(२५३) ... मग कोणी श्रद्धा ठेवली व कोणी द्रोहाचा मार्ग अवलंबिला. होय, अल्लाहने इच्छिले असते तर ते कदापि लढले नसते परंतु अल्लाह जे इच्छितो ते करतो.२७५
(२५४) हे ईमानधारकांनो! जी काही धन-दौलत आम्ही तुम्हाला बहाल केली आहे त्यातून खर्च करा २७६ यापूर्वी की तो दिवस येईल ज्यामध्ये खरेदी-विक्री होणार नाही, मित्रताही उपयोगी पडणार नाही आणि शिफारसदेखील चालणार नाही. आणि खरे अत्याचारी तेच आहेत जे द्रोहाचा मार्ग अवलंबितात.२७७
(२५५) अल्लाह, तो चिरंतनजीवी जिवंत सत्ता आहे ज्याने तमाम सृष्टीचा भार सांभाळलेला आहे, त्याच्याशिवाय इतर कोणीही ईश्वर नाही,२७८ तो झोपतही नाही आणि त्याला झोपेची गुंगीही येत नाही,२७९ पृथ्वी आणि आकाशांत जे काही आहे त्याचेच आहे.२८०
275) म्हणजे पैगंबरांद्वारा ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जे मतमतांतर लोकांमध्ये निर्माण झाले आणि या मतभेदामुळे युद्ध होत असत; याचा अर्थ असा नाही की अल्लाह विवश होता आणि त्याच्याकडे या भेदांना आणि युद्धांना रोखण्याची शक्ती नव्हती. नाही! जर अल्लाहने इच्छिले असते तर कोणातही साहस नव्हते की पैगंबरांच्या आवाहनाला विरोध करावा आणि विद्रोहाच्या मार्गांने चालावे आणि अल्लाहच्याच धरतीवर बिघाड निर्माण करावा. परंतु तो हे इच्छितही नव्हता की मनुष्यापासून आचार विचारांचे आणि अधिकाराचे स्वातंत्र्य हिरावून घ्यावे आणि त्यांना एका खास मार्गावर चालण्यास मजबूर करावे. अल्लाहने परीक्षेच्या उद्देशासाठी मनुष्याला धरतीवर निर्माण केले. म्हणून अल्लाहने मनुष्याला श्रद्धा आणि आचरणासाठी निवड स्वातंत्र्य दिले. अल्लाहने पैगंबरांना लोकांवर कोतवाल नेमले नाही की बळजबरीने त्यांनी लोकांना ईमान व आज्ञाधारकतेकडे ओढून आणावे. अल्लाहने त्यांना यासाठी पाठविले की त्यांनी (पैगंबरांनी) पुराव्यानिशी आणि स्पï निशाण्यांसह लोकांना सत्याकडे बोलवावे. म्हणून जितके जास्त मतभेद आणि युद्धे झालीत, ती सर्व यामुळे झाली की, अल्लाहने मनुष्याला श्रद्धा आणि आचार विचाराचे जे स्वातंत्र्य दिले होते त्याचा गैरफायदा मनुष्याने घेतला. लोकांनी वेगवेगळे मार्ग शोधून काढले आणि त्या निरनिराळ्या मार्गावर चालताना लोकांत संघर्ष आणि युद्ध झाले. परंतु अल्लाह लोकांना सत्यमार्गावर चालवू इच्छित होता.
276) म्हणजे अल्लाहच्या मार्गात खर्च करणे आहे. सांगितले जाते की ज्यांनी ईमानचा मार्ग स्वीकारला त्यांना त्या उद्देशप्राप्तीसाठी आर्थिक त्याग सहन करावाच लागेल.
277) येथे विद्रोहाची जी नीती स्वीकारली गेली ते लोक म्हणजे अल्लाहच्या आदेशाचे उल्लंघन करणारे आणि आपल्या संपत्तीला त्याच्या प्रसन्नतेपेक्षा अधिक प्रिय समजणारे आहेत; किंवा ते लोक आहेत जे परलोकवर विश्वास ठेवत नाहीत, ज्याच्या येण्याची त्यांना भीती घालण्यात आली आहे. किंवा ते लोक आहेत जे परलोकात शिफारसीने काम घेणे किंवा परलोकातील मुक्ती खरेदी करण्याच्या धोक्यात पडलेले आहेत.
278) म्हणजे नादान लोकांनी आपल्यासाठी कितीही ईश्वर आणि उपास्य बनविले असतील तरी सत्य हे आहे, की या सृष्टीवर शाश्वत सत्ता विनाभागीदारीची त्याच एकमेव अल्लाहची आहे. अल्लाह कोणाच्या दिलेल्या जीवनाने नव्हे तर स्वयंभू आहे. त्याच्याचमुळे सृष्टीची ही समस्त व्यवस्था सुचारू रूपाने चालत आहे. आपल्या साम्राज्यात प्रभुत्वाच्या सर्व अधिकारांचा स्वामी स्वयं अल्लाह आहे. त्याच्या गुणात दुसरा कोणी भागीदार नाही; तसेच त्याच्या अधिकारांत आणि हक्कांतसुद्धा कोणी दुसरा भागीदार नाही. म्हणून अल्लाहला सोडून जिथे कोठे त्याच्या बरोबरीने भागीदार ठरवून जमीन व आकाशात जिथे कोठे दुसऱ्यांना उपास्य (देव) बनविले जाते; तिथे एक मोठे खोटारडे मनोविश्व रचले जात आहे आणि सत्याविरुद्ध युद्ध छेडले जात आहे.
279) हे त्या लोकांच्या विचारांचे खंडन आहे जे जगाच्या स्वामीच्या सत्तेला आपल्या त्रुटीपूर्ण अस्तित्वांशी अनुमान करतात आणि त्याच्याकडे त्या त्रुटींना जोडले जाते जे मनुष्य स्वभावी आहेत. उदा. बायबलचे वर्णन आहे की खुदाने सहा दिवसांत जमीन व आकाशांना निर्माण केले आणि सातव्या दिवशी आराम केले.
280) म्हणजे ही धरती आणि आकाश आणि त्यातील प्रत्येक वस्तूंचा मालक अल्लाह आहे. त्याच्या मिळकतीत त्याच्या व्यवस्थेत आणि त्याच्या बादशाहीत आणि शासन व्यवस्थेत दुसऱ्या कोणाचीही काहीच भागीदारी नाही. यानंतर सृष्टीमध्ये ज्या दुसऱ्या अस्तित्वाविषयी तुम्ही विचार करता ती तर याच सृष्टीचाच एक भाग आहे. तो अल्लाहच्या आधीन व त्याचा दास आहे. अल्लाहचा तो समकक्ष किंवा भागीदार होऊच शकत नाही.
Post a Comment