Halloween Costume ideas 2015

लूक इन टू आइज् ऑफ मुसलमान - यू विल फाइंड देअर हिंदुस्तान

    इस्लामी वर्ष हिजरी १४४० ची अखेर आता समीप आहे. या वर्षात भारतीय मुस्लिमांना यातनादायक काही घटना घडल्या. त्यापैकी काही महत्त्वाच्या घटना म्हणजे मुस्लिमांस देश आणि संविधान अधिक की धर्म व कुरआन अधिक? हे प्रश्न उपस्थित करणारे आजचे केंद्र व काही राज्यांतील सरकार चालविणारे हिंदुत्ववादी आणि त्यांचे समविचारी होत. मुळात हे प्रश्न अप्रस्तुत आहेत. कारण न्यायालय असो वा सरकार संविधानानुसार चालत असतात. न्यायालयात पक्षकार व साक्षीदार यांजकडून शपथ घेतली जाते आणि ती त्याच्या धर्मग्रंथाची असते. यातून हेच स्पष्ट होते की संविधानाने धर्म व त्याच्या ग्रंथास जसे महत्त्व दिलेले आहे तसेच त्यांच्या ग्रंथाचे श्रेष्ठत्वही मान्य केले आहे आणि संविधानानेच अशा प्रश्नांना वाव ठेवलेला नसल्या कारणाने हे प्रश्न अप्रस्तुत ठरतात हे मान्य व्हावे. म्हणजेच या प्रश्नात लपवून ठेवलेला मुख्य प्रश्न राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम. येथे हे माहीत व्हावे की मुस्लिम मुले प्राथमिक उर्दू शाळेत प्रवेश केल्या केल्याच शाळा सुरू होण्यापूर्वी दुआचे पठण करीत असतात. या दुआचे एक चरण असे-
‘‘हो मेरे दम से यूं ही मेरे वतन की जीनत
जिस तरह फूल से होती है चमन की जीनत।’’
    याखेरीज ‘हिंदुस्तानी बच्चों का कौमी गीत’ हे पूर्णपणे भारताची महती सांगणारे आहे. त्यातील शेवटच्या ओळी-
‘‘बंदे कलीम जिसके परबत जहाँ के सिना
नूहे नबी का आकर ठहरा जहाँ सफीना
रफअत है जिस जमीं की बामे फलक का जिना
जन्नत की जिन्दगी है जिसकी फिजां में जीना।’’
    यातून सुज्ञांना हे कळून येईल की देशप्रेमाचे बाळकडू मुस्लिमांना बालपणीच दिले जाते आणि याच बालकडूचे परिणाम म्हणजे १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात लाखो मुस्लिमांनी आपल्या देशासाठी आपले प्राण बहाल केले आहेत. अशा प्राण अर्पण करणाऱ्यांची नावे क्रिसेंट पब्लिकेशनने प्रसिद्ध केलेले पुस्तक ‘मुस्लिम रोल इन इंडियाज फ्रीडम’ या पुस्तकात नमूद आहेत. पण महासभा आणि मुस्लिम लीग यांची स्थापना व्हावी याकरिता कोठे काय घडले ते त्यांच्या स्थापकांनाच माहीत. तेथूनच म्हणजे १९०६ नंतर हे असे प्रश्न सतत उपस्थित केले गेले आणि आता हिंदुत्ववाद्यांचे सरकार आल्यापासून या प्रश्नावर अधिक जोर देण्याचे प्रयत्न होत आहे.
    हिजरी १४३९ मध्ये तर आता अधिकच धार चढली. ही धार चढवणाऱ्यांची तऱ्हा ही की आम्हीच खरे देशप्रेमी अन्य देशद्रोही अशीच त्यांची धारणा असते आणि म्हणून या स्वत:ला राष्ट्रप्रेमी म्हणवून घेणाऱ्यांचा तथाकथित राष्ट्रवाद व त्यांचे तथाकथित राष्ट्रप्रेम तपासणे गरजेचे ठरते. यांना जेव्हा विचारले जाते की काही काळापूर्वी गरज भासली म्हणून गांधी टोपी परिधान केलीत. कार्यभाग होत नाही म्हणून तिला सोडचिठ्ठी दिलीत आणि आता गांधीजींचे नाव घेता आणि त्याच्याच राज्यात त्यांना अपमानितही करता हे कोणते, कसले आणि कसे काय राष्ट्रप्रेम!
    सुप्रीम कोर्ट जेव्हा केंद्र सरकारला फटकारते की सत्तेचा गैरवापर होत आहे, ते सरकारच्या असंवैधानिक वागण्यामुळेच. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री न्यायाधीशांवर पक्षपातीपणाचा आरोप करतात तो त्यांना योग्य वाटतो म्हणून. हे मान्य केले तर शाहबानो खटल्याचा निकाल मुस्लिमांनी अमान्य करणे त्यास अमान्य का? आणि यातूनच मग प्रश्न उपस्थित होतो तो हा की समानता हा आपल्या संविधानाचा गाभा आहे, तर मग समान नागरी कायद्यासाठी आग्रही हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांना एकास एक न्याय आणि दुसऱ्यास दुसरा या विचारसरणीस अनुसरून समान नागरी कायदा हवा की काय? आणि तसा हवा असेल तर मग जो न्याय मला तो न्याय दुसऱ्याला या शास्त्री यांच्या न्यायी बाण्याचे काय?
    टीव्हीवरील एका कार्यक्रमात डॉ. अनामिक यांनी घातलेली मंत्र्यांना ही हाक की ‘मंत्र्यांनी आपापल्या मुलानां लढावयास पाठवावे म्हणजे शहिदांच्या कुटुंबीयांस दहा लाख रुपये दिले आहेत अधिक काय हवे?’ या त्यांच्या म्हणण्यातील फोलपणा पोकळ राष्ट्रप्रेमाचा टेंभा मिरविणाऱ्यांना कळून येईल आणि आपण मुस्लिमांना केलेले प्रश्न कसे अयोग्य व निरर्थक आहेत हेही लक्षात येईल.
    मुस्लिम लोक वंदेमातरतम्चा विरोध का करतात? तर मुस्लिमांना इस्लाम खऱ्या अर्थाने कळतो आणि ते आपल्या धर्मशी आणि स्वत:शी ई्मान राखणारे अल्लाहशिवाय कोठेही नतमस्तक होत नाहीत. अल्लाहनंतर त्यांना प्राणप्रिय असलेल्या आपल्या मातेच्या विंâवा वडिलांच्या चरणापुढे नतमस्तक होत नाहीत. कारण त्यांचे ईमान त्यांना खुणावत असते की असे करणे पाप आहे. त्यांची ही आस्था आहे. आस्थेचे महत्त्व जाणणारांनी त्यांची ही भावना जाणणे गैर तर नाही? राहिला प्रश्न तीन तलाकचा. यात तर केंद्र सरकार स्वत:हून तोंडघशी पडले. कारण तीन तलाकच्या आडून आणि न्यायालयाच्या माध्यमातून इस्लामी शरियतमधील विवाह व तलाकपद्धतीलाच रद्द करण्याचा डाव फसला. थोडक्यात केले तुका झाले माका अशातलाच हा प्रकार. ते काही असो, हिजरी सन १४३९ मध्ये अ‍ेक यातना सोसाव्या लागलेल्या भारतीय मुस्लिमांना ते साल सरते वेळी आणि नवीन वर्ष १४४० च्या सुरूवातीला आनंदी मनाने खूशामदीद म्हणायला तर हवेच!
- बशीर मोडक, पनवेल.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget