माननीय खब्बाब (रजि.) यांनी मक्केतील १३ वर्षांच्या जीवनाचा इतिहास अतिशय विस्तृतपणे या हदीसमध्ये सादर केला आहे.
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी स्पष्ट शब्दांत त्यांना सांगितले,
‘‘संयम बाळगा. तो काळ येणार आहे जेव्हा राजकीय शक्ती इस्लामच्या हातात येईल आणि अल्लाहचे दासत्व करणारे सर्व प्रकारच्या भय व धोक्यापासून सुरक्षित होतील.’’
माननीय अता बिन रबाह (रजि.) यांच्या कथनानुसार,
मी उबैद लैसी यांच्याबरोबर माननीय आएशा (रजि.) यांच्या भेटीकरिता गेलो. आम्ही त्यांना ‘हिजरत’ (स्थलांतर) च्या बाबतीत विचारले,
‘‘हिजरत आजदेखील अनिवार्य आहे काय? (लोकांनी आजदेखील आपापला विभाग सोडून मदीनेला यावे काय?)’’
माननीय आएशा (रजि.) यांनी उत्तर दिले,
‘‘नाही, आता हिजरत होणार नाही. आदेश संपुष्टात आला आहे. हिजरत या कारणाने होत होती की मोमिनचे जीवन ईमान धारण करण्याच्या अपराधापोटी कठीण बनविले जात होते. तेव्हा तो आपला ‘दीन’ व ‘ईमान’ घेऊन अल्लाह व पैगंबरांकडे निघून येत होता. आता अल्लाहने ‘दीन’ला सामथ्र्यवान बनविले आहे. आज मोमिन हवे तेथे स्वतंत्रपणे अल्लाहचे दासत्व करू शकतो. मग तो हिजरत का करील? होय, ‘जिहाद’ (प्रयत्नांची पराकाष्ठा) आणि ‘जिहाद’चा निश्चय (नियत) बाकी आहे.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : सत्ताधारी व सामथ्र्यशाली ‘दीन’च्या बाबतीत माननीय आएशा (रजि.) वरील हदीसमध्ये चर्चा करीत आहेत. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या मृत्यूनंतर ‘दीन’ची सामुदायिकता व सत्तेला धोका निर्माण झाला होता, परंतु माननीय अबू बकर सिद्दीक (रजि.) यांनी वाचविले. पैगंबरांच्या मृत्यूमुळे लोकांना खूपच दु:ख झाले आणि लोक निराश होऊ लागले. इस्लामचा ही सामाजिक व्यवस्था कोलमडून पडते की काय असे वाटू लागले होते. या धोका माननीय अबू बकर सिद्दीक (रजि.) यांनी ओळखला आणि एक मोठे भाषण दिले. त्यात ते म्हणाले–
हे लोकहो! ज्या मनुष्याने मुहम्मद (स.) यांना उपास्य बनविले होते त्याला माहीत असायला हवे की मुहम्मद (स.) यांचा मृत्यू झाला आहे आणि जे लोक अल्लाहची उपासना करीत होते त्यांनी समजून घेतले पाहिजे की तो जिवंत आहे, मरणार नाही. अल्लाहने आपल्या ‘दीन’च्या रक्षणाचा आदेश तुम्हाला दिलेला आहे. आतूरता व भीतीमुळे त्या ‘दीन’चे रक्षण करण्याचे विसरू नका. अल्लाहने पैगंबर मुहम्मद (स.) यांना तुमच्यामधून उठवून आपल्याजवळ बोलविणे पसंत केले आहे, तेथे त्यांना त्यांच्या कर्माचा मोबदला देईल. तुमच्या दरम्यान अल्लाहने आपला ग्रंथ आणि आपल्या पैगंबराचे जीवनचरित्र मागे ठेवले आहे. जो मनुष्य त्या दोन्हींचा अवलंब करील त्याला सदाचाराच्या मार्ग लाभेल आणि जो त्या दोन्हींच्या दरम्यान फरक करील तो दुराचाराच्या मार्गाने जाईल. अल्लाहने तुम्हाला उद्देशून म्हटले आहे, ‘‘हे ईमानधारकांनो! आम्ही अवतरित केलेल्या व्यवस्थेचे संरक्षक व्हा’’ आणि असे अजिबात होऊ नये की शैतानाने तुमच्या पैगंबराच्या मृत्यूमध्ये तुम्हाला गुंतवून ठेवावे. तेव्हा शैतानाविरूद्ध लवकरात लवकर उपाय करा जेणेकरून तो पराभूत व्हावा. त्याला आपले काम करण्याची संधी देऊ नका, अन्यथा तो तुमच्यावर हल्ला करील आणि तुमची धार्मिक व्यवस्था नष्ट करून टाकील.‘‘ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : माननीय अबू बकर सिद्दीक (रजि.) यांच्या या भाषणाने चांगल्या प्रकारे स्पष्ट होते की ‘दीन’ची जी व्यवस्था पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जीवनात स्थापित झाली होती, तिला किती महत्त्व आहे. पैगंबरांच्या मृत्यूच्या दु:खामुळे लोक एकेश्वरत्व आणि नमाज वगैरे सोडण्याचा निश्चय केला नव्हता, जेणेकरून त्यांना समजावून सांगण्याची आवश्यकता येऊन ठेपली होती, तर हा धोका निर्माण झाला होता की इस्लामची राज्यसत्ता जी इतक्या कष्टाने स्थापित झाली होती ती नष्ट होऊ नये.
म्हणून माननीय अबू बकर सिद्दीक (रजि.) पुढे सरसावले.
पैगंबरांच्या अनुयायींच्या सभेत भाषण दिले. त्यात ‘सूरह निसा’ची आयत ‘‘या अय्युहल्ल़जीना आमनू वूâनू ़कव्वामीना बिल़िकस्ति’’चा संदर्भ देऊन सांगितले,
‘‘अल्लाहने तुम्हाला आपल्या व्यवस्थेचे संरक्षक बनविले आहे, तिचे रक्षणाचे तुमच्याकडून वचन घेले आहे. तेव्हा मृत्यूच्या दु:खाला मर्यादेपलीकडे जाऊ देऊ नका. उठा आणि शैतानाला पराभूत करा. आपल्या धार्मिक व्यवस्थेला अबाधित राखण्याबाबत विचार करा.’’
Post a Comment