Halloween Costume ideas 2015

दुबईत भरला कोकणी महोत्सव


दुबई
11 जानेवारी 2019 रोजी सबीना खोत शेख, रितू सिसोदिया द्वारा कोकण मेळा सीझन-टू चे अ‍ॅम्फी जुबैल पार्क दुबई येथे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कोकणच्या पारंपारिक  वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आलेले होते. यामध्ये सांदन, खजूरी, रोट, घावणे, दुदेरी, कोकम, सानगे आदींसह अनेक घरेलू खाद्य प्रकार मांडण्यात आले होते.
या मेळाव्यात कोकणच्या संस्कृतीची झलक दाखविणारे अनेक कार्यक्रम सादर केले गेले. या मेळाव्याला कोकण बँकेने प्रायोजित केले होते. याप्रसंगी चेअरमन मुजीब मुल्ला आणि त्यांच्या बोर्ड ऑफ डायरे्नटर्सची भारतीय टीम प्रमुख आकर्षण होती. या मेळाव्यामध्ये 12 हजारांपेक्षा जास्त कोकणी लोकांनी जगाच्या विविध देशातून येऊन आपली उपस्थिती नोंदविली.
या प्रसंगी मास्टर शेफ पद्मश्री संजीव कपूर यांनी खास कोकणी व्यंजने तार केलेले होते. मेळाव्याचे प्रमुख पाहूणे म्हणून एच.ई. सोहेल अल जरूनी आणि स्वित्झरलँड येथून आलेले  पाहूणे होते. या मेळाव्याला केसीसी आई डोनीअर दुबई, मरहबा सर्व्हीसेस, हॅशटॅग टुरीझम, लक्षरी कार रेंटल, अल माहीर प्रिंटींग, रोडा-अल-बस्तान, एव्हरग्रीन फुड्स स्टफ, 106.2 बिग  एफएम, झी 24 तास, इत्यादींचे सहकार्य लाभले होते.

- फेरोजा तस्बीह
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget