Halloween Costume ideas 2015

बुरखा प्रगतीरोधक नाही

बुरखा म्हणजे काय व कशासाठी? हे जाणून घेणे आवश्यक आह़े बुरखा प्रयोजनामागील भूमिका जाणून घेतल्याशिवाय त्याचे फायदे व तोटे लक्षात येणार नाही़त ते समजून घेतल्यानंतर  आम्हाला कोणत्या दिशेने प्रगती करावयाची आहे, हे निश्चित करता येईल व बुरखा प्रगतीस अडथळा निर्माण करतो किंवा नाही याबद्दल निर्णय देता येई़ल॰ ‘हिजाब’ या अरबी शब्दाचे  उर्दू भाषांतर ‘परदा’ असे करण्यात आले आह़े ‘हिजाब’ हा शब्द कुरआनोक्तीतून घेण्यात आला आह़े त्या आयतीत अल्लाहने पैगंबर मुहम्मद (सल़्ल) यांच्या घरात नि:संकोचपणे ये-जा  करणाऱ्यांना मनाई केल़ी घरातील महिलांकडून काही हवे असेल तर ते पडद्याआडून मागावे, असे आदेश देण्यात आल़े याच आदेशाच्या अनुषंगाने बुरखापद्धत अस्तित्वात आल़ी तद्नंतर  बुरख्यासंबंधात आलेल्या इतर आदेशांना बुरख्याचे आदेश (अहकामे हिजाब) असे संबोधण्यात आल़े बुरखाबाबतच्या आदेशाचें तपशीलवार वर्णन कुरआनच्या चोवीस व तेहतीस या दोन  अध्यायात (सूरहमध्ये) दिले गेले आह़े ज्यात म्हटले आहे, ‘‘ महिलांनी आपल्या घरात मोकळेपणाने व थाटाने वावराव़े इस्लाम धर्माच्या प्रसारापूर्वीच असभ्य राहणीमान सोडून द्यावे व  नटून सजून आपल्या सौंदर्याचे सर्वत्र प्रदर्शन करत फिरू नय़े घराबाहेर जाताना डोक्यावर एक चादर पांघराव़ी ज्या दागिन्याचे मधुरनाद (ध्वनि) निर्माण होत असल असे दागिने काढून  ठेवावे़त घरातील सदस्यांसमोर वावरताना विशेष खबरदारी बाळगाव़ी ज्यांच्याशी विवाह करता येतो (गैरमहरम) अशा नातेवाईकांसमोर शृंगार करून जाण्याचे टाळाव़े घरातील आप्तजना  (महरम) समोर जातानासुद्धा आपल्या वक्षस्थळावर ओढनी (दुपट्टा) पांघरून आपले संपूर्ण शरीर आच्छादित होईल असे वस्त्र धारण कराव़े’’ पुरूषांना आदेश देण्यात आले आहेत, ‘‘त्यांनी  आपल्या आयाबहिणींच्या खोलीत जाताना परवानगी द्यावी जेणेकरून अचानक प्रवेशाने बेसावध बसलेल्या महिलांवर खजील होण्याची पाळी येणार नाह़ी’’ यालाच ‘परदा’ (बुरखापद्धत) म्हणता़त॰ पैगंबर मुहम्मद (सल़्ल) यांनी याबाबत अधिक खुलासा करताना म्हटले आहे, ‘‘स्त्रियांनो, आपल्या सख्ख्या भावा व वडिलांसमोर जातानासुद्ध चेहरा, हाताचा पंजा व  घोट्यापर्यंत पायाव्यतिरिक्त संपूर्ण शरीर वस्त्राने आच्छादित करूनच जाव़े असे पारदर्शक व घट्ट वस्त्र धारण करू नये की ज्यातून शरीर प्रदर्शन घडेल, तसेच आपल्या घरातील  आप्तजनां (महरम) शिवाय इतर कोणत्याही नात्याच्या पुरूषासोबत एकांतात बसू नय़े’’ पैगंबरांनी स्त्रियांना सुगंध (अत्तर वगैरे) लावून घराबाहेर जाण्याबाबतही मनाई केलेली आह़े  मस्जिदीत महिलांना नमाज पढण्यासाठी वेगळ्या जागेची व्यवस्था करण्याचे आदेश दिले होत़े एकाच रांगेत स्त्री- पुरूषांनी नमाज अदा करण्यास अनुमती नाकारण्यात आली आहे नमाज  अदा झाल्यानंतर महिला निघून जाईपर्यंत पैगंबर मुहम्मद (सल़्ल) व इतर मुस्लिम पुरूष मस्जिदीत आपल्या बसल्या ठिकाणावरून उठत नस़त या आदेशाची कुरआनातील सूरह  (अध्याय) नूर व अहजाब आणि पैगंबराच्या आदेशा (अहादीस)मध्ये पडताळणी करता येई़ल बुरख्यामध्ये हल्ली बरीच विविधता दिसून येत़े मात्र बुरख्याबाबतच्या मूळ तत्त्वात व  उद्देशांत फरक झालेला नाह़ी मी कोणाचे नाव घेऊ इच्छित नाही, मात्र मला सांगावेसे वाटते की जे लोक सांगतात की ‘बुरखा आमच्या प्रगतीच्या मार्गात अडथळा निर्माण करतो,’ ते  दुंतोडीपणाचे धोरण प्रगट करीत आहे़त त्यांचे वक्तव्य अल्लाह व पैगंबर मुहम्मद (सल़्ल) यांच्या विरोधात आह़े दुसऱ्या शब्दांत सांगायचे म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार, अल्लाह
व पैगंबर मुहम्मद (सल़्ल) यांनी आमच्या प्रगतीच्या मार्गात अडथळा निर्माण केले आहे़त खरोखर आम्ही जर अशा प्रकारचे विचार बाळगत असू तर आम्ही स्वत:ला मुस्लिम कसे  मानावे?
ज्या अल्लाह व पैगंबर मुहम्मद (स.) यांनी असा अन्याय केला आहे ते त्यांच्यापासून पूर्णत: अलिप्त का होत नाहीत? अल्लाह व पैगंबर मुहम्मद (सल़्ल) यांनी बुरख्याचा आदेश  दिलेलाच नाही, असे म्हणताच येणार नाह़ी मी आताच सांगितले आहे की, ज्याची इच्छा असेल त्याने कुरआन वा हदीसचे अध्ययन करू शंकासमाधान करून घ्याव़े एखाद्यास हदीसच्या  अध्ययनाने समाधान होत नसेल तर त्यांनी कुरआनचे आदेश पडताळून पाहावे़त बुरखा पद्धतीबाबत थोडे बारकाईने अभ्यास केल्यास तीन महत्त्वाचे उद्देश लक्षात येती़ल
(१) पुरूष व स्त्रियांच्या चारित्र्यांचे रक्षण करण्यात यावे व अशा दुर्वर्तनांपासून त्यांना अलिप्त ठेवावे, जे स्त्री-पुरूषांच्या स्वैर सहजीवनामुळे निर्माण होता़त
(२) स्त्री-पुरूषांचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यात याव़े नैसर्गिकरित्या जी कर्तव्ये स्त्रियांनी पार पाडावयाची आहेत ती त्यांनी निश्चितपणे पार पाडावीत व ज्या जबाबदाऱ्या पुरूषांच्या वाट्यास  येतात त्या त्यांनी व्यवस्थितपणे पूर्ण कराव्या़त
(३) कुटुंबव्यवस्था मजबूत व सुरक्षित कराव़ी कुटुंबव्यवस्था जीवनाच्या इतर व्यवस्थांपेक्षा अधिक महत्त्वाची बाब आह़े बिनबुरख्याच्या कुटुंबव्यवस्थेने महिलांना कुटुंबात गुलामांचा दर्जा प्राप्त झाला आह़े त्या सर्व प्रकारच्या हक्कांपासून वंचित झाल्या आहे़त तसेच ज्यांनी महिलांना त्यांचे हक्क तर दिले आहेत मात्र बुरख्याच्या बंधनातून मुक्त ठेवले आह़े, अशा कुटुंबाची  व्यवस्था अस्तव्यस्त झाली आह़े इस्लाम स्त्रियांना सर्व अधिकारसुद्ध देऊ पाहतो, त्याचबरोबरच घरातील व्यवस्थाही सुरक्षित ठेवू इच्छित़ो हे केवळ बुरखापद्धतीचा अवलंब केल्यानेच  शक्य होऊ शकत़े मी आपणांस विनंती करते की आपण कृपया उपरोक्त तीन उद्देशांवर शांतपणे विचार कराव़ा चारित्र्यरक्षणाचा समस्येबाबत जर कोणी उदासीन असेल तर त्यांच्या  बाबतीत मी काही करू शकत नाह़ी जे चारित्र्याबाबत गंभीर आहेत त्यांनी विचार करायला हवा की ज्या समाजात स्त्रिया नटून थटून-स्वैराचरण करत असतील व पुरूषांसोबत सर्वच  क्षेत्रात एकत्र काम करीत असतील तर तेथील लोकांचे चारित्र्य कसे व कुठवर सुरक्षित राहू शकेल? आपल्या देशात जसजशी स्वैराचारी परिस्थिती निर्माण होत आहे तसतशी लैंगिक  अपराधांची संख्या वाढत चालली आह़े त्याबाबत वर्तमानपत्रात आपण रोजच वाचत असत़ो बुरखा पद्धतच लैंगिक अपराधाचे मूळ कारण आहे, तसेच बुरखा न राहिल्यास लोकांमधील  स्त्रियांबद्दल कुतूहल व आकर्षण आपोआप कमी होईल, असे म्हणणे व मानणे साफ चुकीचे आह़े ज्या काळात बुरखा पद्धत नव्हती त्या काळातसुद्धा लैंगिक आकर्षण कमी झाले नव्हत़े  त्यांच्या वासनासक्तीने चरमसीमा गाठली होत़ी नम्रतेने समाधान होत नव्हते, म्हणून उघडपणे कामक्रीडा होऊ लाली व आता तर लैंगिकसंबंधाचे परवाने देऊन ही वासनात्मक भूक शमण्याचे चिन्ह दिसत नाह़ी अमेरिका, इंग्लंड व इतर देशांच्या वर्तमानपत्रात अनेक लैंगिक अपराधांबाबतच्या बातम्या प्रसिद्ध होत असता़त ही समाधानकारक परिस्थिती मानली जाईल  काय?
ही केवळ वैयक्तिक चारित्र्यची समस्या नसून संपूर्ण सामाजिक संस्कृतीचा प्रश्न बनला आह़े समाजात सहजीवनाची प्रथा जितकी जास्त वाढत आहे तितकाच जास्त स्त्रियांच्या शृंगारिक प्रसाधनाचा खर्च वाढत जात आह़े हा वाढता खर्च काबाडकष्ट करून मिळालेल्या रास्त कमाईने पुरा होत नाही म्हणून लाच, अफरातफर व इतर भ्रष्टाचाराने वाढता खर्च पूरा केला जात  आह़े त्यामुळे पूर्ण समाज पोखरला जात आह़े कोणत्याच कायद्याची योग्यरित्या अंमलबजावणी होऊ शकते नाह़ी जे लोक आपल्या स्वत:च्या इच्छांवर ताबा ठेवू शकत नाहीत ते  दुसऱ्यावर शिस्तीचे नियम कसे लागू करू शकतील? जो आपल्याच कौटुंबिक जीवनात विश्वासपात्र नसेल तो समाज व देशाशी एकनिष्ठ कसा राहू शकेल?
स्त्री-पुरूषांचे कार्यक्षेत्र वेगळे असावे ही एक नैसर्गिक व्यवस्था आह़े स्त्रीला मातृत्वपद देऊन तिचे कार्यक्षेत्र दाखवून देण्यात आले आह़े पुरूषाला पितृत्वाचा अधिकार देऊन इतर जबाबदाऱ्या  त्याच्यावर सोपविण्यात आल्या आहे़त स्त्री-पुरूषांच्या शरीररचनेत आवश्यक ते फरक निर्माण करून, दोहोंना वेगळी मानसिकता, शारीरिक क्षमता व गुण प्रदान करण्यात आले आहे़त मातृत्वाची जबाबदारी कौशल्याने पार पाडता यावी म्हणून तिला अधिक संयम व सहनशील प्रवृत्ती प्राप्त झाली आह़े तिच्या ममत्व व कोमल भावनांमुळे बालकांचे संगोपण व  पालनपोषण अत्यंत सहृदयपणे पार पाडले जात़े पुरूष त्या मानाने कणखरवृत्तीचा असत़ो त्याच्यावर कुटुंबाच्या रक्षणाच्या व उदरनिर्वाहाच्या कठीण जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या आहे़त  स्त्री - पुरूषांचे नैसर्गिक कार्यक्षेत्र वाटप जर आपणास मान्य नसतील तर जगास मातृत्वाला मुकावे लागेल व परिणामत: संपूर्ण मानवसमाज हैड्रोजन वा अणुबॉम्बविना संपुष्टात येई़ल  स्त्रियांनी मातृत्वाच्या नैसर्गिक जबाबदारीबरोबरच पुरूषांसह राजकीय, आर्थिक, औद्योगिक व इतर जबाबदाऱ्या पार पाडाव्यात अशी अपेक्षा करणे म्हणजे महिलांवर अन्याय व अत्याचार  करणे आह़े मानवजातीच्या उत्पत्ती व सेवा - शुश्रुसेची संपूर्ण जबाबदारी ती एकटीच पार पाडीत असत़े त्यात पुरूषांचा काडीमात्र सहभाग नसत़ो या उलट पुरूषांच्या जबाबदारीतही तिने  सहभागी व्हावे व कितपत न्याय्य ठरेल?
स्त्रियांनी परिस्थितीनुरूप अन्यायकारक जबाबदाऱ्यांचा स्वीकार केला आह़े एवढेच नव्हे तर आता तर अधिकाधिक सामाजिक स्वातंत्र्य व अधिकार मिळविण्याकरिता त्यांनी सामूहिक चळवळी सुरू केल्या आहे़त आपण मातृत्वाचा उपहास केला आह़े गृहणीचा अपमान केला आह़े महिलांनी घरात राहून केलेल्या सेवा-शुश्रुसेला तुच्छ लेखले आह़े तिच्या सेवाकार्याचे महत्त्व पुरूषांचे राजकारण, उद्योगधंदे व युद्धच्या जबाबदाऱ्यांपेक्षा कमी मानता येणार नाह़ी बिचाऱ्या स्त्रियांनी विवश होऊन पुरूषांच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहे़त पुरूषांची कामे न केल्यास  तिला सन्मानजनक वागणूक देण्यास पुरूष तयार होत नव्हत़ा इस्लामने महिलांना घरगुती स्त्रीसुलभ जबाबदाऱ्या पार पाडण्याचा आदेश दिला होत़ा मातृत्व व बालकांच्या संगोपनाच्या  उदात्त कार्यामुळे तिला समाजात सन्मानजनक स्थान प्राप्त होत़े मात्र आता कुटुंब व्यवस्थेबाबतचा आपला दृष्टिकोनच बदलत चालला आह़े आपला आग्रह आहे की स्त्रियांनी मातेची  कर्तव्ये पार पाडावीत, त्याबरोबरच तिने उच्चशिक्षण प्राप्त करून मॅजिस्ट्रेटसारखे पद भूषवावे, पुरूषांच्या मनोरंजनासाठी नृत्य व संगीताच्या महफिलीही सजवाव्या़त अशा अनेक  प्रकारच्या कामांचे ओझे तिच्यावर लादले गेल्यामुळे ती एकही जबाबदारी पूर्णत: समाधानकारकपणे पार पाडू शकत नाह़ी ज्या कामाकरिता तिचा जन्म झालेला नाही, जे तिच्या शरीराला  पेलवणार नाही, जे तिच्या व्यक्तिमत्वाला शोभणार नाही अशी कामे तिच्यावर सोपवण्यात आली आहे़त मात्र तिचे कौतुक झालेच तर ते केवळ तिच्या सौंदर्य व स्त्रीत्वामुळचे होते!

– सय्यद परवीन रिजवी

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget