Halloween Costume ideas 2015

अल्बकरा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(२४८) याचबरोबर त्यांच्या नबीने असेही सांगितले , ‘‘अल्लाहकडून तो बादशाह म्हणून नियुक्त होण्याचे लक्षण हे आहे की त्याच्या कारकिर्दीत ती पेटी तुम्हाला परत मिळेल ज्यामध्ये तुमच्या पालनकत्र्याकडून तुमच्यासाठी मन:शांतीची सामग्री आहे, ज्यामध्ये मूसाचे वंशज व हारूनच्या वंशजानी सोडलेले पवित्र अवशेष आहेत आणि ज्याला आता दूतांनी उचलले आहे,२६९ जर तुम्ही ईमानधारक असाल तर तुमच्यासाठी ही मोठी खूण आहे.’’
(२४९) नंतर जेव्हा तालूत लष्कर घेऊन निघाला तेव्हा त्याने सांगितले, ‘‘एका नदीवर अल्लाहकडून तुमची परीक्षा घेतली जाणार आहे. जो तिचे पाणी पिईल तो माझा सोबती नव्हे. माझा सोबती तर केवळ तोच आहे जो आपली तहान त्याने भागविणार नाही. परंतु जर एखादा, एखादी ओंजळभर प्याला तर हरकत नाही.’’ मन:शांतीची सामग्री आहे, ज्यामध्ये मूसाचे वंशज व हारूनच्या वंशजानी सोडलेले पवित्र अवशेष आहेत आणि ज्याला आता दूतांनी उचलले आहे,२७० जर तुम्ही ईमानधारक असाल तर तुमच्यासाठी ही मोठी खूण आहे.’’

२६९) बायबलमध्ये याचे नाव "साऊल' ठेवले गेले आहे. हा कबीला बिन्यामीन (बिनयमीन) तीस वर्षाचा एक नवजवान युवक होता. बनीइस्राईलीमध्ये याच्यापेक्षा सुंदर दुसरा कोणी नव्‌हता. इतका उँच धिप्पाड होता की लोक त्याच्या खांद्यापर्यंतच येत असत. (अल्लाहच्या सांगण्यावरून) सॅम्युलन नबीने त्याला आपल्या घरी आणले आणि तेलाची कप्‌पी त्याच्या डोक्यावर खाली केली आणि त्याचे चुंबन घेऊन सांगितले, ""खुदावंदने तुला स्पर्श केला की तू त्याच्या वारसांचा नेता बनावा.'' या नंतर त्यांनी बनीइस्राईलींची आम सभा घेऊन त्याच्या बादशाहीची घोषणा केली. (1 सॅम्युल अध्याय 9 व 10 वा) हा बनीइस्राईलींमध्ये दुसरा व्‌यक्ती होता ज्‌याला खुदाच्या आदेशाने मसह (स्पर्श) करून पेशवाईच्या पदावर नियुक्त केले गेले होते. यापूर्व आदरणीय हारून (अ) मुख्‌य पुरोहित (Chief Priest) च्या पदावर नियुक्त केले गेले होते. यानंतर तिसरे मसीह (स्पर्श) केलेले म्हणजे मसीह आदरणीय दाऊद (अ.) होते आणि चौथे मसीह आदरणीय पैगंबर इसा (अ.) होते. परंतु तालुतविषयी असा काही उल्लेख कुरआन आणि हदीसमध्ये आलेला नाही की ते पैगंबरपदावर नियुक्त झाले होते. केवळ बादशाहीसाठी नियुक्त होणे म्हणजे पैगंबरपदावर नियुक्त होणे नाही.
२७०) बायबलचे याविषयीचे विवरण कुरआनपासून भिन्न आहे. तरी पण त्यामुळे मूळ घटनेच्या विवरणांवर भरपूर प्रकाश पडतो. यावरून माहीत होते की ही पेटी ज्‌यास बनीइस्राईल ""अहदका संदुक'' म्हणत असत, त्यास एका युद्धात पॅलेस्टाईन अनेकेश्वरवाद्यांकडून बनीइस्राईलींनी हिसकावून घेतली होती. परंतु अनेकेश्वरवाद्यांच्या ज्‌या शहरात त्याला ठेवण्यात आले होते तिथे महामारी फैलावली होती. म्हणून त्यांनी भीतीपोटी बैलगाडीत पेटीला ठेवून गाडीला हाकून दिले होते. याच मामल्याकडे शःयतो कुरआन या शब्‌दांत स्पर्श करतो की त्या वेळी ती संदुक (पेटी) ईशदूतांच्या रक्षणात सुरक्षित होती. कारण ती गाडी विनागाडीवानाची हाकून दिली होती. अल्लाहच्या आदेशाने ईशदूतांनी ती गाडी बनीइस्राईलकडे हाकत नेली. असे म्हणणे, ""या पेटीत तुमच्यासाठी मन:शांतीचे साधन आहे.'' हे बायबलच्या वर्णनाने जाणवते. बनीइस्राईल याला फार पवित्र आणि आपणासाठी विजय आणि मदतीचे चिन्ह समजत होते. जेव्‌हा ते चिन्ह त्यांच्या हातून निघून गेले तेव्‌हा सर्वांची हिंमत कमी झाली होती आणि प्रत्येक इस्राईली विचार करू लागला की अल्लाहची कृपा आमच्यावरून हटली आहे आणि आता आमचे वाईट दिवस आले आहे. तेव्‌हा या संदुकाचे (पेटी) परत येणे त्यांच्यासाठी तर शक्तीचे कारण बनले. हे एक असे साधन होते ज्‌यामुळे त्यांची गेलेली हिंमत पुन्हा परत आली. ""मूसा आणि हारूनच्या लोकांनी सोडलेली समृद्धशाली (तब्‌बरुकात) वस्तू जी या संदुक (पेटी) मध्ये ठेवली होती. त्या म्हणजे पाषाणशीळा होत ज्‌याना सीमा डोंगरावर अल्लाहने आदरणीय पैगंबर मूसा (अ.) यांना दिले होते; तसेच तौरातची ती मूळ प्रतसुद्धा त्या पेटीत होती ज्‌यास आदरणीय पैगंबर मूसा (अ.) यांनी स्वत: लिहुन बनीलावीच्या हवाली केले होते. बरोबर एक बाटलीत "मन्न' भरून त्या पेटीत ठेवण्यात आले होते. जेणेकरून पुढील पिढ्यांनी अल्लाहच्या उपकाराला जाणावे जे वाळवंटात त्याने त्यांच्या बापजाद्यांवर केले होते. आदरणीय पैगंबर मूसा (अ.) यांची ती लाठीसुद्धा त्याच्यात ठेवली असेल जी अल्लाहच्या महान चमत्काराचे प्रतीक होती.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget