Halloween Costume ideas 2015

मेरा पैगाम मोहब्बत है, सच है, बस तुम तक पहूंचे

नोटबंदीचे दहशतवादांचे कंबरडे मोडल्याचे ठणकाहून सांगणार्‍यांचे आजही कौतूकच वाटत असेल तर... आणि सातत्याने कोणत्याही घटनेचे धार्मिक, धु्रवीकरणासाठीचा वापर होत असेल तर... तर प्रश्‍न विचारावे लागतील़ अन्यथा निवडणुकीच्या या काळात प्रत्येक गावगल्ली वस्ती खेडी शहर नगरं ही द्वेषाची मजबूत केंद्र होतील़


प्रचंड उद्वीग्न, उदासीने अतिरेकी हल्ल्याचा निषेध करतो आधीच़ केवळ संतापच नव्हे तर काहीही न बोलता, लिहिता दु:खात मुक्तपणे सहभागी होणे हे भारतीय म्हणून माझ्या हाती उरतं़ ट्रायच्या वाढीव केबलबिलाच्या तरतुदीमुळे सामान्यांच्या घरचा टी़व्ही़ बंद पडला़ मला तर बरेच वाटले़ किमान भंपक मालिका, उधाणलेल्या जाहिराती, चौथ्या स्तंभाची टेम्पररी चाटूगिरी आणि व्यक्तीनिष्ठा, अंधश्रद्धा प्रवृत्तींचे उदात्तीकरण, सिनेमांतून कायमची सुट्टी किंवा सुटकाच झाली़ जीओनं इथंही प्रवेश केला़ जसं दूरदर्शन संपलं तस इतर चॅनेल्स कंपन्याही संपतील़ बीएसएनएलची तर बोंबच बोंब़ मोबाईल मीडियातील फालतूगिरीचा विट येऊ लागलाय. अनैतिक गप्पांचे विचारवंतही अड्डे नकोसे वाटताहेत़
    एकंदरीत काय तर वॉटसअ‍ॅपच्या ग्रुप्समधून प्रेमाच्या महतीचा इमोजीस्माईली सुगंध दरवळत असताना़़़ प्रेम़स्वातंत्र्य, नीति यांचा सप्ताह सुरू असताना, मोबाईलला ही आम्ही मोदीमोडवर ठेवला अर्थात एरोप्लेन मोड.
 मग कामगार मित्रांशी गप्पा, आजारी-मरणासन्न नातेवाईकांच्या भेटी, बोर्डाच्या परीक्षेचे अभ्यासू विद्यार्थ्यांशी मार्गदर्शन, गावातील बाजारपेठ या ना त्या कारणे निवांत भटकंतीच धरली़
 जुम्मा उजाडला
    छोट्याशा गल्लीतून सुरमई डोळ्यांनी भावासोबत दुवारी नमाज पढली़ सामुहिकपणे शुचिर्भूत नमाजी मंडळी रस्त्यावर जमून, नेटाने तितक्याच त्वेषाने पुलवामधील भ्याड हल्ल्याचा निषेध करू लागले़  माझ्या गल्लीतल्या मुलांनी भलामोठा पाकिस्तान मुर्दाबादचा बोर्ड लावला़ प्रत्येक चौकात निषेध उरकून जवानांच्या शहिदांच्या दु:खात कमी तिथून बाजूला झालो़ या घडीला प्रचंड असंतोष मनात भडकतोय आक्रोशाची नुसती कल्पनाही करवत नाही़ पण मित्राहारी मीडिया बातम्या पाहिल्या फोन वायफाय सुरू केला़ श्रद्धांजलीच्या असंख्य भावपूर्ण मेसेजिस मधून डोळ्यातला टिपूस थेंब सावरला़ रात्र झाली तशी बातम्यांचे अँकर युद्धासाठीचा ज्वर भरताना दिसले पाहिलेे़ सोशल मीडियातून पुन्हा भावनिक ओळीसकट युद्धतज्ञ बसण्याचा दावा सामान्याकडून होऊ लागला़ या दु:खद घटनेचं राजकारण करून मीडियाबाईट देणारे सगळेच क्रूर वाटताना़़़ या सगळ्यांतून एक अदृश्य धागा ठळक गडद करण्याचा प्रयत्नही करणारी शक्ती डोकं वर काढून होती़ अशा कठीण काळातही अविवेकी, धर्मांध भावनिक आवाहनांतून पुन्हा दोन समूह सेपरेशनचा डाव पक्का मांडला गेला़
     नजीब-रोहीत-आसिफा-अगदी सच्चर कमिशन किंवा जगण्याच्या प्रश्‍नावर एकत्र न येणार्‍या सगळ्याच मुस्लिम समुहाने पुढाकार घेऊन निषेध रॅली मोर्चा केला. त्या भावनेचा सम्मान आणि आदरच़़ पण यातला अंतर्गत भितीचा किंवा उगाच ‘गिल्ट’ वगैरे ‘फिल’ करण्याचा शेखचिल्ली मानस मात्र त्रासदायक. विवेकी नागरिकत्वाचा जागर असंतुलीत होणारा हा संशयकल्लोळ. सत्ताधिशांनी प्रचाराच्या सभा न थांबवता आपला हेकेखोरपणा आधीच सिद्ध केलाय. भक्तांनी या घटनेचा हिंदू-मुस्लिम असा वाद तेवत ठेवण्यात विद्वेषी तेल ओतलेलेच आहे़ बावळट सहिष्णूधारी देशभक्ती सिद्धतेसाठी आघाडीवर आहेत़ सामान्य खूळी जनता युद्धाची विचार पसरवत आहे़ मीडियाचा टीआरपी वाढतोय कवींचा वीररस भरून ओसंडतोय. विश्‍लेषणाचे वैचारिक वाद वाढताहेत़ शहीद सैनिकांचा मातम सुरूय. कुठे दहन सुरूय, कुठे दफन सुरूय. सैनिकांच्या आई-बहिणीस विधवेला, सांत्वनाचा एक शब्द नाही देऊ शकत आपण़़
     सैन्य पोटावर चालत़ कर्ता पुरूष मुलगा-बाप नवरा गेला की संपलच संगऴ  अर्धसैनिकबल म्हणून पूर्णबलाची मान्यता कधी मिळणार किंवा वन रँक पेन्शनच काय झालं? असलं काही आपण नाहीच विचारणार. मनोजातीवारीचा रंगारंग कार्यक्रम पहाणार प्रचाराचे मनुवादी दौरे पाहणारं
    आम्ही 40 के बदले 400 वाटणारं फेसबुकवर स्वत: जेम्स बॉन्ड म्हणून प्रोजेक्शन करणार्‍यांचे सुपूत्र पाकिस्तानी बिझनेसमनचे पार्टनर असतील तर सुरक्षा़ राष्ट्रनिती, युद्धनिती, कुटनिती आणि आंतरराष्ट्रीय बाता टिव्हीवर झळकत असतील तर. सर्व विरोधी पक्षांची निषेध बैठक असताना सत्ताधिश असंवेदशनशील होऊन प्रचार दौर्‍यात रममाण असतील तर... नोटबंदीचे दहशतवादांचे कंबरडे मोडल्याचे ठणकाहून सांगणार्‍यांचे आजही कौतूकच वाटत असेल तर... आणि सातत्याने कोणत्याही घटनेचे धार्मिक, धु्रवीकरणासाठीचा वापर होत असेल तर... तर प्रश्‍न विचारावे लागतील़ अन्यथा निवडणुकीच्या या काळात प्रत्येक गावगल्ली वस्ती खेडी शहर नगरं ही द्वेषाची मजबूत केंद्र होतील़
 युद्ध होईल, होऊ दे़  पण असल्या युद्धात इथला सामान्य भारतीय मुस्लिम हा शहीद झालेल्या नासिर अहमदच असेल़ सध्याच युद्ध हे भांडवलशाही विरूद्ध बेरोजगारीचं आहे़ धार्मिक कट्टरतावाद्यांच्या विरोधात मानवतेचं आहे़ भारतीयांचे युद्ध इथल्या वित्तीय हुकूमशहांच्या विरोधात आहे़ यात माझे उपरेपण मला मान्य नाही़
 उनका जो फर्ज है वो नफरत की सियासत करें
 मेरा पैगाम मोहब्बत है, सच है, बस तुम तक पहूंचे़

- साहिल शेख
कुरूंदवाड
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget