Halloween Costume ideas 2015
March 2019

आता उन्हाळ्यात पडणार घोषणांचा पाऊस, दाहीदिशांनी आदळत राहणारा नाटकीपणाचा गोंधळ, गोंधळलेल्या नागरिकांच्या मताला फुटणार आमिषाच्या हजार वाटा. पण या वाटांवर  नजिब न्यायापासून परवा कोसळलेल्या मुंबईपुलाच्या जीवांचा आकांती हिशोब विचारायला हवा. त्याचे भान नागरिकांनी जपायलाच हवे. बांध्यावरच्या आत्महत्या आणि फोडांतून रक्त  फुटेपर्यंत सडक्या पायांच्या मोर्च्याची स्मृती ठेवायलाच हवी ताजी. तजेला देणाऱ्या मुर्खजाहिरातींच्या नारील्या डोसांतून बाजूला करून ’आण्णाचं काय झालं’ म्हणून छळायलाच हवं...  लोकांना पाल समजून त्यांना झटकून टाकणारी व्यवस्था बदलायला हवी. कंत्राटी चौकीदारांचा हा भारीव ठळकपणा अचानक उठून दिसतोय. तरी गायब झालेल्या सगळ्याच महत्त्वाच्या  फायलींचे मागमूस लागत नाही.
अतिप्रभावाने क्षुल्लक, चेष्टेचा विषय बनलेल्या मीडियाने काबीज केलेला मेंदू, आता भानावर येतोय. हिप्नॉटीस्टचे परदेशी दौरे कमी झालेत. देशाच्या कोपऱ्यांतून अस्मितेचे झेंडे विरोधात  फडकताहेत. जातीनिहाय माशांची यादी गळाला लागली आहे. पण प्रश्न जैसे थे वैसेच. सामान्य मुस्लिम म्हणून प्रश्नांचा न संपणारा गुंता करून वाढलाय समोर. 55 हजाराहून अधिक तरूण विनाकारण सडताहेत जेलमध्ये, याबद्दल कुणीच कुठे हालचाल करताना दिसत नाही. खऱ्या गुन्हेगाराने अपराध्याची कबूली देऊन सुद्धा सुटत नाहीत. मुस्लिम नावाचे बेगुनाह कैदी. आरक्षण-रक्षणाच्या आंदोलनाचे केवळ राजकीय फलीत झोळीत पडावे म्हणून स्वतःतच झगडाहेत काही चळवळी चेहरे. दुःखाचा मागोवा घेत मुस्लिम भवितव्याची मांडणी करणारं साहित्य येत नाही आतून, आले तरी प्लॅटफॉर्मवरून ढकललं जातय बाजूला दूर. नव्या प्रतिकांची खऱ्याने मांडणी करताना सध्याच्या तरूणाईशी जोडता येत नाही प्रतिमांना. बहुजनीपदर  धरून चाचपडत रहावं तरी जातीपेक्षा ’धर्म’ म्हणून बुद्धिभेद होतोय. हुशार, विद्वानांच्या फौजेत सामिलकी पत्करून सुद्धा माझ्या दुःखव्यथेला साधी ओलीओळ मिळत नाही.
एकीकडे नव्याने येणारे धार्मिक जाणतेपण आणि बदलाच्या टोकावरली घुसमट याचा मेळ घालताना नाकीनऊ येताहेत. सामाजिक बहिष्कृततेचा छुपा मार मुस्लिम म्हणून गप्प सहन  करावाचा लागतोय. दोन पावलं पुढे असणाऱ्या प्रादेशिक मुस्लिमांच्या समवेत देवाणघेवाणीचा वैचारिक संवाद ही अत्यल्प ठरतोय. राजकीय अनिश्चित गटांच्या दावणीला अस्तित्वाचा फुगा लटकलेला दिसावा यासाठीची धडपड केविलवाणी दिसत आहे. शिक्षणाच्या एकूण गोंधळात, केवळ धार्मिक शिक्षणाचा जोर लावलाय. सहृदयी विचारवंताच्या मेळ्यात सांस्कृतिक जडणघडणीत आपण शेवटी उरतोय. कुठल्याही पदराला पकडून कितीही उभ राहण्याचा प्रयत्न इम्बॅलन्स करतोय. मानवप्रवृत्ती म्हणून असणाऱ्या जगण्याच्या संघर्षातली अत्यवस्था  तितकीच तडफडीची आणि मुस्लिम म्हणूनची इमानी धडपड ही मोलाची. यातल्या हल्नयाने येणाऱ्या मानवतेला कुणी तितकासा प्रतिसाद देत नाहीए. अगदी परवा न्यूझिलँडच्या आतंकी  हल्ल्यातील सगळ्याच बातम्यांवर कितीसे आपले किमान व्यक्त होत राहिले? नाहीच!!!
माणसाच्या जाण्याने चांगलच बोलावं, म्हणून ढिगभर पोस्ट भरतात. लेखकाच्या लेखनाप्रत प्रेम उफाळून येत. शहिदांवर मातम करत बोलून-लिहून गाजतात लोक. आचारसंहितेच्या कारणास्तव स्वतःलाच पुन्हा कोषात बंद करून घेताहेत सगळे...
माझं जगणं गोंधळाचं झालंय, यावर विचारल पाहिजे, बोललं पाहिजे, स्वतःच्या पायावरती ठाम उभे राहताना आधुनिक काळाशी सख्य सांगताना माझ्या भवितव्याची स्पष्ट मांडणी  व्यक्ती म्हणून झाली पाहिजे. अंधार गडद असला तरी, पहाट होईलच. पहाटेसाठीच्या केवळ बाष्फळगप्पा न करता कृतीशील विवेकीविचारांचा सुगंध दरवळू दे. मत कळू दे, मताची  अनमोलता कळू दे.. सध्या जागेपणी उजेडवाटा निवडाव्यात.
’’अपना गम सबको बताना, है तमाशा करना.
हाले-दिल उसको सुनाएंगे वो जब पूछेगा.’’

- साहिल शेख
कुरूंदवाड (कोल्हापूर)
9923030668

एखाद्या क्षेत्रात लोकसंख्या वाढली तर काय होते? नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अर्थात एनआयएनएच ऑफ यु.एस.च्या जॉन कॅल्हून चा या संबंधीचा प्रयोग फार प्रसिद्ध आहे.  त्या प्रयोगाचे नाव विश्व - 25 असे आहे. हा प्रयोग 1972 साली केला गेला. या प्रयोगापूर्वी मालथसचा लोकसंख्या वाढीसंबंधीचा सिद्धांत मान्यता प्राप्त होता. त्यात मालथस ने म्हटलेले  होते की, जास्त लोकसंख्येमुळे लोक दाटीवाटीने राहतात, त्यामुळे रोगराई वाढते आणि त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात मरतात. पण त्याच सिद्धांताबरोबर कॅल्हूनचा सिद्धांतही लोकप्रिय  झाला व खरा मानला गेला. तो असा की, लोकसंख्या जास्त नसतांना सुद्धा लोक विषमतेने मरतात. उदाहरणार्थ ग्रामीण भारतात भरपूर जागा आहे. पण विषमतेमुळे शेतकरी हजारांच्या  संख्येने आत्महत्येच्या रूपाने मरत आहेत. याचाच अर्थ दाटीवाटी नसतानासुद्धा विषमतेमुळे लोक मरतात.

प्रयोग
कॅल्हूनने 9/4 फुटाचा एक चौरस हौद तयार केला. त्या हौदाच्या प्रत्येक भिंतीवर त्याने जाळ्याची बोगदे वजा बिळे बनविली. त्या बिळात भरपूर अन्नपाणी आणि स्वच्छ पाण्याची सोय  केली. त्या हौदात 3 हजार 840 उंदीर आरामत राहू शकतील अशी सर्व व्यवस्था केली. मग त्याने त्या हौदात चार नर व चार नर मादी उंदीर सोडले. सुरूवातीला सर्व काही कॅल्हूनच्या  अंदाजाप्रमाणे झाले. दर 50-55 दिवसांमध्ये उंदरांची संख्या दुप्पट होत गेली. मात्र काही दिवसांनी उंदरांची वर्तणूक बदलली. माद्या गर्भगळीत होण्याचे प्रमाण वाढले. त्या पिल्लांची  काळजी घेईनाशा झाल्या. काही उंदीर विनाकारण इतर उंदरांपासून फटकून एकटे राहू लागले. ते बिळातच राहत व ईतर उंदीर झोपल्यावर बाहेर येऊन अन्नपाणी घेत. इतर सगळा वेळ  ते स्वतःला चाटून पुसून स्वच्छ व सुंदर ठेवण्यात घालवू लागले. ते सदृढ झाले. इतर उंदरांपेक्षा त्यांचा आकार मोठा झाला. ते दुसऱ्या उंदरावर हुकूमत गाजवू लागले. त्यांचे लैंगिक  व्यवहारही बदलले. सामाजिक व्यवहार सुद्धा बदलले. या उंदरांना कॅल्हूनने ’सुंदर लोक’ अर्थात ’अलाईट्नलास’ असे संबोधले. इतर उंदरांची मात्र दाटीवाटी सुरू झाली. ते गटागटाने राहू  लागले. त्यांच्यात वाईट सवयी वाढू लागल्या. समलैंगिक संबंधही सुरू झाले. एकमेकांना जीवे मारून खाण्यापर्यंत त्यांची मजल गेली. बलात्कार वाढले. काही उंदरांनी हल्ल्यापासून  स्वतःला वाचविण्याचा प्रयत्नही सोडून दिला. अखेर 560 व्या दिवशी उंदरांची संख्या 2 हजार 200 वर पोहोचली. त्यानंतर मात्र एकेक करत अलाईड्नलास उंदरासह सर्व उंदीर मरण पावले.
म्हणजे 3 हजार 840 उंदरांना साठविण्याची क्षमता असलेल्या हौदात 2200 उंदीर म्हणजे क्षमतेच्या 57 टक्क्यांवर आली. हे सगळे हौदातील व्यवस्था कोलमडल्याने त्यातून निर्माण  झालेल्या विषमतेमुळे घडले. कारण सुंदर लोक हौदात प्रमाणाबाहेर जागा बळकावत होते. म्हणून इतर उंदरांमध्ये दाटीवाटी वाढली होती. त्यामुळे ते आपली सामाजिकता व उंदीरपणच  गमवून बसले होते. म्हणजे हौदाचे संतुलन कोलमडण्याचे मूळ दाटीवाटीत नाही तर विषमतेत होते. याला कॅल्हून ’बिहेवियरल सिंक’ म्हणजे ’वर्तन डोह’ असे नाव देतो. विषमतेमुळे  जनतेत हिंसकपणा आल्याने जनता त्या गर्तेत जाते. त्यावर वेळेवर राज्य व्यवस्थेकडून विषमता दूर करण्याचे उपाय झाले नाहीत तर सर्व जनता नष्ट होते. त्यात अलाईट्नलास  मधील सुंदर लोकही संपतात. हा नियम माणसांनाही लागू होतो.
विषमतेसंदर्भात लिहिल्या गेलेल्या’अ‍ॅन एस्से ऑन गव्हर्नमेंट’ नावाच्या एका निबंधामध्ये जेम्स नावाचा लेखक म्हणतो, ’’माणसांचा आपल्या आकांक्षापूर्तीसाठी दुसऱ्याचे हिरावून घेण्याकडे  कल असतो. ज्यांचे हिरावून घेतले जाते त्यांना जेमतेम जगता येईल, अशा स्थितीत लोटले जाते. त्यांना तीव्रतम भितीला सामोरे जावे लागते. असाधारण क्रौर्य दाखवले जाते. म्हणून  दुसऱ्यांचे हिरावून घेणे टाळणे गरजेचे आहे. ज्यांच्यामुळे विषमता वाढते ती कारणे नष्ट करणे किंवा नियंत्रणात ठेवणे हे शासनाचे पहिले कर्तव्य आहे.’’ उत्पादनाची साधणे न वाढणे  ह्यापेक्षा तीव्रतम क्रौर्य दूसरे नाही. त्यात टॅक्सचा बोजा जास्त नसावा. नसता विषमतेत भर पडते. म्हणून सरकारांनी कर योजना विचारपूर्वक आखावी.

- एम.आय. शेख.

न्यूझीलंड येथील दोन मस्जिदींमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये ५०हून अधिक लोक ठार झाले तर अनेक जखमी झाले. ठार झालेल्यांमध्ये किमान ९-१० भारतीयांचादेखील समावेश  आहे. हा हल्ला विशिष्ट समाजाच्या लोकांवर झालेला असल्याकारणाने जगभरातील जगभरातील इस्लामोफोबियाने ग्रासलेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पसह जगभरातील  जातियवादी, वर्णवादी, राष्ट्रवादी नेते आणि कार्पोरेट मीडियाला यास दहशतवादी कृत्य म्हणण्यास लाज वाटली. कारण आजपर्यंत त्याच समाजाचे नाव घेऊन त्यास दहशतवादात  गुरफटून टाकल्यामुळे आता या क्रूर कृत्याला दहशतवाद म्हणणे त्यांना चुकीचे वाटले होते. आपल्या चौकीदारांनी तर त्यावर प्रतिक्रियाच देण्याचे टाळले. विशेषत: काही पाश्चिमात्य  वृत्तसंस्था आणि संकेतस्थळे या हल्ल्याचे वर्णन अगदी अलीकडेपर्यंत गोऱ्या माथेफिरूने वर्चस्ववादी भावनेतून केलेला हल्ला (व्हाइट सुप्रीमसिस्ट अ‍ॅटॅक) असेच करत राहिल्या. मात्र  स्वत: न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी तो दहशतवादी हल्लाच होता असे खडसावून सांगताच पाश्चिमात्यधार्जिण्या कार्पोरेट मीडियाचे डोळे खाडकन उघडले आणि या कृत्यास  तेदेखील दहशतवादी कृत्यच म्हणू लागले. न्यूझीलंडमधील एका स्थानिक युवकानेच त्वेषाच्या तीव्र भावनेने विशिष्ठ देशवासियांना टारगेट करून हे दहशतवादी कृत्य केले.  न्यूझीलंडमधील या दहशतवाद्याने भारतीय, तुर्की आणि चीनी नागरिकांना लक्ष्य करुनच हे अमानवी कृत्य केले. त्याने प्रसिद्ध केलेल्या ७२ पानी ‘द ग्रेट रिप्लेसमेन्ट’ नावाच्या  जाहीरनाम्यात भारत, चीन आणि तुर्कीचा उल्लेख केला असून त्याने भारतीयांना आक्रमणकारी ठरवले आहे. या ‘जाहीरनाम्या’त पोलंड, ऑस्ट्रिया, फ्रान्स, अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, कॅनडा  आणि अगदी व्हेनेझुएलातील त्याच्यासारख्या माथेफिरूंकडून पाठिंबा मागतो तेव्हा हा वांशिक राष्ट्रवाद किती धोकादायक पद्धतीने पसरू लागला आहे याची प्रचिती येते. या भूमिकेतून  अनेक भारतीयांना आतापर्यंत जीवही गमवावा लागला आहे. अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणीही भारतीयांना वर्णद्वेशी शेरेबाजी आणि हिंसेलाही सामोरे जावे  लागते. प्रार्थनास्थळी किंवा कोठेही निशस्त्र, निष्पाप सामान्यांवर झालेले असे हल्ले दहशतवादीच असतात. ते विशिष्ट धर्मीयांनी घडवून आणल्यावरच दहशतवादी ठरवायचे, ही गोऱ्या  देशांची सवय प्रथम न्यूझीलंडने मोडून काढली हे योग्यच झाले. याचा धडा आपल्याकडील राजकारणी आणि गोदी मीडिया कधी घेईल तेव्हाच शुभदिन. ख्राइस्टचर्च घटनेतला मारेकरी  ब्रेंटन टॅरेंट हा मूळचा ऑस्ट्रेलियन आणि गोरा. त्याच्या गोळ्यांना बळी पडलेले बहुसंख्य स्थलांतरित होते. ‘आमच्या आदर्शातला न्यूझीलंड असा नाही,’ असे त्या देशाच्या पंतप्रधान  जेसिंडा आर्डेर्न यांनी शुक्रवारी रात्रीच जाहीर केले, हे बरे झाले. युरोपातील काही सरकारे आणि विद्यमान अमेरिकी सरकार स्थलांतरित नागरिकांच्या विरोधात उघडपणे भूमिका घेऊ  लागले आहेत. मूलत: बेकायदा निर्वासितांबाबत सुरू झालेली चर्चा अखेरीस कायदेशीर स्थलांतरितांपर्यंत पोहोचतेच. अनेकदा निवडणुकीनिमित्त विशेषत भावनिक जनाधारावरच जन्माला  येणारे आणि तगून राहणारे नेते स्थलांतरितांच्या मुद्द्याचे हुकमी अस्त्र बाहेर काढतातच. त्यातून जो विखार निर्माण होतो आणि समाजमनात झिरपतो त्याचे उत्तरदायित्व घेण्यास असे  नेते कधीही तयार नसतात. एका अर्थाने या दहशतवादाच्या मुळाशी वांशिक राष्ट्रवाद आहे. वांशिक राष्ट्रवाद हा आता चांगलाच फोफावू लागला आहे. टॅरेंटच्या काही ‘आदर्शां’पैकी एक  लुका ट्रेनी याने इटलीत सहा स्थलांतरितांना जखमी केले. दुसरा डिलन रूफ ज्याने अमेरिकेत चर्चमध्ये नऊ आफ्रिकनांना ठार केले. आणखी एक डॅरेन ओसबोर्न, ज्याने लंडनमध्ये  मुस्लिम स्थलांतरितांवर व्हॅन चालवली. टॅरेंटने ‘स्फूर्ती’ घेतली तो अँडर्स बेरिंग ब्रायविक हा नॉर्वेजियन माथेफिरू, ज्याने ७७ युवकांचे बळी घेतले होते! खाईस्टचर्च येथील दहशतवादी  हल्ल्यानंतर जगभरातून दुःख व्यक्त होत आहे. पण या घटनेनंतर एक छायाचित्र नकारात्मक वातावरणात आशेचा किरण जागृक करत आहे. हे छायाचित्र आहे न्यूझीलंडच्या पंतप्रधान  जेसिंडा आर्डन यांचे. देशात मुस्लिम आणि निर्वासित यांच्याबद्दल तयार होत असलेल्या तिरस्काराच्या वातावरणात आर्डन या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातलगांना  भेटून जगासाठी मानवतेचा संदेश दिला आहे. या मुस्लिम कुटुंबीयांना भेटताना त्यांनी हिजाब परिधान केला होता. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांची गळाभेट घेतली. त्यावेळी आर्डन यांच्या  चेहऱ्यावर दुःख आणि त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळत होते. पीडित कुटुबीयांना भेटल्यानंतर त्या म्हणाल्या, ‘आपण विविधता, करुणा आणि दयेचे प्रतिनिधित्व करतो. जे लोक ही मूल्ये  मानतात त्या सर्वांचा हा देश आहे. ज्या निर्वासितांना गरज आहे, त्यांचाही हा देश आहे.' दहशतीच्या या काळात राजकारणातील मानवी चेहरा म्हणजे दहशतीचे राजकारण करणाऱ्या क्रूरकर्म्या वृत्तीच्या राजकारण्यांना बसलेली जबरदस्त चपराकच आहे. ‘उपाशी मुले आणि या मुलांचे अनवाणी पाय पाहिले आणि मला राजकारणात येण्याची गरज भासू लागली,' असे  त्यांनी राजकारणात येण्यापूर्वी म्हटले होते. उजव्या विचारांच्या राजकारण्यांनी जेसिंडा यांच्याकडून कारुण्य आणि प्रेम यांचे धडे जरूर घ्यावेत.

-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@eshodhan.com)

हजरत अबु हुरैराह (र.) कथन करतात की, इस्लामचे अंतीम प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, ‘‘व्याजखोरीच्या (व्याज घेणे-देणे) व्यवहाराचे ७० भाग आहेत. शेवटचा  महत्वपूर्ण भाग असा की, माणसाने तिच्या सख्या आईशी लग्न करावे (म्हणजे आईशी शरीरसंबंध करण्याएवढे मोठे पाप आहे.) (इब्ने माजा, हदीस क्रमांक २८२६) ह. अब्दुल्ला इब्ने  हंजला कथन करतात, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी फर्माविले, ‘‘व्याज म्हणून कोणी व्यक्ती मुद्दामहून एक दिरहम (एक अरब नाणं) देखील घेत असेल तर हे छत्तीस वेळा व्यभिचार  करण्यापेक्षाही जास्त गंभीर (पाप) आहे. (तिरमिजी शरीफ, हदीस क्रमांक - २८२५)

भावार्थ-
उपरोक्त दोन्ही हदीसमध्ये व्याजासंबंधी इतकी कठोर तंबी देण्यात आली आहे. मानवी समाज हा इतर प्राणी, पक्ष्यापेक्षा जास्त सभ्य समाज म्हणून ओळखला जातो. स्त्री आणि पुरुष  यांचे नाते परस्परपूरक म्हंटले जाते. ईश्वर, त्याचे प्रेषित यानंतर जगात सर्वात जास्त आदरणिय अशी कोणी व्यक्ती असेल तर ती आई. प्रेषितांनी आईच्या तळव्याखाली जन्नत  (स्वर्ग) आहे असे म्हंटले. पण वरील हदीसमध्ये व्याज खाण्यासंबंधी कठोरतम निर्भत्सना केली आहे. स्वत:च्या सख्या आईशी शरीरसंबंध ठेवणे? केवळ विचारानेच माणसाच्या काळजाचे  पाणी होते. जगातील सर्वात आदरणीय, आईशी शरीरसंबंध? शक्य नाही. पण प्रेषितांनी फर्माविले, व्याज खाणे म्हणजे आईशी शरीरसंबंध ठेवणे, इतके महापाप आहे. दुसऱ्या हदीसमध्ये  व्याज खाणे म्हणजे ३६ वेळा व्यभिचार करण्यापेक्षाही जास्त गंभीर आहे. इस्लामने व्यभिचाराला हराम ठरविले आहे.
पवित्र कुरआनने म्हंटले आहे, ‘‘व्यभिचाराच्या जवळही जाऊ नका. ही उघड अशी निर्लज्जता आहे व अतिशय वाईट मार्ग.’’ (१७:३२)
ही आयत चारित्र्यसंपन्नतेचे महत्व विषद करते. निर्लज्जतेच्या गोष्टीमध्ये व्यभिचार, कुकर्म, नग्न आणि अश्लील चित्रे (पोरनोग्राफी), प्रेमाचे चाळे करणे, शारिरीक आकर्षण निर्माण  करणारी गाणी गाणे अथवा पाहणे, चित्रपट पाहणे, स्त्रियांचे बिभत्स चाळे, नृत्ये, हावभाव या सर्व गोष्टी निलज्जतेत प्रथम क्रमांकांच्या मानल्या जातात. व्याज खाणे हे व्यभिचाराहून  जास्त गंभीर पाप आहे. सुसंस्कृत व सत्शील जीवन हे समजाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. कुरआन आणि हदीसमध्ये दर्शविलेल्या नितीनियमांचे पालन जो समाज  करेल, स्विकारेल व अंगीकारेल, तो समाज निश्चितच स्वकल्याण साधू शकेल यात संशय नाही.
व्याजाची परिणिती आर्थिक तंगीतच होते– माननिय अब्दुल्ला बिन मसऊद (र.) कथन  करतात की प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, ‘‘जो मनुष्य व्याजाच्या माध्यमाने  संपत्ती गोळा करतो, त्याची परिणिती आर्थिक तंगीमध्ये होते.’’ दुसऱ्या एका हदीसमध्ये असे शब्द आहेत, ‘‘व्याजाने गोळा केलेली संपत्ती कितीही जास्त असली तरी, त्याची परिणिती  आर्थिक तंगीमध्येच होते. (हदीस : तरगीब व तरहीब)

(६१) आणि जेव्हा त्यांना सांगितले जाते की या, त्या गोष्टीकडे जी अल्लाहने अवतरली आहे आणि या, पैगंबराकडे तेव्हा तुम्ही या दांभिकांना पाहाता की हे तुमच्याकडे येण्याचे टाळतात.९२
(६२) मग तेव्हा काय होते जेव्हा यांनी स्वहस्ते ओढवून घेतलेले संकट यांच्यावर कोसळते? त्या वेळेस हे तुमच्याजवळ शपथा घेत येतात९३ आणि सांगतात की ईश्वराची शपथ, आम्ही  तर केवळ भले इच्छित होतो आणि आमची मनिषा तर अशी होती की उभयपक्षात कोणत्या न कोणत्या प्रकारे समेट व्हावा.
(६३) अल्लाह जाणतो जे काही यांच्या मनांत आहे, यांच्याकडे लक्ष देऊ नका. यांची समजूत घाला व असा उपदेश द्या जो यांच्या अंत:करणात उतरावा.
(६४) (यांना सांगा की) आम्ही जो कोणी पैगंबर पाठविला आहे. याकरिताच पाठविला की अल्लाहच्या आदेशांच्या आधारावर त्याची आज्ञा पाळली जावी.९४ जर यांनी ही पद्धत  अंगीकारिली असती की जेव्हा हे स्वत:वर अत्याचार करून बसले होते तेव्हा तुमच्यापाशी आले असते आणि अल्लाहजवळ क्षमायाचना केली असती आणि पैगंबरांनीदेखील माफीची  दरखास्त केली असती, तर नि:संशय अल्लाह यांना क्षमा करणारा व कृपा करणारा आढळला असता.
(६५) नाही, हे मुहम्मद (स.)! तुमच्या पालनकर्त्याची शपथ, हे कधीही श्रद्धावंत होऊ शकत नाहीत, जोपर्यंत आपल्या वादग्रस्त प्रश्नात हे तुम्हाला निर्णय देणारा मान्य करीत नाहीत.  मग जो काही निर्णय तुम्ही द्याल त्यावर आपल्या मनांतदेखील काही संकोच वाटू नये तर पूर्णत: मान्य करावे.९५
(६६) जर आम्ही यांना आज्ञा दिली असती की आत्मघात करा अथवा आपल्या घरातून निघून जा तर यांच्यापैकी थोड्याच लोकांनी त्याची अंमलबजावणी केली असती.९६ वास्तविक  पाहाता जो उपदेश यांना दिला जात आहे जर यांनी ते अमलात आणले असते तर हे यांच्यासाठी अधिक हितकारक व अधिक दृढतेचे कारण बनले असते.९७
(६७) आणि जेव्हा यांनी असे केले असते तर आम्ही यांना आपल्याकडून फार मोठा मोबदला दिला असता.
(६८) आणि यांना सरळमार्ग दाखविला असता.९८

९२) यावरून माहीत होते की पाखंडी आणि दांभिक लोकांचे हे नित्याचे आचरण होते. ज्या दाव्यामध्ये त्यांना होण्याची आशा असते. आशा होती, की निर्णय त्यांच्याच बाजूने होणार;  त्यांना पैगंबर मुहम्मद (स.) यांचेकड घेऊन येत. परंतु ज्या दाव्याचा निर्णय त्यांच्या बाजूने न लागण्याचा त्यांना संशय असायचा असे दावे ते पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे नेत नसत. हीच दशा आजसुद्धा दांभिक लोकांची आहे. असे लोक ईमान असण्याचा डिंडोरा तर पिटतात. शरीयतचा निर्णय त्यांच्या बाजूने झाल्यास उतम. नाहीतर त्या प्रत्येक कायद्याच्या  नियमांच्या आणि परंपरेच्या आणि न्यायालयाच्या आश्रयाला जावून पडतात ज्यापासून त्यांना आपल्या इच्छेनुसार निर्णय.
९३) तात्पर्य हे आहे की त्यांची पाखंडी वागणूक मुस्लिम लोक जाणून घेतात आणि त्या पाखंडीना जाब विचारण्याची व शिक्षेची भीती वाटू लागते म्हणून ते शपथावर शपथी खाऊन  आम्ही खरे ईमानवाले (श्रद्धावंत) आहोत असे पटविण्याचे प्रयत्न करतात.
९४) म्हणजे अल्लाहकडून पैगंबर येतो फक्त यासाठी नव्हे की त्याच्या पैगंबरत्वावर ईमान धारण करावे आणि यानंतर आज्ञापालन कुणाचेही करीत फिरावे (परंतु असे नाहीये) परंतु  पैगंबर आगमनाचा उद्देश हाच असतो की त्याने जी जीवनप्रणाली आणि तिची कायदेसंहिता आणली आहे; त्यासाठी इतर सर्व जीवनप्रणालींना आणि कायद्यांना झुगारून देऊन फक्त  त्याचेच आचरण व्हावे. पैगंबराने अल्लाहकडून जो आदेश आणला, त्यासाठी इतर सर्व आदेशांना पायाखाली तुडवून त्याच आदेशाचे पालन व्हावे. जर असे कोणी केले नाही तर त्याचे पैगंबरांना पैगंबर मानने निरर्थक आहे.
९५) या आयतीचा आदेश फक्त पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जीवनापुरताच लागू होत नाही तर सर्व जगवासीयांसाठी अंतिम दिनापर्यंत (कयामत) आहे जे काही अल्लाहकडून पैगंबर  मुहम्मद (स.) यांच्यावर अवतरित झाले आहे आणि अल्लाहच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी त्यानुसार स्वत: जीवनव्यवहार पार पाडले, (पैगंबरप्रणाली) ते सदासर्वदा मुस्लिमांसाठी निर्णायक  प्रमाण आहे. याच प्रमाणास मानणे अथवा न मानणे यावर ईमानधारक होणे न होणे अवलंबून आहे. हदीसकथन आहे, ``तुमच्यापैकी तोपर्यंत कोणी मोमीन होऊ शकत नाही जोपर्यंत त्याची मनोकामना त्या पद्धतीनुसार होत नाही ज्याला मी घेऊन आलो आहे.''
९६) म्हणजे त्यांची ही स्थिती आहे की शरीयतवर आचरण करण्याने ते थोडेसे नुकसान किंवा थोडेसे कष्टसुद्धा सहन करू शकत नाही तर त्यांच्याशी मोठ्या त्यागाची अपेक्षा करणे व्यर्थ  आहे. घरदार सोडणे व प्राणपर्ण करण्याची मागणी त्यांच्याशी केली तर त्वरित दूर पळतील आणि ईमान आणि आज्ञापालन करण्याऐवजी अवज्ञा आणि द्रोह करू लागतील.
९७) म्हणजे हे लोक संशय, संकोच सोडून एकाग्रतेने पैगंबर मुहम्मद (स.) यांचे आज्ञापालन आणि अनुकरणावर कायम राहतील व धरसोड केली नाही तर त्यांचे जीवन  अनिश्चिततेपासून सुरक्षित असते. यांचे विचार, आचार आणि चरित्र सर्व एक स्थायी, शाश्वत व मजबूत आधारावर स्थापित झालेले असते. त्याना ती समृद्धी प्राप्त् झाली असती जी  एका सरळमार्गावर दृढतेने चालल्यास प्राप्त् होते. ज्याची वृत्ती धरसोडीची आणि संकोचपूर्ण आहे तो तर कधी या मार्गावर तर कधी दुसऱ्यामार्गावर चालतो आणि त्याला आत्मिक  समाधान मिळतच नाही. त्याचे संपूर्ण जीवन पाण्यावर बनविलेल्या चित्राप्रमाणे असते आणि त्याच्या संपूर्ण जीवनाची धडपड व्यर्थ ठरते.
९८) म्हणजे जेव्हा ते संशय सोडून ईमान आणि दृढतेसह पैगंबर आज्ञापालनाचा निर्णय घेतात तेव्हा अल्लाहच्या मेहरबानीने त्यांच्या समोर प्रयत्न आणि व्यवहाराचा तो सरळमार्ग  अगदी स्पष्ट होतो. त्यांना स्पष्ट कळून येते की आपले श्रम, शक्ती आणि वेळ कोणत्या मार्गावर लावावेत. ज्यामुळे त्यांचे प्रत्येक पाऊल आपल्या वास्तविक ध्येयाकडे उठते.

अंधेरी रात थकी हिम्मतें गिरां मंजील
सलामती की दुआ मांग कारवां के लिए

न्यूयॉर्क येथील ट्विन टॉवर वर 11/9/2001 रोजी घडवून आणलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकन प्रसार माध्यमांनी जगाला दोन नवीन शब्द दिले. एक, ’’इस्लामी टेररिझम व दोन इस्लामोफोबिया’’. या आठवड्यात आपण इस्लामोफोबियावर चर्चा करूया.

न्यूझिलँड

शांततेच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेला न्यूझिलैंड हा छोटासा देश दक्षिण पॅसिफिक महासागरातील एक सार्वभौम बेटांचा दोन भागात विभागलेला समूह आहे. ज्याचे  क्षेत्रफळ 268.021 चौरस किलोमीटर आहे. जनसंख्या 49 लाखापेक्षा थोडीसी अधिक आहे. त्यात 74 टक्के लोक युरोपियन वंशाचे तर 11.8 टक्के लोक एशियाई आहेत. न्यूझिलँडच्या एकूण लोकसंख्येच्या एक टक्क्यापेक्षा थोडेसे जास्त मुस्लिम आहेत.

प्रत्यक्ष घटना आणि त्यामागची मानसिकता

15 मार्चला क्राईस्टचर्च शहरातील ’अल-नूर’ आणि ’लिनवुड’ नावांच्या मशिदीमध्ये घुसून एका अप्रवासी ऑस्ट्रेलियाई नागरिकाने ज्याचे नाव ब्रेंटन टॅरेंट (वय 28) होते ने दोन  स्वयंचलित बंदूकीतून बेछूट गोळीबार करून 50 भाविकांचा बळी घेतला. घटनेपूर्वी समाजमाध्यमांवर पोस्ट केलेल्या 74 पानी पत्रात त्याने स्वतः या हल्ल्यासंबंधी जी माहिती शेअर केली  त्याचे विश्लेषण करता खालील गोष्टी स्पष्ट होतात. एक तर तो स्वतःला गौरवर्णीय/ श्रेष्ठ वंशीय तर इतरांना हल्नया दर्जाचे लोक समजतो. त्याचे आदर्श पुरूष अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असल्याचे त्याने या पत्रात नमूद केलेले आहे. यावरूनच त्याच्या मानसिकतेची पुरेशी कल्पना यावी. आपल्या पत्रात त्याने मुस्लिमांवर जे आरोप केलेले आहेत त्याचा  थोडक्यात सार असा की, मुस्लिम हे आक्रमणकारी असून, युरोप आणि अमेरिका तसेच अन्य गौरवर्णीय लोकांच्या देशात घुसखोरी करून तेथील श्रेष्ठ संस्कृती नष्ट करीत आहेत.  शिवाय, अनेक मुस्लिमांनी आतंकवादाच्या माध्यमातून अनेक गौरवर्णीयांना अनाठायी जीवे मारले आहे.

प्रत्यक्ष स्थिती

ब्रेंटेन टॅरेंटने आपल्या पत्रात आंतरराष्ट्रीय मुस्लिम समुदायावर लावलेले आरोप कमी जास्त प्रमाणात तेच आहेत जे पश्चिमी मीडिया लावत आलेला आहे. या संबंधी विवेचन केल्याशिवाय, आपल्याला पुढे जाता येणार नाही. म्हणून सुरूवात, ’’फोबिया’’ या शब्दापासून करूया. फोबिया म्हणजे भिती. हा एक मानसिक आजार आहे. कोणाला अंधाराची भीती  वाटते तर कोणाला पाण्याची तर कोणाला उंचीची भिती वाटते. काही लोकांना अशीच भिती इस्लामबद्दल वाटते, असा व्यापक समज तयार करण्यात जागतिक प्रसार माध्यमांना यश  आलेले आहे, हे मात्र स्विकार करावे लागेल. जरी ही भीती अनाठायी वाटत असली तरी खरी परिस्थिती तशी नाही. होय ! अनेक लोकांना इस्लामची भीती वाटते आणि तशी ती  वाटायलाच हवी. पण कोणाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे लबाड भांडवलदारांना, भ्रष्ट राजकारण्यांना, माणसा-माणसांमध्ये भेद करणाऱ्यांना, गरीबांना गुलाम समजणाऱ्यांना, मद्य  सम्राटांना, चक्रवाढ व्याज आकारून ’नाही रे’ गटातील लोकांचे शोषण करणाऱ्यांना, अश्लिल चित्रपट मालिका तयार करणाऱ्यांना, त्यांचे वितरण करणाऱ्यांना, कलेच्या नावाखाली हिडीस  संगीत व फॅशनच्या नावाखाली महिला व मुलींचे शोषण करणाऱ्यांना, वेश्याव्यवसाय करविणाऱ्यांना, दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस करणाऱ्यांना, अंमली पदार्थांचा व्यापार करून स्वतःचे  उखळ पांढरे करणाऱ्यांना इस्लामची भीती वाटते, हा इतिहास आहे. अशीच भीती सातव्या शतकात इस्लामचे प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल. यांनी, ’’इस्लाम’’ या शब्दाचा उच्चार करताच  मक्कातील धनदांडग्यांना, अनैतिक व्यापारामध्ये लिप्त असणाऱ्यांना, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना वाटली होती. तीच भीती आज 21 व्या शतकातील अपप्रवृत्ती असलेल्या लोकांना वाटत आहे, हा इस्लामचा एका प्रकारचा विजयच आहे. 1991 पासून सुरू असलेले इस्लामविरूद्ध भांडवलदार देश यांच्यातील शीतयुद्ध इस्लाम हळूहळू जिंकत असल्याचे पाहून  भांडवलदारांचे पित्त खवळणारच. कशाचीही आणि कोणाचीही परवा न करता वर नमूद सर्व वाईट गोष्टींचा विरोध करणारी जगात एकमेव जीवन व्यवस्था म्हणजे इस्लाम होय.  बाकीच्या जीवन पद्धतींनी वर नमूद खल प्रवृत्तींसमोर कधीचीच शरणागती पत्करलेली आहे.
चंगळवादी भांडवलदारांची डोकेदुखी वाढण्याचे कारण म्हणजे त्यांचे स्वतःचे नागरिक इस्लामचा जाणीवपूर्वक स्वीकार करत आहेत व असे करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही केल्या याला आळा बसत नाहीये, म्हणून त्यांची माथी भडकत आहेत. ’पियू फोरम’ सारख्या प्रतिष्ठित अमेरिकन सर्वे कंपनीच्या अनेक सर्वेक्षण अहवालामधून ही बाब स्पष्ट  झालेली आहे की, युरोप आणि अमेरिकेमध्ये इस्लामसर्वाधिक वेगात वाढणारा धर्म आहे.
स्पष्ट आहे, इस्लाम केवळ काही धार्मिक रिच्युअल्स (कर्मकांड) पुरता मर्यादित असता तर कधीच वाढला नसता. इस्लाम एक स्वच्छ, सुंदर, साधी आणि नैतिक जीवन जगण्याची परीपूर्ण व्यवस्था आहे हे लक्षात येत असल्यामुळेच युरोप आणि अमेरिकेचे ते लोक जे त्यांच्या मूळ अनैतिक जीवन पद्धतीला कंटाळलेले आहेत, इस्लामच्या शीतल छायेखाली येत  आहेत. याच गोष्टीची टेरंट सारख्या खलप्रवृत्तीच्या लोकांना भीती वाटते. त्यांना वाटते हे आपल्या धर्म आणि संस्कृतीवर आक्रमण आहे. त्यांच्या शब्दात सांगावयाचे म्हणजे इस्लामच्या  वाढत्या प्रभावाने त्यांचा धर्म आणि संस्कृती धोक्यात आलेली आहे.
ज्याप्रमाणे कुठल्याही डिबेट दरम्यान, ज्यांच्याकडे मुद्दे संपतात ते गुद्यांवर येतात, अगदी त्याचप्रमाणे इस्लामच्या नैसर्गिक विचारांचा सामना आपल्या पोकळ विचारांनी करता येत  नसल्याचे लक्षात येताच टेरंट सारखे लोक हातात बंदुका घेऊन मुस्लिमांना ठार करत सुटलेले आहेत. अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी ज्या-ज्या मुस्लिम राष्ट्रांवर हल्ले करून  त्यांना बेचिराख केलेले आहे त्याचे मूळ कारणही इस्लाम विषयी वाटणारी भीतीच आहे. बुश ज्युनियर यांनी तर 9/11 च्या हल्ल्यानंतर वेजींग वॉर अगेन्स्ट इस्लामिक टेररिझमला  ’क्रुसेड’ असे संबोधले होते. हे वाचकांच्या लक्षात असेलच. परंतु, या लोकांच्या लक्षात एक गोष्ट येत नाही की, इस्लाम ही नैसर्गिक जीवन पद्धती आहे.
तिचा विरोध अनाठायी आहे. कारण की,
जहां में अहले इमां मानिंद-ए-खुर्शिद जीते हैं
इधर डूबे उधर निकले उधर डूबे इधर निकले

उध्वस्त पाश्चिमात्य संस्कृती

मुळात युरोप आणि अमेरिकेचा समाज खिळखिळा झालेला आहे. कुटुंब व्यवस्था उध्वस्त झालेली आहे. तरूण पीढि अमली पदार्थ आणि मुक्त लैंगिक संबंधाच्या आहारी गेलेली आहे. व्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक होऊन त्याचे रूपांतर स्वैराचारात झालेले आहे. म्हणून सामाजिक जीवन व्यवस्थेच्या मोडकळीस आलेल्या या जहाजामधून सावध होऊन काही लोक स्वतः व  स्वतःच्या कुटुंबियांना वाचविण्यासाठी पूर्ण विचाराअंती इस्लामच्या सुरक्षित जहाजामध्ये प्रवेश करत आहेत. ट्रम्प असो का संघ कोणीही कितीही द्वेष केला तरी इस्लामची ही घौडदौड  थांबविणे आता कोणालाही शक्य नाही. अमेरिकन सिनेटच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये अमेरिकन इतिहासात पहिल्यांदा दोन मुस्लिम महिलांना निवडून जाण्यापासून स्वतःला  पस्तीसमारखान समजणाऱ्या ट्रम्पना देखील शक्य झालेले नाही. त्यामुळे प्रत्येक सद्सद् विवेकबुद्धी असणाऱ्या व्यक्तीला पूर्वग्रह दूर सारून इस्लामचा पुन्हा एकदा नव्याने अभ्यास  करण्याची हीच योग्य वेळ आहे, यात कुठलीही शंका नाही. कोणाला किती जरी वाईट वाटले तरी इस्लामची घौडदौड काही केल्या थांबणार नाही, याची भविष्यवाणी कुरआनमध्येच  करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर खालील आयात वाचून कदाचित वाचकांना आश्चर्य वाटेल, आपल्या पवित्र ग्रंथ कुरआनमध्ये अल्लाह म्हणतो की, ’’या लोकांची इच्छा आहे की,  अल्लाहच्या प्रकाशाला आपल्या फुंकरानी विझवून टाकावे पण अल्लाह आपल्या प्रकाशाला परिपूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. मग ते अश्रद्धावंतांना कितीही असह्य होवो.’’(सुरह तौबा आयत नं.32)

भांडवलशाहीचे अपयश

1991 साली युनायटेड सोव्हियत सोशालिस्ट रिपब्लिकच्या पतनानंतर साम्यवादी जीवन व्यवस्था निकालात निघाल्याचे जगाने मान्य केलेले आहे. भांडवलशाही सुद्धा धोक्यात असल्याचा इशारा मागच्याच आठवड्यात भारताच्या आरबीआयचे गव्हर्नर व ब्रिटनच्या इम्पेरियल (रिझर्व्ह) बँकचे होऊ घातलेले गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिलेला आहे. बीबीसीच्या चॅनल फोर शी बोलतांना 14 मार्च रोजी त्यांनी सांगितले की, ’’भांडवलशाही व्यवस्था गंभीर धोक्याखाली आलेली आहे.’’ एकूणच आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक या सर्व आघाड्यांवर युरोप  आणि अमेरिकन जीवन व्यवस्था अपयशी ठरत आहे आणि संसाधन विहीन मुस्लिम इस्लामी जीवन व्यवस्था सुदृढ होत आहे. हे सहन न झाल्यामुळे ब्रेन्टन टॅरेंट सारखे लोक  पिसाळल्यासारखे वागत आहेत. जेव्हा समाजाची उस विस्कटते, संस्कृती लयाला जात असते तेव्हा अनेक जणांचे शेवटचे आश्रयस्थान ’राष्ट्रवाद आणि वंशवाद’ असते. त्यातूनच मग  स्वतःला सावरण्याचा हे लोक प्रयत्न करत असतात. पण ते व्यवस्थित जमत नसल्यामुळे त्यातून निर्माण झालेल्या कुंठेला वाट करून देण्यासाठी मग मुस्लिम देशांवर किंवा व्यक्तींवर  हल्ले असे राष्ट्र किंवा लोक करत असतात. कल्पना करा आज या क्षणी जागतिक मुस्लिम समुदायाने असे ठरविले की, युरोप आणि अमेरिकेच्या व्याजाधारित, चंगळवादी, भांडवलशाही, भ्रष्ट आणि अनैतिक जीवन पद्धतीला विरोध करायचा नाही. उलट त्यांच्या या ’पुण्यकर्मा’मध्ये सक्रीय साथ द्यावयाची तर या क्षणापासूनच या लोकांचा इस्लाम विरोध  संपेल व हे लोक मुस्लिमांच्या गळ्यात गळे टाकून फिरतील. याबाबतीत सुद्धा कुरआनने स्पष्ट म्हटलेले आहे की,’’ त्यांची तर इच्छाच आहे की, ज्याप्रमाणे ते स्वतः अश्रद्धांवत आहेत  त्याचप्रमाणे तुम्ही अश्रद्धावंत बनावे. म्हणजे तुम्ही व ते सर्वजण एकसारखेच व्हावेत.’’ (संदर्भ : सुने निसार आयत नं. 89).

भारतीय बहुसंख्यांकांची मानसिकता

पाश्चिमात्यांच्या अंधानुकरणांमुळे नेमकी अशीच स्थिती आपल्या देशातही उत्पन्न झालेली आहे. विशेषतः शहरी समाज तर सर्व अपप्रवृत्तींना बळी पडलेला आहे. यासंबंधी एका कट्टर हिंदूत्ववादी विचारवंताचे विचार त्यांच्याच शब्दात खाली नमूद करत आहे.
’’ परानुकरण से बढकर राष्ट्र की अन्य कोई अवमानना नहीं हो सकती, हम स्मरण रख्खें की, अंधानुकरण याने प्रगती नहीं, वो तो आत्मिक पराधिनता की ओर ले जाता है.’’ (संदर्भ :  मा.स. गोळवलकर : विचार नवनीत पान क्र. 43).

भारतीय मुस्लिमांची भूमीका

सरतेशेवटी न्युझिलैंडमध्ये घडलेल्या मस्जिंदीवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय मुस्लिमांची भूमिका काय असावी? याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. त्या संबंधी माझे मत असे की,  मुस्लिमांच्या जगण्याचा जो मूळ उद्देश्य कुरआनमध्ये सांगितलेले आहे त्यापासून किमान भारतीय मुस्लिमांनी तरी ढळू नये. तो उद्देश्य काय आहे? हे आपण अगोदर समजून घेऊ या. कुरआनमध्ये मुस्लिमांसाठी जगण्याचा जो उद्देश्य दिलेला आहे तो खालीलप्रमाणे - ’’जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात ज्याला अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी  अस्तित्वात आणले गेले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता व दुराचाराला प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रद्धा बाळगता.’’ (सुरे आलेइमरान आयत नं. 110).
या आयातींविषयी भाष्य करताना जमाअत-एइस्लामीचे संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी (रहे.) म्हणतात की, ’’ एक कौम (समूह) की जिंदगी का मकसद (उद्देश्य) तमाम बनी-नौ - इन्सान (अखिल जागतिक मानव समुदाय) की खिदमत करना. ये एक ऐसी बात है जिसके तखय्युल (खयाल) से क़ौमियत (समुदायवादी) व वतनियत (राष्ट्रवादी) की फिजा में  परवरीश पानेवाले तंग दिमाग आशना (परिचित) नहीं हैं. वो ’कौमपरस्ती या वतनपरस्ती’ को तो खूब जानते हैं. और कौमपरस्ती तो गोया उनके तखय्यूल की मेराज (सर्वोच्च स्थान) है. मगर जुगराफी (भौगोलिक) व नस्ली (वांशिक) हदबंदीयों (सिमाओं) से बालातर (उपर) होकर सारे आलम-ए-इन्सान की अमली खिदमत (प्रत्यक्ष सेवा) अंजाम देना और उसीको पूरी कौम का मकसद-ए-हयात (जीवनाचा उद्देश) करार देना, उनकी रसाई (पहूंच) से बहोत दूर है. इसलिए सबसे पहले हमें इसकी तशरीह (व्याख्या) करनी चाहिए के, ये ’उखरजतुल लिन्नास’ (लोगों की भलाई)्नया चीज है? (संदर्भ : अलजिहाद फिल इस्लाम पान क्र. 86).
माझ्या मते मुस्लिम होण्याचा अर्थ असा आहे की, मुस्लिमांनी नेकीचा आदेश द्यावा व वाईटापासून रोखावे. हे काम करणे हेच आपल्या जीवनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. स्पष्ट आहे नेकीकडे बोलाविणारा खल प्रवृत्तींच्या लोकांच्या डोळ्यामध्ये काट्यासारखा खुपतो. याचसाठी मोठ मोठ्या साधूसंत आणि प्रेषितांचा लोकांनी छळ केला. हा मानवतेचा इतिहास आहे. येशूख्रिस्त (अलै.), सॉक्रेटिस पासून ते तुकाराम महाराजांपर्यंत पुण्यवान समाजाच्या स्थापनेसाठी प्रयत्नशील असल्यानेच त्यांना त्रास देण्यात आला. नव्हे अनेकांचे जीव घेण्यात आले.  आज इस्लामचे काही पाईक हेच काम करीत आहेत, किमान वैचारिक पातळीवर तरी ते आदर्श समाजरचनेचे स्वप्न उरी बाळगून आहेत. इस्लामला समतेवर आधारित, पुण्यवान,  लज्जाशील, आदर्श समाज निर्माण करावयाचा आहे व तो होऊ नये यासाठी चंगळवादी भ्रष्ट भांडवलशाहीचे पाईक रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून आपल्या हातात असलेल्या माध्यमांतून  इस्लामची बदनामी करत आहेत व मुस्लिमांवर हल्ले करत आहेत. अशा ढेपाळलेल्या व्यवस्थेमधून सुद्धा वाममार्गाला कंटाळून जे लोक इस्लामच्या गटात सामिल होत आहेत ही बाब काहींना इस्लामचे त्यांच्या संस्कृतीवरील आक्रमण वाटते, जे की चुकीचे आहे. वाममार्गाकडून सद्मार्गाकडे होणारे पलायन सहन न झाल्यामुळे बे्रटेंट टेरेन्ट सारखे लोक निरपराध  मुस्लिमांवर हल्ले करीत आहेत. त्यांना घाबरण्याची मुळीच गरज नाही. कारण
की... कत्ले-ए-हुसेन अस्ल में मर्ग-ए-यजीद है
इस्लाम जिंदा होता है हर करबला के बाद.

- एम.आय.शेख
9764000737

लोकशाहीमध्ये निवडणुका खऱ्या अर्थाने सणासारख्या असतात ज्या देशाच्या भविष्यातील मार्गक्रमणाची दिशा ठरवितात. स्वातंत्र्यानंतर झालेल्या निवडणुकांनी देशातील लोकशाहीला  मजबूत केले आहे. असे मुळीच नाही की या काळात अडचणी आल्या नाहीत. निवडणुकांमध्ये पैशाचा आणि शक्तीचा वापर तसेच इव्हीएमची विश्वसनीयता इत्यादी बाबतीत निवडणूक  प्रक्रियेतील निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे लोकशाहीवरील जनतेच्या विश्वासाला थोडासा तडा गेलेला आहे. मागच्या पाच वर्षांपासून एक नवीन अडचण निष्पक्षतेसंबंधी उभी  राहिलेली आहे. ती म्हणजे समाजाला धर्माच्या आधारे विभाजन करून अल्पसंख्यांकांना आतंकित करण्यासाठी सत्तेचा दुरूपयोग होय. धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी भारतीय  लोकशाहीची संरक्षक असलेल्या राज्यघटनेला अनेकवेळा आव्हान दिलेले आहे. अनेकवेळा घटनेचे उघड उल्लंघन झालेले आहे. मागच्या पाच वर्षात मोदी सरकारने वेगवेगळ्या कारणासाठी  समाजातील अनेक वर्गांना आतंकित आणि प्रताडित केलेले आहे.
देशातील एका मोठ्या गटाने,’अच्छे दिनच्या’ आशेवर मोदींना मतदान केले होते. अनेकांना आशा होती की त्यांच्या खात्यावर 15 लाख रूपये येतील. भ्रष्टाचाराचा दानव थकून भागून  बसेल, महागाई पळून जाईल, रोजगारच्या संधी वाढतील, डॉलरच्या तुलनेत रूपया मजबूत होईल, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे योग्य भाव मिळतील. मात्र ह्या आशा ठेवणाऱ्या  मतदारांचा मोहभंग झालेला आहे. देशात बेरोजगारीमध्ये मोठी वाढ झालेली आहे आणि कृषी क्षेत्र अतिशय गंभीर काळातून मार्गक्रमण करीत आहे. महागाईने सामान्य माणसाचे कंबरडे  मोडले आहे. दरम्यान, टुकड्या टुकड्यात विभाजित झालेल्या विरोधी पक्षांना या आपसातील फुटीने होणाऱ्या नुकसानीची जाणीव झालेली आहे. विरोधी पक्षांनी महागठबंधन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू केलेला आहे. परंतु, अद्याप त्यांना त्यात यश आलेले नाही. विरोधी पक्षांच्या हे ही लक्षात आले आहे की, अंधाधूंद प्रचार आणि उद्योजकांकडून मिळणारा प्रचंड  पैसा हेच मोदींच्या विजयाचे कारण होते. परंतु, विरोधकांची आपसातील दुहीनेही मोदींना विजयी करण्यात मोलाची भूमिका बजावली होती. महागठबंधन अद्याप कोणत्याच एका कॉमन  मिनिमम प्रोग्राम वर जरी आलेला नसला तरी सामान्य जनतेच्या अडचणींना निवडणुकीचा मुद्दा बनविण्यात त्यांना थोडे यश मिळालेले आहे. म्हणून आपण आशा करू शकतो की,  मतदानाच्या तारखा येईपर्यंत हे मुद्दे सार्वजनिक चर्चेच्या केंद्रात आलेले असतील.
मोदी आणि कंपनीने देशातील एकात्मतेमध्ये मोठी दरी निर्माण केलेली आहे. राम मंदिर, घर वापसी, लव्ह जिहाद, गोमांस सारख्या मुद्दयांना उचलून आपसातील सद्भाव आणि प्रेमाला  खंडित केलेले आहे. जो सद्भाव आणि प्रेम कुठल्याही धर्मनिरपेक्ष लोकशाहीचा पाया असतो. त्यालाच यांनी मोठी हानी पोहोचविलेली आहे. विविधता आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा आणि  राज्यघटनेचा मूळ आधार होता. परंतु, या दोन्ही मुल्यांवर या सरकारने अनेक हल्ले केले. भाजपाने संघाचा एजेंडा लागू करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. आणि सत्तेचे लालसी  एनडीएचे इतर पक्ष शांतपणे हे सारे पाहत राहिले. राष्ट्रीय राजनैतिक क्षितीजावर मोदीचा उदय गोध्राकांडच्या त्यांनी केलेल्या राजकीयकरण आणि त्यातून गुजरातमध्ये झालेल्या  दंगलीनंतर झाला. या घटनेनंतर समाजाचे जे ध्रुवीकरण झाले त्याचा लाभ भाजपाला निवडणुकीतून झाला. लोकसभेच्या निवडणुकांच्या अगोदर मोदींनी आपला राग बदलला आणि त्यांनी  विकासाची भाषा सुरू केली. विकासाचे तात्पर्य त्यांचे भांडवलशाही मित्र होते. हे लोकांच्या नंतर लक्षात आले. मोदींनी आपल्या अब्जाधीश मित्रांना कोरा चेक देऊन देशाला लुटण्याची मुभा दिली. आणि हे सर्व घडणार हे आधीच माहित असल्यामुळे अब्जाधीशांनी मोदींना आपले समर्थन दिले. संघानेही मोदींचा विजय निश्चित करण्यासाठी आपल्या लाखो कार्यकर्त्यांना  मैदानात उतरविले. त्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र भारताच्या इतिहासात भाजपने पहिल्यांदा स्वबळावर लोकसभेत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आणि सत्ता पिपासू युतीतील मित्र पक्षांना  सोबत घेऊन हिंदू राष्ट्रवादाच्या अजेंड्याला लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली. काश्मीर प्रश्नाला केवळ काश्मीरची जमीन आपल्या ताब्यात ठेवण्यापुरता मुद्दा बनविला. तथाकथित  अतिवादी तत्व जे आरएसएस ने दिलेल्या श्रम विभाजनाखाली काम करतात त्यांनी रस्त्यांवर गुंडगिरी सुरू केली आणि लोकांना मारहाण करून त्यांच्या हत्या करण्याच्या रोमहर्षक  घटना घडू लागल्या. धार्मिक अल्पंख्यांकांना आतंकित करण्यासोबत दलितांवर अत्याचार झाले आणि महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली. सरकारच्या कार्पोरेटधार्जीन्या नीतिमुळे  शेतकऱ्यांना डावलले गेले. देशातील अनेक समाज घटकांमध्ये असंतोष आणि राग वाढत होता. म्हणूनच अगदी अलीकडच्या काळापर्यंत निवडणूकपूर्व सर्वेक्षणामध्ये भाजपच्या पराभवाची  भविष्यवाणी केली जात होती.
मात्र त्यानंतर पुलवामामध्ये आतंकवादी हल्ला झाला आणि भाजपने या घटनेचा निवडणुकीमध्ये लाभ उठविण्याचा प्रयत्न सुरू केला. भारतीय सेनेच्या कामगिरीला मोदी आणि भाजपाची  कामगिरी म्हणून प्रोजेक्ट केले गेले. अच्छे दिनची भाषा बोलणारे मोदी आता स्वतःला मजबूत नेत्याच्या रूपात प्रस्तुत करत आहेत. मीडियामध्ये अंधाधूंद प्रचार सुरू आहे. सरकारच्या  दाव्यांवर प्रश्न विचारणाऱ्यांना सेनेवर अविश्वास दाखवत असल्याचे भासवण्यात येत आहे. परिस्थिती एवढी विकृत केली गेलेली आहे की, सरकारला प्रश्न विचारणेच अशक्य होऊन  बसले आहे. या परिस्थितीचा मोदींना निवडणुकीमध्ये लाभ मिळेला का? आज भारतीय जनतेसमोर दोन प्रकारच्या भारतापैकी एका भारताला निवडण्याची संधी आहे. एक भारत तो आहे  ज्यामध्ये सर्वधर्मांचे लोक राष्ट्रनिर्माणाच्या कामामध्ये संयुक्तपणे काम करू शकतील. कायद्यासमोर सगळे समान असतील आणि सर्वांना समान अधिकार असतील. हा तो भारत आहे  ज्याच्या निर्मितीसाठी आमच्या पूर्वजांनी संघर्ष केला होता. दुसरीकडे मोदी आणि भाजपाचा भारत आहे ज्यात हिंदूंच्या श्रेष्ठ वर्गाला राजकारणाच्या केंद्रात आणले जाईल, जेथे सामान्य  माणसांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाईल, जेथे दलितांसोबत उनासारख्या घटनांची पुनरावृत्ती होईल. जेथे रोहित वेमुला सारख्या लोकांच्या संस्थागत हत्या होतील. जेथे महिलांना कठुआ  आणि उन्नाव सारख्या घटनांना सामोरे जावे लागेल आणि जेथे धार्मिक अल्पसंख्यांकांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनविले जाईल. यात कुठलाही संशय नाही की मोदींची प्रचार यंत्रणा शक्तीशाली आहे. परंतु, हे ही स्पष्ट आहे की ते लोक यावेळेस तुम्हाला मुर्ख बनवू शकणार नाहीत. अच्छे दिनच्या वायद्याने मतदारांना आकर्षिक केले होते. अतिराष्ट्रवाद आणि  देशभक्तीच्या ओव्हरडोसने मतदारांना काही काळापुरते दिगभ्रमित करता येईल, परंतू, याचा प्रभाव फार काळ टिकून राहत नाही. लोक आपल्या दैनंदिन जीवनात उत्पन्न होणाऱ्या  अडचणींना विसरू शकत नाहीत. जे मुलभूत प्रश्न विरोधक देशासमोर मांडत आहेत, त्याकडे देशाची जनता नक्कीच लक्ष देईल. जे लोक महात्मा गांधी, नेहरू आणि पटेल यांच्या स्वप्नातील भारताला साकारताना पाहू इच्छितात ते यावेळेस नक्की विजयी होतील, अशी आम्हाला आशा आणि विश्वास आहे की, भारतातील लोक चांगल्या प्रकारे समजतील की  देशासाठी चांगले काय आहे? भारतीय लोकशाहीला संकीर्ण राष्ट्रवादापुढे कदापि हार पत्करू देणार नाहीत.

- राम पुनियानी

राजेशाही शासन पद्धतीतच वंशज नसल्यास पर्यायाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. लोकशाही प्रक्रियेत मात्र असा प्रश्न निर्माण होत नाही. कारण लोकशाही प्रक्रिया स्वत: पर्याय निर्माण  करीत असते. स्वातंत्र्योत्तर भारताने असे अनेक प्रसंग पाहिले जेव्हा खंबीर नेतृत्वानंतर कोण असा प्रश्न निर्माण झाला. पंडित जवाहरलाल नेहरू नंतर कोण? इंदिरागांधीनंतर कोण?  असे अनेक वेळेस निर्माण झालेल्या, प्रश्नाला या लोकशाही प्रक्रियेने पर्याय दिल्याचा इतिहास आपल्या समोर आहे. याचे मुळ कारण म्हणजे लोकाशही प्रक्रियेत पंतप्रधानपद हे सार्वभौम  नसुन ते सामुहीक नेतृत्वातुन निर्माण होते म्हणून येथे नेतृत्वापेक्षा संघठन नेहमीच वरचढ ठरते.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर सतरा वर्षे पंडित नेहरू भारताचे पंतप्रधान होते. पंडित नेहरू यांच्या समोर एक नविन राष्ट्र उभारण्याचे आव्हाण होते. स्वतंत्र देशासाठी व्यवस्था निर्माण करायची होती. नेहरूंनी स्वतंत्र भारताची सुत्रे हाती घेतली त्यावेळेस भारत सुई देखील बनवित नव्हता. देशासमोर गरीबी, भुकमरी, शिक्षण, रोजगार तसेच संरक्षण इ. सारख्या अत्यंत  गंभीर समस्या होत्या. परंतु या सर्व आव्हाणांना तोंड देत पंडित नेहरू एक नविन राष्ट्र उभारण्यात यशस्वी झाले. हे करत असतांना त्यांनी तत्कालीन महाशक्तीच्या दबावाला बळी न  पडता भारताची स्वातंत्र्य ओळख जगात निर्माण केली. पंडित जवाहरलाल नेहरूंचे नेतृत्व सर्वसमावेशक आणि उदारमतवादी होते. जनतेने नेहरूच्या भारत निर्माण अभियानास भरपूर पाठींबा दिला. सलग तीन वेळेस तयांना पंतप्रधानपद दिले. पंतप्रधानपदावर असतानाच नेहरूंचा मृत्यू झाला. परंतु नेहरूच्या लोकप्रियतेला त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात कधीच ओहोटी  लागली नाही. नेहरूंच्या नेतृत्वात काँग्रेसला पहिल्या 1951 च्या लोकसभेत 364 तर शेवटच्या 1962 च्या निवडणुकीत 361 जागा मिळाल्या हे त्यांच्या पंतप्रधान पदाच्या यशस्वी कारकीर्दीचे द्योतक आहे. परंतु नेहरूंच्या मृत्युनंतर भारतासमोर प्रश्न निर्माण झाला. नेहरू नंतर कोण? नेहरू एवढ्या उंचीचा नेता कोण? कोण पुढे नेईल नेहरूच्या विकासाचे कार्यक्रम?  भारताच्या जनतेसमोर मोठे संकट उभे राहिले. परंतु ही लोकशाही प्रक्रिया असल्यामुळे त्यांच्या नंतर लाल बहादूर शास्त्री सारखे नेतृत्व भारताला मिळाले. लालबहादूर शास्त्रींनी अत्यंत  बिकट अशा काळात भारताचे नेतृत्व समर्थपणे सांभाळले. त्यांच्या काळात पाकीस्तानने भारतावर आक्रमण केले. परंतु याच अत्यंत सौम्य वाटणाऱ्या लालबहादूरशास्त्रींनी खंबीरपणे  पाकिस्तानच्या आक्रमणाला परतावून आपल्या खंबीर नेतृत्वाची चुणुक दाखवून दिली.
त्यानंतर नेतृत्वाची धुरी सांभाळली ती श्रीमती इंदिरा गांधी यांनी. वयाच्या 49 व्या वर्षी त्या पंतप्रधान झाल्या. त्यांच्या समोर दोन मोठी आव्हाणे होती. एक दुष्काळ आणि दुसरे  पाकीस्तान. याच इंदिरा गांधींनी एकदाचा पाकीस्तानचा सोक्षमोक्ष लावला. 1971 च्या युद्धात फक्त पाकीस्तानला हरवलेच नाही तर पाकिस्तानची दोन शकले करून टाकली. इंदिरा  गांधींना प्रचंड लोकप्रियता मिळाली. लोकशाहीची गळचेपी करत त्यांनी देशांवर आणिबाणी लादली. परंतु इंदिरा गांधीची ही घोडचुक ठरली व पुढील लोकसभा निवडणूकीत जनतेने इंदिरा काँग्रेसचा धुव्वा उडविला. अत्यंत कणखर आणि चिवट अशा इंदिरा गांधीने फक्त तीन वर्षाच्या काळात पुन्हा जनतेचे समर्थन प्राप्त केले व लोकसभेत 367 जागा जिंकून पुन्हा  पंतप्रधान झाल्या. इंदिरा गांधीनी बँकेचे राष्ट्रीयकरण इ. सारखे अनेक देशहिताचे निर्णय घेतले. तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचा दरारा निर्माण केला. 1984 ला इंदिरा गांधीची  निर्घूण हत्या झाली. देश नेतृत्वहीन झाल्यासारखे वाटले. कारण त्यावेळेस त्यांचा एवढा सक्षम नेता कोणीच नव्हता. पुन्हा प्रश्न तोच निर्माण झाला इंदिरा गांधी नंतर कोण? आणि पुन्हा  एकदा लोकशाही प्रक्रियेनेच त्याचे उत्तर दिले. की ही अखंड प्रक्रिया आहे. नेतृत्व येते आणि जाते परंतु प्रक्रिया निरंतर असते व ती सातत्याने पर्याय देखील निर्माण करत असते. अवघ्या चाळीस वर्षाच्या आणि राजकारणातील अगदी शुन्य अशा वैमानिकाला देशाचा कप्तान करण्यात आले. राजीव गांधीने समर्थपणे जबाबदारी सांभाळली व भारताला माहिती आणि  तंत्रज्ञान युगात नेले. कम्प्युटर आणि टेलिफोनच्या ऐतिहासिक सुधारणा केल्या. भारताला आधुनिक युगात नेण्यात राजीव गांधी यांचा सिंहाचा वाटा आहे. राजीव गांधींना लोकसभेत  एकूण 426 असे ऐतिहासिक बहुमत होते. परंतु मंडल कमंडलमुळे पुढच्या निवडणुकीत राजीवजींचा पराभव झाला.
व्ही.पी.सिंग, चंद्रशेखर, देवगौडा, इंद्रकुमार गुजराल इ. च्या अल्पकाळाच्या शासनानंतर जेव्हा पुन्हा निवडणुका लागल्या तेंव्हा राजीव गांधीची हत्या झाली. परंतू त्यांचा पक्ष लोकसभेत  बहुमत प्राप्त करून गेला. अर्थात जनतेने काँग्रेसवर पुन्हा विेशास दाखविला होता. राजीव गांधीबद्दल प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करीत जनतेने पुन्हा काँग्रेसचे सरकार आणले. गड आला  पण सिंह गेला होता. पुन्हा नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला. पुन्हा लोकशाही प्रक्रियेने पर्याय निर्माण केला आणि नरसिम्हाराव पंतप्रधान झाले.त्यानंतर वाजपेयी सरकार सत्तेत आले.  त्यावेळेस काँग्रेस पक्ष पुर्णपणे मरगळीत गेला होता. हा पक्ष संपला की काय असे वाटत होते. पक्षाकडे सक्षम नेतृत्व नसल्यामुळे सोनिया गांधी सारख्या नवख्या स्त्रीकडे नेतृत्व देण्यात आले होते. अटलबिहारी वाजपायी सरकारने आपली टर्म पुर्ण केली. कोणताही सक्षम पर्याय नसल्यामुळे अतिआत्मविेशासात प्रमोद महाजनने मोठ्या प्रमाणावर ‘शायनिंग इंडिया’चा प्रचार  केला. वाजपेयी सरकारच्या काळात भारताने किती क्रांती केली याचा जोराने प्रोप्रोगंडा सुरू झाला. परंतु भारताच्या जनतेने शायनिंग इंडियाची वास्तविकता भाजपाला दाखवून दिली.  फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेत पुन्हा काँग्रेसपक्ष सत्ताधिन झाला. परंतु पुन्हा सक्षम नेतृत्वाचा तिढा निर्माण झाला. कोण होणार भारताचा पंतप्रधान? कोणालाच्या गावीसुद्धा  नव्हते की ब्युरोक्रेसी मधून आलेला, अत्यंत मृदृभाषी व कोणत्याही सदनाचा खासदार नसलेला व्यक्ती मनमोहनसिंग भारताचे पंतप्रधान होतील. म्हणून परंतु मनमोहन सिंगने आपली  निवड सार्थ ठरावीत भारताला जागतिक मंदिच्या काळात आर्थिक संकटातून वाचविले. जेंव्हा संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था ही बर्बादीच्या उंबरठ्यावर उभी होती त्यावेळेस भारतीय अर्थव्यवस्था त्यांनी मजबुत स्थितीत ठेवली. प्रथम सत्रात त्यांनी खंबीर भुमिका घेतल्या. परंतु दुसऱ्या टर्ममध्ये शासन आणि प्रशासनात मरगळ आली. युपीएच्या ढसाळ,  असामाधानकारक कारभाराने महागाई, भ्रष्टाचार, महिलेवरील अत्याचार असे अनेक समस्या ऐरणीवर आल्या. त्यामुळे कंटाळलेल्या जनतेने विकासाच्या एशमेधावर स्वार नरेंद्र मोदी  यांना नेतृत्वाची संधी दिली.
परंतु चार वर्षातच जनतेचा पुन्हा भ्रमनिरास झाला आहे. नोटबंदीच्या अपयशाने आणि स्वच्छता अभियान, जन-धन योजना, स्मार्ट सिटी, स्टार्टअप, स्टॅण्ड अप इंडिया अशा अनेक  योजनांच्या अपयशाने हे सरकार केवळ जुमला सरकार असल्याचे मत जनतेचे होत गेले. देशासमोर पुन्हा गरीबी, बेरोजगारी, आरोग्य, अन्याय, महिलांवरील अत्याचार कुपोषण इ. समस्येत या सरकारच्या कालावधीत कोणतेही ठोस उपाय न केले गेल्यामुळे या समस्या तीव्र होत गेल्या. सरकारचे हे अपयश लपवण्यासाठी शेवटचा युक्तीवाद केला जात आहे तो हा  की विरोधकांकडे कोणता सक्षम पर्याय आहे काय? याचा अर्थ विरोधकांकडे पर्याय नसल्यामुळे पुन्हा मजबुरीने का होईना परंतु हेच सरकार निवडणून द्यावे लागेल. हा मुळातच भ्रामक युक्तीवाद आहे. भारताच्या राजकारणाच्या इतिहास ज्याला माहित नसेल आणि जो नागरीकशास्त्रात अज्ञानी आहे तोच अशा युक्तीवादावर विेशास ठेऊ शकतो. कारण इतिहासात  अनेकदा पर्यायाचा प्रश्न निर्माण झाला आणि लोकशाही प्रक्रियेने त्याचे योग्य उत्तर दिलेले आपण पाहिले.
परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे भारतीय लोकशाहीत पंतप्रधानपद हे अमेरीकेतील राष्ट्रपती सारखे सार्वभौम नसतात. पंतप्रधान हे जरी पक्षाचा चेहरा असला तरी पक्षाचे संगठण,  त्याची विचारधारा, प्राथमिकता व एजेंड्याचा त्याच्या निर्णयावर प्रभाव आणि नियंत्रण असते. त्याचप्रमाणे संसदीय लोकशाहीत संसदेचे, विरोधी पक्षाचे आणि न्यायालयाचे देखील नियंत्रण  असते म्हणून तो एकटा सर्व निर्णय घेऊ शकत नाही. म्हणून भारतीय लोकशाहीत व्यक्तीपेक्षा पक्ष व त्याची विचारधाराच श्रेष्ठ असते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीवाचून मग तो पंडित  जवाहरलाल नेहरू असो, इंदिरा गांधी अथवा राजीव गांधी असो ही प्रक्रिया कधीच थांबत नसते. तसेच सातत्याने पर्याय देखील निर्माण करीत असते.
अपेक्षा भंग झालेल्या जनतेने मोठमोठ्या धुरीणांना पराजीत केले. भारताचा इतिहास पाहिल्यास अपेक्षाभंग झालेल्या जनतेने कधीच मजबुरीने पर्याय न निवडता नवीन पर्याय शोधला  आहे. त्यामुळे विरोधकांकडे कोणताच पर्याय नाही म्हणून मजबुरीने आम्हालाच निवडा हा भ्रामक युक्तीवाद आहे.

- अर्शद शेख
9422222332

पैठण येथील नियोजित संतपीठासाठी विद्यापीठ अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे.येत्या जूनपासून विद्यापीठातर्फे प्रत्यक्ष अभ्यासक्रम सुरू होणार आहे.या अनुषंगाने सदर लेख...
मराठी संस्कृतीच्या रथाचा आस म्हणजे संत साहित्य होय. या साहित्याने आजवर आपल्या ‘मNहाठी’ संस्कृतीला दिलं काय, याचा ताळेबंद शोधत असताना त्यानं केलेल्या प्रबोधनाचा आणि जागरणाचा ठसा आपल्या मानपटलावर पहिल्यांदा उमटतो. जीवनाचा खरा अर्थ काय असावा, त्यात कोणती अंत:सूत्रं दडली असावीत, त्याचे नेमके उद्दिष्ट तरी काय असावं, त्यात कोणती या संदर्भात अंतर्मूख होऊन, विचार करण्यास भाग पडते, त्यातल्या सुखाचा आणि दुख:चा अन्वयार्थ कोणता, हे जीवन कशासाठी आणि कसं जगावं? या संदर्भात आपल्या आणभावाचे अमृत जगाला देताना संतांनी समाजात प्रबोधनाचे महान कार्य केले. प्रत्येक संतांनी आपल्या शिकवणीतून मानवतेच्या कल्याणसाठी पराकष्ट घेतलेले आहे. एकमेकांचा आदर आणि सन्मान करणे हा संत साहित्याचा गाभा आहे. मानवतेची प्रतिष्ठा जोपर्यंत आहे तो पर्यंत संत साहित्याचा रथ वेगाने धावत राहील. शांतीच्या प्राप्तीसाठी आत्मसमर्पण करणे संतांना अभिप्रेत आहे. संत समस्त मानवजातीत शांतता प्रस्थापित करण्याचे कार्य करतात. शांतता घरात वा बाहेर नसते. ती मनात असायला हवी.
प्रत्येक संतांनी मानवतेच्या मनावर मशागत केली. तेव्हा तेथे शांतीचे गोमटे फळाची प्राप्ती झाली. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘आनंदाचे ढोही आनंद तरंग’ आनंदावर आनंदाचा तरंग म्हणजे आनंदाच्या दुधावर आनंदाची सायच आहे. ती साय संतपीठाच्या चुलीवर काढायला हवी. ती कशी येईल? तर दु:खे जाळून आनंद उकळावा लागेल, संतपीठाच्या कारखान्यात समाजात वाढत जाणारी असहिष्णुता, दांभिकता, कट्टरता,स्वार्थीपणा, जातिवाद, प्रांतवाद यांना ताव दिल्यानंतर सहिष्णुता निर्माण होईल व हरवलेला तो जगण्याचा आनंद अनुभवता येईल. विषमता, विसंवाद, उदात्त मानवी मूल्यांची घसरण कुटुंबापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंसा या जगासमोरील मुख्य समस्या आहे. जगासाठी एखादी गोष्ट निरपेक्षपणे करणे हाही मोठा त्यागच आहे. निसर्गातील प्रत्येक घटक त्यागाच्या भूमिकेतून उभा आहे, परंतु ज्या मानवाला ईश्वराने बुद्धी दिली त्या बुद्धीचा वापर तो त्यागासाठी नव्हे तर स्वार्थासाठी करतो. कर्मफलाची लालसा नसलेला हा संत त्यागी पुरषाचेच महान प्रतीक आहे. त्याग ही ईश्वराने मानवाला दिलेली एक अद्वितीय देणगी आहे. या कसोटीवर जो खरा उतरतो तो संत! ‘ज्या अंगी मोठेपण त्यास यातना कठीण’ हे यासाठीच की त्यागात समर्पणाची भूमिका आहे आणि कृतार्थतेचा आनंद आहे. परंतु हा कृतार्थतेचा आनंद प्राप्त करण्यासाठी कर्मफलाचा त्याग करावा लागतो. तेव्हा कुठे संतत्व प्राप्त होते.
संतपीठाच्या निर्मितीचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्राच्या संतांनी केलेल्या कमगिरीची ओळख होणे महत्त्वाचे आहे. त्यात संत नामदेव, संत ज्ञांनेश्वर, संत बहिणाबाई व संत तुकाराम, शेख महंमद, शहामुनी यांच्या व्यतिरिक्त अठरापगड जातीच्या संतांनी मराठी साहित्य समृद्ध केलेले आहे. या संताच्या साहित्याचा मूलगामी शोध संतपीठाच्या माध्यमातून होईल व राष्ट्रीय व सामाजिक एकात्मता जोपासणारा संदेश जाईल. 
संत साहित्य हे मानसिक स्वास्थ देणारे साहित्य आहे. आज प्रत्येक माणूस मानसिकदृष्ट्या कमकुवत होत चाललेला आहे. भौतिक सुखाच्या हव्यासामुळे मानसिकदृष्ट्या कमकुवत होत आहे. मानवाच्या मनावर संस्कार खऱ्या अर्थाने संत साहित्यामुळे होतात. संस्काराक्षम माणूस घडविण्याचे कार्य हे संतांनी केलेले आहे. त्यामुळे संताचे साहित्य वाचतांना डोवंâ आणि शरीर यांच्यात मेळ घालणे महत्त्वाचे आहे. संत साहित्य वाचतांना डोवंâ हे धडावर ठेवावं लागते तरच संत साहित्य खऱ्या अर्थाने कळते. नैतिक पराभवापासून समाजाला जर मुक्त करायचे असेल तर संत साहित्याची कास धरणे आवश्यक आहे. जागतिकीकरणाच्या युगात आपण प्रगती केली, माणूस हा बोटाच्या अंगठ्याजवळ आला परंतु हृदयात त्याला आपण समजावून घेतलेले नाही. हृदयात जर त्यांना आपण जागा दिली असती तर आज मोठ्या प्रमाणात होणाऱ्या. आत्महत्या, स्त्रीभ्रूण हत्या, बलात्कार, जातिभेदांची दुकाने बंद करण्यात आपण अयशस्वी होत आहोत. मानवी जीवन किती मौल्यवान आहे हे संतांनी वेळोवेळी आपल्या शिकवणीतून सांगितले आहे. खऱ्या अर्थाने जीवनाचं महत्त्व संत साहित्य सांगते तेच कार्य संतपीठाच्या माध्यमातून घडेल.
वृत्तपत्र वाचतांना अंगाला शाहारे आले ती बातमी अशी होती की, सख्या मुलाने आईला टेरिसवरून फेकून दिले तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझे डोळे पाणावले येथे एका आईचा पराभव झाला. कारण जगात येण्यापूर्वी हा मुलगा त्या आईच्या पोटात नऊ महिने पोटात होता हे तो विसरला. भूतकाळच्या खांद्यावरून आपण वर्तमान पाहाणे विसरलो आहे. जो भूतकाळ विसरतो त्याचे भविष्य धोक्यात आहे. या धोक्यातून समाजाला जर वर काढायचे असेल तर आज जगाला संत साहित्याची गरज आहे. जागतिकीकरणात प्रत्येक माणूस या कृत्रिम साधनांवर मेहनत करत आहे; परंतु सर्व समाजातील संतांनी साधनांवर मेहनत न करता मानवी मनावर मेहनत केलेली आपणास दिसून येते. आज पुन्हा तसेच उदयास येईल, या मेहनतेची आवश्यकता आहे. त्यासाठी संतपीठाची निर्मिती व्हावी व मूलगामी संशोधन होऊन समाजाला एक जीवन जगण्याचा मूलमंत्र मिळेल अशी शास्वतता येईल.
भारतात सामाजिक सलोखा, समता आणि एकात्मता आबाधित राहाण्यास संतांचे कार्य अप्रतिम आहे. संपूर्ण विश्वाला जोडणाऱ्या साहित्यात संत साहित्याचे महत्त्व आपल्या लक्षात आणून देण्याचे कौतुकास्पद काम संतपीठाच्या माध्यमातून होईल.
संत साहित्य हा मराठी वाङ्मयाची विलक्षण गवसणी पडली आहे. महाराष्ट्राच्या घराघरांतून, झोपड्याझोपड्यांतून, वस्त्यावस्त्यांतून, रानावणातून या संतसाहित्याचे विणाझंकार निनादत आहेत.
विविध धर्मांच्या व धर्मपंथांच्या संतकवींनी आपल्या लेखनाने मध्ययुगीन मराठी साहित्य समृद्ध केले आहे. बऱ्याच वेळा विशिष्ट संप्रदायाचे साहित्य म्हणजेच मध्ययुगीन मराठी साहित्य असे समीकरण करून वाङ्मयेतिहासाचे लेखन केले जाते, संसोधन केले जाते. वस्तुत: या धर्मसंप्रदायांच्या साहित्याबरोबर अन्य धर्माच्या व धर्मसंप्रदायांच्या संतकवींनी केलेल्या साहित्यनिर्मितीचा विचार केल्याविना मध्ययुगीन एक सेतु होते आणि समाजातील निम्नस्तरावर झालेला संमिश्र संस्कृतीचा उदय भारतातील सूफी विचारधारेच्या रूपाने झालेला दिसतो. चिश्ति परंपरेतील सूफी वहद्तुल वुजूद (अस्तित्वाची एकात्मता) आणि सुलह-कल (सार्वत्रिक शांतता) या दोन सिद्धान्तांवर श्रद्धा असणारे होते. हे दोन्ही सिद्धान्त हिंदू व मुस्लिम समुदायामध्ये सेतु बांधण्यास उपयुक्त ठरणारे होते. मानवी अस्तित्वाच्या एकात्मतेच्या पहिल्या सिद्धान्ताने हिंदू–मुस्लिमांमधील भिंत उद्ध्वस्त केली आणि आपण सगळे एक आहोत आणि आपण सर्व जण खऱ्या मानवाचा एक अंश आहोत. एक आविष्कार आहोत ही जाणीव निर्माण केली. ‘सुलह-कुल’ (सार्वत्रिक शांतता) या सिद्धान्ताने दोन समुदायांमध्ये मित्रत्वाचं नातं निर्माण केलं. सूफी संतांनी भारतातील प्रत्येक धर्माचे आदर केला आहे. कोणताही संत कोणत्याही धर्माचा अनादर करत नाही हे संतांचे विशेष असते. त्यामुळे हिंदू-मुस्लिम गुरु-शिष्य परंपरादेखील आपल्याला संतामध्ये दिसून येते.
जगासाठी एखादी गोष्ट निरपेक्षपणे करणे हाही मोठा त्यागच आहे. त्यागाच्या भूमिकेतून उभे राहण्याची शिकवण संतांनी सबंध समाजाला दिली. आजवरच्या शतकामध्ये संतसाहित्याने समाजाला जे मार्गदर्शन केले आणि जनमानसावर जे संस्कार केले त्यामुळे त्या त्या काळातील काही समस्यांना सामोरं जाण्याची मानसिकता या साहित्यानं निश्चितपणे निर्माण केली. चातुर्वण्र्य व्यवस्थेमुळे निर्माण झालेला विषमतामूलक जानिवेला व विचाराला विरोध करायला महानुभाव संप्रदायासारख्या संप्रदायांनी शिकवले. वीरशैव संतांनी समाजाचं उत्तरदायित्व पार पाडणारे कोणतेही कर्म अपवित्र नसते. त्यामुळे ते कर्म करणारा तो वर्गही अपवित्र नसतो हा विचार समजामानवावर ठसविला. ज्ञानदेव, नामदेव, तुकोबा, शेख महंमद, शहा मुंतोजी, शहामुनी इत्यादी संतांनी अद्वैत तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून एकात्मतेचा पुरस्कार केला. जैन संतांनी अहिंसा, सहिष्णुता, स्त्री-पुरुष समानता याचं महत्त्व प्रतिपादिले. सूफी संतांनी धार्मिक सामंजस्य आणि एकात्मतेची शिकवण दिली. शेख महंमद, शहा मुंतोजी बामणी, शहामुनी आदि मुस्लिम आणि सूफी संतांच्या काही शाखा यांचा संबंध इथं लक्षात घ्यायला हवा. नागेश संप्रदायनं जातीभेदमधील समन्वयात्मक दृष्टिकोन केवळ प्रतिपदिलाच नाही तर प्रत्यक्ष आचरणात आणला. समर्थ संप्रदायाने प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घातली. नाथ संप्रदायने योगतील चित्तवृत्तींनिरोधच्या सूत्राचा पुरस्कार करून मन:शांतीचा मार्ग दाखविला आहे.
संत साहित्याचा अभ्यास केल्यानंतर प्रत्येक संताचे माणसाशी असलेले नाते जवळचे होते. संताच्या सहवासाने नास्तिक हा आस्तिक होतो. ‘जाऊ देवाचिया गावा देव देईल विसावा’ या ओळीतील शांतरस मनात पोहचू लागला की एक आल्हाददायक आनंद प्राप्त होतो. म्हणूनच विसावा हा शब्द शांतीचे प्रतीक आहे. हा विसावा गुगलवर मिळणार नाही अथवा फेसबूकवर मिळणार नाही. तर हा विसावा संताचे कार्य अभ्यासल्यानंतर त्यापेक्षा पुढे आचारणनन्तर प्राप्त होऊ शकतो. त्यामुळे हा विसावा निर्माण करणारे संतपीठ विश्वशांतीची प्रयोगशाळा आहे असे म्हणणे उचित ठरेल.


- प्रा. आरिफ ताजुद्दीन शेख

नागपूर (डॉ एम ए रशीद)-
‘स्त्रीविरुद्ध अत्याचार’ जमा़अत ए इस्लामी हिंदच्या थीमवर हे कार्यक्रम होत आहेत. सर्व प्रकारचे अधिकार असूनदेखील स्त्रीला अनेक अत्याचार सहन करावे लागतात. समाजात बलात्कार, शोषण, घरगुती हिंसाचार, हुंडाबळी असे अनेक अत्याचार होत आहेत. स्वातंत्र्याच्या नावावर महिलांचे शोषण केले जात आहे. भारतीय नारीची संस्कृती आणि सभ्यता प्रभावित होत आहे. विरोध केल्यास रूढीवादी म्हणून यावरून लक्ष भटकविण्यात येते.
‘स्त्रीचा होऊ नये अपमान- हाच आहे इस्लामचा संदेश’ या विषयावर नागपुर महिला विभागाच्या शहर अध्यक्षा डॉ. सबिहा हाशमी यांनी अध्यक्षपदावरून संबोधन केले. हा कार्यक्रम जेआईएच नागपुर वेस्ट महिला विभागाच्या वतीने जा़फरनगरच्या ओल्ड चौपड़े लान येथे आयोजित करण्यात आला होता. त्यांनी सांगितले की इस्लाममधे स्त्रीसोबत उत्तम व्यवहार करण्याचा आदेश दिला आहे, दांपत्य जीवन यशस्वी बनविण्यास पतिपत्नीचे अधिकार सांगितले आहे, ़कुरआनमधे पत्नीसंबंधी सांगितले आहे की पत्नीमधील एक गोष्ट तुम्हाला नापसंद असेल तर दुसरी चांगली गोष्ट शोधा. त्यांनी सांगितले की सामाजिक, आर्थिक शोषण आणि अर्धनग्नतेचा पोषाख यावर प्रतिबंध लागायला हवेत, कुठलाही धर्म महिलांवर अत्याचार करण्यास सांगत नाही.
दैनिक भास्कर, नागपूरच्या वरिष्ठ पत्रकार सोनाली सिंह यांनी ‘भारतीय समाजात स्त्री किती सुरक्षित किती असुरक्षित’ या विषयावर प्रकाश टाकत सांगितले की सैद्धान्तिक रूपाने स्त्रियांना सुरक्षित मानले जाऊ शकते, परंतु हे सत्य नाही. आधुनिक आणि वैज्ञानिक युगात स्त्रीला अनेक त्रास होत आहेत, टेक्नॉलॉजीचा व्यवहार स्त्रीविरुद्ध होत आहे, मोबाइल आणि सोशल मीडिया याचं माध्यम आहे. 
साकार फाउंडेशनच्या वैशाली चोपड़े यांनी ‘समाजाच्या प्रगतीमधे स्त्रीची भूमिका’ या विषयावर विचार व्यक्त करताना सांगितले की भक्ती समाजपरिवर्तनचे मुख्य अंग आहे, ती आम्हाला निष्ठा शिकविते. ‘मीराबाई’चा संदर्भ घेत त्या आपले संबोधन करीत होत्या. एका आईनेच शिवाजीमधे आदर्श संस्कार घडविले होते.
नगरसेवक फरहत कुरैशी यांनी या विषयावर प्रकाश टाकत म्हटले की या हिंसेला थांबवायचे असेल तर आपल्याला आपल्या मुलांना असे संस्कार द्यावे लागतील, अशा प्रकारे शिक्षित करावे लागेल की या प्रकारच्या हिंसा ते सहन करणार नाहीत व कुणावर करणारदेखील नाही. महिलांना मुलांकडे खास लक्ष देण्याची गरज आहे की त्यांनी टीव्हीवर काय बघावे, इंटरनेटवर काय सर्पिंâग करावे, कुणाशी कशा प्रकारे वागावे व समोरच्याला किती अधिकार द्यावेत जेणेकरून या हिंसेला समाजात वावच राहणार नाही.  
मराठा सेवा संघाच्या प्रेमलता जाधव यांनी ‘मुलगी वरदान, स्त्रीचा सन्मान’ या विषयावर प्रकाश टाकताना म्हटले की आजचा दिवस आम्ही सावित्रीबाई पुâले, जिजाऊ माता, ़फातिमा शेख यांना समर्पित करतो. यांच्याच परिश्रमने स्त्रीला शिक्षणाप्रती जागरूक बनविले होते.
कार्यक्रमाची सुरुवात अ़जरा परवीन यांच्या कुऱआन पठणाने झाली आणि संचालन आबिदा ़खान यांनी केले. महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास विविध समाजांतील महिला व मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

आल्या सार्वत्रिक निवडणुका. आचारसंहिता लागू झाली. राजकीय पक्षांची प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. मात्र या २०१९ मधील लोकसभेच्या निवडणुकीचे एक वैशिष्ट्य म्हणजे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भारतातील २९ राज्यांमध्ये १८ ते २२ वयोगटातील तरुण या वेळी पहिल्यांदा मतदान करणार आहेत आणि २८२ जागांवर लढणाऱ्या उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत. बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, झारखंड, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमध्ये युवा मतदारांच्या संख्येत अधिक वाढ झालेली आहे. प्रांतीय हित-स्वार्थाच्या आधारावर त्यांचे मतदान असेल म्हणजेच अन्न, वस्त्र, निवारा याचबरोबर रोजगाराच्या मुद्द्यांवर त्यांचा भर असेल. कोणत्याही राष्ट्रीय मुद्द्यावर अथवा दार्शनिक व्हीजनला ते भुलणार नाही. सर्वसामान्यपणे प्रगत देशांमध्ये उच्चशिक्षित परिसर तरुणांच्या कलमापनाचे माध्यम असते. मात्र आपल्याकडे त्या परिसरांपर्यंत अधिकांश तरुण अजूनपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. राजकीय-सामाजिक असहिष्णुतेत वाढ अथवा सनातनी जातिव्यवस्था यासारख्या विषयांवर उघड चर्चा असताना अनेक माथेफिरू तरुणांचे राष्ट्रवादाचे तथाकथित प्रेम ऊतू जाऊ लागते आणि सौहार्दपूर्ण वातावरण हिंसक होते. दुसरीकडे जे तरुण सरकारी शाळांमधून बाहेर पडतात त्यांच्यापैकी अधिकांश गरिबीमुळे विद्यापीठात जाऊ शकत नाहीत विंâवा चांगल्या विद्यापीठांऐवजी कर्ज घेऊन वा जमीन विवूâन खाजगी शिक्षण संस्थांमध्ये येतात. तेथील वॅâम्पसमध्ये त्यांना प्लेसमेंट मिळण्याची अपेक्षा असते. बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ (सीएमआयइ) च्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी २०१९मध्ये देशातल्या बेरोजगारी वाढीचा दर ७.२ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. फेब्रुवारीमध्ये २०१८मध्ये हा दर ५.९ टक्के इतका होता. गेल्या अडीच वर्षातील बेरोजगारीचा हा सर्वाधिक आकडा आहे. २०१६ पासून १.८ कोटी लोक बेरोजगार झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. ‘सीएमआयइ’चे प्रमुख महेश व्यास यांनी म्हटले आहे की, ही आकडेवारी देशभरातल्या लाखो कुटुंबीयांच्या सर्वेक्षणावर आधारित आहे. फेब्रुवारी २०१९मध्ये ४० कोटी लोक नोकरीला असण्याचा अंदाज आहे, गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात हीच संख्या ४०.६ कोटी इतकी होती. भपकेबाज आकडेवारी सादर करून देशातील सत्ताधारी मंडळींकडून देशाच्या प्रगतीची गती बुलेट ट्रेनपेक्षाही अधिक दाखविली जात आहे. गेल्या २-३ दशकांत देशाची आर्थिक प्रगती झपाट्याने झाली, पण त्या तुलनेत देशातल्या नोकऱ्यांचे प्रमाण मात्र कमी झाले आहे. आज देशात उच्चशिक्षित तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. तर इतर अशिक्षित विंâवा जेमतेम शिकलेल्यांमध्ये ते ५-६ टक्के आहे, असे एक अहवाल सांगतो. अझीम प्रेमजी विद्यापीठातील ‘सेंटर फॉर सब्स्टेनेबल एम्प्लॉयमेंट’ने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या ‘स्टेट ऑफ वर्विंâग इंडिया – २०१८’ (एसडब्ल्यूआय) अहवालात देशातल्या रोजगाराच्या स्थितीबाबत काही निरीक्षणे मांडण्यात आली आहेत. हा अहवाल राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण (एनएसएस), श्रम मंत्रालयाच्या नोकरी-बेरोजगारीचे सर्वेक्षण (इयूएस) आणि ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडिययन इकॉनॉमी’ (सीआयएमइ) या खासगी संस्थेच्या आकडेवारीवर आधारित आहे. १९७० आणि १९८० च्या दशकांत जीडीपी वाढीचा दर ३ ते ४ टक्के असतानाही रोजगारनिर्मितीचा दर २ टक्के होता. पण १९९० नंतर आणि विशेषत: गेल्या दशकात जीडीपीची वाढ १० टक्क्यांपर्यंत झाली असताना रोजगारनिर्मितीचा दर घसरून एक टक्क्यावर आला आहे, असे हा अहवाल सांगतो. देशाची आर्थिक प्रगती झपाट्याने होत गेली. पण ही प्रगती अर्थव्यवस्थेतल्या काही ठराविक क्षेत्रांतच झाली. उदाहरणार्थ, वित्तीय सेवा, बांधकाम, आयटी या सेवा क्षेत्रांपुरती ही वाढ मर्यादित राहिली. असे असतानाही या क्षेत्रात नोकरीच्या संधी पुरेशा उपलब्ध झाल्या नाहीत. ज्या क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध होत्या जसे की, उद्योग, उत्पादन क्षेत्र, सार्वजनिक सेवा या क्षेत्रांची वाढ झालीच नाही. आरोग्य, शिक्षण, मूलभूत सुविधा या क्षेत्रात नोकरीच्या बऱ्याच संधी होत्या. पण सरकारने यामध्ये भरघोस गुंतवणूक केली नाही, असे हा अहवाल सांगतो. गेल्या पाच वर्षांत लक्षावधी शेतकऱ्यांनी आणि तंत्रशिक्षणाच्या उच्च वेंâद्रांमध्ये व ट्यूशन संस्थांमधील शेकडो विद्याथ्र्यांनी भविष्य अंधकारमय असल्याचे समजून आत्महत्या केली. तरुण पिढीला वेगळ्याच मार्गाने वापरून घेतले जात आहे. त्यांना रक्ताची चव चाखविली गेली आहे. त्यांची माथी भडकविली जात आहेत. याची सवय सुनियोजित पद्धतीने लावली जात आहे. अशा प्रकारे तरुण पिढीला बरबाद केले जात आहे. व्यवस्थेविरूद्ध बोलणाऱ्या विद्याथ्र्यांना तुरुंगात डांबले जात आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला तरुणांमध्ये संभ्रमावस्थेची वाढ झाल्याचे दिसून येते. बेरोजगारी, शिक्षणसंस्थांची कमतरता, सरकारी शिक्षणप्रणालीमध्ये सरकारी हस्तक्षेप यामुळे देशातील तरुणवर्ग आंदोलने करू लागला आहे. काश्मीर अथवा पूर्वोत्तरचा मुद्दा सोडला तरी तीन तलाक, सबरीमाला मंदिर प्रवेश, सीबीआयमधील गोंधळ, शस्त्रखरेदीतील तथाकथित घोटाळे चव्हाट्यावर आणणे आणि लपविणे यामध्ये व्यस्त असलेला सत्तापक्ष आणि विरोधी पक्ष दोघांमुळे त्यांच्या संभ्रमावस्थेत वाढ होत आहे. तरीही तरुण मतदारांमुळे आगामी पाच वर्षांचा भारतीय राजकीय नकाशा निश्चित करील. तरुण मत अनेक नवीन दरवाजे उघडू शकते आणि त्यांना बंददेखील करू शकते.
  
­-शाहजहान मगदुम (मो.:८९७६५३३४०४)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीला आता दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र 
मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करण्याआधी रिझव्र्ह बँकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली होती. या बैठकीत मोदी सरकारकडून नोटाबंदीसाठी जी कारणे सांगण्यात आली होती त्यापैकी बहुतेक कारणे बँकेच्या संचालक मंडळावर असलेल्या संचालकांना मान्य नव्हती. मात्र केवळ  जनहिताचा विचार करुन रिझव्र्ह बँकेच्या संचालक मंडळाने मोदी सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा दिला. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, नोटाबंदी आधी सहा महिन्यांपासून वेंâद्र सरकार आणि रिझव्र्ह बँकेच्या संचालक मंडळा यासंबंधित चर्चा सुरु होती. काळा पैशाला चाप बसावा, बनावट नोटा चलनातून बाद करण्यासाठी आणि ऑनलाईन व्यवहाराच्या माध्यमातून डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी नोटाबंदी करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. नोटाबंदीच्या काही तास आधी रिझव्र्ह बँकेच्या संचालक मंडळातील काही सदस्यांनी नोटाबंदीला असहमती दर्शविली होती. काळा पैसा हा फक्त नोटांच्या स्वरूपात नसून सोने, बेनामी मालमत्ता या स्वरूपातदेखील असल्याचे रिझव्र्ह बँकेच्या काही संचालकांनी सांगितले होते. त्यामुळे नोटाबंदीचा परिणाम होणार नाही असेही सांगण्यात आले होते.
८ नोव्हेंबर, २०१६ मध्ये केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाने काय आणि किती फायदा झाला, हे सरकार ढोल वाजवून सांगत असले, तरी देशात उद्योग आणि रोजगाराच्या स्थितीवर त्याचा काय परिणाम झाला, याचा अभ्यास करण्यात आलेला नाही, हे मोदी सरकारने प्रथमच संसदेत मान्य केले. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी असा निश्चित अभ्यास सरकारने केलेला नाही, असे यापूर्वीच राज्यसभेत सांगितले होते. राज्यसभेचे खासदार एलामाराम करीम यांनी जेटली यांना नोटाबंदीच्या निर्णयाचे उद्योग आणि रोजगारावर नेमके  काय काय परिणाम झाले आणि झाले असल्यास त्याचा तपशील मागितला होता, परंतु अर्थमंत्री जेटली यांनी असा काही अभ्यास झालेला नाही, असे सांगत यासंबंधी तपशील देण्यात असमर्थता व्यक्त  केली होती. जेटली यांनी असेही स्पष्ट केले की, नोटाबंदीनंतर नवीन चलनी नोटा छापण्यासाठी झालेला खर्च रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाने तिच्या खातेपुस्तकात स्वतंत्रपणे दाखविलेला नाही. वर्ष २०१५-२०१६ (नोटाबंदीच्या निर्णयाच्या आधी) वर्षात चलनी नोटा छपाईवरील खर्च ३४.२१ अब्ज रूपये होता. तथापि, २०१६-२०१७ वर्षात हाच खर्च ७९.६५ अब्ज रुपये इतका होता, तर २०१७-२०१८ वर्षात नोटा छपाईवर ४९.१२ अब्ज रुपये खर्च झाले, असे जेटली यांनी उत्तरात म्हटले, ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री पंतप्रधानांनी ५०० व १००० रू पयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा ऐतिहासिकनिर्णय जाहीर केला. आणि देशभर एकच हाहाकार माजला होता. यापूर्वी १६ जानेवारी १९७६ रोजी तत्कालीन राष्ट्रपती निलम संजीव रेड्डी यांनी १ हजार रूपयांच्या नोटा व त्यापुढील चलन रद्द करण्याचा वटहुकूम जारी केला होता. मात्र या निर्णयामुळे तेव्हा आत्ताच्या एवढा गहजब व हाहाकार माजला नव्हता. कारण तत्कालीन निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन व्यवहारात फारसा फरक पडलेला नव्हता, कारण त्यावेळी १ हजार रूपयांच्या व त्यावरील चलन हे फक्त अतिश्रीमंत किंवा गर्भश्रीमंत व्यक्तीकडेच असायचे. सामान्य नागरिकांच्या त्या दृष्टीस खचितच पडायच्या. याचे कारण त्यावेळी देशातील दरडोई उत्पन्न कमी होते, शिवाय आत्ताच्या एवी महागाई गगनाला भिडली नव्हती, नोकरदारांना पगारसुध्दा बेतासबात होते. त्यामुळे क्रयशक्तीसुध्दा माफक होती. १०० रूपयांची नोट घेऊन बाजारात कुणी गेला तर त्यावेळी किमान चार-पाच पिशव्या भरून बाजार घरी आणला जायचा. अलीकडे या १०० रूपयांचे बाजारमूल्य केवळ १ रूपयाएवे झाले आहे. त्यामुळे ५०० रूपयाची नोट घेऊन बाजारात गेले तर जेमतेम १ पिशवीसुध्दा मालाने भरत नाही. हे वास्तव आहे रूपयाचे मूल्य कमालीचे घटले आहे. त्यामुळे मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदीचे नेमके फलित काय? हे सर्वसामान्यांना कळणे अशक्यप्राय झाले होते.
बनावट नोटांना आळा घालणे, भ्रष्टाचाराला लगाम घालणे आणि काळा पैसा बाहेर काणे ही तीन मुख्य कारणे मोदी सरकारने ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यासाठी दिली होती, पण पंतप्रधान मोदींचा हा दावा जेटली यांच्या विधानाने आणि रिझ्व्र्ह बँकेने नुकतेच जाहीर केलेल्या वक्तव्यामुले पोकळ व निराधार ठरला आहे.
नोटांबंदीच्या निर्णयाच्या काळात देशात १७ लाख कोटींचा नोटा चलनात असल्याची माहिती सरकारच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले होते, यापैकी ४०० कोटींच्या बनावट नोटा चलनात असल्याचा रिझव्र्ह बँकेने दावा केला होता, अर्थात एकूण चलनात असलेल्या बनावट नोटांचे प्रमाण अवघे ०.२८ टक्के एवेच होते. याचाच अर्थ पाचशे व एक हजार रूपयांच्या चलनात असलेल्या ८६ टक्के नोटा खऱ्याच होत्या, मग ०.०२८ टक्के बनावट नोटांकरिता ८६ टक्के चलनातील खऱ्या नोटा रद्द करण्याचा निर्णय कशासाठी घेण्यात आला? या प्रश्नाचे आजवर कुणीच उत्तर देत नाही.
वास्तविक  पाहाता जगात सर्वाधिक बनावट चलनांचा प्रश्न अमेरिकेसमोर उभा आहे. कारण अमेरिकन डॉलर्समध्ये सर्वाधिक बनावट डॉलर्सचे प्रमाण आहे. त्यावर त्यांची करडी नजरही आहे. डॉलर्समध्ये बनावटगिरी होत आहे हे वास्तव असतांना अमेरिकन सरकारने सर्वच डॉलर्स (चलन) अवैध ठरविण्याचा मार्ग कधीही स्वीकारलेला नाही. हे लक्षात घेणे आवश्यक आहे. बनावट नोटांना आळा घालण्यासाठी असा आततायीपणे निर्णय घेणे योग्य नव्हते ते अलीकडे मोठ्या प्रमाणात सापडलेल्या नवीन चलनातील बनावट नोटांमुळे सिध्द झाले आहे.
नोटाबंदीच्या निर्णयामागे दुसरे कारण दिले जात होते ते म्हणजे भ्रष्टाचाराला आळा घालणे, पण हा दावासुध्दा आता फसला आहे, कारण गेल्या दोन वर्षात अनेक सरकारी बाबू भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेरबंद झाले आहेत. केवळ महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात लाच घेतांना सरकारी अधिकारी सापडल्यांच्या अनेक घटना अलीकडेच घडलेल्या आहेत. तसेच देशभरातील वृत्तपत्रांतून दरारोज भ्रष्टाचाराच्या बातम्या वाचावयास मिळत आहे. म्हणजेच नव्या नोटा चलनात आणल्या की भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे; हे मोदी सरकारचे म्हणणे तर्क संगत नाही हे सिध्द झाले आहे.
काळा पैसा बाहेर काढणे हे तिसरे कारण मोदी सरकारनी दिले होते. मात्र गेल्या दोन वर्षात किती काळा पैसा बाहेर काला, याचे उत्तर सध्यातरी मोदी सरकार देऊ शकत नाही हे वास्तव आहे. या संदर्भात नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर येण्यास काहीही मदत होणार नाही अशी ठाम भूमिका त्यावेळी रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मांडली होती, मात्र या त्यांच्या विधानाकडे कानाडोळा करून त्यांची मुदत संपल्याबरोबर घाईगडबडीने मोदी सरकारने नवीन गव्हर्नर उर्जीत पटेल यांची नियुक्ती केली व निश्चलनीकरणाचा आपला निर्णय रेटला होता. वास्तविक त्यावेळी अर्थतज्ज्ञांचा या निश्चलनीकरणाला तीव्र विरोध होता, पूर्ण अभ्यास न करता हा निर्णय घेतलेला आहे. असे अनेक व्यासंगी व वास्तविक अर्थतज्ज्ञ म्हणत होते. 
नोटाबंदीमुळे देशात उद्योग आणि रोजगाराच्या स्थितीवर काय परिणाम झाला याचा अभ्यास करण्यात आलेला नाही. ही राज्यसभेत अर्थमंत्र्यांनी दिलेली कबुली आणि तपशील देण्यात व्यक्त  केलेली असमर्थता निश्चितच मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय फसलेला आहे हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे; अर्थात या निर्णयाचा फटका गोरगरीब व सर्वसामान्यांना सर्वाधिक बसला आहे. हे वास्तव आहे.
गरीबांचे कर्दनकाळ आणि धनवंतांचे दाते होण्याच्या या मोदी सरकारच्या निर्णयावर भाष्य करतांना कॉ. सीताराम येचूरी यांनी म्हटले होते की, मगर मारण्यासाठी तलाव रिकामे केले जातात तेंव्हा मगर मरत नाही, कारण त्यांना पाण्यातल्यासारखेच जमिनीवरही जिवंत राहता येते, मात्र तलाव कोरडे करण्याच्या या प्रयत्नात गरीब मासे मात्र मरत असतात; अर्थात नोटाबंदीचा सर्वाधिक त्रास गरीब व मध्यमवर्गीयांनाच झाला आहे. श्रीमंत व बडे भांडवलदार यांना कसलाही त्रास झाल्याचे दिसले नाही. नोटाबंदीमुळे उद्योग आणि रोजगार या दोन्ही क्षेत्रावर अपयश तर आले आहेच शिवाय इतर क्षेत्रावर कोणते यश आले? याचे उत्तरही स्पष्टपणे मिळत नाही.

– सुनीलकुमार सरनाईक

माननीय अब्दुल्ला (र.) यांचे निवेदन आहे की, एक मनुष्य प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांच्याजवळ आला आणि प्रेषित यांना म्हणाला, मी तुमच्याशी प्रेम राखतो. प्रेषितांनी सांगितले, जे तुम्ही बोलता, त्यावर विचार करा. त्याने तीन वेळा म्हटले की, ईश्वराची शपथ, मी तुमच्याशी प्रेम राखतो. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जर तुम्ही आपल्या बोलण्यात सच्चे असाल तर दारिद्र्य आणि तंगीचा मुकाबला करण्यासाठी शस्त्रे जमा करा. जे लोक माझ्याशी प्रेम राखतात, त्यांच्या दिशेने गरीबी, भूक, तंगी पुरापेक्षा जास्त वेगाने सरसावून येतात.       (हदीस - तिर्मिजी)
भावार्थ- एखाद्याशी प्रेम करणे व त्याला प्रिय बनविण्याचा अर्थ काय असतो? हाच की त्यांच्या पसंतीस आपली पसंत व त्यांच्या नापसंतीस आपली नापसंत ठरवून घेणे. आपला ‘प्रिय’ ज्या मार्गावर चालतो. त्यास आपला जीवन मार्ग बनवावे. त्याच्या सानिध्यासाठी, सहवासासाठी आणि त्याच्या प्रसन्नतेसाठी सर्वस्व अर्पण केले जावे आणि बलिदानासाठी सदैव तत्पर असावे. प्रेषित मुहम्मद (स.) यांना प्रिय बनविण्याचा अर्थ, त्यांचे एक एक पाउलचिन्ह जाणून घ्यावे व त्यानुसार आचरण करावे. प्रेषित (स.) यांनी ज्या मार्गात आघात सहन केले त्या मार्गात आघात सोसण्याचा दृढ संकल्प केला जावा. ‘गारे हिरा’ हे प्रेषित (स.) यांचा मार्ग आहे तसेच ‘बद्र व हुनेन’ देखील प्रेषितांचा मार्ग आहे. सत्य धर्माच्या मार्गावर चालण्याचा परिणाम दारिद्र्य, तंगी, उपासमार, इत्यादि गोष्टींचा मारा होईल. हे सर्वविदीत आहे की आर्थिक आघात सर्वात मोठा आघात आहे. याचा मुकाबला फक्त अल्लाहवर भरवसा आणि अल्लाहशी असलेल्या प्रेमानेच होऊ शकतो. ईमानधारक मनुष्य अशावेळी असा विचार करतो की, अल्लाह माझा कार्यसाधक आहे. तो माझा पाठीराखा आहे. मी निराधार नाही. आणि शेवटी मी एक अल्लाहचा गुलाम आहे. गुलामाचे काम फक्त आपल्या मालकाची आज्ञा पाळणे, त्याच्या मर्जीनुसार चालणे. मी ज्याच्या कामावर लागलो आहे तो अतिशय दयावान आणि न्यायी आहे. माझी मेहनत वाया जाऊ शकत नाही, त्याचे (ईश्वराचे) अशा प्रकारे विचार करणे प्रत्येक संकटाला सोपे करणे. शैतानाच्या प्रत्येक शस्त्राला निष्काम करून टाकते. नबुवत/प्रेषितत्त्व, हे एक अधिकारपद आहे. सर्वोच्च अल्लाहकडून त्यासाठी विशिष्ठ व्यक्तीची निवड व नियुक्ती होत असते. अशा निवडलेल्या व नियुक्ती झालेल्या व्यक्तीच्या स्वत:च्या इच्छेलाही काही वाव नसतो. माणसाच्या स्वत:च्या निर्धार व इरादा, धडपड व प्रयत्नांनी, प्रेषितत्त्व प्राप्त होत नसते. आपला प्रेषित कुणास करावा याचा निर्णय घेणारा तो अल्लाहच आहे. ‘‘अल्लाह उत्तम प्रकारे जाणतो की आपल्या प्रेषितत्त्वाचे कार्य कुणाकडून घ्यावे व कसे घ्यावे. (सूरह अनआम). जपजाप्य व ध्यानमग्न आणि तपश्चर्येमुळे मनुष्य अध्यात्मिक दृष्टीने उच्च होऊ शकतो. परंतु हे शक्य नाही की आपल्या या खडतर तपश्चर्येच्या बळावर तो प्रेषितत्त्वपदापर्यंत पोहोचावा व आपल्या तपांमुळे प्रेषितत्त्वाने उपकृत व्हावा. प्रेषितत्त्व हे एक अधिकारपद आणि ठराविक कामगिरी आहे. कोणतेही अधिकारपद स्वत: होऊन केवळ आपल्या प्रयत्नांनी मिळत नसते तर कुणा समर्थ अधिकारीच्या फर्मानाने व नियुक्तीनेच ते प्राप्त होऊ शकते. म्हणून प्रेषितत्त्व, जे एक महान रब्बानी-दैवी पदाधिकार आहे, त्यालाच मिळू शकते ज्यासाठी सृष्टीच्या व मानवजातीच्या खऱ्या शासकाकडून नियुक्ती आदेश मिळाला असेल. प्रेषित जे काही आदेश देतात, आणि दीन, शरिअत (धर्म व शास्त्र) म्हणून ज्या ज्या गोष्टींची शिकवण देतात, ती त्यांच्या स्वत:कडून नसते तर सर्वोच्च अल्लाहकडून असते. सर्वच प्रेषित म्हणतात, ‘‘मी तुम्हाला आपल्या पालनकत्र्याच्या आज्ञा ऐकवित आहे व त्याचाच संदेश ऐकवित आहे पोहोचवित आहे.’’ (सूरह आअराफ) ‘‘ज्याने प्रेषिताचे आज्ञापालन केले त्याने अल्लाहचे आज्ञापालन केले.’’ (सूरह निसा).

(५९) हे श्रद्धावंतानो! आज्ञापालन करा अल्लाहचे, आज्ञापालन करा पैगंबराचे, आणि त्या लोकांचे जे तुमच्यापैकी जबाबदार (आदेश देण्यासाठीचे अधिकारी) असतील. मग जर तुमच्या दरम्यान एखाद्या बाबतीत वाद निर्माण झाला तर त्याला अल्लाह व पैगंबराकडे न्या.८९ जर तुम्ही खरोखरच अल्लाह व अंतिम दिनावर श्रद्धा बाळगत असाल. हीच एक योग्य कार्यपद्धती आहे आणि शेवटाच्या दृष्टीनेदेखील अधिक चांगली आहे.९०
(६०) हे नबी (स.)! तुम्ही पाहिले नाही काय त्या लोकांना जे दावा तर करतात की आम्ही श्रद्धा ठेवतो आहोत त्या ग्रंथावर जे तुमच्याकडे अवतरविले गेले आहे आणि त्या ग्रंथावर जे तुमच्याअगोदर अवतरविण्यात आले होते परंतु इच्छितात असे की आपल्या बाबींचा निवाडा करण्यासाठी तागूतकडे (विद्रोही लोक) रुजू व्हावेत. वस्तुत: त्यांना तागूतशी द्रोह करण्याचा (इन्कार) आदेश देण्यात आला होता.९१ शैतान त्यांना भटकवून सरळमार्गापासून फार लांब नेऊ इच्छितो.


८९) ही आयत इस्लामच्या पूर्ण धार्मिक, सांस्कृतिक आणि राजनैतिक व्यवस्थेचा मूलाधार आणि इस्लामी राज्याच्या संविधानाचे पहिले कलम आहे. यात खालीलप्रमाणे चार शाश्वत नियम दिले आहेत.
(१) इस्लामी जीवनव्यवस्थेत आदेश देणारा अधिकारी वास्तविकपणे अल्लाह आहे. एक मुस्लिम सर्व प्रथम अल्लाहचा दास (बंदा) आहे. बाकी जे काही आहे यानंतर आहे.
(२) इस्लामी जीवनव्यवस्थेचा दुसरा मूलभूत अंग (तत्त्व) पैगंबर मुहम्मद (स.) यांचे आज्ञापालन आहे. हे अल्लाहच्याच आज्ञापालनाचे एक व्यावहारिक रूप आहे. आम्ही अल्लाहच्या आज्ञेचे पालन फक्त त्याच पद्धतीने करू शकतो की पैगंबराचे आज्ञापालन केले जावे. पैगंबराच्या आज्ञापालनातच अल्लाहचे आज्ञापालन आहे. अल्लाहचे कोणत्याच आज्ञांचे पालन पैगंबर मुहम्मद (स.) यांचे प्रमाणाशिवाय विश्वसनिय नाही. पैगंबर मुहम्मद (स.) यांचे अनुकरण न करणे म्हणजे अल्लाहशी द्रोह करण्यासारखे आहे.
(३) उपरोक्त दोन्ही आज्ञापालनानंतर त्यांच्या प्रकाशात तिसरे आज्ञापालन जे इस्लामी जीवनव्यवस्थेत मुस्लिमांवर अनिवार्य आहे. ते म्हणजे त्या सर्व जबाबदार मुस्लिम व्यक्तींचे (नेत्यांचे) आज्ञापालन होय. जबाबदार म्हणजे ते सर्वजण जे मुस्लिमांच्या सामूहिक जीवनव्यवहाराचे नेते आहेत. मग ते मानसिक, वैचारिक मार्गदर्शन करणारे विद्वान िंकवा राजनैतिक मार्गदर्शन करणारे लीडर (राजनेता) िंकवा जज (न्यायाधीश) तसेच सामाजिक, सांस्कृतिक व्यवहारात लोकांना मार्गदर्शन करणारे बुजुर्ग आणि सरदार असोत. या सर्वांचा समावेश जबाबदार नेत्यामध्ये होतो.
(४) चौथे म्हणजे जे शाश्वत आणि निश्चित नियम आहे ते इस्लामी जीवनव्यवस्थेत अल्लाहचा आदेश आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांची पद्धत (पैगंबरप्रणाली) एक मूलभूत कायदा आणि अंतिम प्रमाण आहे. (इग्हaत् Aल्ूप्दrग्ूब्) मुस्लिमांमध्ये िंकवा शासन आणि जनतेमध्ये विवाद निर्माण झाला तर निर्णयासाठी कुरआन व हदीस (पैगंबरप्रणाली) चे सहाय्य घेतले जाईल आणि जो निर्णय तेथून होईल त्याला सर्व मान्य करतील. अशाप्रकारे प्रत्येक जीवनव्यवहारात अल्लाहचा ग्रंथ आणि पैगंबर प्रणालीस प्रमाण, युक्ती आणि अंतिम निर्णय मानणे इस्लामी जीवनव्यवस्थेची अनिवार्य विशेषता आहे जी त्यास अधर्मावर अधारित जीवनव्यवस्थेपासून (असत्यावर आधारित) स्पष्टत: विलग करते. ज्या जीवनव्यवस्थेत या गोष्टींचा अभाव आढळतो निश्चितच ती जीवनव्यवस्था गैरइस्लामी जीवन व्यवस्था आहे.
९०) कुरआन केवळ कायद्याचेच ग्रंथ नाही तर शिक्षण प्रशिक्षण देणारा, उपदेश करणारा, मागदर्शन करणारा व आदेश देणारा ग्रंथ आहे. म्हणून पहिल्या वाक्यात (आयत) जे वैधानिक सिद्धान्त सांगितले गेले होते, या दुसऱ्या वाक्यात त्याचे मर्म आणि निहित हित समजावून सांगितले गेले आहे. यात दोन मुख्य गोष्टी आहेत. एक म्हणजे वरील चारही सिद्धान्ताचे अनुपालन करणे ईमानची अनिवार्यता आहे. मुस्लिम होण्याचा दावा करणे आणि या सिद्धान्तांशी प्रतारणा करणे हे दोन्ही एके ठिकाणी एकत्रित होऊ शकत नाही. दुसरी  महत्त्वाची  गोष्ट  म्हणजे  या  सिद्धान्तावर  आपली  जीवनप्रणाली  निश्चित  करण्यावरच मुस्लिमांचे भले होणार आहे. केवळ हीच एक बाब त्यांना जगात सरळमार्गावर कायम ठेवू शकते आणि यानेच त्यांचे परलोक जीवन सफल होईल. हा उपदेश आणि मार्गदर्शन ठीक या व्याख्यानानंतर लगेच आले आहे ज्यात यहुदी लोकांच्या नैतिक, धार्मिक दशेची समीक्षा केली गेली आहे. अशाप्रकारे अतिसूक्ष्म पद्धतीने मुस्लिमांना सचेत करण्यात आले आहे की तुमच्या पूर्वीचा अनुयायीसमाज (यहुदी) जीवन धर्माच्या या मूलभूत सिद्धान्तांशी विमुख झाला होता आणि ज्या विनाशाच्या खाईत ते पडले होते त्यापासून तुम्ही धडा घ्यावा. जेव्हा एखादा लोकसमूह अल्लाहचा ग्रंथ आणि त्याच्या पैगंबराच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करतो आणि अशा नेत्यांच्या आणि गुरुंच्या मागे लागतो जे अल्लाह आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांचे आज्ञापालन करीत नाहीत; तसेच जो आपले धार्मिक गुरु आणि राजनैतिक शासकांचे आज्ञापालन करतांना कुरआन व पैगंबरप्रणालीचे प्रमाण त्यांच्याकडून मागत नाही आणि तसेच डोळे बंद करून त्यांचे आज्ञापालन करतो. अशा स्थितीत तो त्या विनाशाच्या खाईत लोटला जातोच ज्यात पूर्वी बनीइस्राईल (यहुदी) पडले होते.
९१) येथे `तागूत' म्हणजे तो शासक आहे जो अल्लाहच्या आदेशांचे पालन न करता कुण्या दुसऱ्या नियमांचे पालन करतो आणि त्यांच्यानुसार निर्णय घेतो. ही न्यायव्यवस्थासुद्धा गैरइस्लामी न्यायव्यवस्था आहे जी अल्लाहच्या प्रभुसत्तेचा स्वीकार करीत नाही आणि कुरआनला अंतिम प्रमाण मानत नाही. म्हणून ही आयत स्पष्टोक्ती आहे की जे न्यायालय `तागूत'चे स्वरुपधारण करून आहे त्यांच्याकडे आपल्या जीवनव्यवहाराच्या निर्णयासाठी दाद मागणे ईमानविरुद्ध आहे. अल्लाह आणि कुरआनवर ईमान आणण्याची निकड आहे की ईमानवंताने अशा न्यायालयाला योग्य मानू नये. कुरआननुसार अल्लाहवर ईमान आणि `तागूत'चा अस्वीकार दोन्ही एक दुसऱ्यासाठी अनिवार्य आहे. तसेच अल्लाहसमोर नतमस्तक होणे आणि `तागुत' च्या समोरसुद्धा नतमस्तक होणे `दांभिकता' व `कपटाचार' आहे.

चोरीला गेलेला फोनमुळे थोडा अधिक हतबल झालेला मी. पण मंत्रालयातून राफेलची कागदपत्रे चोरीला जातात हे वाचून-ऐकूण मात्र जरा धिरावलो. जिथे मंत्रालय सुरक्षा व्यवस्थेतून अती महत्त्वाची फाईल चोरीने गायब होऊ शकते तिथे माझ्या सारख्या पामराच्या फोनचं काय? पण फोनमधील डाटा, इतर कॉन्टॅ्नट मिळविता येतील. राफेलच्या फाईलची पण या पेपरलेस जगात सॉफ्ट कॉपी, हार्ड कॉपी वगैरे असेलच, असा टे्ननोसॅवी विचार करून मी शांतलो. सध्या तरी टिव्हीचं भडकाऊ भूत आणि मीडियाच्या भयभीत करणाऱ्या अफवा, मॅसेजेस पासून स्वतःला दूर ठेवलंय. 
नाहीतर उथळ उन्मादल्या देशभक्तीचा गौरव पुलवामा नंतर बक्कळ आदळत होता. नको असलेली युद्ध सदृश्य स्थितीही पाकिस्तानशी अन् संशयी नजरेने हलाल मात्र मुस्लिम पोरं - पानपट्टी जवळच्या पान पिचकाऱ्यात सुद्धा टग्या तरूणाईने युद्धाला आम्ही सिद्ध आहोत, हे मीडियावरून पसरवलच होतं. बर झालं की फोन हरवला. सुटलो, तुडूंब ट्रोलनी. शहिदांच्या स्मृतीचा गौरव आणि मनापासूनचा अभिमान नक्कीच. पण डिजिटल पोस्टरवरून पक्ष प्रचाराचे फेसव्हॅल्यू नामंजूर हमेशा. सख्या मित्रांसोबत बोलतांना सुद्धा आधी विचार करून बोलावे लागणे ही अघोषित मुस्कटदाबीची लक्षणे नव्हेत? हिंदूत्व आणि भांडवलदाराच्या अजेंड्यावर नेमके आपणच टार्गेट आहोत. हे कळूनसुद्धा अजून बेफिकीरीचा आळस मात्र सुटत नाही. आठवड्या दर आठवड्याला एक नया अ‍ॅपीसोड ठरवून मनू मनाप्रमाणे सगळं व्यवस्थित घडवलं जातं. समस्यांना नडवलं जातं अगदी मुस्लिम म्हणून. मुसलमानांच्या बाजूने गळे काढणाऱ्यांना देखील मूळ प्रश्नांची जगण्याची दखल घ्यावीशी वाटत नाही. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक मांडणीचे उभे असलेले पर्याय तळागाळातल्या भयभीत मुस्लिमांपर्यंत पोहोचविण्याची धडपड होताना दिसत नाही. लुटीपूटीच्या हंगामी संवेदना तात्काळ प्रतिक्रिया, तात्पुरता अभिनिवेश एवढेच काही स्पष्ट दिसते. पुरेझाले आता. हे सगळं लिहायला कागद घेतल्यावर माय सावित्रीची आठवण होतेय... फातिमांचा उल्लेख कुठेच नाही आढळत. 
विवेकाच्या बाजूने लढणाऱ्या, सनातण्यांच्या गोळ्यांनी शहीद होणाऱ्यांच्या नावांत ’सफदर हाश्मी’ वगैरे बाजूलाच राहतात. (की ठेवले जातात). माझा गोतावळा म्हणून उराउरी भेटावे किंवा कवटाळावं तरी छुप्या दुरत्वाचा जवळून वास येतो. आपली लोकप्रिय, प्रसिद्धी, आपला पैसा, पद, कोकलून मिळवलं की समाजसमूहाच्या भितीभावाशी तुटणे हे सगळ्यांचेच लक्षण झाले आहे. 
फर्ज अदा करणे, धर्म पाळणे या गोष्टी प्नया इमानी खऱ्या. त्याचबरोबर संभ्रमित केलेली अस्मिता, मुद्दामहून पुसली गेलेली प्रतिके, अंधारात दडपून ठेवलेली बलस्थाने, शिक्षणाचा अखंड जागर यांची चर्चा ऐरणीवर आली पाहिजे. ’लोहा गर्म है तो हातोडा डालो’ असं ऐकलय. घुसमट घुसळणीच्या काळात स्वतःच्या जाणिवा मारून जपणाऱ्या समाजाला जागं करण्याची  हीच वेळ आहे. नाहीतर पुन्हा तेच आठवड्याला नवीन मुद्दा, सुड घेतल्याप्रमाणे वागणारे आसपासचे बांधव, पुन्हा-पुन्हा तोच रडीचा डाव.
नजीबला हरवून कित्येक वर्ष झालीत. पुण्यासारख्या शहरातून मॉबलिंचिंगमधून, गोरक्षणाच्या भंपक कारणांवरून किंवा निव्वळ खोट्या अफवांवरून मुसलमान किंवा निव्वळ खोट्या अफवांवरून मुसलमान म्हणून मारल्या गेलेल्या जीवांना न्याय नाही मिळत. मारणाऱ्यांना जानि आणि सन्मान मिळतोय. हा मूळ हुद्दा नको का रेटायला?
सत्ताधिशांनी शेवटचं आश्रय म्हणून युद्धजन्य वीररसी, पाकिस्तानीद्वेषी जहर सर्वसामान्यांना पाजलाच आहे. मंदिर-मस्जिदीचा पत्ता वाया गेला म्हणून हा हुकमीजहरी एक्का फेकलाय. स्मृती जाग्या ठेवा. मेंदूला झोप येऊ नका देऊ. सगळ्या घटनांची साखळी जोडली की साखळी आपल्याच मानेभोवती, स्वातंत्र्याभोवती घट्ट गुंडाळली जाते हे कळेल. ’द हिंदू’ पेपर्सचे एन.राम त्यांना परवडत नाही. केवळ माझ्याहून अधिक ताकदीने लिहिण्या-वाचणाऱ्यांची जागृती चळवळ न बनता, गल्लीमोहल्ल्यातून, वाड्यावस्त्यांंतून स्वतःच्या उन्नतीचा दिया’ स्वतःच पेटवला पाहिजे. 
सजग भान, सच्चपेणाची जाणीव आणि उपरेपणाच्या दुय्यमत्वाला लाथ मारून मानवतेच्या बोथट संवेदनेला साद घालायला हवी. आपण अधिक सूज म्हणून सूज्ञपणे उद्याच्या निवडणुकांच्या बाजारात आपलं ’भारतीय जगणं’ लोकशाही संविधान मूल्य जपूया... विवेकी विचारांनेच सगळं बदलू शकतं, बदल आवश्यक... बस् इतकेच!
मै कागज की तकदीर पहचानता हूं
सिपाही को आता है तलवार पढना
किताबें रिसाले न अखबार पढना
मगर दिल को हर रात इकबार पढना

- साहिल शेख

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget