Halloween Costume ideas 2015

पुरोहितवादाचं मूळ

पुरोहितगीरी फक्त एकाच समाजात आहे, असं नाही, तर जे लोकं स्वतःला पुरोहितगीरीचा विरोधक म्हणून मिरवतात, ते स्वतः देखील या पुरोहितवादाला, भटशाहीला बळी पडलेले असतात, पण ते कटू सत्त्य स्वीकारण्याइतका विवेक त्यांच्याकडे नसतो.
पुरोहितवादाच्या किंवा पुजारीवादाच्या मूळाशी मुर्तीपुजा हेच कारण आहे. कारण मुर्ती आली की, मुर्तीपुजा आली. मुर्तीपुजा आली की पुजारी आला. पुजारी आला की पुजारीवाद आला, पुरोहितवाद आला, ब्राह्मणवाद आला. म्हणून पुरोहितवादाचं समूळ उच्चाटन करायचं असेल तर आपल्याला सर्वप्रथम आपल्याच महामानवाचं दैवतीकरण थांबवावं लागेल. त्यासाठी त्यांच्या मुर्तीची, फोटोची, पुतळ्यांची पुजा बंद करावी लागेल आणि त्यांचे विचार, त्यांचे चरित्र वाचून त्यांच्या मार्गावर चाल
    मुर्तीसमोर दीप प्रज्वलन करणे, फोटोला हार घालणे, महापुरूषांच्या समाधीवर फुलं टाकणे, चादर टाकणे, त्याच्यासमोर अगरबत्ती लावणे, संतांच्या कबरींसमोर नतमस्तक होणे वगैरे सोपस्कारांना पुजा समजत नाही. तो फक्त आदर करण्याचा, मान देण्याचा संकेत असल्याचा, प्रेरणा घेण्याच् मार्ग असल्याच् युक्तीवाद करतात. असाच युक्तीवाद पुरोहितवादीही करत असतात की, ते त्या मुर्तीची पुजा करत नसून ती मुर्ती ज्याची आहे त्या महामानवाचा आदर करत आहेत, त्याद्वारे ते सात्विकतेचा, ईश्‍वरी तत्वांचाच आदर करत आहेत.
    हे थोड्या वेळासाठी खरं जरी मानलं तरीही, हा युक्तीवाद करणार्यांनी छातीवर हात ठेऊन म्हणावं की, खरंच सर्वसामान्य लोकं फक्त प्रेरणा अन् आदर म्हणूनच हे सोपस्कार करतात की पुज्य भाव मनात ठेऊन हे सगळं करत असतात? अन् याला जबाबदार कोण? याला जबाबदार तेच तथाकथित बुद्धीजीवी विचारवंत लोकं आहेत, जे आदर व प्रेरणेच्या नावाखाली या नवपुरोहितवादाला आपल्या कृतीतून चालना देत असतात. म्हणून कबरपुजा असो की पुतळापुजा, ती थांबल्याविवाय पुरोहितवाद संपुष्टात येणारच नाही.
    यासाठीच प्रेषित मुहम्मद सलअम् यांनी जगाचा निरोप घेतांना अल्लाहशी दुवा केली होती की, हे अल्लाह, माझ्यानंतर माझ्या कबरीचा देव होऊ देऊ नकोस ... म्हणजे दैवतीकरण होऊ देऊ नको. आज मदिना येथे प्रेषितांच्या कबरीवर कुणी फुलं किंवा चादर टाकत नाही. कुणी अगरबत्ती, मेणबत्ती लावत नाही, कुणी नतमस्तक (सडदा) होत नाही. किती पुरोगामी विचार होते प्रेषितांचे! त्यांनी कुणाला आपलं चित्र काढू दिलं नाही. कारण चित्र आलं की, मुर्ती येते, मुर्ती आली की मग मुर्तीपुजा अन् पुढे पुजा करणारा पुरोहित अन् पुरोहितवाद येतो. अशाप्रकारे प्रेषितांनी पुरोहितवादाचं मूळच कापून टाकलं.
    भारतीय मुस्लिम समाजात काही तुरळक ठिकाणी काही इस्लामबाह्य गोष्टी नंतर घुसल्या आहेत, हे मान्य. त्यांचं समर्थन केलंच जाऊ शकत नाही. परंतु याचे कारण म्हणजे ढोवळ्यासोबत पोवळा बांधला, वाण नाही आला, पण गुण नाही आला. परंतु सुज्ञ मुस्लिम विचारवंत, बुद्धीजीवी त्या अपप्रवृत्तींचा फक्त विरोधच करत नाही, तर त्याविरूद्ध जनजागरणदेखील करत असतात. त्यासाठी उलेमांच्या अनेक चळवळी उभ्या राहिल्या आहेत. म्हणूनच आज त्या गोष्टी फार जास्त दिसत नाहित.
    परंतु आश्‍चर्य याचे वाटते की, स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणारे इतर काही सामाजिक कार्यकर्तेदेखील फोटोपुजा, पुतळापुजेचं समर्थन करत असतात. हा नवपुरोहितवाद आहे. मी हे सगळं पोटतिडकिने मांडतोय. कुणाच्या भावना दुखविण्याचा किंवा इतरांना कमी लेखण्याचा यात काडीमात्रही उद्देश नाही. कृपया गैरसमज करून घेऊ नका. विचार स्वातंत्र्य मान्य करणारे खरे बुद्धीप्रामाण्यवादी मला समजून घेतील या अपेक्षेने सांगतोय की, जोपर्यंत व्यक्तीवादाला प्रोत्साहन देणारा हा पुतळावाद, फोटोवाद संपत नाही, तोपर्यंत पुरोहितवादाविरूद्ध कित्तीही व्याख्याने द्या, पुरोहितवाद तसाच अढळ उभा राहिन एखाद्या लोखंडी पुतळ्यासारखा!
ण्याची गरज आहे, तसेच त्यांच्या विचारांचा प्रचार करण्याची गरज आहे. हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. डॉ. आ. ह. साळूंखे यांचं वाक्य आठवते की, महापुरूषांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घ्या.

- नौशाद उस्मान, 
औरंगाबाद
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget