Halloween Costume ideas 2015

स्वतंत्र भारत आणि मुस्लिम समाज

आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली, परंतु भारतीय मुस्लिम समाजाची प्रगती आणि विकास झाला नाही. त्याला महत्त्वपूर्ण कारण म्हणजे मुस्लिम समुदाय आज सामाजिक, राजकीय आणि जातीय संघर्षात भरडला जात आहे. यामुळे या समाजाची प्रगती आणि विकास कमी अधोगती जास्त प्रमाणात झाली आहे. संपूर्ण भारतात जर कोणी सर्व  क्षेत्रांत मागे असेल तर तो म्हणजे मुस्लिम समाज. या समाजाची सद्य:स्थिती, सरकार आणि राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षित कारणांमुळे खालावली आहे. हा समाज जातियवादात भरडला जात  आहे. सरकार आणि काही राज्याकर्त्यांमुळे आपल्या देशातील लोकशाही आणि स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. देशात आजपर्यंत अनेक सरकारे आली आणि त्यांनी अनेक समित्या  नेमल्या, मात्र त्या कागदोपत्री होत्या. त्यांची अंमलबजावणी प्रत्यक्ष सरकारांनी आजपर्यंत मुस्लिम समाजासाठी केलेली नाही. आपल्या देशात धार्मिक उन्माद माजविण्याचा व जातीचे  तुष्टीकरण करण्याचा आरोप करून मुस्लिम समाजाला बदनाम केले.
येथे गेली अनेक वर्षे काँग्रेस पक्षाची सत्ता राहिली आहे. या प्रत्येक काळात धार्मिक वाद माजवून मुस्लिम समाजावर, लहान मुले व महिलांवर अत्याचार घडवून आणण्यात आले. जे  लोक जातीय दंगलीत मृत्युमुखी पावले त्यांच्याशिवाय त्यांच्या घरात चूल पेटती की नाही याकडे आजपर्यंत कोणत्याही सरकार वा राज्यकर्त्यांनी लक्ष दिले नाही. त्यांना आर्थिक मदतही  पोहचविण्याचा प्रयत्न कधी झाला नाही. मुस्लिम समाजामध्ये फार कष्टाने एकवेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात त्यांचा संपूर्ण दिवस जातो. केंद्रा वा राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार अले तरी मुस्लिम समाजाच्या परिस्थितीवर काही फरक पडत नाही. कारण ते आजही या स्वतंत्र भारतात पिढ्यान्पिढ्या गरिबी, अज्ञान आणि दारिद्र्याच्या खाईत जीवन जगत  आहे. येथील राजकारण्यांकडे या समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी वेळ नाही. या स्थितीला राजकीय पक्षांच्या नेत्यांरोबरच मुस्लिम समाजातील नेतेदेखील जबाबदार आहेत. या  लोकांनी मुस्लिम समाजाला धर्मकारणात, दंगलींत आणि दहशतवादासारख्या समस्यांमध्ये इतके व्यस्त करून टाकले आहे की त्याला आपल्या रोजीरोटीपलीकडे कसलाच विचार करण्यास  वेळ नाही.
मुस्लिम समाजाला प्रगती करायची असेल तर सर्वप्रथम सक्षम नेतृत्व समाजात निर्माण करावे लागले. मग पक्ष स्थापन करून लोकशाही पद्धतीने राजकीय सत्तेत भागीदारी मिळवावी  लागेल. येथे मुस्लिम समाजाची मोठी लोकसंख्या असूनदेखील हा समाज विकासाच्या दृष्टीने मागे का राहातो यावर विचारमंथन व्हायला हवे. या समाजातील अनेक तथाकथित नेते काही जातीयवादी पक्षांत काम करतात, ते पक्षाच्या ताटाखालचे मांजर बनून आपलेच पोट भरत बसले आहेत. त्यांना आपल्या समाजाच्या प्रगतीबद्दल बोलण्याची हिंमत होत नाही. या  समाजाने शिकावे, प्रगती करावी अशी राजकीय पक्षांची मुळीच इच्छा नाही. मुस्लिम समाजाच्या प्रगतीत प्रचंड प्रमाणात अडचणी येत आहेत. समाजाच्या मूलभूत व शैक्षणिक सुविधा  मिळविण्यासाठी संघटितपणे लढा उभारण्याची वेळ निर्माण झाली आहे. राज्यकर्त्यांना कागदावर मुस्लिम समाज दिसतो मात्र कोणत्याही सुविधा त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत. या समाजाच्या लोकांना देशांतर्गत तिरस्काराच्या दृष्टीने पाहिले जात आहे. देशद्रोही ठरविले जाते आणि अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत. मुस्लिम व्यक्तीला घर, जागा, दुकान इत्यादी खरेदी करण्यापासून रोखले जात आहे, ही दुर्दैवाची बाब आहे. हे सर्व मुस्लिमांच्या देशभक्तीवर संशय घेण्यासारखे आहे.
देशातील धर्मनिरपेक्ष सरकारने मुस्लिमांच्या शैक्षणिक सुविधांकडे दुर्लक्ष केले आहे. म्हणूनच हा समाज आपल्या पायावर उभा राहू शकत नाही. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे लहान  मुलांनादेखील शिक्षण मिळत नाही. आपल्या दोन वेळच्या जेवणाच्या सोयीसाठी बाल्यावस्थेत मुलांना कामावर जावे लागते. स्वातंत्र्योत्तर काळात मुस्लिम समाजाला जी राजकीय  भागीदारी मिळायला हवी होती ती आजतागायत मिळालेली नाही, यामागे फार मोठा राजकीय षङ्यंत्राचा भाग आहे. त्यामुळे समाजाचा माणूसच समाजातील माणसाला निवडून देत नाही.  तसेच सांप्रदायिकतेमुळे या समाजाची प्रगती झालेली नाही. म्हणूनच हा समाज मागे राहिला आहे. त्यामुळे समाजातील लोकांना निवडणुकीच्या काळात मतांचे राजकारण करणाऱ्या आज  कोणत्याही राजकीय पक्षावर विश्वास अजिबात उरलेला नाही.

- गुलाब नजीर पिंजारी
निंभोरा- रावेर (जि.जळगाव)
मो.९६८९०३५७९२

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget