Halloween Costume ideas 2015

आलिइमरान : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(३१) हे पैगंबर (स.)! लोकांना सांगून टाका, ‘‘जर तुम्ही खरोखर अल्लाहवर प्रेम करीत असाल, तर माझे अनुकरण करा, अल्लाह  तुमच्यावर प्रेम करील आणि तुमच्या अपराधांना क्षमा करील. तो अत्यंत क्षमाशील व परम कृपाळू आहे.’’
(३२) त्यांना सांगा, ‘‘अल्लाह व पैगंबराचे आज्ञाधारक बना.’’ मग जर त्यांनी तुमचे आवाहन स्वीकारले नाही तर अल्लाह त्याची व  त्याच्या पैगंबराची. अवज्ञा करणाऱ्यांवर प्रेम करत नाही.’’२८
(३३) अल्लाहने२९ आदम (अ.) आणि नूह (अ.) आणि इब्राहीम (अ.) ची संतान व इमरानची३० संतान यांना सर्व दुनियेवर प्राधान्य  देऊन (आपल्या पैगंबरपदाकरिता) निवडले होते.
(३४) हे एका परंपरेचे लोक होते जे एक दुसऱ्याच्या वंशापासून जन्मले होते. अल्लाह सर्वकाही ऐकतो व जाणतो.३१


२८) येथे पहिले व्याख्यान समाप्त् होत आहे. यातील मजकुरावर प्रामुख्याने बदरच्या युद्धासंबंधीच्या वर्णनावर चिंतन केल्यास जाणवते की याचा अवतरणकाळ बदरच्या युद्धानंतर आणि उहुदच्या युद्धापूर्वीचा आहे. अर्थात हि. स. ३. मुहम्मद बिन इसहाकच्या  मतानुसार लोकांना हा भ्रम झाला की या अध्यायाच्या सुरुवातीच्या ८० आयती नजरानचे प्रतिनिधीमंडळ आगमनकाळात (हि. स. ०९)  अवतरित झाल्या होत्या. परंतु एक तर हा मजकूर स्पष्ट करीत आहे की हे अगदी अगोदरचे अवतरण आहे. दुसरे मुकातिल बिन  सुलैमानचे कथन आहे की नजरानचे प्रतिनिधीमंडळ आगमना वेळी केवळ त्या आयती अवतरित झाल्या ज्यांचा संबंध आदरणीय  पैगंबर याहया आणि इसा (अ.) यांच्या वर्णनाशी आहे. त्यांची संख्या तीस किंवा त्यापेक्षा काही जास्त आहे.
२९) येथून दुसरे व्याख्यान सुरु होते. याचा अवतरणकाळ हि. स. ०९ आहे जेव्हा नजरान येथील खिस्ती संघ लोकशाहीचे  प्रतिनिधीमंडळ पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या सेवेत उपस्थित झाले होते. नजरान अरब आणि यमनच्या मध्ये आहे. त्या वेळी त्या  क्षेत्रात ७३ वस्त्या होत्या आणि १ लाख वीस हजार लढवय्ये त्यांच्याकडे होते. लोकसंख्या पूर्णत: खिश्चन होती आणि तीन नेत्यांच्या अधिकाराखाली होती. एकाला `आक़िब' संबोधले जात असे जो त्या राष्ट्राचा प्रमुख होता. दुसऱ्याला `सय्यद' संबोधले जाई.  त्याच्याकडे सांस्कृतिक आणि राजनैतिक व्यवस्थेची जबाबदारी होती. तिसरा उस्कुफ (बिशप) होता ज्याच्याकडे धार्मिक मार्गदर्शन  होते. जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मक्केवर विजय प्राप्त् केला आणि सर्व अरबवासीयांची खात्री झाली की देशाचे भवितव्य आता  अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या हातात आहे तेव्हा अरबस्थानाच्या विभिन्न भागांतून प्रतिनिधीमंडळ पैगंबराकडे येऊ लागले.  याच संदर्भात नजरानचे तिन्ही सरदारसुध्दा साठ लोकांचे प्रतिनिधीमंडळ घेऊन मदीना येथे आले. लढाईसाठी ते कोणत्याही स्थितीत  तयार नव्हते. आता प्रश्न केवळ हाच उरला होता की ते इस्लामचा स्वीकार करतात की जिम्मी बनून राहू इच्छितात. या प्रसंगी  अल्लाहने पैगंबर मुहम्मद (स.) वर हे व्याख्यान अवतरित केले ज्याद्वारे नजरानच्या प्रतिनिधीमडंळाला इस्लामकडे निमंत्रित केले  जावे.
३०) इमरान आदरणीय पैगंबर मूसा आणि हारून (अ.) यांचे पिता होते. बायबल (निर्ग, ६:२०) मध्ये `अम्रान' असा उल्लेख आला  आहे.
३१) खिश्चन लोकांच्या मार्गभ्रष्टतेचे मुख्य कारण ते पैगंबर इसा (अ.) यांना अल्लाहचा दास आणि पैगंबर न मानता अल्लाहाचा पुत्र  आणि ईशत्वात भागीदार ठरवतात. जर त्यांची ही मूलभूत चूक नष्ट झाली तर सत्य आणि विशुद्ध इस्लामकडे त्यांचे पलटून येणे  सहज सुलभ होईल. म्हणूनच या व्याख्यानाची सुरुवातच अशी करण्यात आली की आदम, नूह, इब्राहीम (अ.)ची संतती आणि इमरान  (अ.)च्या संततीतील सर्व पैगंबर मनुष्य होते.एकापासून दुसरा जन्म घेत राहिला.यांच्यापैकी कोणीही अल्लाह (खुदा)नव्हता.त्या सर्वांची  विशेषता मात्र ही होती की अल्लाहने आपल्या धर्माच्या प्रचारार्थ आणि विश्वकल्याणासाठी त्यांना निवडले होते.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget