Halloween Costume ideas 2015

दृढ ईमानवंत हादिया



मानव जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला या जगात कोणताही धर्म नसतो. तो ज्यांच्या संगोपनात वाढतो, त्याला जे धार्मिक ज्ञान त्याच्या पालकांकडून वा आईवडिलांकडून मिळते त्याचे तो अनुकरण करतो. जेव्हा मनुष्य सज्ञान होतो तेव्हा तो अवलंबत असलेली जीवनपद्धती वा अनुसरत असलेला धर्म आपल्या पसंतीचा आहे की नाही? याचा शोध घेऊ लागतो. मानवाच्या जन्मत:च निमाणकत्र्या ईश्वराने त्याला धर्मनिवडीचे वा श्रद्धा आत्मसात करण्याचे स्वातंत्र्य बहाले केले आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या केरळमधील तथाकथित लव्ह जिहाद प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे.
केरळच्या २५ वर्षीय अखिला अशोकन नामक युवतीने तिला लाभलेल्या निर्माणकत्र्याच्या अधिकाराचा वापर करून तिने इस्लाम धर्माची निवड केली आणि ती मुस्लिम झाली. तिने हादिया असे नाव धारण केले. मग तिने शाफिन मुस्लिम युवकाशी विवाह केला. पुढे पुढे अखिला ते हादियापर्यंतचा प्रवास तिला अतिशय खडतरपणे सुरू आहे. नुकताच सर्वोच्च न्यायालयाकडून तिला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. संपूर्ण सरकारी यंत्रणा, पोलीस, सांप्रदायिक शक्ती आणि वडिलांकडील मंडळी एकीकडे आणि हादियाचा ईमान एकीकडे. तिच्या ईमानमध्ये इतकी दृढता होती की त्यापासून तिला कोणीही हटवू शकले नाही. शेवटी कोर्टाने तिच्या आईवडिलांच्या कस्टडीतून सुटका केली आणि तिला पुढील शिक्षणासाठी मुक्त केले. तत्पूर्वी उच्च न्यायालयाने तिच्या विवाहाला रद्दबातल ठरविले होते आणि विवाहाच्या एक महिन्यानंतर पतीपासून अलिप्त केले होते. तिच्या पतीवर दहशतवादाचा आरोप केला जात आहे. एनआयएकडून त्याची चौकशी सुरू आहे. मात्र कणखर इच्छाशक्ती असलेल्या हादियाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि आपल्या इस्लाम स्वीकारण्याच्या आणि विवाहाच्या निर्णयावर ठाम राहिली. हादियाने इस्लाममध्ये स्त्रीला मिळालेल्या अधिकारांचे महत्त्व आणि ईमानवर दृढ राहण्याची क्षमता संपूर्ण समाजाला दाखवून दिली आहे. हादिया ज्या मुस्लिम भगिनींच्या वागण्यामुळे इस्लामकडे प्रभावित झाली त्यापासून मुस्लिम समाजाने निश्चितच धडा घेतला पाहिजे. तिच्या त्या मैत्रिणींनी हादियावर कोणतीही जोरजबरदस्ती केलेली नाही विंâवा मुस्लिम समाजातील कोणत्याही व्यक्ती वा संस्थेने तिला बळजबरीने इस्लाम स्वीकारण्यास सांगितलेले नव्हते. त्याचबरोबर तिला मुस्लिम युवकाशी लग्न करण्यासही कोणी जबरीने प्रवृत्त केलेले नव्हते; हे सर्व तिने सर्वोच्च न्यायालयात परखडपणे सांगितले. इस्लाममध्ये कोणत्याही प्रकारच्या जोरजबरदस्तीला थारा नाही हे त्याच्या शिकवणींवरून स्पष्ट होते. तेच हादियाला पसंत पडले. सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा हादियाला तिची इच्छा विचारली तेव्हा तिने सांगितले की ती स्वतंत्रपणे इस्लामचे अनुसरण करून आपल्या पतीबरोबर राहू इच्छिते. न्यायालयाने विचारले की तिला सरकारकडून कोणत्या प्रकारची मदत हवी आहे काय? तेव्हा तिने उत्तर दिले, माझा पती जिवंत आहे, तोच माझा यापुढील सर्व खर्च भागविण्यास समर्थ आहे. अशा प्रकारचे अनेक प्रश्नांचे अगदी स्पष्ट व सडेतोड उत्तर तिने न्यायाधीशांना दिले. येथील हिंदुत्ववाद्यांनी लव्ह जिहादसारख्या वापर करून केरळमधील इस्लामी संघटना आणि मुस्लिम समाजातील युवकांवर आरोप करण्याचे षङ्यंत्र रचण्याचे काम सुरू केले आहे. त्यांच्या या कुकृत्याला हादिया प्रकरणातील निर्णयाद्वारे सर्वोच्च न्यायालयाने चांगलीच चपराक दिली आहे. त्यामुळे देशभरातील तथाकथित ‘लव्ह जिहाद’चे रक्षणकर्ते चांगलेच धास्तावले आहेत. केरळ सरकार आणि राज्य पोलिसांनी या प्रकरणी हादिया आणि तिच्या पतीला यापूर्वीच क्लीन चिट दिलेली आहे. मात्र या खटल्याची सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी जानेवारीच्या तिसNया आठवड्यात होणार आहे. न्यायालयाद्वारे एनआयएच्या दहशतवाद व लव्ह जिहाद दृष्टिकोन आणि हादियाच्या विवाहाची वैधतेवरही निर्णय घेतला जाईल. याबाबत हादियाच्या कुटुंबीय आणि एनआयएने आक्षेप घेतला आहे. न्यायालयाने या खटल्यात संविधानप्रदत्त मौलिक अधिकाराची पुष्टी आणि विविध मानवाधिकांची सुरक्षा केल्याचे दिसून येते. सर्वप्रथम नागरिक या नात्याने हादियाच्या वैयक्तिक अधिकार व जीवन जगण्याचा, धार्मिक स्वातंत्र्याचा, आपल्या इच्छेनुसार वागू शकण्याचा आणि एक महिला म्हणून आपल्या हितांचे रक्षण करण्याचा अधिकार हादियाला लाभला आहे. न्यायालयाचे आकलन, निर्णयानंतर ही गोष्ट स्पष्ट होते की आपल्या देशाने आधुनिक युगात प्रवेश केलेला असतानाही वैचारिक दारिद्र्य असून संपलेले नाही. म्हणूनच हादियासारख्या दृढ ईमानवंताला सलाम करावासा वाटतो.


shahjahan magdum 

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget