हजरत आदम (अ.) यांस सजदा न करण्याचे कारण होते ती अस्मिता! ही बाब सर्वश्रुत आहे. तेव्हा या अस्मितेमुळे किंवा त्यातून जे काही प्राप्त झाले होते ते हानिकारक, मानहानिकारक म्हणजेच सैतान. म्हणून इस्लामला अस्मिता मान्य नाही.
इस्लामची शिकवण त्याच्या अर्थानुसार म्हणजेच शांती आहे. शांती तेथेच आणि तेव्हाच लाभते जेव्हा जुलमाला थारा नसकतो. मात्र आपण याचे विपरीत अनुभरतो ते म्हणजे कुटुंब, समाज, राज्य देश इतकेच काय धर्मदेखील अशांततेतून सुटलेला दिसत नाही. अर्थात याचे कारण अस्मिता हेच होय. कुटुंबात पती-पत्नी, भाऊ-भाऊ, इत्यादींची अस्मिताच कुटुंबाला बेचिराख करते. प्रादेशिक अस्मितेमुळे देशाची प्रगती खुंटते. या अस्मितेतून नुसतीच वित्तीय हानी नाही तर मानव हानीबरोबरच नैतिकतेची हानी होत असते. गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान येथील काही हिडीस प्रकार हेच दाखवून देतात.
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी घालून दिलेले उदाहरण असे की जेव्हा सामनेवाल्यांनी आपसांतील करारपत्रावर रसूलल्लाह या शब्दास विरोध केला तेव्हा मुहम्मद (स.) यांनी तो शब्द स्वत:च वगळवला. येथे त्यांनी अस्मिता दूर ठेवली. पैगंबर जे बोलत असत ते प्रथम करीत असत विंâवा नंतरही तसे करीत असत. ज्या अनेक कारणांमुळे त्यांना जगात सर्वोच्च स्थान प्राप्त झाले रोते त्यापैकी हे एक होते.
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी त्यांच्या अखेरच्या प्रवचनात संदेश दिला होता की गोNयास काळ्यावर तसेच अरबीस अजमीवर वर्चस्व प्राप्त नाही. सर्व समान. म्हणजेच अस्मितेला कोठे थाराच नाही. आज सर्व जग समानतेसाठी तडफडत असताना इस्लामने नष्ट केलेली अस्मिता डोके वर काढणार नाही हे पाहणे गरजेचे ठरते. ते विशेषत: मुस्लिमांसाठी काळाची गरज आहे. धार्मिक अस्मितेसाठी हपापलेल्या काही लोकांनी मुस्लिमांस येनकेन प्रकारे आर्थिक, सामाजिक, राजकीय आयुधांचा वापर करून अधिक कमकुवत बनविल्याने त्यांस त्यांची अस्मिता अबाधित राखण्याची आवश्यकता आहे. इस्लाम हा एकमेव धर्म असा आहे ज्याने अस्मितेस समानतेच्या अस्त्राने नामोहरम करून ठेवले आहे.
काही लोक पैगंबर मुहम्मद (स.) जन्मदिन साजरा करतात. खरे तर मुस्लिमांना अल्लाहच्या स्मरणाबरोबर पैगंबर मुहम्मद (स.) यांचे स्मरण करत असताना वेगळा दिन स्मरणासाठी आवश्यकच नाही. तरीदेखील हा दिन साजरा करताना मुस्लिमांनी आपसांतील अनेक फिरके पेवूâन देऊन डॉ. अल्लामा इक्बाल यांनी पृच्छा केल्याप्रमाणे ‘‘क्या बिघडता अगर मुसलमान होते भी एक. समाज म्हणून एकवटले तर आज ज्या समस्यांना ते सामोरे जात आहेत त्या समस्यादेखील अल्लाह स्वत:हून दूर करेल. यासाठी असाच एक शेररूपी सल्ला ‘‘खुदाने उस कौम की हालत आजतक नहीं बदली जिसको न हो खयाल आप अपने को बदलने का’’. अवश्य विाचरात घेऊन अमलात आणल्यास पैगंबर मुहम्मद (स.) यांचा जन्मदिन साजरा केल्याचा आनंद द्विगुणीत होण्यास मदत होईल.
व्यासंगी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी त्यांच्या एका अग्रलेखात पाकिस्तान आणि नंतरचा बांगलादेश न करता एवढे म्हणेन की अल्लाह मुस्लिमांतील पंथ नष्ट करो आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांनी त्यांच्या शेवटच्या प्रवचनाच्या वेळी मुस्लिमांसमोर दाखविलेली दोन बोटे यांचा मुस्लिमांनी बोध घ्यावा आणि नमाजच्या वेळी आपण एकाच साखळीत बांधलेले आहोत याची सद्बुद्धी आम्हा सर्वांनो देवो अशी दुआ आहे. कारण समाज ऐक्य हे या देशाच्या ऐक्यासाठी देखील लाख मोलाचे आहे.
- ब. अ. मोडक.
Post a Comment