(२५५) ....याव्यतिरिक्त की एखाद्या गोष्टीचे ज्ञान तो स्वत:च त्यांना देऊ इच्छित असेल.२८२ त्याचे राज्य२८३ आकाश आणि पृथ्वीवर पसरले आहे, आणि त्यांचे संरक्षण काही त्याला थकवून सोडणारे काम नव्हे. फक्त तोच एकटा महान व सर्वश्रेष्ठ सत्ताधीश आहे.२८४ (२५६) धर्माच्या बाबतीत कोणतीही जोरजबरदस्ती नाही.२८५
282) या वास्तविकतेला दाखवून दिल्यानंतर अनेकेश्वरत्वाच्या आधारांवर आणखी एक प्रहार पडतो. वरील वाःयात अल्लाहच्या असीम सम्प्रभुत्व आणि अपार अधिकारांचा विचार समोर आणून स्पष्ट केले आहे की त्याच्या साम्राज्यात कोणी भागीदार नाही. कुणाचाही त्याच्याजवळ जोर चालतच नाही जेणेकरून तो आपल्या शिफारसींनी अल्लाहचे निर्णय प्रभावित करील. आता दुसऱ्या दृष्टीने हे स्पष्ट केले जात आहे की दुसरा कोणी त्याच्या कामात हस्तक्षेप कसा करू शकेल? जेव्हा दुसऱ्यांकडे हे ज्ञान मुळातच उपलब्ध नाही ज्यामुळे तो या सृष्टी व्यवस्थेला आणि तिच्या अपेक्षा आणि हिताला समजू शकतो. मनुष्य असो की जिन्न व निर्मित किंवा ईशदूत सर्वांचे ज्ञान अपूर्ण व मर्यादित आहे. सृष्टीच्या समस्त वास्तविकतांवर कोणाचीही नजर आच्छादित नाही. एखाद्या लहानशा भागावर जरी दासांपैकी एखाद्याचा स्वतंत्र हस्तक्षेप किंवा शिफारस शक्य झाली तर तमाम सृष्टीची व्यवस्था कोलमडून पडेल. सृष्टीची व्यवस्था तर दूरची गोष्ट आहे दास तर आपल्या स्वत:च्या अपेक्षा आणि हितांना समजू शकत नाही. दासांच्या अपेक्षांनासुद्धा सृष्टीनिर्माता पूर्णत: जाणून आहे. दासांसाठी तर याशिवाय दुसरा मार्ग नाही की त्या अल्लाहच्या मार्गदर्शनावर आणि शिकवणींवर भरोसा करावा जो ज्ञानाचा मूळ स्त्रोत आहे.
283) मूळ अरबी शब्द "कुर्स' आला आहे ज्याला सर्व साधारणत: सत्ता आणि शासनासाठी उपयोगात आणला जातो. उर्दू, हिंदी आणि मराठी भाषेतसुद्धा कुर्स (खुर्च) म्हणून शासनाधिकार (सत्ता) समजले जाते.
284) ही आयत "आयतुल कुर्स'च्या नावाने प्रसिद्ध आहे. यात अल्लाहची परिपूर्ण व वैशिष्टपूर्ण ओळख करून देण्यात आली आहे. असे उदाहरण कुठे सापडत नाही. म्हणूनच हदीसमध्ये या आयतीस कुरआनची सर्वश्रेष्ठ आयत म्हटले गेले आहे. येथे हा प्रश्न निर्माण होतो की अल्लाहचे अस्तित्व व गुणवैशिष्ट्यांचा उल्लेख कोणत्या संदर्भात झाला आहे? याला समजण्यासाठी पुन्हा त्या व्याख्यानावर नजर टाकली पाहिजे जे आयत नं. 243 पासून चालत आले आहे. प्रथमत: मुस्लिमांना सच्च्या (सत्य) जीवनधर्मावर (दीन) चालून सत्य जीवनव्यवस्था जगात कायम (स्थापित) करण्यासाठीच्या मार्गात तनमन-धनाने प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यास प्रवृत्त करण्यात आले आहे. आणि त्या कमतरतेपासून सुरक्षित राहण्याची ताकीद करण्यात आली ज्यांचे भक्ष बनीइस्राईल बनले होते. नंतर या वास्तविकतेकडे निर्देश करून समजाविण्यात आले आहे की यश आणि सफलतेचा आधार संख्या आणि साधनसामुग्रीवर व त्यांच्या अधिकतेवर अवलंबून नसतो तर ईमान, धैर्य, अनुशासन आणि दृढनिश्चयाच्या आधारावर यश अवलंबून आहे. युद्धासोबत अल्लाहची जी तत्वदर्शिता जुडलेली आहे त्याकडे संकेत केला आहे. सृष्टी व्यवस्था सुचारु पद्धतीने सतत चालत राहाण्यासाठी अल्लाह सतत एका गटाला दुसऱ्या गटाद्वारा हटवित राहातो. नाहीतर एकच गटाला कायमस्वरुपी सत्ता व अधिकार प्राप्त झाले असते तर दुसऱ्यांसाठी जगणेसुद्धा अशःय बनले असते. नंतर या शंकेला दूर करण्यात आले की अल्लाहने आपले पैगंबर मतभेद मिटविण्यासाठी आणि संघर्षाचे द्वार बंद करण्यासाठीच पाठविले. त्यांच्या आगमनानंतरसुद्धा विरोध आणि मतभेद मिटले नाही की संघर्ष समाप्त होऊ शकले नाहीत. कारण या मतभेदांना ताकदीने रोखणे आणि मानवजातीला एका विशिष्ट मार्गावर जबरदस्तीने चालवणे, अल्लाहचा शिरस्ता नाही. तसे पाहता मनुष्याची काय बिशाद होती की अल्लाहच्या इच्छेविरुद्ध वागला असता. नंतर एका वाक्यात त्यामुळे विषयाकडे संकेत केला गेला. ज्यापासून भाषणाचा प्रारंभ झाला होता. यानंतर सांगितले जात आहे की माणसांची विचारसरणी, धारणा,पंथ आणि धर्म जरी वेगवेगळे आहेत, परंतु सत्य ज्यावर जमीन आणि आकाशाची व्यवस्था आधारित आहे; त्याचा येथे उल्लेख आला आहे. मनुष्यांच्या गैरसमजूतींमुळे कणभराचासुद्धा त्यात फरक होत नाही. माणसांना जबरदस्तीने मानण्यास मजबूर करणे अल्लाहला आवडत नाही. जो त्याला मानेल तो स्वयमही लाभान्वित होईल आणि जो कोणी त्याच्याशी विमुख होईल तर स्वत: नुकसानीत राहील.
285) म्हणजे कोणालाही ईमान (श्रद्धा) आणण्यासाठी बळजबरी केली जाऊ शकत नाही. येथे "दीन' म्हणजे अल्लाहसंबंधी ती धारणा आहे जी वर "आयतुल कुर्स'मध्ये वर्णित झाली आहे. "दीन' म्हणजे जीवन जगण्याची परिपूर्ण व्यवस्था जी या धारणेपासून निर्मित आहे. आयतीचा अर्थ असा आहे की इस्लामच्या या धारणासंबंधी नैतिक आणि व्यावहारिक व्यवस्थेला कोणावर बळजबरीने थोपले जाऊ शकत नाही. अल्लाहने जगाला दिलेली ही देणगी परिपूर्ण जीवनव्यवस्था आहे जिला बळपूर्वक लागू केली जाऊ शकत नाही.

Post a Comment