४६) ...‘समिअना व असैना’७४ (आम्ही ऐकले परंतु आम्ही मान्य करत नाही) आणि ‘इसमअ गैर मुसमइन’७५ (ऐका, तुम्ही असे नाही की कोणी ऐकावे) व ‘राइना’७६ खरे पाहता जर त्यानी म्हटले असते ‘समिअना व अतअ्ना’ (आम्ही ऐकले आणि मान्य केले) आणि ‘इस्माअ’(ऐका) व ‘उन्जुरना’(आमच्याकडे - लक्ष द्या) तर हे त्यांच्यासाठीच उत्तम होते आणि ती अधिक सत्यनिष्ठतेची पद्धत होती. परंतु त्यांच्यावर तर त्यांच्या असत्यवादामुळे अल्लाहचाधिक्कार ओढवला आहे, म्हणून ते अल्लाहवर कमीच ईमान राखतात.
(४७) हे लोकहो ज्यांना ग्रंथ दिला गेला होता! मान्य करा त्या ग्रंथाला जो आता आम्ही अवतरला आहे आणि जो त्या ग्रंथाची सत्यता प्रमाणित करतो व समर्थन करतो जो तुमच्याजवळ अगोदरपासूनच उपलब्ध होता.७७ यावर श्रद्धा ठेवा या अगोदर की आम्ही तुमचे चेहरे विद्रूप करून मागे फिरवावे किंवा त्यांना त्याचप्रकारे धिक्कारित करावे ज्याप्रकारे सब्तवाल्यांशी (शनिवार न पाळणाऱ्यांशी) केले होते.७८ आणि लक्षात ठेवा की अल्लाहचा आदेश लागू होतच असतो.
(४८) अल्लाह नि:संशय त्याच्यासोबत अन्य कुणाला सामील करणाऱ्यांना (शिर्क) क्षमा करीत नाही.७९ अनेकेश्वरत्वा व्यतिरिक्त इतर जितके गुन्हे आहेत तो हवे ते माफ करतो,८० अल्लाहबरोबर ज्याने इतर कोणाला भागीदार केले त्याने तर एक मोठे असत्य रचले आणि भयंकर मोठ्या पापाची गोष्ट केली.
(४९) तुम्ही त्या लोकांनासुद्धा पाहिले आहे काय जे स्वत:फार फार शुद्धात्मा असल्याचा दावा करतात? वास्तविक पाहता पवित्रता तर अल्लाहच ज्याला इच्छितो त्याला प्रदान करतो, आणि (त्यांना पवित्रता प्राप्त नाही तर वास्तविकपणे) त्यांच्यावर तिळमात्र जुलूम केला जात नाही.
(५०) पाहा तर खरे, हे अल्लाहबद्दलदेखील खोटे कुभांड रचण्यास चुकत नाहीत आणि यांच्या स्पष्टपणे गुन्हेगार असण्यास एवढा एकच गुन्हा पुरेसा आहे.
(५१) तुम्ही त्या लोकांना पाहिले नाही काय ज्यांना ग्रंथाच्या ज्ञानातून काही भाग दिला गेला आहे आणि त्यांची दशा अशी आहे की ते मिथ्या जिब्त८१ व तागूत८२ (मर्यादेबाहेर जाणारा)
ला मानतात. आणि अनेकेश्वरवादींrच्या बाबतीत म्हणतात की श्रद्धा ठेवणाऱ्यांपेक्षा तर हेच अधिक सन्मार्गावर आहेत.८३
७४) म्हणजे जेव्हा त्यांना अल्लाहचे आदेश ऐकविले जातात तर मोठ्याने म्हणतात. `समि़अना' (आम्ही ऐकले) आणि हळूच बडबडतात की `असैना' (आम्ही स्वीकार केला नाही) किंवा `अत़अना' (आम्ही स्वीकार केला) चे उच्चरण अशाप्रकारे जिव्हेला झटका देऊन करतात की उच्चर `असैना' होतो.
७५) म्हणजे वार्तालाप करता करता जेव्हा ते पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी काही बोलू इच्छितात तेव्हा म्हणतात `इस्म़अ' (ऐका) आणि बरोबरीने `गैर मुस्मईन'सुद्धा म्हणतात ज्याचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे आपण इतके आदरणीय आहात की आपल्या मर्जीविरुद्ध काहीही आपणास ऐकविले जाणार नाही. दुसरा अर्थ म्हणजे तुम्ही या योग्य नाही की तुम्हाला कोणी काही ऐकवावे. एक अर्थ असाही आहे की अल्लाह करो तुम्ही बहिरे व्हावेत.
७६) याचा तपशील पाहा सूरह २ (अल्बकरा, टीप १०८)
७७) तपशीलसाठी पाहा, सूरह ३ (आलिइमरान, टीप २)
७८) तपशीलासाठी पाहा, सूरह २ (अल्बकरा, टीप ८२-८३)
७९) हे यासाठी सांगितले गेले आहे की ग्रंथधारक जरी पैगंबर आणि ईशग्रंथांचे दावेदार होते परंतु ईशद्रोहात (शिर्क) आणि अनेकेश्वरत्वात पडलेले होते.
८०) याचा अर्थ असा नाही की मनुष्याने फक्त अनेकेश्वरत्वात पडू नये आणि इतर सर्व अपराध आणि गुन्हे करीतच जावे. याने अभिप्रेत अनेकेश्वरत्व ज्यास त्या लोकांनी किरकोळ गोष्ट समजली होती ती इतर सर्व अपराधांपासून मोठा अपराध आहे की इतर अपराधींची माफी तर संभव आहे परंतु अनेकेश्वरत्व हा असा अक्षम्य गुन्हा आहे की त्याची कधीही माफी होऊ शकत नाही. यहुदी धार्मिक नेता शरीयतच्या लहान सहान आदेशांची काळजी घेत परंतु त्यांचा पूर्ण वेळ त्या गौण गोष्टीतच जात असे, ज्यांना त्यांच्या धार्मिक नेत्यांनी उकरून काढले होते. परंतु अनेकेश्वरत्व (शिर्क) त्यांच्याजवळ तर अगदी हलके आणि शुल्लक काम होते. ते स्वत: आणि त्यांच्या समाजबांधवांना या घोर अपराधांपासून वाचविण्याचा कधीही त्यांनी प्रयत्न केला नाही. त्यांना अनेकेश्वरवादींसोबत मैत्री करण्यास व त्यांचे समर्थन करण्यात काही एक दोष दिसत नसे.
८१) `जिब्त' चा मूळ अर्थ आहे अवास्तविक, तथ्यहीन आणि निरर्थक वस्तू. इस्लामी भाषेत जादू, ज्योतिषी (फालगीरी) टोने टोटके, शकून अपशकून, मुहूर्त आणि इतर सर्व अंधविश्वासपूर्ण आणि काल्पनिक गोष्टींना `जिब्त' म्हटले जाते. हदीस कथन आहे, `जनावरांच्या आवाजाने भविष्य वर्तविणे, त्यांच्या पायाच्या निशाणी व्दारे मुहूर्त काढणे आणि फालगीरीचे इतर सर्व पद्धती `जिब्त' आहेत.' `जिब्त'चा अर्थ तोच आहे ज्याला आपण मराठीत `अंधविश्वास' म्हणतो. इंग्लीशमध्ये `Superstitions' हा शब्द आहे.
८२) तपशीलासाठी पाहा सूरह २ (अल्बकरा) टीप - २८६ व २८८
८३) येथे अश्रद्धावंतापासून अभिप्रेत अरबांचे मुशरीक लोक (अनेकेश्वरवादी) आहेत. यहुदी लोकांचा दुराग्रह इथपर्यंत पोहचला होता की ज्यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर ईमान आणले होते; त्यांना ते अरबच्या अनेकेश्वरवादी (मुशरीक) लोकांपेक्षा जास्त मार्गभ्रष्ट समजत होते आणि म्हणत होते की यांच्या पेक्षा हे अनेकेश्वरवादीच अधिक सरळमार्गावर आहेत परंतु ते उघड्या डोळयांनी पहात होते की एकीकडे विशुद्ध एकेश्वरत्व (तौहीद) आहे ज्यात अनेकेश्वरत्व (शिर्क) लवलेश मात्रही नाही आणि दुसरीकडे उघड मूर्तीपूजा आहे ज्याची निंदा संपूर्ण बायबलमध्ये आलेली आहे.

Post a Comment