Halloween Costume ideas 2015

पंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या

आज शिक्षण क्षेत्रात वाढत्या स्पर्धे बरोबरच शिक्षण संस्था व विषय शाखा देखील वाढत आहे. बालक-पालकांना विचार पडला आहे कि कोणत्या क्षेत्रात प्रवेश घ्यावा? आज सगळ्याच क्षेत्रात वाढलेली स्पर्धा पाहता त्या स्पर्धेला लढण्यासाठी पालकांनी मुलांना उत्साह देण अतिशय आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रात मुलांना मोकळे वातावरण देऊन त्यांना विचार करायला स्वातंत्र्य दिले पाहिजे. विषय शाखा निवडतांना मुलांना मार्गदर्शनाची आवश्यकता असते. बालक-पालक यांनी एकत्र बसुन विषय शाखेविषयी चर्चा करायला पाहिजे. मुलांना ज्या क्षेत्रात रुची व आवड असेल त्या क्षेत्रात प्रेरणा व प्रोत्साहन द्यायला पाहिजे. पण सध्या याउलट होतांना दिसत आहे. खरंतर पालकांची इच्छा असते कि डॉक्टर, इंजिनिअर किंवा क्लासवन अधिकारी व्हावं. पालक रोख-ठोक मुलांना म्हणतात कि मला असा हवा आहे. याचा अर्थ पालकांची स्वप्ने व इच्छा मुलांकडून पुर्ण करणे होय का? मुलांनी भविष्यात काय बनायचं आहे किंवा कोणत्या क्षेत्रात जायचं आहे याचे स्वातंत्र्य मुलांना द्यावे.

दहावी-बारावीचा निकाल लागला कि मुलांसमोर विषय शाखेचा व शिक्षणाचा डोंगर उभा राहतो तसेच पालकांची इच्छा व स्वप्ने पण असतात. मुलांच्या स्वेच्छेने ज्या क्षेत्रात जायचं आहे त्या क्षेत्रात त्यांना प्रेरणा दिले पाहिजे. पालक म्हणून फक्त मुलांना जाणून घेण्याची गरज आहे. मुलांना प्रेम व जिव्हाळा दिले पाहिजे. जेणेकरून त्याची इच्छाशक्ती व विचार शक्ती वाढेल. त्याच्या प्रगतीच्या पावलावर व मार्गावर पालकांनी त्यांना मदत करायला हवी, शक्ती प्रदान करायला हवी किंवा प्रेरणा-प्रोत्साहन द्यायला हवे. काही वेळेस नारळा सारखे कडक व काही वेळेस लोणी सारखे मऊ स्वभाव व प्रेम असणे अतिशय गरजेचे असते. कारण जास्तीच जिव्हाळा व प्रेम मुलांच्या जीवनाला अपंगत्व बनवणारी ठरता कामा नये. पालकांनी मुलांन सोबत राहतांना शिक्षणाचे महत्व सांगणे त्याचबरोबर वाचण सवय, आवड लावणे, लिखाण कला व स्वच्छ अक्षर काढणे, अभ्यासक्रम संदर्भात जाणुन घेणे, अभ्यास करतांना त्यांना मदत करणे, शाळेविषयी, महाविद्यालय विषयी किंवा शिक्षण संस्था विषयी जाणुन घेणे. पालक वर्ग त्यांची इच्छा, विचार, स्वप्ने, कल्पना, दृष्टी, आकांशा, भवितव्य, कर्तव्य यासारख्या विविध गोष्टी मुलांवर लादत असते. त्यामुळे मुलांची इच्छा, स्वप्ने, विचार, कल्पना, महत्वकांक्षेची भरारी थोपवली जाते. त्याचबरोबर त्यांची विचार शक्ती तर कोलमडते पण त्याचसोबत मानसिक, भावनिक दृष्ट्या देखील वाढण्याची शक्यता असते. आमचे गणेश बंधु मुलांना म्हणतात, मी जेव्हा तुझ्या एवढा होतो तेव्हा भरपूर अभ्यास करत असायचो. असे काही म्हणून नव्या कल्पना व काही अपेक्षा लादत असते.

पालक ज्या क्षेत्रात आहे त्याच क्षेत्रात मुलांना आणण्यासाठी सतत पर्यंत करत असतात. खरंतर पालक मुलांना कार्बन कॉपी किंवा सावली बनविण्याचा प्रयत्न करत आहे. मुलांकडून कोणत्या अपेक्षा करायला पाहिजे व कोणते नाही? हे आधी पालकांनी ठरवायला पाहिजे. पण आज मात्र अस होतांना दिसत नाही. लहान बाळ असतांनाच नातेवाहीकांना किंवा मित्रमंडळीना रोख-ठोक सांगतात कि माझे पाल्य भविष्यत डॉक्टर, इंजिनिअर, वकील होणार आहे आणि घरात-दारात तेच वातावरण निर्माण करतात. लोकशाही देशात व नैसर्गिक वातावरणात असतांना सुद्धा विचाराचे आदान-प्रधान किंवा स्वातंत्र्य दिसत नाही. मुक्त विचार व स्वातंत्र्य पण दिसत नाही. पालक वर्गाला कोणी जरी सांगत असेल तर ते ऐकण्याच्या अवस्थेत नसते. अर्धवट ज्ञानाचा घडा उभारला जातो. मुलांनाही स्वतःचे काही स्वप्न, विचार, आकांक्षा असतात हे मात्र पालक वर्ग लक्षात घेत नाही, कारण पालक त्याला स्वतंत्र्य व्यक्ति मानत नाही. प्रत्येक माणुस वेगळ्या व्यक्तिमत्वाचा असतो. त्याचे विचार, आचार, मानसिक व भावनिक दृष्टीकोन वेगवेगळे असते. प्रत्येकाचे विचार विश्व व माहितीच महासागर भिन्न भिन्न असतात. पण पालक वर्ग त्याकडे दुर्लक्ष करतात.

मुलांचा वाचण, लेखण किंवा शिक्षण प्रवास-मार्ग गतीने, हसत-खेळत व आनंददायी होण्याऐवजी दुःखाच्या व जबाबदारीच्या दिशेने सुरू होते. खरंतर निसर्गरम्य वातावरणात शिक्षण, स्वातंत्र्य विचार, मुक्त घेवाण-देवाण, हसत-खेळत शिक्षण इत्यादी दिले असते तर तो उत्तम व चांगला नागरिक बनला असता. मुलांना शिक्षण क्षेत्रात स्वातंत्र्य व मुक्तत: दिले तर तो घरातच नव्हे तर समाजात पण उत्तम व स्वावलंबी नागरिक बनू शकतो. पालकांच्या इच्छेने, शक्तीने, स्वप्नाने व चुकीच्या वाटेने चालण्यास लावल्याने मुलं लवकर थकतात किंवा त्या क्षेत्रात त्यांना रस निर्माण होत नाही आणि सेवटी अंधाराच्या दिशेने प्रवास करतात. त्यांना योग्यवेळी योग्य विचार करायला सुध्दा वेळ मिळत नाही व सेवटी नैराश्यच वाट्याला येते. अनेकदा मुलांना स्वातंत्र्य देणे म्हणजे काय? स्वातंत्र्य म्हणजे त्यांना विचार-आचार स्वातंत्र्य प्रधान करणे होय. माणसाच्या प्रत्येक वळणावर, टप्यावर व मार्गावर विकासाची प्रक्रिया घडत असते. शारीरिक, मानसिक, भावनिक व बौद्धिक बदल होत असतांना विचार शक्ती व आचार शक्ती देखील बदलत असते. त्या-त्या मार्गावर, टप्यावर व वळणावर होणारे बदल पालकांनी समजुन घेणे अतिशय गरजेचे असते. त्यानुसार मुलांना प्रेरणा व उत्साह प्रधान करायला पाहिजे.

मुलांना जेव्हा विचार स्वातंत्र्य मिळते तेव्हा थोर पुरुषांचे विचार स्विकारण्यास प्रवृत्त किंवा तयारी दर्शवितात. योग्य व अयोग्य मधला फरक कळू लागते. चागले असतील तर कौतुक करावे व वाईट असतील तर मार्गदर्शन करावे. उदार वादी, हुकुमशाहीची शिक्षा सोडुन लोकशाहीची शिक्षा मुलांना प्रधान करणे. सतत सांगणे, उदाहरण देणे, पटवुन देणे म्हणजे हुकूमशाही वृतीने किंवा दडपशाही पद्धतीने सांगणे होय. यामुळे मुलं खोड्या करतात, खोट बोलतात, चापलुशी करतात व टाळाटाळ करतात म्हणजे पालकांचे ऐकायचे व तेच करायचे हा दृष्टीकोन तर असतेच पण मुलं जे एका कानाने ऐकतात तेच दुसऱ्या कानाने सोडतात. हे सगळ थांबवण्यासाठी पालकांनी प्रेम, जिव्हाळा व उत्साह देणे अतिशय गरजेचे असते. लहान वयात किंवा तरुणपणी प्रेमाची, मायेची व जिव्हाळ्याची  गरज असते. त्यांच्या वरती कौतुकाच, व्हा-व्हा-व्हाच, उत्तम-अतिउत्तम, लयभारी, अगदी छान किंवा सप्रेमभेटच वर्षाव करायला पाहिजे. मात्र असे होतांना किंचित दिसतात. पालक खऱ्या उपाय करण्याऐवजी चुकीचं पर्याय निवडत आहे किंवा चुकीच्या पर्यायाचा विचार तरी करीत नाही ना? असा प्रश्न पडतो. कोणत्याही मनुष्य प्राणीला असा दबाव व दडपण नको असते. सतत उपदेश, दडपण, सल्ला, दबाव व विचारांचे डोस तर अजिबात नको असते. योग्य वेळी, योग्य सल्ला, योग्य उपदेश योग्य ठिकाणी देणे गरजेचे आहे पण नेहमी-नेहमी देणे पण योग्य नाही. जणु मुलं मोठ्यांच ऐकण्यासाठीच तर जन्माला आले नाही? खरंतर मुलांच्या वाट्यावर, वळणावर व मार्गावर असे कोणतेच ठिकाण नाही कि तिथे त्यांना सल्ला, उपदेश व मार्गदर्शन येत नाही किंवा लागत नाही. काही वेळेस त्यांना वैताग पण येऊ शकतो किंवा काही वेळेस चांगलं पण वाटत असेल.

घरात पालकांनी मुलांना आनंदाने खेळू देणे, गप्पा मारणे, मनोरंजन होऊ देणे, विविध सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊ देणे, पारीवारिक कार्यक्रमात सहभागी होऊ देणे, विचार घेवाण-देवाण करणे, पारंपारिक गोष्टी सांगणे, वाचण-लेखन करणे, चित्र काढणे, शब्द्पाठ करणे, पोहायला जाणे, बाहेर फिरायला जाणे इत्यादी अतिशय महत्वाचे आहे. पालकांचा शिक्षणाबद्दलचा दृष्टीकोन आणि शैक्षणिक दृष्टीकोन यात मोठा फरक आहे. हे अंतर कमी व्हायला हवे आहे किंवा शिक्षणाच्या प्रक्रियेत सौम्य स्वरूपाचा सहभाग घेणे पण गरजेचे आहे. घरात मुलांना मोकळे खेळू द्या, काम करू द्या, अवतीभवती त्याला सोबत फिरू देणे, माळावर-शेतावर घेऊन जाणे, निसर्गरम्य वातावरण पाहू देणे, मौज-मस्ती करायला थोड वेळ देणे, यासाठी उघडा डोळे पाहा नीट या स्वरूपात करू दिले पाहिजे. त्यांना पडणारे प्रश्न स्वातंत्र्याने व चर्चेने सोडवणे. पालकांचे स्वप्ने काही असले तरी त्या मुलांना पण स्वप्ने, आवाज, विचार असतेच ते स्पप्ने, आवाज व विचार त्याला करू देणे किंवा ऐकू देणे. मुलांच्या विचारसरणी नुसार त्यांच्या मार्गावर त्यांना उत्साह व प्रेरणा देणे महत्वाचे आहे. पालकांनी मुलांच्या भविष्याबद्दल, शिक्षणाबद्दल काळजी करणे स्वाभाविकच आहे पण त्यासाठी त्यांना त्यांचे स्वप्ने, विचार, आवज किंवा इछेचे मार्ग व दरवाजे बंध करणे योग्य नाही. माणसाचं प्रत्येक पाउल हे शिक्षणाकडे पोहचत असतो. त्या दृष्टीने पर्यंन व क्रम करायला हवे. कोणतेही दडपण, दबाव, हुकूमशाही न आणता सतत पर्यंत करायला हवे. डोक्यावरती दबाव व अपेक्षांचे ओझे लादून पालक मुलांना भविष्यात अंधारात लोटत तर नाही ना? त्यामुळे पालकांचे अधुरे विचार, स्वप्न व महत्वाकांक्षा बाजुला ठेवुन मुलाचं भविष्याचा विचार अधिक महत्वाचा आहे. चला तर मग प्रेम करू या, जिव्हाळा लावू या व हसत-खेळत मुलं वाढवू या. प्रेमाच्या दारात शिक्षणाचे फुल उघडू या. शेवटी पंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या असा नारा करू या.

- प्रा. राहुल भिमराव राठोड (पुणे)
मो. नं. ९५०३२०३६९५

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget