Halloween Costume ideas 2015

खरा इतिहास लोकांसमोर आणावा

सोलापूर (शोधन सेवा) - 1857 च्या उठावामध्ये मुस्लिम केंद्रस्थानी होते. हे लक्षात आल्यावर इंग्रजांनी मुस्लिमांचा अनेकप्रकारे छळ केला. फोडा आणि राज्य करा या नितीला अनुसरून बहुसंख्य हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचे सर्वस्वी प्रयत्न केले. त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणजे इंग्रजांनी भारतीय मुस्लिमांचा विकृत करून लिहिलेला इतिहास होय. त्याचीच री जमातवादी इतिहासकारांनी ओढलेली आहे. इतिहास खोटा का लिहिला जातो याच्या कारणांवर लक्ष देऊन ती कारणे वर्तमान काळात परत उपलब्ध करून दिली जाणार नाहीत, याकडे मुस्लिम समाजाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन एम.आय. शेख यांनी येथे केले.
    सोलापूरच्या समाजकल्याण केंद्राच्या सभागृहात ऍड. गाजीयोद्दीन रिसर्च सेंटरतर्फे आयोजित सरफराज शेख लिखित व पुणे येथील डायमंड पब्लिकेशनद्वारा प्रकाशित ’सल्तनत-ए-खुदादाद’ या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
    मंचावर मुक्त पत्रकार कलीम अजीम, शोधनचे उपासंपादक बशीर, मराठी साहित्यिक डॉ. फारूख तांबोळी, लखेक सरफराज शेख, समीर शेख, हमीद शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कलीम अजीम म्हणाले, नव इतिहास लेखकांनी समोर येवून खरा इतिहास लिहिण्याचे कार्य करावे. आज काही तथाकथित लोकांनी खोटा इतिहास लिहून समाजाची मने गढूळ करण्यात यश मिळविले आहे. मात्र खरा इतिहास समोर येत असल्याने ते आगपाखड करत आहेत. त्यामुळे खरा आणि खोटा याची तुलना करण्यात आणि इतिहास समजण्यात अडचण होणार नसल्याचे कलीम अजीम म्हणाले. डॉ. फारूख तांबोळी म्हणाले, इतिहासाचे विकृतीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. टिपु सुलतान समजायचे असेल तर सल्तनत-ए-खुदादाद पुस्तक वाचायलाच हवे. वडिलांची भूमिका काय असते हे जर कोणाला बघायचे असेल तर त्यांनी या पुस्तकातील हैदरअली यांना काळजीपूर्वक वाचावे.     शोधनचे उपसंपादक बशीर शेख म्हणाले, कठिण परिस्थितीत सरफराज शेख यांनी सल्तनत-ए-खुदादाद लिहून लोकांसमोर सत्य इतिहास आणला. त्यांचे कार्य वाखाण्याजोगे आहे. सल्तनत-ए-खुदादाद वाचल्यावर लक्षात येते की, टिपू सुलतान किती नितीमान राजा होते. ते अल्लाह आणि प्रेषित सल्ल. यांना फक्त मानतच नव्हते या पुस्तकातील मथळ्याखाली दिलेले एंट्रो जरी कोणी ओघात वाचले तरी वाचकाला टिपू सुलतानांची महती कळून येईल.     प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष तथा गाजीयोद्दीन रिसर्च सेंटरचे उपाध्यक्ष राम गायकवाड यांनी केले. सुत्रसंचालन संघर्ष खंडागळे यांनी केले. आभार इस्माईल शेख यांनी मानले. यावेळी ऍड. महेबूब कोथिंबिरे, समिउल्लाह शेख, शफिक काझीसह मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget