Halloween Costume ideas 2015

मुस्लिम समाजातील मुलांनी शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करावे – नवाब मलीक

‘सामाजिक समतेचा प्रवाह’ या प्रा. बेन्नूर स्मृतीग्रंथाचे प्रकाशन : अरफा

 

मुंबई-
स्वत:च्या विकासासाठी शिक्षण आवश्यक आहे. शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत होतो. समाज सुसंस्कृत होतो म्हणून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण घेण्यासाठी मुस्लिम  समाजातील मुलांनी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे॰ गरिबी असली तरी शिक्षण अर्धवट सोडू नका, विज्ञानयुगामध्ये शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. समाजाच्या विकासासाठी शिक्षण  आवश्यक आहे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी मंत्री, राष्ट्रीय प्रवत्तेâ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवाब मलीक यांनी केले.
बीड मायनॉरिटी वेल्फेअर ट्रस्ट मुंबईच्या वतीने मदरसा अन्वरुल कुरआन, कुर्ला येथे २३ जानेवारी २०१९ रोजी मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांच्या कलाहुणांना चालना देण्यासाठी आणि  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, त्या प्रसंगी नवाब मलीक बोलत होते.
ट्रस्टचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य के. ए. सय्यद सर यांच्या अथक परिश्रमाने कुर्ला जागृतीनगर परिसरातील गोरगरीब समाजाबरोबरच मुस्लिम समाजासाठी माता  सावित्री / फातिमा सार्वजनिक वाचनालयाची मोफत सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सय्यद सर म्हणाले, वाचनाने मस्तक सुधारते, ते  कोणापुढेही नतमस्तक होत नाही. वयाला हरवायचे असेल तर वाचनाचा छंद जोपासला पाहिजे. वाचनामुळे जीवनात मौज आहे. नाही तर समस्या रोज आहेत. सय्यद सरांनी  विद्यार्थ्यांना वाचनाचे आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
धार्मिक शिक्षणाबरोबरच आधुनिक शिक्षणाची गरज आहे. मुलींनीसुद्धा चांगल्या पद्धीतने शिक्षण घेऊन जुन्या चालीरिती दूर केल्या पाहिजेत. समाजाची शिक्षश्रणाची टक्केवारी वाढविली  पाहिजे, असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या विशेष अतिथी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सदस्य मुनिसा आबेदी यांनी केले. पाहुणे आणि ट्रस्टचे अध्यक्ष सय्यद सर, पदाधिकारी अस्लम पठाण, गणी सय्यद, करीम शेख यांच्या हस्ते ५० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी महाराष्ट्र नाईट हायस्कूल एज्य. कॉलेजचे प्राचार्य सुनिल पाटील, शकूर सय्यद, लियाकत भाई, अकबर खान, मुख्तार सय्यद, राजूभाई, मिलिंद केदारे यांचे अनमोल  सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती नसीम खान यांनी केले तर एजाज सय्यद यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget