Halloween Costume ideas 2015

हामिद अन्सारी, जिन्नांची फोटो आणि एएमयूमधील धिंगाणा

    अगदी अलिकडेच भारताचे पूर्व उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांना अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाने आजीवन सदस्यता प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यासाठी विद्यापीठात निमंत्रित केले होते. तसे पाहता जेव्हा हमीद अन्सारी विद्यापीठाच्या परिसरात पोहोचले, त्यावेळेस त्यांच्यासोबत पुरेशी सुरक्षा पुरविण्यात आलेली होती. परंतु, हिंदू वाहिनी आणि व्हीएचपीच्या काही कार्यकर्त्यांनी ते ज्या इमारतीत थांबले होते त्याच्या अगदी जवळ जावून हथियार बंद हिंसक प्रदर्शन केले. त्यांची मागणी होती की, विद्यार्थी संघाने हामिद अन्सारी यांना खुश करण्यासाठी बॅ. जिन्ना यांचा फोटो विद्यापीठात लावलेला आहे, तो काढण्यात यावा. त्यांच्या या प्रदर्शनानंतर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. मात्र नंतर त्यांना सोडून देण्यात आले. त्यानंतर हिंदू युवा वाहिनी, जिचे संस्थापक मुख्यमंत्री स्वतः आहेत त्यांची वेगवेगळी विधाने पुढे आली. ज्यात म्हटले गेले आहे की, विद्यापीठातून तो फोटो हटविला जाईल. भाजपचे एक नेते सुब्रहमण्यम स्वामींनी प्रश्न उपस्थित केला की, एएमयुला कोण धडा शिकवू शकेल? या घटनेमुळे एएमयूचे विद्यार्थी, हिंदू वाहिनी आणि व्हीएचपी यांच्याद्वारे आंदोलन सुरू होते.
    या घटनेचे अनेक पैलू आहेत. पहिला हा की, हिंदू वाहिनी आणि व्हीएचपीचे सशस्त्र कार्यकर्ते त्या इमारतीपर्यंत कसे पोहोचले? जिथे हामिद अन्सारी थांबलेले होते. उल्लेखनिय बाब अशी की, श्री अन्सारी हे एक प्रतिष्ठित, विद्वान आणि राजनयीकच नव्हे तर अनेक उच्च पदांवर आसीन राहिलेले गृहस्थ आहेत. त्यांना सुद्धा अपमानित करण्याची संधी कधीच सोडण्यात आलेली नाही. 26 जानेवारीच्या परेडमध्ये सलामी न देतानाचा त्यांचा फोटो व्हायरल करून असे दर्शविण्यात आले जसे की, त्यांनी गणतंत्र दिवसाचा अपमान केला. मात्र नंतर लक्षात आले की, त्यांनी सलामी न देवून पूर्णपणे कायद्याचेच पालन केले आहे. कारण 26 जानेवारीच्या परेडची सलामी घेण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना असतो बाकीच्यांना नाही. उपराष्ट्रपती पदावरून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर निरोप समारंभामध्ये अत्यंत अपमानजनक पद्धतीने मोदींनी त्यांच्या विषयी सांगितले होते की, मुस्लिमांशी संबंधित मुद्दयांवर ते  जास्त ध्यान देत होते. अलिगढ विद्यापीठातील ताजी घटना ही संघ परिवाराद्वारे अन्सारींना लक्ष्य करण्याच्या अभियानातील एक कडी आहे.
    अशा परिस्थितीत प्रश्न हा उपस्थित होतो की, जिन्नांच्या फोटोचा विरोध करणार्यांना हत्यार घेऊन एएमयू परिसरात घुसण्याला कसे काय न्यायसंगत ठरविता येईल?  जिन्नांचा फोटो काय काल लावला गेला होता का? हा फोटो 1938 पासून तेथे आहे. जेव्हा एएमयू विद्यार्थी संघाने जिन्नांना विद्यार्थी संघाचे आजीवन सदस्यत्व प्रदान करून त्यांना सन्मानित केले होते. आता असे म्हटले जात आहे की, जिन्ना फाळणीसाठी जबाबदार होते. म्हणून ते सन्मान करण्यास लायक नाहीत. मात्र जिन्ना हे सुरूवातीला स्वतंत्रता संग्रामामध्ये सामील होते. त्यांना त्या समितीचा अध्यक्ष बनविले गेले होते. जी समिती गांधीजी दक्षीण आफ्रिकेहून परत आल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यासाठी तयार केली गेली होती. जिन्नांनी लोकमान्य बाळ बाळगंगाधर टिळकांना आपल्या प्रतिभेने त्यांच्याविरूद्धचा खटला जिंकून त्यांना फाशीला जाण्यापासून वाचविले होते. एवढेच नव्हे तर जिन्नांनी भगतसिंग यांच्यातर्फेही वकीली केली होती. एवढेच नव्हे तर टिळकांबरोबर ते हिंदू-मुस्लिम एकता गठबंधन (लखनौ 1916) मध्येही सामिल होते. सरोजिनी नायडूंनी तर त्यांना हिंदू-मुस्लिम एकतेचे संदेशवाहक म्हणून संबोधिले होते. 1920 मध्ये ते स्वतंत्रता आंदोलनामधून यासाठी वेगळे झाले की, गांधीजींनी असहयोग आंदोलनाची सुरूवात केली होती. जिन्ना एक संविधानवादी होते. त्यांचे मत होते की, सामान्य माणसांना इंग्रजांच्या विरूद्ध या आंदोलनात जोडून संघर्ष करायला लावणे अनुचित होते. त्याचप्रमाणे त्यांनी खिलाफत आंदोलनाबद्दलही गांधींच्या भूमिकेचा विरोध केला होता. या विरोधातूनच हळूहळू ते काँग्रेसपासून दूर होत गेले. शेवटी ते वकीली करण्यासाठी लंडनला परत गेले.
    जिन्ना मूळतः धर्मनिरपेक्ष होते. तरी त्यांनी मुस्लिम लिगचे नेतृत्व सांभाळले आणि इंग्रजांकडून लिगला मुस्लिमांचे प्रतिनिधी असल्याचा दर्जा मिळवून दिला. ब्रिटिशांनी विचारपूर्वक नवाब आणि जमीनदारांना प्रेरित करून मुस्लिम लीग तयार करून घेतली होती. त्यात सामंतीमूल्य भरलेले होते. मुस्लिम लीगचे नेतृत्व स्वीकारून तसेच लाहौर ठरावामध्ये मुस्लिमांसाठी वेगळ्या राष्ट्राच्या प्रस्तावाचे समर्थन करून त्यांनी स्वतःची छवी एक सांप्रदायिक नेत्याची करून घेतली. परंतु, फक्त त्यांनाच देशाच्या फाळणीला जबाबदार ठरविणे म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासाची मोडमोड करण्यासारखे आहे. फाळणीचा पाया इंग्रजांनी फोडा आणि राज्य कराच्या नितीच्या माध्यमाने रचला होता. फाळणीस हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समुदायातील सांप्रदायिक तत्व सुद्धा जबाबदार होते. सावरकर पहिले व्यक्ती होते ज्यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडला होता. आणि म्हटलं होतं की, भारत हिंदू राष्ट्र आहे. या एका राष्ट्रात हिंदू आणि मुस्लिम दोन राष्ट्रे आहेत. त्यासाठी मुस्लिमांना रहायचे असेल तर हिंदूंच्या आधीन रहावे लागेल. यानंतरच जिन्ना हे मुस्लिम सांप्रदायिकांच्या जाळ्यात अडकले. मग त्यांनीही तर्क दिला की, जेव्हा हिंदू आणि मुस्लिम दोन वेगळे राष्ट्र आहेत तर मग पाकिस्तान का बनू शकत नाही?
    जिन्नांचे अनेक जीवन चरित्र लिहिले गेलेले आहेत. त्यांच्या कार्याची वेगवेगळ्या प्रकारची व्याख्या आणि विवेचने केली गेलेली आहेत. पाकिस्तानच्या संविधान सभेमध्ये 11 ऑगस्ट 1947 रोजी भाषण देतांना त्यांनी म्हटलेले होते की, पाकिस्तानमध्ये प्रत्येक जण आपआपल्या धर्माचे पालन करण्यासाठी स्वतंत्र राहिल. शासन त्यात दखल देणार नाही. ही गोष्ट त्यांच्या धर्मनिरपेक्षतेविषयी असणार्या प्रतिबद्धतेची निदर्शक आहे. आडवाणींनाही आपल्या जीवनाच्या उत्तर काळामध्ये बाबरी मस्जिद विध्वंस केल्यानंतर धर्मनिरपेक्षतेवर सर्वात मोठा वार केल्यानंतर ही संवेदना झाली की, जिन्ना धर्मनिरपेक्ष होते. जिन्नांना धर्मनिरपेक्ष म्हणण्याचे मूल्य त्यांना आपली राजकीय वाटचाल समाप्त करून चुकवावी लागली आणि संघ परिवाराने जिन्नांशी घृणा करा, असे अभियान चालू करून जिन्नांना भारतीय मुस्लिम आणि पाकिस्तानचे प्रतिक बनवून टाकले.
    एमयूच्या घटना क्रमामध्ये हिंदू राष्ट्रवाद्यांनी एका बानातून अनेक लक्ष्य साध्य केले. एक हमीद अन्सारी ज्यांना ते धर्मनिरपेक्ष मानत नाहीत ला बदनाम करणे, दोन - या मुद्याला अन्य भावनात्मक मुद्यांप्रमाणे उचलून राजकारणासाठी त्याचा उपयोग करणे, तीन-. एएमयू परिसरामध्ये हैद्राबाद विश्वविद्यालय आणि जेएनयू विद्यापीठासारखे भयाचे वातावरण उत्पन्न करणे. जिन्नांबद्दल हे मान्य करायला हवे की, ते सांप्रदायिक शरिरामध्ये धर्मनिरपेक्ष आत्मा असलेले व्यक्ती होते.आपल्या देशात ते विवादित राहतील आणि संघ परिवार एकानंतर एक विभाजित करणारे मुद्दे उचलत राहील.
    (इंग्रजीतून हिंदू भाषांतर अमरीश हरदेनिया व हिंदीतून मराठीत एम.आय.शेख, बशीर शेख यांनी भाषांतर केले.)

- राम पुनियानी

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget