचे दिसून आले. माध्यमे आणि नेते लोकभावनेच्या आहारी जाऊन वास्तवतेकडे दुर्लक्ष करताना  आढळून आले. भारताचे जागतिक अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे. देशाची अर्थव्यवस्था २.५ हजार अब्ज डॉलरच्या पुढे आहे. नव्याने उदयाला येणारी महासत्ता म्हणून  जगभारताकडे पाहत आहेत. सीमेवर युद्धजन्य परिस्थिती राहिली तर देशाला मूलभूत प्रश्न बाजूला सारून सैन्यदल आणि क्षेपणाध्Eाावर जास्त खर्च करावा लागेल. दहशतवादी,  नक्षलवादी हल्ल्यानंतर कोणी काय बोलायचे हे सगळे ठरलेले असते. ठरलेली विधाने माध्यमांतून केली जातात. आजवर या विषयावर माध्यमांत खूप चर्चा झाल्या, अनेक अग्रलेख छापून आले. अनेक सरकारे आली, अनेक गेली. पण जवानांचे सीमेवर सांडणारे रक्त कोणी थांबवू शकले नाही. या रक्तांच्या पाटाला देशभक्ती आणि राष्ट्रवादाचा मुलामा चढवला की  झाले! एकदा ‘जय जवान, जय किसान’ घोषणा दिल्या की, सीमेवर जवानांनी आणि शेतात शेतकऱ्यांनी मरत राहायचे.
२०१३पासून जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. तीन वर्षे भाजप आणि पीडीपी सत्तेत सहभागी होते. गेल्या वर्षी भाजपने मेहबुबा  मुफ्ती यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेत सरकार पाडले. अतिशय नाट्यपूर्ण घटना घडल्या आणि राष्ट्रपती राजवट लागू केली. जम्मू-काश्मीरची पूर्ण सूत्रे केंद्र सरकारकडे आहेत.  जम्मू-काश्मीरमध्ये २०१३ सालापासून २०१७पर्यंत वेगवेगळ्या १२६४ घटना घडल्या आहेत. यापैकी २०१६ मध्ये ३२२ घटना घडल्या. सर्वाधिक ३४२ घटना २०१७ मध्ये घडल्या. या काळातील हल्ल्यात ३०१ जवान शहीद झाले. २०१६ मध्ये ८२ जवान शहीद झाले, तर २०१७मध्ये ८० जवान शहीद झाले. यामध्ये ११५ निरपराध काश्मिरी नागरिक मारले गेले. १२६४  हल्ल्यांत ६४८ दहशतवादी मारले. सर्वाधिक २१३ दहशतवादी २०१७ साली मारले. (संदर्भ ‘द वायर’) निसर्गाच्या कुशीत वसलेले काश्मीर आत्ता रक्ताळले आहे. पांढरा बर्पâ लाल दिसू  लागला आहे. पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबातील सदस्यांचे अश्रू सुकले नव्हते, तोच सत्ताधारी नेतेमंडळींना आपल्या आगामी निवडणुकीतील मतदानाची काळजी वाटू लागली.  त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपापल्या कार्यक्रमांना उपस्थिती दर्शविली. दु:खाची नौटंकी करणाऱ्या या (अभि) नेत्यांची नैतिक पातळी किती खालावलेली आहे याचेच हे दर्शन  होते. कुणी उद्घाटनाचा सोहळा साजरा करतो तर कुणी युती कशी अबाधित राहील यासाठी बैठका घेतो. कुणाची प्रचारसभा थांबली नाही. सैनिकाच्या शवपेटीबरोबर एका नेत्याने तर  चक्क सेल्फी काढल्याची बातमी आहे. आज सामान्य काश्मिरी रोज कणाकणाने मरण अनुभवतो, त्याची मरणाविषयीची भीती संपलेली आहे. तरीही त्याची पहिली इच्छा भारत-पाक युद्ध  होऊ नये, हीच आहे. एका बाजूला निवडणुकांचा माहोल नजरेपुढे ठेवून युद्धाच्या भाषेचा आवाज बुलंद होत चालला आहे. जम्मूमधून काश्मिरींच्या गाड्या जाळल्याच्या घटना पुढे येत  आहेत. लदाख, लेह यांना वेगळा दर्जा देऊन काश्मिरींमध्ये पूâट पाडण्याचे डाव खेळले जात असल्याची तीव्र भावना काश्मिरींमध्ये आहे. तसेच राजकीय हस्तक्षेप पाहता, आणखी २०- ३० वर्षे काश्मीर समस्या धगधगत राहणार का, या शंकेने अनेकांची झोप उडाली आहे. स्वातंत्र्यापासूनच काश्मीरच्या भूमीवर अघोषित युद्ध लढले जात आहे. पुलवामा घटनेनंतर युद्धाची  भाषा अधिकच जोर धरू लागली आहे. परंतु युद्ध हा कोणत्याही समस्येवर उपाय ठरत नाही. फुटीरवादी काश्मिरीने ५० जवान मारले. युद्ध झालेच तर ५० हजार काश्मिरी मरतील, द्वेषाची ही आग शस्त्रास्त्रांनी कधीही विझणारी नाही. मानवतेला काळिमा फासणारा हा गुन्हा दहशतवाद्यांकडून व त्यांचा वापर करून घेणाऱ्यांकडून प्रथमच घडलेला नाही. आपल्या  अस्तित्वासाठी, दहशत कायम राहण्यासाठी, आपल्या अर्थकारणासाठी तसेच राजकीय उद्दिष्टांसाठी दहशतवादी व त्यांचे आश्रयदाते ठराविक काळाने असली नापाक कृत्ये करत असतात.  त्याला ‘काश्मीर आणि धर्मयुद्ध’ असला बेगडी मुलामा देण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून अनेकदा झाला आहे. मात्र, हा त्यांचा एक बुरखा आहे. त्यामागे लपवलेला व्रुâर, भेसूर आणि विकृत  चेहरा कधीच उघडा पडला आहे, याची त्यांना कल्पना अद्याप आलेली नाही. दहशतवादविरोधी लढाईत जसे जवान मृत्युमुखी पडत आहेत तसाच सामान्य काश्मिरींचा मुख्यत्वे बळी जात  राहाणार आहे. त्यामुळेच युद्धाची भाषा न थांबणाऱ्या संहाराकडे निर्देश करणारी ठरते. दहशतवादी कारवायांना खतपाणी घालणाऱ्या शक्तींचा बिमोड करून आज देशात सौहार्दाचे वातावरण  निर्माण करण्याची खरी गरज आहे.

-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@eshodhan.com)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget