मधमाशी दिसायला अगदी लहान असते पण तिची कामे फार मोठी असतात. आपण तिच्या कामाचे विचार केले तर आपल्याला तिची योग्यता आश्चर्यचकित करते. तिचे खास काम मध तयार करणे होय, जे खूप गोड असते, आणि ज्यामध्ये औषधी चे गुण असतात. चला तर मग चिंतन करूया. आणि मध बनवण्याच्या प्रक्रियेला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. या प्रक्रियेमध्ये बहुतेक माशा असतात, ज्यामध्ये राणीमाशीला सर्वाधिक स्थान असते. ती पूर्ण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवते. असे समजा की ती इतर माशांची नेता आणि मार्गदर्शक असते. राणीमाशी इतर कामगार माशांपेक्षा वेगळी असते. तिचा शरीर इतर माशांपेक्षा मोठा असतो. इतर माशा राणीमाशीसाठी अन्न तयार करण्याचे काम (आतील पान 7 वर)
करतात. त्याशिवाय, विविध माशांच्या वेगवेगळे काम असतात, जो राणीमाशीने त्यांना दिलेली असतात. राणीमाशीचे खरे कार्य हे आहे की ती तीन आठवड्यांमध्ये सुमारे 11 ते 12 हजार अंडे घालते. या अंड्यांचे संरक्षण करण्याचे काम इतर माशांचा एक गट करतो. आणि एक समूह तो असतो, जो अंड्यांमधून - बाहेर पडलेल्या बाळांची देखभाल आणि प्रशिक्षण करतो. काही माशा पोळा बनवतात, तर काही संरक्षणाची कामे करतात. रक्षक माशा कोणत्याही अनोळखी व्यक्तीस पोळयात येऊ देत नाहीत. काही माशांचा समूह तो असतो जो सैनिकाची भूमिका बजावतो. त्याचे काम शत्रूंशी सामना करणे असते आणि पोळयाचे रक्षण करणे हेसुद्धा त्याच गटाची जबाबदारी असते. काही माशा रस ओढून आणतात, काही मध आणि मोमचा पोळा बनवण्याचे काम करतात.
या माशांमध्ये नकाशा बनवण्याची क्षमता असते, जशी गूगल मॅपमध्ये असते. या माशा सूर्यप्रकाश आणि पृथ्वीच्या चुंबकीय ताकतचे वापर करून कठीण नकाशा बनवू शकतात. आणि आपल्या पोळयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तयार करतात. एखादी दुसरी माशी राणीमाशी बनण्याची इच्छा व्यक्त करत असेल तर तिला मारले जाते. या माशा स्वच्छ असतात, स्वच्छ वस्तूंपासून अन्न बनवतात, अस्वच्छ वस्तूंवर बसत नाहीत, आणि कोणालाही हानी पोहोचवत नाहीत.
एक हदीस आहे ज्यामध्ये मानवाचे उदाहरण मधमाशी सारखे दिले आहे. हदीस हे आहे की, ‘माणसाचे उदाहरण त्या मधमाशीप्रमाणे आहे, जी पवित्र वस्तू खाते आणि पवित्र वस्तू उत्पन्न करते. ती जेथे बसते तेथे ती ना तोडते, ना बिघडवते (मुस्नद अहमद)’.
खरोखरच, माणसाचे उदाहरण त्या मधमाशीप्रमाणे आहे जे माणूस स्वच्छता आणि पवित्रता पसंत करतो, मेहनती असतो, आणि स्वतःचा मार्ग शोधतो. अल्लाहने दिलेल्या बुद्धीचा वापर करून, आपले ध्येय गाठतो, मग ते या जगाचे ध्येय असो किंवा परलोकाचे.
तो माणूस नफा देणारा असतो, लोकांच्या भल्यासाठी कार्य करीत असतो, आणि लोकांना नफा पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतो, अगदी त्या मधमाशीप्रमाणे जी मेहनत करून रस ओढून आणते. तो संघटनेत राहतो, संघटनेशी जोडलेला राहतो, एकटे भरकटत नाही, आपल्या प्रमुखांच्या(अमीर) आज्ञेचे पालन करतो.
जर संघटनेच्या संरचनेत काही त्रुटी दिसली तर तो ती सुधारण्याचा प्रयत्न करतो. जर कोणी त्रुटी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो तर त्याला योग्य मार्गावर आणतो. जर कोणी शत्रू संघटनेच्या संरचनेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर त्याला आपला शत्रू समजून त्याचा नाश करतो.
खरोखर, एका माणसाची आणि खऱ्या व्यक्तीची अशी गुणधर्म असावी की तो प्रमुखाचे आज्ञा पालन करतो, कारण प्रमुखाचे आज्ञापालन हे रसूलल्लाह (सल्ल.) चे आज्ञापालन आहे, आणि रसूलल्लाह (सल्ल.) चे आज्ञापालन करणे हे अल्लाहचे आज्ञापालन आहे.
आणि जो कोणी अल्लाहचे आज्ञा पालन करतो, तो खरेच या जगात आणि परलोकात यशस्वी होतो, कारण जीवनाचा खरा उद्देश अल्लाहचे आज्ञा पालन आहे, त्याची बंदगी आहे, त्याच्यासमोर नतमस्तक होणे आहे, त्याच्याशी प्रेम करणे आहे, त्याच्याशी मागणे आहे, त्याच्यासाठी जगणे आहे, आणि त्याच्यासाठीच मरणे आहे.
ज्याप्रमाणे मधमाशी मध बनवण्याचे कार्य करते, फुलांचा रस ओढते, ज्यामध्ये उपजिविका आहे आणि औषध देखील आहे, तसाच एक माणूसही लोकांची भूक आणि तहान मिटवण्याचे कार्य करतो,लोकांच्या दुःखांची वेदना कमी करणारा बनतो.
अगदी त्याचप्रमाणे एक नेक व्यक्ती आणि इमानवंत बंधू, कुरआनावर विचार करतो व बुद्धीचा वापर करतो, कानांनी ऐकतो, कुरआणाच्या गोष्टी समजुन घेतो, ज्यामुळे त्याला सत्य प्राप्त होते, कुरआन ऐकून, समजून, बुद्धीचा वापर करून, कुरआनावर विचार करुन आणि अल्लाहशी जवळीक साधून. त्याला अल्लाह मिळतो, तो अल्लाहशी प्रेम करतो, त्यांचे जीवन पवित्र होते. तो लोकांना भल्याचा आदेश देतो आणि वाईटापासून दूर ठेवतो. एक शिस्तबद्ध जीवन जगतो आणि खोटे आणि वाईट कामांपासून दूर राहतो.
पवित्र कुरआनमध्ये आहे की,’’ आणि पहा, तुमच्या पालनकर्त्याने मधमाशीवर ही गोष्ट दिव्य प्रकटन केली की पर्वतामध्ये आणि वृक्षामध्ये आणि मांडवावर चढविलेल्या वेलीत आपले मोहळ बनव.व प्रत्येक प्रकारच्या फळांचे रस शोषून घे आणि आपल्या पालनकर्त्याच्या सुरळीत केलेल्या मार्गावर चालत राहा. या माशीमधून रंगीबेरंगी एक सरबत निघते जे लोकांकरिता आरोग्यदायी आहे, निश्चितपणे यातदेखील संकेत आहे त्या लोकांकरिता जे गांभिर्याने विचार करतात.(दिव्य कुरआन सुरह: अन नहल: आयत:68,69)
मधमाशीला ही बुद्धी कोणी दिली? स्पष्टच आहे की तिच्या निर्माणकर्ता ने दिली. ही मधमाशी, बुद्धीचा योग्य वापर करून, अल्लाहच्या आज्ञेनुसार लाभदायक काम करते.
अखिल मानवजाती साठी यात खूप मोठा धडा आहे. मानवाला पाहिजे की त्याने या छोट्या मधमाशीपासून धडा घ्यावा, आपल्या बुद्धीचा योग्य वापर करावे, आपल्या क्षमतांचे ओळख करून घ्यावे, आणि त्यांचा अधिकाधिक चांगला वापर करून घ्यावा. एक नीतिमान आणि पवित्र जीवन जगावे, अल्लाहचा दास बनून राहावे, आणि त्याचीच आज्ञा पाळावी. जसे, अल्लाहचे दास बनून मधमाशी अल्लाहच्या आज्ञेचे पालन करते आणि एक पवित्र जीवन जगते. तुमच्या पैकी श्रेष्ठ तो आहे जो लोकांना फायदा पोहचवत असतो. (हदिस)
- आसिफ खान, धामणगाव बढे
9405932295
Post a Comment