है अयां युरीश-ए-तातार के अफसानेसे
पासबां मिल गए काबे को सनम खानेसे
हजारो चॅनल्स, लाखो वर्तमानपत्रे आणि समाजमाध्यमांच्या कोट्यावधी पोस्टच्या माध्यमातून रात्रं-दिवस रविवारची सुट्टीही न घेता अखंडपणे इस्लामविरोधी प्रचार होऊनही युरोप आणि अमेरिकेमध्ये असा एकही दिवस जात नाही जेव्हा तेथे दोन-चार लोक रोज इस्लामचा स्विकार करत नाहीत. हा इस्लामला प्रतिगामी समजणाऱ्या लोकांवर काळाने उगवलेला सुडच म्हणावा लागेल. या धर्मांतरांच्या बातम्यांच्या लहरी सहजासहजी आपल्यापर्यंत येत नाहीत. मात्र 5 फेब्रुवारी रोजी हॉलंड अर्थात नेदरलँडमध्ये झालेल्या एका धर्मांतराने जागतिक स्तरावरखळबळ माजविली. वर्ल्ड हेविवेट बॉक्सिंग चॅम्पियन कॅशिअस्नले च्या धर्मांतराला जेवढी प्रसिद्धी मिळाली होती तेवढीच किंबहुना थोडीसी जास्तच प्रसिद्धी या धर्मांतरांना मिळाली. यामुळे या धर्मांतराची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते.
नेदरलँड हा युरोपीयन युनियनचा एक श्रीमंत देश. या देशातील एक राजकीय पक्ष पी.व्ही. व्ही. अर्थात फ्रिडम पार्टी ला इस्लामचे वावडे. या पार्टीचा अध्यक्ष ग्रिट विल्डर्स हा इस्लामचा क्रमांक एकचा शत्रू. या पक्षाने नेदरलँडमध्ये मस्जिद, कुरआन आणि मुसलमान यांचा विरोधच केला. एवढेच नव्हे तर हा विरोधच त्यांच्या राजकारणाचा पाया बनला. या ग्रिट विल्डरचा एक सहकारी आणि खासदार अरनुड वॅन ड्युरॉनने 2013 मध्ये स्वतःच्या उच्चशिक्षित मुलासह अचानक इस्लामचा स्विकार करून फ्रिडम पार्टीला जोराचा धक्का हळूवारपणे दिला. त्यामुळे चिडून ग्रिट विल्डर्सने मागच्या वर्षी इस्लामचे प्रेषित ह.मुहम्मद मुस्तफा सल्ल. यांच्यावरील व्यंगचित्रांची स्पर्धा भरविली. मात्र मुस्लिम देशांच्या आंतरराष्ट्रीय दबावामुळे डच (नेदरलँड) सरकारने ही स्पर्धा होऊ दिली नाही. जे-जे वाईट त्याला इस्लामशी कसेही करून जोडण्याच्या उद्योगात सदैव व्यग्र राहणाऱ्या विल्डर्सला दूसरा जोराचा धक्का तेवढ्याच जोरात दिला तो त्याचा उजवा हाथ मानल्या जाणाऱ्या जोराम जॅरोन वॅनव्हॅन्नलेवरेन ने 5 फेब्रुवारीला आपण इस्लाम स्विकार केल्याची अधिकृत घोषणा केली. या घोषणेमुळे साहजिकच संपूर्ण युरोपमध्ये खळबळ उडाली. जगातील सर्वच प्रमुख वाहिण्या, वेब पोर्टल्स आणि वर्तमानपत्रांनी या घोषणेची दखल घेतली.
मात्र भारतात ही बातमी समाज माध्यमातून आली. नाही म्हणायला लाजत काजत काही वर्तमानपत्रांनीही ही बातमी जमेल तेवढी छोटी करून प्रकाशित केली. मात्र युरोपमध्ये जशी ही बातमी केंद्रस्थानी होती तसे स्थान या बातमीला आपल्या देशात मिळालेले नाही. आणि हे स्वाभाविकच होते. ज्या प्रकारे आपला राष्ट्रीय मीडिया वागतो आहे, ज्याप्रमाणे त्याने धर्मनिरपेक्षतेचा त्याग केलेला आहे, निष्ठा बदललेल्या आहेत, त्यावरून या बातमीला प्रामुख्याने जनतेसमोर तो आणेल, अशी अपेक्षा करणे म्हणजे उन्मादी माणसाकडून समजदार वर्तनाची अपेक्षा करण्यासारखे होते.
सीबीएस अर्थात सेंट्रल स्टॅटिट्निस ब्युरो नेदरलँडच्या सांख्यिकी विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार नेदरलँडच्या 17 कोटी 50 लाख लोकसंख्येपैकी 4.9 टक्के मुस्लिम आहेत. ग्रीट विल्डर्सच्या विरोधाला न जुमानता अनेक डच नागरिक अभ्यासाअंती इस्लामचा स्विकार करत आहेत आणि धर्मांतराचा हा वेग पाहता 2050 पर्यंत नेदरलँडमध्ये मुस्लिमांची जनसंख्या दुप्पट होईल, असे न्यूज एशियाच्या बातमीत म्हटले आहे.व्हॅन्नलेव्हरेनच्या धर्मांतराचे महत्व जोराम व्हॅन्नलेव्हरेन्स हा काही साधा सुधा माणूस नाहीये. तो डच संसदेच्या हाऊस ऑफ रिप्रझेंटेटीव्ह अर्थात लोकसभेचा खासदार राहिलेला आहे. 17 जून 2010 ते 21 मार्च 2014 पर्यंत तो फ्रिडम पार्टीतर्फे खासदार होता. नंतर पक्ष प्रमुख ग्रिट विल्डर्सबरोबर झालेल्या मतभेदामुळे त्याने पक्ष सोडला व स्वतंत्र सदस्य म्हणून 23 मार्च 2017 पर्यंत संसदेत त्याने काम केले. इस्लामचा एक कट्टर विरोधक म्हणून नेदरलँडमध्ये त्याची ओळख होती. त्याचा जन्म 13 जानेवारी 1979 रोजी अॅमस्टरडॅम येथे एका कट्टर प्रोटेस्टंट ख्रिश्चन कुटुंबामध्ये झाला. विशेषबाब म्हणजे त्याने अॅमस्टरडॅम विद्यापीठातून ’रिलीजिअस स्टडीज’ म्हणजे ’धार्मिक अभ्यास’ या विषयात पदव्युत्तर पावेतोचे शिक्षण घेतलेले आहे व अनेक वर्षे याच विषयात त्याने अध्यापनाचे कामही केलेले आहे. अशा धर्मशास्त्रातील तज्ञ डच लोकप्रतिनिधीचा इस्लाम स्विकार करण्याच्या निर्णयाने अनेकांच्या विचारांना हादरा दिलेला आहे.
अवघा युरोप आपल्या आस्थेविषयी साशंक झालेला आहे. फ्रिडम पार्टीचा आधारस्तंभ असलेल्याव्हॅन्नलेवरेनने 21 मार्च 2014 ला पक्षप्रमुख व पक्षाच्या पक्षपातील नीतिला कंटाळून विभक्त होत स्वतःच्या व्ही.एन.एल. नावाच्या एका नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. मात्र 2017 साली झालेल्या सार्वजनिक निवडणुकांमध्ये पक्षाला आलेल्या अपयशामुळे 23 मार्च 2017 रोजी त्याने पक्ष गुंडाळल्याचे जाहीर केले. राजकारण सोडल्यावर त्याने डच रेडिओवर, ’’डिट इज ए डॉग’’ या शोच्या समालोचकाच्या रूपात काम केले. रेडिओने त्याला या शोमध्ये यासाठी घेतले होते की, तो पुरानमतवादी, उजव्या विचारांचा, प्रोटेस्टंट ख्रिश्चन होता. इस्लाम स्विकारण्यापूर्वी त्याचे विचार त्याच्या या लोकप्रिय घोषणेने वाचकांच्या सहज लक्षात येतील. तो म्हणत असे की, ’’इस्लाम खोटा धर्म आहे आणि कुरआन विष आहे’’ आपल्या याच विचारांना एक तात्विक बैठक मिळवून देण्यासाठी त्याने इस्लाम विरूद्ध एक सविस्तर पुस्तक लिहिण्याची घोषणा केली. त्या पुस्तकाचे नाव त्याने, ’’अपॉस्टेट : फ्रॉम ख्रिश्चॅनिटी टू इस्लाम इन द टाईम ऑफ से्नयुलर टेरर’’ असे ठेवले होते. या पुस्तकासंबंधी संशोधन करण्यासाठी त्याने केंब्रिज विद्यापीठाच्या प्राध्यापक टीमोथी विंटर यांच्याशी संपर्क केला. विंटरची निवड त्याने यासाठी केली की, विंटरने नुकतीच इस्लाम स्विकारल्याची घोषणा करून स्वतःचे नाव अब्दुल हकीम मुराद असल्याचे घोषित केले होते.व्हॅन्नेलेवरेनला आत्मविश्वास होता की आपण विंटरला सुद्धा त्याचा धर्मपरिवर्तनाचा निर्णय कसा चूकला हे दाखवून देऊ शकू.
जेव्हा व्हॅन्नेलेवरनेने प्रा.विंटरला प्रश्न केला की, व्हॉट इज इस्लाम? तेव्हा उत्तरादाखल विंटरने काही पुस्तके पाठवून दिली.व्हॅन्नलेवरेनला तर हेच हवे होते. त्याला वाटले चला स्वतःच्या पुस्तकाच्या संशोधनासाठी आयते स्टडी मटेरियल उपलब्ध झाले. आनंदाने व्हॅन्नलेवरेनने ती पुस्तके वाचण्यास सुरूवात केली. स्वतः धर्मशास्त्रज्ञ असल्याने जस-जसे वाचन पुढे जात होते तस-तसे त्याच्या विचारांना हादरे बसत होते. या वाचनातून त्याला इस्लाम संबंधी सत्य माहिती तर कळालीच उलट त्याच्या मनातील सर्व शंकांची उत्तरे देखील मिळाली. एक परिपूर्ण धर्म कसा असावा? या संबंधीच्या त्याच्या कल्पनेपेक्षाही जास्त परिपूर्ण इस्लाम असल्याचे त्याच्या लक्षात आले व जे-जे वाईट ते-ते इस्लामशी जोडण्याची गरज ग्रिट विल्डर्सला का वाटत होती, याचेही उत्तर त्याला मिळाले. आणि त्याच्या भावविश्वात एक नवीन सूर्योदय झाला.
तरीपण व्हॅन्नलेवरेनने घाई न करता अनेक डच इमामांशी व्यक्तिगत संवाद साधला. त्यांच्याकडून इस्लाम संबंधी अधिक माहिती हस्तगत करून घेतली आणि पूर्ण विचाराअंती त्याने इस्लाम स्विकारल्याची घोषणा केली. नेदरलँडमध्ये मुस्लिमांचा दुःस्वास केला जातो, त्यांना रानटी, हिंसक आणि असंस्कृत समजले जाते, जेथे मुस्लिम महिलांना परदा करण्यास, मस्जिदीवर मिनार बांधण्यास प्रतिबंध आहे, त्या देशात इस्लामचा स्विकार करणे, यासारखे दूसरे धाडस ते कोणते? व्हॅन्नलेवरेनसाठी आस्थेसंबंधी असलेल्या आपल्या प्रस्थापित भूमिकेपासून घुमजाव करून थेट विरोधी भूमिका घेऊन इस्लाम स्विकारणे मोठे जिकीरीचे काम होते. मात्र सत्याचा साक्षात्कार होताच क्षणाचाही विलंब न लावता, लोकांची, लोकप्रियतेची आणि कुटुंबाची कोणाचीही परवा न करता त्याने सरळ इस्लाम स्विकारत असल्याची घोषणा केली. त्यावरून त्याच्या धाडशी स्वभावाचा अंदाज यावा. त्याच्या या निर्णयावर ग्रिटची प्रतिक्रिया अशी की,’’ एका शाकाहऱ्या व्यक्तिने कसाई खाण्यात जॉब स्विकारण्यासारखा हा निर्णय आहे. मला अंदाज नव्हता की माझी फ्रिडम पार्टी इस्लाम स्विकारण्यासाठी सुपिक जमीन ठरेल.’’व्हॅन्नलेवरेनने धर्मपरिवर्तनाचा हा जो निर्णय घेतलेला आहे, त्यामागच्या जोखीमीची त्याला संपूर्ण कल्पना आहे. त्याच्या या निर्णयाची पाठराखण त्याची पत्नी व त्याच्या भावाव्यतिरिक्त कोणीही केलेली नाही. परंतु, व्हॅन्नलेवरेनला कोणाची परवा नाही. अज्ञान काळात आपण जो इस्लामला विरोध केला, इस्लामविरोधी चित्रपट ’फितना’च्या वितरणाचे जे काम केले, कुरआन आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्याबद्दल ज्या अपमानजनक टिपण्या केल्या त्या सर्वांसाठी त्याने तौबा केली असून, मुस्लिम जगताची माफी मागितलेली आहे. एवढी स्पष्ट भूमिका घेण्यासाठी सिंहाचे काळीज लागते.
अल्लाहचे मनसुबे कोणाच्याही लक्षात येवू शकत नाहीत. तो कोणाकडून काय काम घेईल, याचा अंदाज सुद्धा बांधता येत नाही. इस्लामी इतिहासामध्ये एकापेक्षा एक कट्टर इस्लाम विरोधकांनी इस्लाम स्विकारल्याचे दाखले हजरत उमर रजि., हजरत खालीद बिन वलिद रजि. पासून जे सुरू आहेत ते आजतागायत सुरूच आहेत. इस्लाम तलवारीने पसरत नाही...व्हॅन्नलेवरेनच्या धर्मपरिवर्तनाच्या निर्णयातून त्या लोकांना नक्कीच उत्तर मिळालेले असणार ज्यांचा असा समज होता की, इस्लाम हा तलवारीच्या बळावर पसरतो. जागतिक मुस्लिम समुहासाठी ही मनाला दिलासा देणारी घटना आहे. कारण की, कट्टर विरोधकच जेव्हा कट्टर समर्थक बनतो हे दृश्य डोळ्यादेखत पाहण्यासारखा आनंद दूसरा नाही. धन्यवाद! व्हॅन्नलेवरेन आपल्या धाडसी निर्णयाने हा गौरवपूर्ण आनंद जागतिक मुस्लिम समुदायाला मिळवून दिल्याबद्दल शतशः धन्यवाद!
तुमचा हा निर्णय अनेक बुद्धिवंतांना इस्लाम संबंधी आपल्या विचारांचा फेर आढावा घेण्यास भाग पाडेल, याचाही आनंद या क्षणी आम्हा सर्वांना होत आहे. वेलकम टू द प्राऊड अँड ग्लोरियस ग्लोबल फॅमिली ऑफ इस्लाम.

Post a Comment